Premagandha ... (Part - 4) books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ६)

(आपण मागच्या भागात पाहिलं....
अंजली बाई- "वाह... अजय खुप छान काळजी घेतोस हा अर्चनाची, अशीच काळजी घेत रहा बरं का."
तसं अर्चना त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "हो बाई, अजय खुप काळजी घेतो माझी." 🤗🤗😊😊

यांवर अजय हसू लागला आणि म्हणाला, "हो तर काळजी घ्यावीच लागेल बाई, नाही तर हिला काही त्रास झाला ना तर घरी सगळे मला आरोपीच्या कटघर्‍यात उभे करतील." तसे सगळे शिक्षक हसू लागले, राधिका पण हसू लागली. 😅😅😅 शाळेचा आजचा दिवसही छान गेला.
आता पुढे बघुया... )

शाळा सुटल्यावर राधिका घरी आली. फ्रेश झाली आणि बाहेर येऊन बसली. छान पाऊस पडत होता. पाळण्यावर बसून मस्त ती पाऊस बघू लागली. तीला असं बसून पाऊस बघायला खुप आवडायचा. अचानक तीला शाळेतलं अंजली बाईंचं बोलणं आठवलं. आणि ती विचार करू लागली. "अर्चना आणि अजय किती क्लोज आहेत एकमेकांशी, रोज सोबतच येतात- जातात पण. काय नातं असेल दोघांचं ?🤔🤔 दोघांचं सरनेमही सारखंच आहे. आणि ती एकदमच म्हणाली, "दोघं नवरा बायको तर नाहीत ?" 🤔🤔 तसे तिचे डोळे एकदमच मोठे झाले. 😲😲 "नाही, नाही, मी पण वेडीच आहे. सरनेम सारखं असू शकते. जरूरी नाही की ते नवरा बायकोच असले पाहिजेत." आणि तीने स्वतःचीच जीभ चावली. "पण अजय माझा इतका चांगला मित्र आहे, मग त्याने तरी दोघांचं नातं काय आहे.... हे सांगायला हवं ना मला. मग मी पण तर त्याला विचारू शकते ना..." दुसऱ्याच क्षणाला तिच्या मनात विचार आला. "असं कसं विचारू शकते मी त्याला, दोघं काय विचार करतील माझ्याबद्दल? 🤔🤔 जाऊ दे पण मी का इतका विचार करते त्यांचा?" 🤔🤔 तिने दोन्ही हाताने स्वतःचं डोकं पकडलं आणि गच्च डोळे मिटले. आणि म्हणाली," इsss मी वेडी होऊन जाईन आता विचार करून करून..."

तेवढ्यात मागून आई आली. राधिकाला बघून म्हणाली, "काय गं काय झालं राधी, डोकंबिकं दुखतंय का काय तुझं?" आणि राधिकाच्या डोक्याला हात लावू लागली. तसं राधिकाला हसूच आलं. 😀😀
राधिका- "नाही गं आई, ते मी असंच माझ्या वर्गातल्या मुलांचा विचार करत होती." आणि तीने आईला हाताला पकडून तिच्या बाजूला बसवलं.
आई- "का गं, मुलं खुप हैराण करतात का गं वर्गात. अशी डोक्याला हात पकडून बसलेली ती?"
राधिका- "तसं नाही गं आई, लहान मुलं आहेत ती, त्यांच्या मनात येतील तसे प्रश्न विचारत असतात मला. कधी कधी तर इतकं हसायला येतं ना त्यांचे प्रश्न ऐकून खरंच... खुप छान दिवस जातो माझा त्या मुलांसोबत." ती हसतच म्हणाली. तशी आई पण हसू लागली. आणि राधिका आईला वर्गातल्या मुलांच्या सगळ्या गमती जमती बोलू लागली. दोघीही खुप हसत होत्या. 😀😀

