Premagandha ... (Part-11) books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ११)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयच्या बाबांना बारशात यायला उशीर होतो. त्यांना बघुन अमृता, अजय, अर्चनाचा नवरा त्यांच्याजवळ येतात... बाबा त्यांच्याकडे, बारसं कसं झालं याची सगळी चौकशी करतात. समर्थ त्यांना "आजोबा" आवाज देत धावतच येतो. बाबा त्याला उचलून घेतात आणि त्याच्या दोन्ही गालावर पप्पी देतात. आणि त्याला घेऊन सगळे जेवायला जायला निघतात.
आता पुढे...)

राधिका शाळेतल्या शिक्षकांसोबत गप्पा मारत उभी होती. तिने अजयच्या बाबांना समर्थला उचलून घेऊन येताना पाहिलं. त्यांच्यासोबत अजयच्या घरचे सगळेच होते. तिने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. "कंडक्टर काका अजयच्या फॅमिलीसोबत कसे काय...?" असं ती मनातच विचार करू लागली. आणि त्यांच्याकडे पाहतच होती, त्याचवेळी अजयच्या बाबांचं पण तिच्याकडे लक्ष गेलं. राधिकाने त्यांना स्माईल दिली... 😊 तसे बाबाही तिला बघून हसले...

राधिका- "काका... तुम्ही इथे...?" ती सगळ्यांकडे बघतच म्हणाली.
अजयचे बाबा- "हो... पण तू इथे कशी काय...?"

तेवढ्यांत अजय म्हणाला, "राधिका हे माझे बाबा आहेत आणि बाबा हि राधिका... माझी आणि अर्चूची मैत्रीण... आम्ही एकाच शाळेत सोबतच काम करतो..."
राधिका तर एकदा अजयकडे आणि एकदा अजयच्या बाबांकडे बघू लागली. "अजय तर एका पाठोपाठ एक मला आश्चर्याचे धक्केच देतोय." असं ती मनातच विचार करू लागली.

अजयचे बाबा- "हो का... अरे वाह... छान... बघितलंस राधिका एवढे दिवस आपण एकमेकांना ओळखतो, पण तू अजयची मैत्रीण आहेस हे मला आज माहिती पडलं..." ते हसतच म्हणाले. 😊

राधिका- "हो काका, मला पण माहिती नव्हतं... की तुम्ही अजयचे बाबा आहात म्हणून..."

अजयचे बाबा- "हो बरोबर आहे तुझं... तसं पण एक पॅसेंजर आणि कंडक्टर एवढ्यापुरतीच आपलं नातं होतं नाही का... आपली खरी ओळख तर आता झाली." ते हसतच म्हणाले. तसे सगळे हसू लागले. 😀😀
अजयचे बाबा- "पण राधिका आजपासून तू माझी मुलगी बरं का... आणि मला काका नाही म्हणायचं बाबा म्हणायचं कळलं का..."
राधिका- "हो काका..."
अजयचे बाबा- "बघ परत काका बोललीस...?"
राधिका- "साॅरी... बाबा..." 😊
अजयचे बाबा- "हं आता कसं बोललीस..." राधिकाने अजयच्या बाबांना नमस्कार केला.
अजयचे बाबा- "अगं राहू दे पोरी..." त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते म्हणाले, "बघा आज मला अजून एक माझी मुलगी मिळाली." सगळे खुप खुश होते. 😊

अजयच्या घरची माणसं आणि सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसले.
अजयचे बाबा- "राधिका... तू माझ्यासोबत जेवायला बस. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे..."
तसे सगळे बाबांकडे बघू लागले.

अजयचे बाबा- "अरे... असे का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे...? एवढे दिवस आमची फक्त तोंड ओळख होती, खरी ओळख तर आता झाली. मग आम्ही एकमेकांबद्दल विचारपुस नको का करायला...?" बाबा हसतच म्हणाले, तसे सगळेच हसू लागले. राधिका अजयच्या बाबांच्या बाजूला जेवायला बसली. अजयचे बाबा जेवता जेवता राधिकाची विचारपुस करू लागले.

