Premchand… (Part - 5) books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ५)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका बसमधला घडलेला प्रकार घरी सगळ्यांना सांगते.... आता पुढे...)

अजयच्या घरी पण अजय आणि त्याचे आईबाबा जेवायला बसले होते. दुपारचं दोघांचं बोलणं आई अजयच्या बाबांना सांगत होती. अजय आईचं बोलणं ऐकून गालातल्या गालातच हसत होता. 😊😊
बाबा- "काय रे खरंच कुणी मुलगी आवडलंय का तुला ?"
अजय- "नाही बाबा असं काही नाही. मी ते आईला सहजच विचारत होतो. पुढे जर मला एखादी मुलगी आवडली तर आपल्या होम मिनिस्टर चा विरोधी पक्ष व्हायला नको ना, म्हणून आधीच खात्री करून घेतली." आणि त्याने बाबांच्या हातावर टाळी दिली. आणि दोघेही हसू लागले. 😀😀😅😅

आई- "नको टेन्शन घेऊस बाळा, नाही होणार माझा विरोधी पक्ष. दहा मुलं आहेत का मला ? एकुलता एक मुलगा आहे माझा. आपण एका पक्षातच राहू सगळे." आणि आईपण त्यांच्यासोबत हसू लागली. 😀😀😅😅

बाबा- "तू पसंत करशील तेव्हा करशील, पण एक मुलगी मला सुन म्हणून पसंत आली बघ. तीला बघून मात्र असं वाटलं की हिच मुलगी आपली सून व्हावी म्हणून. अगदी वाघिणीसारखी होती पोरगी."
त्यांवर अजय बारीक तोंड करून म्हणाला, "बाबा, पण मी वाघ नाही ना, ती खाऊन टाकेल मला वाघीण." 🐯🐯 तसे आईबाबा हसू लागले. 😅😅

आई- "तुम्ही कुठे बघितलं तिला ? आणि वाघीण म्हणताय, तर आपल्या पोराला शेळी बनवून ठेवलं नाही ना तर मिळवलं."

बाबा- "नाही गं ती पोरगी चांगली संस्कारी वाटली मला." आणि बाबांनी राधिकासोबत बसमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्या माणसाला दोनचार शिव्या पण घातल्या. आणि बाबा परत बोलले, "खुप कौतुक वाटलं मला त्या पोरीचं. प्रत्येक मुलीने असंच धीट राहायला हवं. कुठे काय प्रसंग उद्भवतील सांगता येत नाही."
(तुमच्या लक्षात आलंच असेल की, ज्यादिवशी राधिकासोबत हा प्रसंग घडला त्यादिवशी त्या बसमध्ये अजयचे बाबाच बसकंडक्टर होते.)

आई- "खरंय तुमचं, बरं झालं त्याला मारून बसमधून बाहेर काढलं ते. खरंच आजकाल पोरींनी खुप सांभाळून राहायला हवं."
अजय- "खरंय आई तुझं. ठिकठिकाणी गुन्हेगारी वृत्तीची माणसं फिरत असतात. आपल्याला फक्त ती ओळखायला यायला हवीत."
आई- "खरंय तुझं पोरा."

जेवता जेवता अजयला एकदमच आठवलं आणि त्याने पटकन बाबांना विचारलं, "बाबा, तुम्ही काय म्हणालात त्या मुलीने छत्रीने मारलं म्हणून ?"
बाबा- "अरे हो, तीने छत्री छत्रीने त्या माणसाला मारलं. तिची छत्रीपण तुटली." बाबा हसून बोलत होते. 😀😀
तसं अजयला लक्षात आलं की ती नक्कीच राधिका असणार. कारण तिची पण छत्री तुटली होती आणि बाबांनी राधिकासारख्या दिसणार्‍या मुलीचच वर्णन केलं होतं. तो मनोमन खुप खुश झाला. त्याला राधिकाचं खुप कौतुक वाटलं. त्यांचंही हसतखेळत जेवण आटोपलं. 😊😊

दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका शांत झोपली होती. राधिकाला कसल्याशा गोंगाटाने जाग आली. तिने डोळे उघडून समोर पाहिलं आणि डोक्याला हातच लावून घेतला. आणि स्वतःशीच पुटपुटली, "या दोघीना कधी सुधरणार नाहीत. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत भांडतच असतात." 🙄🙄

नंतर राधिका वैतागूनच म्हणाली, "काय गं सकाळसकाळी गोंधळ घातलाय तुम्ही दोघींनी ? नेहमीचंच झालंय तुमचं. कशाला भांडताय तुम्ही ?"
त्यांवर मीरापण वैतागूनच म्हणाली, "ताई, मेघाने काल माझ्याकडून पेन घेऊन तिच्या मैत्रीणीला लिहायला दिला आणि तीने परत तिच्याकडून मागितलाच नाही." 😠😠

मेघा- "अगं ताई तिच्याकडच्या पेनाची शाई संपली होती, दुसरा पेन पण नव्हता, आणि माझ्याकडे पण एक्स्ट्रा पेन नव्हता. म्हणून हिच्याकडे मागून दिला मी. आणि एक पेनच तर आहे ना, त्यांत काय एवढं." 🙄🙄
राधिका- "अगं मीरू, देईन मी तूला दुसरा पेन घेऊन. नको वाद घालत बसूस. अगं एका पेनासाठी काय भांडतेस लहान मुलांसारखी." राधिका तिला समजावत म्हणाली. 🙂🙂

मेघा- "तेच तर हिला कधीशी समजावतेय मी. आणि पेनच तर दिलाय ना. दुसरा घेऊ शकतो आपण."
मीरा- "अगं तो नुसता पेन नाहीए गं माझ्यासाठी. खुप जवळची वस्तू आहे ती माझ्यासाठी. मी दहावी पास झाले होते ना तेव्हा माझी बेस्ट फ्रेंड सायली आणि मी एकमेकींना अगदी सेम पेन गिफ्ट केले होते आठवण म्हणून. तिच्या बाबांची बदली झाली म्हणून ती हे शहर सोडून दुसर्‍या गावी गेली. खुप सांभाळून ठेवला होता गं तो पेन मी." मीरा अगदी बारीक तोंड करून बोलत होती. 😟😥😞
यांवर मेघा आणि राधिका एकमेकांकडे बघू लागल्या. दोघींना पण वाईट वाटलं.
मेघा- "मीरू, यार साॅरी गं... मला खरंच माहित नव्हतं. बरं ठिक आहे, आज देते मी तिच्याकडून पेन परत मागून
तूला."
राधिका- "नाही नको मागू तिच्याकडे पेन. तिने जर स्वतःहून तूला दिला ना तरच घे. आणि मी दुसरा पेन घेऊन देईन तुला, अगदी सेम तसाच कळलं." राधिका मीराच्या गालावर हात ठेवत म्हणाली.
मीरा- "ठिक आहे ताई."
राधिका- "आता थोडंसं हस बघू."
तसं मीराने एक स्माईल दिली. 😊😊 त्यांवर मेघाने येऊन मीराला मीठी मारली. राधिका दोघींना बघून हसू लागली. 😊 😊 आणि नंतर आपली शाळेची तयारी करायला निघून गेली.

राधिका घाईघाईने बसस्टाॅपवर आली. बसमधल्या कालच्या घटनेमुळे तिच्याकडे स्टाॅपवर उभी असलेली लोकं खुप आदराने बघत होते. काही लोकं तीला छानशी स्माईल देत होते, त्यामुळे तीही त्यांना स्माईल देत होती. थोड्या वेळाने समोर बस येऊन थांबली. सगळे लगबगीने बसमध्ये चढले. राधिकानेपण विंडो सीट पकडली. कंडक्टरकाका सगळ्यांना तिकीट देत तिच्याजवळ आले. राधिकाने त्यांना पास दाखवला. त्यांनी तो पास चेक करून पुन्हा तीला दिला आणि त्यांनी पण तिला छानशी स्माईल दिली तसं राधिकानेही त्यांना स्माईल दिली. सगळ्यांच्या अशा वागण्यामुळे तीला खुप छान वाटत होतं. 😊😊

