Premagandha ... (Part - 4) books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ९)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजय राधिकाबद्दल स्वतःशीच विचार करत असतो. "राधिकापण ना किती वेडी मुलगी आहे खरंच, तिने आमच्याबद्दल उगाचच गैरसमज करून घेतला. ह्या गोष्टीचा स्वतःला तर त्रास करून घेतलाच पण मला ही त्रास दिला." इतके दिवस राधिका त्याला का टाळत होती, हे त्याच्या लक्षात आलं होतं. ते आठवून त्याला खुप हसु येत होतं... 😀😀 आता पुढे... )

शाळेची घरी जायची सुट्टी झाली. राधिकाला अर्चना आणि तिच्या बाळाला बघायला हॉस्पिटल मध्ये जायचं होतं. म्हणून ती हॉस्पिटलचं नाव विचारायला अजयकडे आली. तर अजय बाईकवर बसून राधिकाचीच वाट बघत होता. त्याला तिला बघून हसूच येत होतं. 😊 पण तो हसू कंट्रोल करत होता. ती त्याच्या बाईकजवळ आली.

अजय- "बस बाईकवर, तुला घेऊन जातो मी."
राधिका- "अरे कशाला, कोणत्या हाॅस्पिटलमध्ये आहे ते सांग मला, माझी मी येते."

अजय- "अगं मी पण हाॅस्पिटलमध्येच जातोय ना. मग वेगवेगळे का जायचं आपण ? बस तू गाडीवर आणि तुझी मैत्रिण ओरडेल ना मला की राधिकाला सोबत का घेऊन आला नाहीस म्हणून...?" तो हसतच म्हणाला. राधिकाला पण हसू आलं. 😊😀

राधिका- "बरं ठिक आहे. येते मी तुझ्यासोबत."
राधिका गाडीवर बसली. पण तिने अजयच्या खांद्यावर हात न ठेवता मागे गाडीला पकडून ती बसली. अजयला तिचं असं वागणं बघून हसूच येत होतं. 😀😀

अजय- "अगं राधिका, माझ्या खांद्यावर हात ठेवून बसलीस तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही." तो हसतच म्हणाला. 😀😀

राधिका- "नाही नको... मी बसते गाडीला पकडून."
अजय- "नक्की ना..." 😊
राधिका- "हो नक्की."

मग अजयने गाडी स्टार्ट केली आणि जायला निघाले. संपूर्ण रस्त्यांत त्याच्या चेहऱ्यावर हसू येत होतं. 😊😊 राधिका मात्र शांतपणे बसली होती.

दोघंपण हाॅस्पिटलमध्ये येऊन पोहोचले. अर्चना ज्या रूममध्ये होती, तिथे अजय राधिकाला घेऊन जात होता. तेवढ्यांत एका नर्सने अजयला आवाज दिला. त्याने तिला अर्चनाची रूम दाखवली आणि तो नर्सकडे निघून गेला. राधिका रूममध्ये आली. तर अर्चना बेडवर आणि बाजूच्या खुर्चीवर एक बाई बसली होती. अर्चना राधिकाला बघून खुश झाली. 😊😊

अर्चना- "राधिका अगं ये ना बस...आई... ही राधिका... माझी आणि अजयची मैत्रीण आणि राधिका ही माझी आई." अशी तिने दोघींची ओळख करून दिली. राधिकाने अर्चनाच्या आईला नमस्कार केला.
"अगं पोरी राहू दे, बरं... सुखी रहा पोरी..." असं म्हणून अर्चनाच्या आईने राधिकाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. 😊

"बसा तुम्ही दोघी. मला थोडं काम आहे. मी आलेच थोड्या वेळात." असं म्हणून अर्चनाची आई बाहेर निघून गेली.

