Premchand… (Part - 4) books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ७)

( आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका तिच्या वर्गात येऊन विचार करत असते. "अशी कशी वागू शकते मी ? एका लग्न झालेल्या माणसावर कसं काय प्रेम करू शकते मी ?🤔😛 तिला स्वतःलाच ओशाळल्यागत झालं आणि ती स्वतःच्या मुर्खपणावर एकटीच हसू लागली....
आता पुढे... )

आज शनिवार असल्यामुळे शाळा पण लवकर सुटली. तीने पाहिलं तर अर्चना अजयच्या बाईकवरून बसून निघून गेली. राधिकापण चालत बसस्टॉपवर आली. तिलाही लवकरच बस मिळाली. बसमधून येताना ती अजय आणि अर्चनाचाच विचार करत होती. "बरं झालं मला दोघांविषयी माहिती पडलं तर, नाहीतर किती मोठी चूक झाली असती माझ्या हातून." हा विचार करून तीच्या अंगावर भितीने काटाच उभा राहिला. "आता यापुढे आपण अजयपासून थोडं अंतर ठेवून वागायला आणि बोलायला हवं. माझ्यामुळे उगाचच दोघांमध्ये गैरसमज व्हायला नको." असं तिने ठरवलं.

राधिकापण घरी येऊन पोहोचली. तीला खुप भूक लागली होती. तीने आईला आवाज दिला.
राधिका- "आई जेवायला काय केलंय गं ?"
आई- "वरण - भात आणि वांग्याची भाजी बनवलंय."
तसं राधिका हसू लागली. 😀😀
आई- "का गं, काय झालं हसायला ?"
"मेघू बरोबर बोलते तुला, सारखी वांग्याचीच भाजी बनवत असते म्हणून." राधिका हसतच म्हणाली. तशी आई पण हसू लागली. 😀😀
आई- "तुझे बाबा म्हणतात ना तसंच आपण तीचं लग्न ज्यांची वांग्याची वाडी असेल त्याच्यासोबतच करून देऊ. म्हणजे रोजच वांग्याची भाजी खावी लागेल तीला." आणि दोघीही हसू लागल्या. 😀😅 दोघींनीही गप्पा मारत जेवण करून घेतलं. आणि किचनमधलं आवरून थोडा वेळ आराम करायला रुममध्ये निघून गेल्या. आई पडल्या पडल्याच झोपून गेली. राधिका मात्र अजय आणि अर्चनाच्याच विचारात होती. विचार करता करताच तिलाही झोप लागली.

आज मेघा, मीरा, सोनाली पण लवकरच घरी आल्या होत्या. आईने सगळ्यांसाठी चहा ☕ बनवला. सगळे बाहेर बसून चहा पित होते. ☕
मीरा- "ताई, उद्या रविवार आहे ना, आम्हाला पाणीपुरी खायला घेऊन जा ना गं उद्या."
मेघा- "हो गं खरंच ताई, उद्या जाऊया का आपण ? बरेच दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नाही. प्लीज..."
आई- "अगं पोरींनो, पावसाळा चालू आहे. असं बाहेरचं खाऊन आजारी पडतील ना तुम्ही."
मेघा- "फक्त एक दिवस बाहेरचं खाऊन आजारी पडणार आहोत का आम्ही... तू पण ना आई काहीही बोलतेस."
मीरा- "हो आई बरोबर बोलतेय मेघू, एक दिवस बाहेरचं खाल्ल्याने काही फरक पडत नाही कळलं का..."

सोनाली राधिकाच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतच बसली होती. ती दोघींचं बोलणं ऐकून हसत होती. 😊😊
आई- "राधी, या दोघी ना खुपच बोलतात खरंच. दोघीपण सारख्याच आहेत अगदी." तशी राधिका आणि सोनाली दोघीही हसू लागल्या. 😀😀
राधिका- "अगं असू दे गं आई, उद्या घेऊन जाईन मी त्यांना. एक दिवस पाणीपुरी खाल्ल्याने काही नाही होणार. असं पण खुप स्ट्राँग बहिणी आहेत माझ्या. बरोबर ना."
तसं मीरा आणि मेघा दोघीपण एकमेकांच्या हातावर टाळी देऊन हसू लागल्या. 😀😅😅
आई- "वा राधी तू पण या दोघींसारखीच बोलायला लागलीस आता." तसे सगळेच हसू लागले. 😅😅😀