थोड्या वेळाने तिचा स्टाॅप आला आणि ती बसमधून खाली उतरली. ती शाळेच्या गेटजवळ पोहोचली. तर समोरच अर्चना अजयच्या बाईकवरून खाली उतरत होती. ती प्रेगनेन्ट असल्यामुळे हळूहळू चालत होती. पायर्‍यांवरून चढताना अजयने तीचा हात पकडून तीला व्यवस्थित चालण्यासाठी मदत केली. राधिकाला अजयच्या असं वागण्याचं खुप कौतुक वाटलं. राधिकाही त्यांच्या पाठोपाठ गेली. तिघांनी पण एकमेकांना गुड मॉर्निंग विश केले. अजय मात्र राधिकाला वेगळाच भासत होता. कारण तो राधिकाकडे बघून सारखा गालातल्या गालातच हसत होता. त्याला त्याच्या बाबांचं बोलणं आठवून हसू येत होतं.😊😊

"ह्याला काय वेड लागलंय का ? माझ्याकडे बघून नुसताच हसतोय." असं राधिका मनातच विचार करत होती. अर्चनाचं पण अजयकडे लक्ष गेलं. ती त्याला म्हणाली, "अजय, काय झालंय तुला ? वेडबीड लागलं की काय ? एकटाच हसतोस तो... आम्हाला पण सांग आम्ही पण हसू, नाही का गं राधिका." अर्चना राधिकाकडे बघून म्हणाली. तसं राधिकाने पण तीला दुजोरा दिला आणि म्हणाली, "हो ना."

"काही नाही गं, काल एक गंमत झाली ना म्हणुन हसत होतो." अजय राधिकाकडे बघून हसतच म्हणाला. 😊😊
अर्चना- "अरे मग आम्हाला पण सांग ना काय गंमत झाली ते."
तेवढ्यात प्रार्थनेची बेल झाली, तसे प्रार्थनेसाठी सगळे उभे राहिले. प्रार्थना झाल्यानंतर सगळे शिक्षक आपापल्या वर्गात निघून गेले.

राधिका आज मुलांना कविता शिकवत होती. कविता शिकवत असताना ती चेहर्‍यावर छानशे हावभाव करून, हातवारे करून कवितेच्या तालावर मुलांना नाचून दाखवत होती. वर्गातली मुलं पण राधिकासारखेच हातवारे करून नाचत होते. सगळ्या मुलांना खुपच मज्जा वाटत होती. आणि हे अजय खिडकीत उभा राहून सगळं बघत होता. अचानकच राधिकाचं लक्ष खिडकीत गेलं. तसं अजय एकदम दचकला आणि पटकन तिथून निघून गेला. अजयचं वागणं बघून राधिकाला हसूच आलं. अजय स्वतःच्या डोक्यांतच मारत मनातच म्हणाला, "मी पण ना वेडाच आहे, राधिकाने पाहिलं मला. काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल." आणि स्वतःशीच हसू लागला. 😊😊🤗🤗

मधली सुट्टी झाली तशी राधिका स्टाफरूममध्ये निघून आली. तीने पाहीलं तर अजय अर्चनाला सफरचंद कापून खायला देत होता. राधिका तिच्या बाजूला जाऊन बसली.

अंजली बाई- "वाह... अजय खुप छान काळजी घेतोस हा अर्चनाची, अशीच काळजी घेत रहा बरं का..."
तसं अर्चना त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "हो बाई, अजय खुप काळजी घेतो माझी." 🤗🤗😊😊

यांवर अजय हसू लागला आणि म्हणाला, "हो तर काळजी घ्यावीच लागेल बाई, नाहीतर हिला काही त्रास झाला ना तर घरी सगळे मला आरोपीच्या कटघर्‍यात उभे करतील." तसे सगळे शिक्षक हसू लागले. राधिका पण हसू लागली. 😅😅😅 शाळेचा आजचा दिवसही छान गेला.

क्रमशः-

🌹💕 @Ritu Patil 💕🌹

💕💕 प्रेमगंध... 💕💕
-------------------------------------------------------------