अजयचे बाबा- "बेटा... कुठे राहतेस तू आणि तुझ्या घरी कोण कोण असते...?"
राधिकापण त्यांच्यासोबत मनमोकळे पणाने बोलत होती.

अमृता- "आई... बाबांनी तुझ्या सुनबाईंची बरीच चौकशी करायला लावलंय..." ती हसतच म्हणाली. 😊

आई- "हो ना खरंय तुझं... लग्न जमवताना सोपं पडेल ना मग..." आईपण हसतच म्हणाली. 😀😁
आई- "अगं पण तुझ्या बाबांना कोणीतरी एक दुसरीच मुलगी सून म्हणून आवडली होती..."
अमृता- "काय... खरंच सांगतेस तू...? आणि कोण आहे ती मुलगी...?"

आई- "अगं मला पण माहिती नाही... पण बसमध्ये एका मुलीने तिची छेड काढणाऱ्या माणसाला छत्रीने खूप मारलं होतं म्हणे... वाघिणीसारखी धीट होती मुलगी असं म्हणत होते तुझे बाबा... तीच मुलगी आवडली होती त्यांना सुन म्हणून..."

अमृता- "अगं आई... मग ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून राधिकाच आहे... राधिकानेच मारलं होतं त्या माणसाला."
आई- "हो का... खरंच की काय...? पण तुला कसं माहिती हे सगळं...?"

अमृता- "अगं खरं तर राधिकाविषयी अजय मला काहीच बोलला नव्हता. राधिका अर्चूला बघायला हॉस्पिटलमध्ये आली होती. तेव्हा अजयने आमची ओळख करून दिली होती आणि अजय तिला सोडायला गेला होता ना तेव्हा अर्चू बोलली होती की अजयला राधिका आवडते म्हणून."

आई- "अच्छा... असं आहे का हे सगळं..." अशाच दोघींच्या गप्पा चालल्या होत्या.

इथे अर्चनाचा नवरा पण जेवता जेवता अजयला हळूच इशारे करत होता आणि बाबा राधिकासोबत बोलत होते त्यांच्याकडे बघायला सांगत होता. दोघेही त्यांच्याकडे बघून गुपचूप हसत होते. 😊

मित्र अजय- "अजय सासरेबुवा आणि सुनबाईंची चांगलीच जोडी जमलीय... खुप कसून चौकशी चाललंय सुनबाईंची..." आणि दोघेही हसू लागले. 😁😁

सगळ्यांचे छानपैकी जेवण उरकून झाले. सगळे पाहुणे आणि शाळेतले इतर शिक्षक सगळ्यांचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेले.

अजयचे बाबा- "राधिका तू कशी जाणार आहेस घरी...? आता उशीर पण झालाय. त्यापेक्षा एक काम कर, आजची रात्र इथेच थांब आणि उद्या सकाळी अजयसोबतच शाळेत जा..."

राधिका- "नाही बाबा, जाईन मी... बस मिळेल मला लगेच आणि बाबा मला घ्यायला येणार आहेत स्टाॅपवर."
अजयचे बाबा- "बरं ठिक आहे पण सांभाळून जा बरं का..."
राधिका- "हो बाबा... येते मी."
अजयचे बाबा- "अजय राधिकाला स्टाॅपवर सोडून ये."
अजय- "हो बाबा जातो मी."
राधिकाने सगळ्यांचा निरोप घेतला आणि दोघेही जायला निघाले. त्या दोघांनाही सोबत जाताना सगळे बघत होते.

अजयची आई- "अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतो दोघांचाही..."

अजयचे बाबा- "हो ना अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. काय अमृते काय विचार आहे तुझा...? आपल्या अजयसाठी राधिका कशी वाटते...?"

अमृता- "अहो बाबा... आपल्या साहेबांची तर खुप आधीच विकेट पडलंय..." ती हसतच म्हणाली. 😁😁

अजयचे बाबा- "काय सांगतेस खरंच...? अरे वा ही तर गुड न्यूज आहे... अजयला राधिका आवडते मग अडलंय कुठे...? जाऊया लवकरच तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला."