रविवारचा सुट्टीचा दिवस उजाडला. आज पावसाने थोडा आराम घेतला होता. सगळ्यांनाच सुट्टी होती. राधिकाचे बाबा पण घरीच होते. राधिकाने घरासमोर फुलझाडं लावून छोटीशीच छान बाग फुलवली होती. त्यांतच तीचे बाबा जाऊन काम करत होते. ते बघून राधिका आणि सोनाली पण बाबांना मदत करू लागल्या. मेघा आणि मीरा मात्र पाळण्यावर बसून त्यांना बघत होते. तिघांनी मिळून बागेत झालेला कचरा, तण उपडून टाकून दिले. झाडांना मातीची भर घातली. झाडं पण पावसाने अगदी टवटवीत वाटत होती. राधिकाला स्वच्छ बाग बघून खुप छान वाटत होते.
नंतर सगळे आंघोळ वगैरे आटोपून नाश्ता करायला बसले.

आज सगळे घरी एकत्र असल्यामुळे गमतीजमती मध्ये सगळ्यांचा खुप छान दिवस गेला. संध्याकाळ झाली. मीरा, मेघा आणि सोनाली पाणीपुरी खायला जाणार म्हणून तयारी करू लागले.
मेघा- "ताई तू पण तयारी कर गं पटकन, जायचं आहे ना आपल्याला."
राधिका- "हो, तुमचं झालं का आवरून... मी फक्त दहा मिनिटांत तयार होते." आणि राधिका फ्रेश व्हायला निघून गेली. सगळे जायला निघाले.
राधिका- "आई, येतो गं आम्ही."
आई- "हो नीट सांभाळून जावा. आणि छत्री घेतली का तुम्ही... एकतर पावसाचे दिवस चालू आहेत..." आई काळजीने म्हणाली.
राधिका- "हो गं आई, घेतली छत्री. आणि आता लहान आहोत का आम्ही... नको इतकी काळजी करूस. चल येतो आम्ही."
आई- "बरं... राधिका बाई." तसे सगळे हसू लागले. 😀😀आणि चौघीपण जायला निघाल्या. बसस्टाॅपवर त्यांना लगेच बस मिळाली.

चौघीपण मार्केट मध्ये येऊन पोहोचल्या. रस्त्याच्या बाजूला बरीचशी माणसं भाजीपाला, फळे, काही जणं प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन विकायला बसले होते. ते सगळं बघत बघत त्या जात होत्या. राधिकाने चौघींसाठी पण पेन विकत घेतले.
राधिका- "सतत भांडत असता ना तुम्ही पेनवरून... म्हणून हे पेन घेतले."
तसं मेघा, मीरा आणि सोनाली तिघीपण हसू लागल्या. 😀😀

चौघीपण पाणीपुरीच्या गाडीजवळ जायला निघाले. राधिका पुढे जाणार तेवढ्यात तिने पाहिलं तर नेमके अर्चना आणि अजय पण तिथे पाणीपुरी खायला आले होते. अर्चना एका टेबलवर पाठमोरी बसली होती आणि अजय पाणीपुरी घेत होता. दोघांचंही राधिकाकडे लक्ष नव्हतं. राधिका उभी राहून विचार करत होती की पुढे जाऊ की नको. तेवढ्यात अजयने त्याच्या प्लेटमधली पाणीपुरी फूक मारून थोडी थंड केली आणि ती अर्चनाला भरवली.
"ही पाणीपुरी आपल्या गोंडस पिल्लूसाठी." असं तो हसतच म्हणाला. आणि अर्चनाने पण ती पाणीपुरी हसतच खाऊन टाकली. मात्र हे अजयचं बोलणं राधिकाने ऐकलं. अजय आणि अर्चनाचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. राधिका तिघींना घेऊन तिथून दुसरीकडे जायला निघाली.