राधिका- "अर्चू कशी आहेस गं...? मी खुप खुश आहे बघ तुझ्यासाठी. खुप आनंद झाला मला." 😊😊
अर्चना- "त्रास होतोय थोडा... पण आता ठिक आहे मी."
राधिका पाळण्यांत बाळाला बघू लागली. ती खुप खुश होती. बाळ खुप छान दिसत होतं. 😊😊

राधिका- "अर्चू... बाळ अगदी तुझ्यासारखंच आहे हा... अगदी गोरंपान, लांबसडक नाक... खुप छान आहे बाळ..."
तशी अर्चना हसू लागली. राधिका बाळाला हातात घेऊन उभी होती. तेवढ्यांत दारातून चार पाच वर्षाच्या मुलासोबत एक बाई आणि एक माणूस आतमध्ये आले.
"कदाचित दोघंही अर्चनाचे नातेवाईक असतील", असा तिने विचार केला. त्या बाईने अर्चनाची विचारपुस केली आणि राधिकाकडून बाळाला घेऊन त्याचे लाड करू लागली. आणि तो माणूस पण अर्चनाची विचारपुस करू लागला.

तेवढ्यात अजय पण आतमध्ये आला. तसं त्या माणसाने येऊन अजयला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, "कसा आहेस तू...?" 😊
"कसा दिसतोय...? तू सांग." अजय हसतच म्हणाला. 😀
"एकदम झक्कास", 👌👌 तो माणुस म्हणाला. तसे सगळे हसू लागले. 😀😀

नंतर अजयने त्या छोट्या मुलाला उचलून घेतले आणि म्हणाला, "माझा गोंडू कसा आहेस तू...?" अजयने त्याला चॉकलेट 🍫🍫 दिले आणि त्याच्या दोन्ही गालावर किस केले तसं त्या मुलाने पण अजयला दोन्ही गालावर किस केले.
आणि तो म्हणाला, "मी एकदम मत्त आहे, मामू तू कचा आहेश ले..." त्याचे ते बोबडे बोल ऐकून सगळ्यांना हसू आलं. 😀😀
"मी पण एकदम मश्त, तुझ्यासारखाच", अजय हसतच म्हणाला. 😊😊
आणि अजयने त्या मुलाच्या आईला जाऊन मिठी मारली. आणि म्हणाला, "ताई तू कशी आहेस गं...?"
तसं तिही म्हणाली, "बोल कशी दिसतेय मी...?"
यांवर अजयने एका हाताने तिचा गाल ओढला आणि हसतच म्हणाला, "एकदम लाडू झालयस बघ तू आता." तसं तिने त्याच्या हातावर एक फटकाच दिला. तसं सगळेच हसू लागले. 😀😀

राधिका गपचूप उभी राहून हे सगळं बघत होती. अजयने तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, "हा माझा भाचा... माझ्या ताईचा मुलगा." आणि अजयने त्या छोट्या मुलाला खाली ठेवले.
राधिकाने त्याच्या दोन्ही गालाला हात लावले आणि त्याला विचारलं, "बाळा नाव काय तुझं...?" तसं तो म्हणाला, "शमल्थ" हे ऐकून सगळे हसू लागले. 😀😀
"अगं तो समर्थ बोलतोय" अजय हसतच म्हणाला. 😀

नंतर अजयने त्याच्या ताईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि तिच्या डोक्याला डोकं लावलं आणि म्हणाला, "राधिका, ही माझी लाडकी मोठी बहीण, अमृता ताई आणि ताई ही राधिका अर्चू आणि माझी मैत्रीण, आम्ही एकाच शाळेत सोबत काम करतो." राधिकाने आणि अमृताने एकमेकींना छानशी स्माईल दिली.

नंतर त्याने अर्चनाच्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाला, "राधिका, अर्चूला तू खूप चांगलं ओळखतेस, तरी पण आज पुन्हा नव्याने तुझी अर्चूशी ओळख करून देतो. अर्चू माझ्या लहान मावशीची मुलगी, माझी लहान बहीण, पण बहीणीपेक्षा जास्त ती माझी मैत्रीण आहे." राधिका अजयकडे आश्चर्याने बघत होती. ती गपचूप उभी होती. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. अजय तिला असं बघून गालातल्या गालातच हसत होता. अर्चनाला तर अजय असा का बोलतोय ते कळतच नव्हतं.