राधिका- "आई, आज मस्त कांदा भजी बनव ना गं, किती छान पाऊस पडतोय ना. कांदाभजी खावीशी वाटतेय आज. मी तुला कांदे चिरून देते चालेल ?" ती लाडात येतच आईला म्हणाली.😊😊
"बरं ठिक आहे, बनवते मी." आई हसूनच म्हणाली. आणि आई किचनमध्ये निघून गेली. आईने राधिकाला कांदे आणून दिले. राधिकाने ते चिरून सोलायला सुरूवात केली. कांदे चिरताना राधिकाच्या डोळ्यांत पाणी येत होते. तिला तसं बघून आई हसू लागली. राधिकालाही हसू आलं. 😊😊😀

आई चिरलेले कांदे घेऊन किचनमध्ये निघून गेली. थोड्या वेळाने भजीचा खमंग वास येऊ लागला. राधिका तो मस्त खमंग वास नाकात ओढून घेऊ लागली. ती उठली आणि किचनमध्ये जाऊ लागली. तेवढ्यात मीरा, मेघा देखील आल्या. त्यांना पण मस्त भजीचा खमंग वास येत होता.
मेघा- "ताई, मस्त खमंग वास सुटलाय गं भजीचा, आई कांदाभजी बनवतेय?"
राधिका- "हो."

तशा मीरा आणि मेघा दोघींनी बॅग हाॅलमध्येच टाकली आणि दोघीही धावतच किचनमध्ये गेल्या. राधिका त्यांना बघून हसू लागली. 😊😊 मीरा ने मागून आईला मीठी मारली. आणि म्हणाली, "My dear mom, आज तू कांदाभजी बनवलीस, waw... मस्त." आणि तीने एक भजी हातात घेऊन तोंडात टाकली. "वाव, सुपर खुपच छान झालंय भजी," ती खाता खाता म्हणाली.

मेघानेही भजी घेण्यासाठी हात पुढे केला तसं राधिकाने तिच्या हातावरच एक फटकाच दिला. आणि म्हणाली, "चला आधी हातपाय धुऊन चेंज करून या दोघींनी, आल्या आल्या लगेच किचनमध्ये धावल्या. चला दोघींनी पण बाहेर." तसं मेघाने तोंड बारीक केलं 🙁😟 आणि म्हणाली, "काय गं ताई तू पण." त्यांना बघून आई आणि मीरा दोघीही हसू लागल्या. 😀😀 दोघीही फ्रेश व्हायला बाहेर निघून गेल्या.
राधिकाने एक भजी घेऊन खाल्ली.
राधिका- "आई, खरंच खुप छान कुरकुरीत झालंय भजी." आई- "बरं..., आवडली ना."
राधिका- "हो खुपच आवडली."
आई- "ठिक आहे, तू चहा बनवायला घे आता, ☕ तुझे बाबा आणि सोनू पण घरी येतील थोड्या वेळात."
राधिकाने चहा बनवायला घेतला. थोड्या वेळाने बाबा आणि सोनाली पण घरी आले. आणि सगळ्यांनी एकत्र बसून रिमझिम पडणारा पाऊस बघत गरमागरम कांदाभजी आणि वाफाळत्या चहाचा ☕☕ छान आस्वाद घेतला.

दुसरा दिवस उजाडला. आज शनिवार होता. राधिका घाईघाईने शाळेत येऊन पोहोचली. थोड्या वेळात अजय आणि अर्चना दोघेही आले. अर्चना बाईकवरून उतरली. ती प्रेगनेन्ट असल्यामुळे हळूहळू चालत येत होती आणि अजय तिच्या मागून येत होता. राधिका उभी राहून दोघांनाही बघत होती. अर्चनाला पायर्‍या उंच असल्यामुळे व्यवस्थित पाय टाकायला जमत नव्हतं. तसं राधिकाने तीला पुढे येऊन हात दिला आणि तीला पायर्‍या चढायला मदत केली.
"थँक्यू यू राधिका" अर्चना हसतच म्हणाली. 😊😊
"यू आर मोस्ट वेलकम" राधिका पण तीला छानशी स्माईल देत म्हणाली. 😊😊

अजय- "अर्चू, आता सुट्टी घे तू आणि घरी आराम कर. कशाला येतेस नुसती त्रास करत ?"
अर्चना- "कसला त्रास मला आणि तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. राधिका आहे आणि सगळेजणं काळजी घेतात माझी."
अजय- "हो गं ते आहेच, पण तुला काही त्रास झाला ना तर घरी सगळ्यांना मलाच उत्तर द्यावे लागेल, कळलं ना."
अर्चना- "नाही रे काही होत नाही मला. एकदम ठिक आहे मी. आणि काही त्रास झालाच तर आहेतच ना सगळे इथे मला सांभाळायला." 😊😊
अजय- "बरं अर्चना बाई." आणि तो हसू लागला. आणि ते आपापल्या वर्गात निघून गेले.