अर्चनाचा नवरा- "अहो बाबा... पण आपल्या महाशयांची गाडी अजूनही सरकत नाही पुढे... अजय घाबरतो तिला विचारायला पण..." तसे सगळेच हसू लागले. 😁😁

अजयचे बाबा- "काही हरकत नाही. आपण मार्ग काढू यातून काही तरी, पण माझ्या घरची सुनबाई म्हणून राधिकाच येणार एवढं मात्र नक्की."

अजयची आई- "खरंय तुमचं... मला पण पोरगी आवडली. छान स्वभाव आहे पोरीचा." सगळ्यांच्या अशाच गप्पा सुरु होत्या.

अजय आणि राधिका दोघेही बसस्टाॅपवर येऊन थांबले.
राधिका- "अजय, तू कधी मला बोलला नाहीस की तुझे बाबा कंडक्टर म्हणून काम करतात असं."

अजय- "कधी विषयच निघाला नाही ना म्हणून नाही बोललो."
राधिका- "हं ते पण आहेच..."

अजय- "पण तू एकदम झाशीच्या राणीसारखे मारलं होतं त्या माणसाला, बाबा बोलले होते आम्हाला." तो हसतच म्हणाला. तिही तोंडावर हात ठेवून हसू लागली.

राधिका- "पण तूला कसं काय माहिती की, मी तीच मुलगी होते म्हणून कारण बाबा पण तर ओळखत नव्हते मला."

अजय- "बाबा जेव्हा बोलले ना तेव्हा त्यांनी तुझ्यासारखाच दिसणार्‍या मुलीचं वर्णन केलं होतं आणि तुझी छत्री पण तुटली होती ना... त्यावरून मी अंदाज लावला की ती मुलगी तूच असशील म्हणून." दोघेही हसतच होते. 😁😁

अजय- "पण बाबा तुझं खुप कौतुक करत होते बरं का..."
राधिका- "अजय तुझ्या घरचे सगळेच खूप छान आहेत... आणि बाबा तर खुपच मोकळ्या स्वभावाचे आहेत एकदम."
अजय- "हो बाबांचा स्वभाव तसाच आहे... ताई आणि माझ्यासोबत पण अगदी मित्रासारखे वागतात ते... आणि आईबद्दल काय बोलू, आई नेहमी आपल्या काळजीपोटीच बोलत असते..."
राधिका- "हो बरोबरच आहे तुझं..."
अजय- "बाबा अजून बरंच काही सांगत होते तुझ्याबद्दल."
राधिका- "काय म्हणत होते...?"
अजय- "खरंच सांगू ना... राग नाही येणार ना तुला...?"
राधिका- "सांग... नाही राग येणार मला..."

अजय- "त्यादिवशी बाबा खुप इम्प्रेस झाले तुझ्यावर... खुप आवडलीस तू बाबांना... त्या आनंदातच बाबा म्हणाले की, ती मुलगी सुन म्हणून मला पसंत आलंय असं..." तो गालातल्या गालात हसतच राधिकाकडे बघतच म्हणाला.

राधिकाने पटकन त्याच्याकडे पाहिलं तसं अजयने आपली नजर दुसरीकडे फिरवली. ते बघून राधिका हसू लागली... तसं अजयही तिच्याकडे बघून हसू लागला. दोघांनाही काय बोलावं काही सुचत नव्हतं. दोघेही खुप लाजले होते. तेवढ्यात बस पण आली.

"हि बसपण आताच यायला हवी होती का...?" असं अजय नाराज होतच मनातच म्हणाला. राधिका त्याला बाय करून बसमधून निघून गेली. तो जाणाऱ्या बसकडे बघतच राहिला. नंतर अजय घरी जायला निघाला. राधिका पुर्ण रस्त्यात अजय आणि त्याच्या बाबांच्या बोलण्याचाच विचार करत होती. कंडक्टर ने बेल वाजवली तेव्हा ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. राधिका बसमधून खाली उतरली. तिने पाहिलं तर बाबा तिची वाट बघत स्टाॅपवर उभे होते.