आणि नंतर अजय त्या माणसाजवळ जाऊन बोलला.
अजय- "राधिका, हा माझा बेस्ट फ्रेंड, आमची दोघांची काॅलेजला असताना मैत्री झाली होती. आणि आमच्या दोघांमधली एक गंमत माहिती आहे तुला, ती गंमत म्हणजे आमची दोघांची नावंही सेमच आहेत. अजय मोहिते. आणि आमचं दुसरं नातं म्हणजे हा अर्चूचा नवरा म्हणजेच माझे जीजू." तसं राधिका एकदम गोंधळूनच गेली. तिला काय आणि कसं रिअॅक्ट व्हावं काही सुचतच नव्हतं. तिला एकदम ओशाळल्यागत झालं होतं. ती गप्पच उभी होती. अजयला तीची सगळी परिस्थिती कळत होती. राधिकाने ओशाळून मान खाली घातली होती.

ती काहीच बोलत नाही हे बघून अर्चना म्हणाली, "अगं राधिका काय झालं...? गप्प का आहेस तू...? आणि अजय तू... आत्ता माझी बहीण म्हणून ओळख करून देत आहेस राधिकाला...? तू आधी बोलला नव्हतास तिला...?"

अजय काही बोलणार तितक्यांत राधिका पटकन म्हणाली, "अर्चू, मला खूप उशीर झालाय, मी निघते आता."
अर्चना- "बरं ठिक आहे आणि सांभाळून जा."
राधिका- "बरं, तू पण स्वतःची आणि बाळाची काळजी घे. चल येते मी." आणि ती पटकन जायला निघाली. तिला तिथून कधी बाहेर निघून जाते असं झालं होतं.

राधिका रूमच्या बाहेर आली, तेवढ्यांत अजय तिला मागून आवाज देत आला. "राधिका...."
त्याचा आवाज ऐकून राधिका तशीच पाठमोरी उभी राहिली आणि जीभ चावून मनातच म्हणाली.
"आता मी अजयच्या नजरेला नजर तरी कशी देऊ... सगळा गोंधळ घालून ठेवलाय मी. काय विचार करत असेल तो माझ्याबद्दल...?" तेवढ्यात अजय तिच्या बाजूला येऊन उभा राहिला.
अजय- "अगं एवढ्या घाईत का जातेस...? मी येतो ना तुला सोडायला..."

तसं ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली, "नको अजय मी जाईन. बस भेटेल मला आता लगेच." बोलताना ती अजयकडे बघतच नव्हती. अजयला तिच्या अशा वागण्याचं खुप हसु येत होतं. 😊😊

अजय- "ते काही नाही, चल मी येतो तुला सोडायला. हवं तर लगेच बस भेटली तर मग जा."
राधिका- "बरं ठिक आहे... चालेल."
आणि दोघेही गाडीवरून बसस्टाॅपवर आले.

दोघेही स्टाॅपवर उभे होते. राधिका एकदम गप्प गप्पच होती. अजयला तिची परीस्थिती कळत होती. त्याने राधिकाला आवाज दिला. त्याचवेळेला तिनेही त्याला आवाज दिला. राधिका- अजय असं दोघांचंही बोलणं सेम झालं. ते बघून दोघांनाही हसू आलं. 😀😀

अजय- "राधिका तू बोल आधी."
राधिका- "अजय आय अॅम व्हेरी साॅरी... खरंच माझा खुप मोठा गैरसमज झाला. प्लीज मला माफ कर. खुप चुकीची समजूत झाली होती माझी तुमच्या दोघांच्या बाबतीत. तुला माझ्या बोलण्याचा राग आला असेल ना... खरंच साॅरी."