मेघा- "अगं ताई काय झालं...? तिकडे खाल्ली असती ना आपण पाणीपुरी."
मीरा- "हो ना."
राधिका- "अगं तो एकच पाणीपुरी वाला आहे का ?" आणि ती त्यांना दुसऱ्या गाडीजवळ घेऊन आली.
राधिका- "हे बघ इथे पण खुप छान पाणीपुरी मिळते." आणि तीने पाणीपुरी वाल्याला आॅर्डर दिली.

मेघा, मीरा आणि सोनाली पाणीपुरी खाऊ लागल्या. राधिकाच्या मात्र अजयचं ते बोलणं "आपल्या गोंडस पिल्लूसाठी" हेच शब्द सारखे तिच्या कानात घुमत होते. आता तर हे अजयचं बोलणं ऐकून तिला ते दोघे हजबंड -वाईफ असल्याची पक्की खात्री झाली होती. तिने त्याच नादात गरमगरम पाणीपुरी तोंडात टाकली. तसा तिला चटकाच बसला.
ती एकदमच ओरडली, "आई गं."
सोनाली- "अगं ताई काय झालं...?" ती काळजीने म्हणाली. तसं मीरा आणि मेघा पण तिच्याकडे बघू लागले.

राधिका- "अगं गरमगरम पाणीपुरी तोंडात टाकली ना म्हणून तोंड भाजलं माझं."
मीरा- "अगं ताई हळू ना गं जरा. कसला एवढा विचार करतेस की लक्ष नाही तुझं..." मेघाने तिला पाणी दिलं प्यायला. पाणी पिऊन राधिकाला थोडं बरं वाटलं. चौघींनी पण पाणीपुरी खाल्ली आणि आणि त्या घरी आल्या. रात्रीचं जेवण आटोपून सगळे जण झोपून गेले. राधिकाला मात्र राहून राहून अजय आणि अर्चनाचेच विचार येत होते. त्यातच तिला रात्री कधी झोप लागली ते तिलाच कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका शाळेत येऊन पोहोचली. ती आपल्या वर्गात निघून गेली. मधल्या सुट्टीत ती स्टाफरूममध्ये येऊन बसली. सगळे शिक्षक गप्पा मारत नाश्ता करत होते. राधिका अर्चनाच्या बाजूला येऊन बसली. तीही त्यांच्यासोबत नाश्ता करू लागली. अजय राधिकाकडेच बघत होता. तिने दोघांनाही स्माईल दिली.😊राधिका अर्चनाशी छान गप्पा मारत होती. अजयही मध्ये मध्ये काहीतरी बोलून त्यांना हसवत होता. पण राधिका अजयकडे जास्त लक्ष देत नव्हती. तिचं आता असं नेहमीचंच झालं होतं. ती अजयला जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न करत होती. तो जेवढं विचारेल तेवढं मोजकंच उत्तर ती त्याला देत होती.
"कदाचित तिला घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल, ती टेन्शन मध्ये असेल." असं अजयला वाटत होतं.

पण यांमध्ये तिची अर्चनाशी मात्र खुप छान मैत्री झाली होती. ती तिच्याशी अगदी मनमोकळे पणाने हसून बोलत होती.
"बायकांना बायकांशीच गाॅसिप करायला जास्त आवडते. म्हणून कदाचित माझ्याशी जास्त बोलत नसेल." असा विचार करून त्याला राधिकाचं हसू यायचं. पण त्याच्याशी ती पहिल्यासारखी बोलत नव्हती. राधिका त्याला टाळायचा प्रयत्न करतेय हे मात्र त्याच्या लक्षात आलं होतं. त्याला काही समजतंच नव्हतं की ती माझ्याशी अशी का वागतेय...? त्याला तीचं असं वागणं कुठेतरी खटकत होतं. पण त्या गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष केलं. तो तिच्याशी नेहमी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण तीही त्याच्याशी जेवढ्यास तेवढंच बोलायची. असेच काही दिवस निघून गेले. राधिकाचं अजयशी असं वागणं आता अर्चनाच्या पण लक्षात आलं होतं.

क्रमशः-

(पुढे काय होते ते बघुया पुढच्या भागात....)

💕💕🌹@Ritu Patil 🌹💕💕

💕💕 प्रेमगंध... 💕💕
-----------------------------------------------------------
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