शाळेची मधली सुट्टी झाली. सगळे शिक्षक स्टाफरूममध्ये आले. राधिकाने पाहिलं तर अर्चना एकटीच बसली होती.
अर्चना- "राधिका, ये बस तुझीच वाट बघत होती मी. सोबत नाश्ता करू आपण."
राधिका- "अगं भूक लागली तर खाऊन घ्यायचं ना तू. अशी उपाशी कशाला राहतेस ? त्रास होईल तूला."

अर्चना- "अगं उपाशी कुठे... अजयने मला मघाशीच आॅरेंज ज्युस दिलं होतं प्यायला. म्हणून भूक नाही लागली मला आणि तो पण आता कामानिमित्त बाहेर गेलाय. आता तू आलयस तर करू सोबत नाश्ता."
"ठिक आहे", राधिका हसून म्हणाली.😊😊

अर्चना- "राधिका, मला जरा माझा टिफीन देतेस का ?"
राधिका- "हो देते ना, कुठे आहे सांग आणून देते मी."
अर्चना- "शेवटून दुसऱ्या रँकमध्ये आहे बघ. २१ नंबर लाॅकर."
राधिका- "ठिक आहे आणते मी." आणि ती त्या लाॅकरजवळ गेली. तीने २१ नंबरचा लाॅकर पाहीला. तो लाॅकर थोडा वर होता. ती तो लाॅकर उघडायला गेली तर तीने लाॅकरवरचं नाव वाचलं आणि तीला एकदम शाॅक लागल्यासारखं झालं. ती क्षणभर ते नाव बघतच राहिली आणि डोळे उघडझाप करून ते नाव सारखं वाचू लागली.
सौ. अर्चना अजय मोहिते असं नाव त्या लाॅकरवर लिहिलं होतं. तेवढ्यात अर्चनाने राधिकाला आवाज दिला.
"राधिका, अगं भेटलं का माझं लाॅकर ?" राधिका अर्चनाच्या आवाजाने एकदम भानावर आली.

राधिका- "हो हो भेटलं, आणते डबा." तीने पटकन लाॅकर उघडून डबा काढला आणि लाॅकर लावून घेतलं. मी काही चुकीचं पाहिलं नाही ना, म्हणून तीने ते नाव पुन्हा वाचलं तर तेच नाव होतं. तीने अर्चनाला टिफीन आणून दिला.
राधिकाला ते नाव वाचून अस्वस्थ वाटू लागलं होतं.
"आपण याबाबतीत विचारावं का अर्चनाला... पण हे कसं विचारणार ? आणि काय विचारू तिला ? उफ" 🤔🤔

तिच्या मनात विचारांचा नुसता गोंधळ चालू होता. ती विचार करत करतच नाश्ता करत होती. तेवढ्यात अजयही आला.
"अरे वा, तुम्ही नाश्ता करायला सुरवात केली पण... माझी वाट नाही पाहिली का अर्चू ?" असं तो गमतीत म्हणाला. तसं अर्चना हसू लागली. 😊😀 त्याने राधिकाकडे पाहिलं. ती तिच्याच विचारात गुंग होती. अजयने तिच्यासमोर चुटकी वाजवली. तशी ती पटकन भानावर आली. अजय आणि अर्चना तिला हसू लागले. 😀😀

"आज खोये खोये से लग रहे हो...." अजय तिला हसतच म्हणाला. 😀😊 राधिकाने त्याच्याकडे बघून जबरदस्तीने सारखी एक स्माईल दिली. 😊 तसं तो बारीक डोळे करून मनातच म्हणाला. "हिला काय झालं अचानक ?" 🤔🤔

अजय- "राधिका, काही प्रॉब्लेम आहे का ? एकदम गप्पगप्प बसलयस ती ?"
"अं, नाही असं काही नाही... ते... जरा... माझं डोकं दुखते ना आज. म्हणून थोडं..." असं ती अडखळत अजयला बोलली.