अजय- "अगं तू कशाला साॅरी म्हणतेस... खरं तर चुकी माझीच होती. कारण मीच तुझी अर्चनाशी ओळख करून द्यायला हवी होती. मला वाटलं तुमच्या दोघींची इतकी छान मैत्री झालंय तर अर्चू बोलली असेल तुला आमच्याविषयी. ती पण काहीच बोलली नाही त्यामुळे तुझा गैरसमज झाला. त्यांत तुझी पण काहीच चुकी नाही. इतकं वाईट वाटून नको घेऊस आणि हो मला राग नाही आला तुझ्या बोलण्याचा." तो हसतच म्हणाला. 😊😊

थोड्या वेळात बस आली आणि राधिका त्याला बाय करून निघून गेली. अजय परत हाॅस्पिटलमध्ये निघून आला. तो आला तेव्हा अमृता, त्याचा मित्र अजय आणि अर्चनाची आई म्हणजेच त्याची मावशी त्याच्याकडे बघून हसत होते. अजयने ते पाहिलं आणि तो त्यांना वैतागून म्हणाला.
"अरे यार... असे का बघताय तुम्ही माझ्याकडे...?" तसे सगळे त्याला हसू लागले. 😀😀😄

मित्र अजय- "वहिनीसाहेब आम्हाला आवडल्या बरं का..."
अजय- "काय...? कोण वहिनीसाहेब...?"
अमृता- "ओह... तू तर पक्का छुपा रुस्तम निघालास हा... सगळं सांगितलं बरं का आम्हाला अर्चूने..."

मावशी- "छान आहे बरं का माझी सुनबाई... मला खुप आवडली. आता लवकरच दोनाचे चार हात करावे लागतील तुझे." हे ऐकून अजय खुप लाजला. 😌
अर्चना- "ओहो... कुणीतरी खुप लाजतय..."
अजयने अमृताला मागून मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिने त्याच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, "आवडली मला राधिका बरं का... आता लवकरच आईबाबांना सांगून तुझ्या लग्नाचा बार उडवून देऊ." तो खुप लाजत होता त्यामुळे अजयला सगळे हसत होते. तेवढंच त्याला हे सगळं ऐकून खुप छान पण वाटत होतं.

मित्र अजय- "कधी प्रपोज करतोस मग राधिकाला...?"

अजय- "करेन लवकरच... पण उगाचच आताच घाई नको व्हायला."

मित्र अजय- "बरं ठिक आहे... पण जास्त लांबवू नकोस कळलं ना... नाहितर कुणीतरी दुसरंच घेऊन जाईल तिला आणि तू आ.... करून बघत बसशील..." तसे सगळे त्याला हसू लागले. 😄😃

अर्चनाला मध्येच काहीतरी आठवलं तसं तिने अजयला विचारलं, "अजय तू आत्ता का माझी अशी राधिकाशी ओळख करून दिलीस...? तू सांगितलं नव्हतं का तिला...?" तसं अजयने राधिकाला झालेल्या गैरसमजाबद्दल सगळ्यांना सांगितलं. तसे सगळेच खूप हसू लागले. 😃😄 अर्चनाने तर डोक्याला हातच लावला. 🤦

अर्चना- "म्हणून ती इतके दिवस तुला अशी टाळत होती... मला वाटलं तू बोलला असशील तीला आपल्याविषयी."
अजय- "अगं तुमची दोघींची तर किती छान मैत्री झाली होती. म्हणून मला वाटलं तू बोलली असेल तीला..."

अमृता- "अरे पण तुमच्या अशा वाटण्याने त्या बिचारीला किती गैरसमज झाला."
मित्र अजय- "गैरसमज झालाच पण त्या गोष्टींचा दोघांनाही खूप त्रास झाला असेल, त्याचं काय..." आणि तो हसू लागला, तसं सगळ्यांनाच हसू आलं.

अशाच त्यांच्या हसतखेळत गप्पा चालल्या होत्या. अजय तर खूपच खूश होता. 😊😊😌

क्रमशः-

💕🌹@Ritu Patil 🌹💕

💕💕प्रेमगंध... (भाग - ९)💕💕
------------------------------------------------------------
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