राधिका- "बाबा तुम्ही कधी आलात स्टाॅपवर...?"
बाबा- "अगं मला येऊन अर्धा पाऊण तास झाला असेल. खुपच उशीर झाला तुला यायला."
राधिका- "काय... एवढा वेळ उभे आहात तुम्ही इथे...?"
बाबा- "मग... चल निघू आता, बोलत नको बसू... घरी तुझी आई वाट बघत असेल..."
राधिका- "हा, चला..."
आणि दोघेही रस्त्याला बोलत बोलत घरी आले. आई वाट बघत दारातच उभी होती. बाबा झोपायला निघून गेले.

आई- "काय गं राधी केवढा तो उशीर..."
राधिका- "अगं आई, बारशाच्या कार्यक्रमाला उशीर झाला गं... त्यामुळे सगळंच उशीरा झालं..."
आई- "बरं बरं... चल जा आता कपडे बदलून घे आणि झोप, सकाळी मग उठत नाही लवकर... रोज घाई करत जातेस स्टाॅपवर..." राधिका हसू लागली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. राधिका येऊन झोपली. सगळे झोपले होते. पण राधिकाला लवकर झोप येत नव्हती. ती अजयचाच विचार करत होती. त्याचा विचार करून तिच्या चेहर्‍यावर हलकीशी स्माईल येत होती. 😊😊

आज अजय पण खुप खुश होता. तो गाणं गुणगुणतच घरी आला. सगळे गप्पा मारत बसले होते. अजयपण गेला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. सगळे त्याला बघून हसत होते. 😊😊

अमृता- "आज आईचं बाळ जास्तच लाडात आलंय बरं का बाबा..." आणि ती हसू लागली. 😁
अजय- "काय गं ताई तू पण... मी रोजच असा लाडात येतो, हो ना गं आई." तेवढ्यात आईने त्याचा कानच पिळला.
अजय- "आई गं आई, कान सोड ना गं दुखतोय मला." त्याला सगळेच हसू लागले. 😁

आई- "काय रे... मी विचारलं होतं तेव्हा तर मला कोणी नाही आवडत असा म्हणाला होतास तू... आणि काय बोलला होतास आठव की कोणी मुलगी आवडली तर सगळ्यांत आधी तूला सांगेन मी आणि आता सगळ्यांत शेवटी मला समजतेय हं. " आईने त्याचा अजून कान पिळला.
तसं तो अजून ओरडला आणि म्हणाला, "आई गं... बाबा प्लीज तुम्ही तरी सांगा ना ओ आईला..."

बाबा- "अगं सावी (अजयची आई सविता ऊर्फ सावी) माझ्या वाटणीचा पण थोडा कान पिळ त्याचा... मला पण सगळ्यांत शेवटी कळतंय..." तसे सगळेच हसू लागले. 😁तेवढ्यात अर्चनाची आई तिथे आली.

अर्चनाची आई- "काय गं ताई माझ्या लेकराचे असे कान पिळतेस गं... तुमच्यासाठी एवढी सोन्यासारखी सून शोधली त्याने आणि त्याचं कौतुक करायचं टाकून त्याचे कान काय पिळतेस तू."
तसं अजयच्या आईने त्याचे कान सोडले आणि म्हणाली, "अगं तुझ्या या लाडक्या लेकराने पोरगी पसंत केली आणि आम्हाला अजिबात खबर लागू दिली नाही याने... मग त्याची शिक्षा नको का त्याला..."

अजय- "आई गं... किती जोराचा कान पिळतेस गं..." त्याला सगळे हसत होते. 😁😁

अजय- "हं तुम्ही फक्त हसा मला सगळे... आणि आईबाबा जसं तुम्ही समजताय तसं अजून काहीच नाही. अजून आमची फक्त मैत्रीच आहे... तिच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत तेही अजून मला माहित नाही... हां... म्हणजे... तशी... ती... मला... आवडते... पण..." तो लाजतच खाली मान घालून बोलला. तसं त्याला सगळे हसू लागले. 😁😁

अमृता- "आई कुणीतरी खुप लाजतंय..." 😊
अर्चनाचा नवरा- "आता किती दिवस लाजत बसणार आहेस...? लाजायचं सोडून द्या राव... आणि आता तर घरच्यांना सगळ्यांनाच राधिका आवडलेली आहे... आता फक्त तू विचारण्याची हिम्मत कर बस... बाकी पुढचं पुढे बघू आपण... बरोबर म्हणतोय ना बाबा मी..."