अर्चना- "अगं मग मेडीसीन घेतलीस का तू ?"
अजय- "हो ना, नाहीतर मी आणून देतो थांब."
"नाही, नाही, नको, मी घरूनच येताना घेतलंय. आता थोडं बरं वाटतंय मला." राधिका पटकन म्हणाली.
"बरं ठिक आहे, पण जास्तच डोकं दुखत असेल तर सांग मला बरं का." अजय काळजीने म्हणाला.
"हो सांगेन." राधिका म्हणाली.

अजयने अर्चनाला खिशातून लिंबू गोळ्यांची दोन छोटी पाकिटं काढून दिली. (लहानपणीची आठवण आली ना😊)
अजय- "हे घे तुझ्यासाठी, लिंबू गोळ्या मागवल्या होत्यास ना तू..."
अर्चना- "हो दे बरं झालं आणल्यांस." तीने एक गोळी तोंडात टाकली आणि राधिकासमोर ते पाकिट धरलं. राधिकाने त्यांतली एक गोळी घेतली, तीने पटापट स्वतःचा नाश्ता आटोपला आणि काहीही न बोलता तिथून लगेच वर्गात निघून गेली. अजय आणि अर्चना मात्र तीला असं जाताना बघतच राहिले.

अर्चना- "राधिकाला काय झालंय आज ? अशी का निघून गेली ही... आणि शाळा सुरू व्हायला तर अजून वेळ आहे ?" 🤔🤔

अजय- "अगं वर्गात जाऊन बसली असेल ती. डोकं दुखतय म्हणत होती ना..." पण अजयला पण तिचं वागणं कुठेतरी खटकत होतं. पण तो अर्चनाला काही बोलला नाही.

राधिका आपल्या वर्गात येऊन चुपचाप बसली आणि विचार करू लागली. "अजय उगाचच अर्चनाची एवढी काळजी घेणार नाही. ते दोघं हजबंड वाईफच असतील. आणि अजय म्हणत होता की अर्चूला काही झालं तर घरची माणसं त्यालाच ओरडतील म्हणून. म्हणजे मी विचार करते ते खरंच आहे तर. पण मग अजय माझ्याशी असा का वागतोय, तेही त्याची एवढी सुंदर बायको असताना ?🤔 पण त्याने तरी अर्चना माझी बायको आहे, अशी कुठे ओळख करुन दिलंय ?" 🤔 दुसऱ्याच क्षणाला ती विचार करू लागली. "पण अजयने तरी मला कुठे असं सांगितलंय की तो माझ्यावर प्रेम करतो असं. एक मित्र म्हणून पण मला तो मदत करत असेल. मी पण अगदी वेडीच आहे. त्याच्या वागण्याचा मी स्वतःच वेगळा अर्थ काढला आणि त्याच्यावर प्रेम करून बसले. तीने स्वतःचीच जीभ चावली. "अशी कशी वागू शकते मी ? एका लग्न झालेल्या माणसावर कसं काय प्रेम करू शकते मी ?🤔😛 तिला स्वतःलाच ओशाळल्यागत झालं. आणि ती स्वतःच्या मूर्खपणावर एकटीच हसू लागली. 😜😛 थोड्या वेळाने शाळा भरल्याची घंटा झाली. तशी ती भानावर आली. सगळी मुलं धावतच वर्गात आली आणि गोंधळ घालू लागली. तसं राधिकाने त्यांना शांत बसण्यांस सांगितलं आणि ती मुलांना पुढे शिकवू लागली.

क्रमशः-

🌹💕 ...@Ritu Patil... 💕🌹

💕💕 प्रेमगंध... 💕💕
----------------------------------------------------------