बाबा- "हो जावईबापू अगदी बरोबर बोललात तुम्ही... आणि जर तूला विचारायला जमत नसेल तर मला सांग, मी स्वतः जातो तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला. काय गं सावी बरोबर ना."

अजयची आई- "हो मला चालेल, माझी काहीच हरकत नाही..."
अजय- "अहो बाबा, हे काय बोलताय तुम्ही...? राधिका सध्या तरी माझी फक्त एक मैत्रीण आहे. आपण असं डायरेक्ट कसं जायचं तिच्या घरी लग्नाची मागणी घालायला...?"

अर्चनाचा नवरा- "मग काय करणार आहेस तू...? प्रेम करतोस ना तिच्यावर... मग थोडी हिम्मत कर आणि विचारून टाक ना तिला... एवढा काय घाबरतोस रे तू मुलींना...? अमृता तुझा भाऊ ना अगदी फट्टू आहे खरंच... हा खुपच घाबरतो मुलींना..." अजयला सगळे हसत होते. 😁😁
अमृता- "अगदी बरोबर बोलतोयस तू अजय... माझ्या भावाचं कसं होणार आहे कोण जाणे...?" 🤦
अजय- "ताई, काय गं तू पण याचं कुठे ऐकतेस...? हा काहीही बोलत असतो..."

अर्चनाचा नवरा- "अच्छा म्हणजे मी काहीही बोलतो असं... बोलू का सगळ्यांना तुझ्या काॅलेजच्या हिरोईन बद्दल... हा बोलू का...?"
अमृता- "काय...? याची काॅलेजला पण एक हिरोईन होती असं... सांग सांग आम्हाला पण कोण होती ती...?"
अजयने डोक्यालाच हात लावला...🤦
अजय- "अगं ताई हा काहीही बोलतोय... माझी हीरोईन वगैरे कोणी नव्हती..."
अमृता- "अजय तू बोल रे... कोण होती ती मुलगी...?"

अर्चनाचा नवरा- "अगं हा काॅलेजला होता ना तेव्हा पण असाच पोरींपासून चार हात लांबच राहायचा. पण पोरी कुठे याचा पिच्छा सोडतात. आधीच हा दिसायला स्मार्ट, हँडसम आणि अभ्यासात पण हुशार, त्यामुळे याच्यामागे पोरींची रांगच लागायची.
"अजय मला हे नाही समजलं, ते नाही समजलं, हे समजावून सांगशील का...?" अशी काही ना काही कारणे देऊन मुली याच्या मागेच... हा तर अक्षरशः कंटाळून जायचा. मुलींना येताना पाहिलं की हा लगेच तिथून काढता पाय घ्यायचा..."
आणि सगळे जोरजोरात हसत होते. 😁😀 अजय मात्र डोक्याला हात लावून गुपचूप त्याच्याकडे बघत होता. 🤦

अर्चनाचा नवरा- "आणि काजल नावाची एक मुलगी होती. ती अजयवर जाम लाईन मारायची..." तो हसतच म्हणाला.
अजय- "तुला नंतर बघतोच मी." तो अर्चनाच्या नवर्‍याकडे रागातच बघत म्हणाला.
"आणि तुम्ही सगळे काय ऐकत बसलात ह्याचं असं काहीही नाही..." अजय सगळ्यांकडे बघतच म्हणाला.
अमृता- "अरे असं काही नाही ना... मग बोलू दे की त्याला... अजय तू बोल रे..."
अजयने डोक्यालाच हात लावला 🤦आणि नंतर मात्र तो गालावर हात ठेऊन गप्पच बसला.

अर्चनाचा नवरा- "आई ती काजल तुमची सुनबाई होण्याच्या मार्गावरच होती बरं का..." तसं अजयने एकदा आईकडे पाहिलं आणि गुडघ्यात तोंड लपवून बसला. सगळे त्याच्याकडे बघून हसत होते. 😁😁

अर्चनाचा नवरा- "काजल आली ना की याच्याबाजूला कोणी बसलेलं असेल ना की त्याला उठवायची आणि स्वतः बसायची. 'अजय मला हे समजलं नाही, समजावून सांगशील मला...?' मग अजय तीला ते समजवायचा आणि ती गालावर हात ठेऊन याला फक्त बघत राहायची. सगळे वर्गातली मुलं दोघांना हसायचे... हे नेहमीचंच झालं होतं बरं का यांचं... नंतर तर संपूर्ण काॅलेजमध्ये या दोघांना अजय देवगण आणि काजोल असेच सगळे बोलायचे... तेव्हापासून तर हा काजल आली की तिला बघून कुठे कुठे लपून राहायचा. कधी लायब्ररीत, कॅन्टीन मध्ये, टेबलखाली कुठेही लपून बसायचा हा, तिचा पिच्छा सोडवायला..." अर्चनाचा नवरा बोलून जोरजोरात हसू लागला. सगळेच त्याला पोटधरून हसत होते. 😁😁 अजयपण गालातल्या गालातच हसत होता. 😊😊

बाबा- "बरं असू दे... पण आता काय करणार आहेस तू...? राधिकाला कधी विचारणार आहेस...?"
अजय- "अहो बाबा, खरंच मला वेळ द्या थोडा... योग्य वेळ आली की मीच तिला माझ्या पद्धतीने विचारेन..."
बाबा- "आणि ती योग्य वेळ कधी येणार...? ते काही नको सांगू मला... मी तुला फक्त दोन दिवसांचा वेळ देतो. या दोन दिवसांत तिला विचारून टाक, नाही तर आम्ही जातो लगेच तिच्या घरी लग्नाची मागणी घालायला, काय गं सावी बरोबर ना."

अजयची आई- "हो, अगदी बरोबर आहे तुमचं... मी तुमच्या मताशी सहमत आहे."

अजयने डोक्याला हातच लावला. 🤦 आणि म्हणाला.
"बाबा खुप वेळ दिलात तुम्ही मला. दोन दिवस म्हणजे खुपच झाले नाही का...?"
आई- "मग अजून काय दोन वर्षे थांबणार आहेस का...? तोपर्यंत तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे जमवलं म्हणजे...?"
अजय- "अगं आई, नाही होत लगेच लग्न तिचं. आताच यावर्षीच तर तिचा जाॅब सुरू झालाय... आणि लगेच लग्न करणार आहे का ती...?"
आई- "बरं ठिक आहे... तू सांगशील तसं... पण पुढे काय करायचं ठरवलंयस तू...?"
अजय- "मी योग्य वेळ बघून विचारेन तीला. ह्याच वर्षी विचारेन, दोन वर्षे नाही लावणार बस... आता तरी चालेल ना..."
आई- "बरं ठिक आहे, चालेल..."
अजयचे बाबा- "खुप मोठी परीक्षा आहे आपल्या चिरंजीवांची... मग परीक्षेची पुर्वतयारी करायला हवी, नाही का...?" बाबा हसतच म्हणाले. त्यानंतर सगळेच हसू लागले. 😁😁 अशाच त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. थोड्या वेळात सगळेच आपापल्या घरी निघून गेले.

सगळंच अजयच्या मनासारखं घडत होतं. तो खुप खुश होता. त्याला काही झोप लागत नव्हती. सारखा राधिकाचाच चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता... विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. इथे राधिकाची पण काही वेगळी परिस्थिती नव्हती. तिलाही अजयचा विचार करता करता खुप उशीरा झोप लागली.

क्रमशः-

💕🌹@Ritu Patil 🌹💕

💕💕 प्रेमगंध... 💕💕

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
-------------------------------------------------------------