Ego + Love Solid Long Lasting Bond .. books and stories free download online pdf in Marathi

अहंकार + प्रेम सॉलीड लाँग लास्टिंग बॉण्ड..




मी : "मीच का?????? तो का नाही....??"

हा प्रश्न किती तरी वेळा माझ्या डोक्यात पिंगा घालत होता.... ब्रेक अप नंतर रोज 'इसमे तेरा घाटा..... मेरा कुछ नहीं जाता' हे गाणं ऐकून मनाला सांगितलं होतं की, मला सोडून जाणं त्याला परवडणार नाही... पण, त्या ब्रेकअपला माझाच अहंकार नडला हे ही तितकंच खरं होतं..... पण, मग आता काय करावं....?? कारण, माफी मागून मी स्वतःची व्हॅल्यू कमी नाही करणार..... कधीच नाही..... मग काय बरे करावे.....??

याच विचारात होते आणि आठवले ते दिवस जेव्हा, तो आणि मी एक क्यूट कपल म्हणून कॉलेजमध्ये मिरवायचो..... कॉलेजच्या फर्स्टडेलाच सगळ्यांची रॅगिंग करणारा तो ह्या इगोइस्टीक मुलीच्या प्रेमात कधी पडला हे त्यालाही कळले नव्हते..... तो तर माझ्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, माझा होकार मिळवायला त्याने माझ्या बेडरूमध्ये कुणालाही न कळता येऊन, मला गिफ्ट देण्याची हिम्मत दाखवली होती..... तेव्हाच.... हो हो.... तेव्हा आणि त्याचं क्षणी मी त्याला मारलेली ती मिठी आठवली..... त्या क्षणी माझ्यात अहंकार नव्हता! होतं ते फक्त प्रेम..... नंतर दिवस जात होते आणि आम्ही दोघं कॉलेजमध्ये हॅश टॅग क्यूट कपल म्हणून फेमस होत गेलो..... पण, ते म्हणतात ना..... आपलं सुख बघवत नसतं.... तसच काहीसं आमच्या रिलेशनमध्ये घडलं......

२४ जूनची ती रात्र होती...... त्याचा बर्थ डे मी एका हॉटेल रूममध्ये प्लॅन केलेला..... मस्त पैकी डेकोरेशन त्याला आवडेल ते मी केलं.... आणि बसले वाट बघत.... हो अॅड्रेस पर्यंत पोहचण्यासाठी एक छोटा गेम होताच कारण, हे त्याच्यासाठी सरप्राइज होतं.....😁 त्याला मी ११:४५ ची वेळ दिली होती.... नेहमी पंधरा मिनिटे आधी येणारा तो आज अर्धा तास उशीर होऊनही आला नव्हता..... हृदय धडधड करत होतं...... काय करावं? फोन करावा का? या विचारात फोन कडे लक्ष दिलं तर १२:४५ वाजले होते.... कॉल करूनच बघुया या विचाराने फोन वर नंबर डायल केला....... रिंग जात होती पण, फोन उचलला जात नाही म्हणून, परत - परत नंबर डायल करत होते...... डोळ्यात अश्रू आणि डोक्यात असंख्य विचार म्हणून, मला त्याच्या काळजीने राहवत नव्हते.... शेवटी एकदा कॉल करून मनाचं समाधान होतं का हे बघायला फोन केला आणि तो उचलण्यात आला.....

मी : "हॅलो.... हॅलो.... कुठेय तू..... बरा आहेस ना.... काय झालं तुला.... हॅलो..... बोल ना....."

तिकडून : "हे बेब्स...... जस्ट चील.... तो झोपलाय..... सध्या तो माझ्या सोबत आहे.... उद्या त्याला मी ड्रॉप करेल घरी.... अँड जस्ट चील ओके..... ही इज युअर बॉय फ्रेंड नॉट हसबंड सो डोन्ट क्रिएट सिन.... गूड नाईट.....🥴"

ती...... ती प्रिया तर नव्हती ना..... एक मिनिट.... हो ती प्रियाच होती..... पण ती.... ती कस.... हे देवा.... 😭😭 त्याच वेळेस मी हॉटेल बिल पे करुन घरी आले..... ती रात्र मला झोप लागणार नव्हतीच म्हणून, सर्व सोडून दुसरीकडे राहायच्या विचाराने टिकिट बुक केले आणि मॉर्निंग फ्लाईटने निघाले...... माझा अहंकार मी ज्या व्यक्तीसाठी सोडला होता.... आज त्याने माझं अस्तित्व संपवल्याची भावना मनात होती....

काही वर्ष गेली..... मी माझं बिझनेस सांभाळण्यात व्यस्त झाले होते...... सगळं कसं सेटल होतं..... पण, अजूनही मला त्याची ती चूक आठवत होती आणि अहंकार अजुनच उफाळून येत होता......😠

एक दिवस आमच्याच कॉलेजचा एक मुलगा माझ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी आला...... इंटरव्ह्यू नंतर त्याला मी बोलावून घेतले.....

मी : "हे..... कसा आहेस....."

तो : "मी मस्त..... तू कशी आहेस? आणि इकडे..."

मी : "हे काय मी फर्स्ट क्लास..... आफ्टर ऑल खोट्या माणसांतून लांब आली आहे....😒"

तो : "हे..... डोन्ट से धिस..... अग तुला कल्पना तरी आहे ऋषभ किती शोधतो आहे तुला.....?"

मी : "काय?? आणि मला कशाला शोधतोय.... आहे ना त्याची प्रिया.....😏"

तो : "अग तू जसा विचार करतेय तसं काहीच नाही...... तो रोज तुझ्या घरासमोर उभा असतो...... कुठून तरी त्याला तुझी इन्फॉर्मेशन मिळेल आणि तो तुला येऊन भेटेल...... त्यादिवशी तू कॉल केला तेव्हा आम्ही दोघं एका मुलाला हॉस्पिटलमध्ये एडमिट करायला गेलेलो आणि फोन प्रियाकडे होता...... ती तरी स्टुपिड.... तिने तुझ्यावर प्रँक केला..... मूर्ख कुठे आणि कधी कसं वागायचं हे ही तिला कळत नाही.... आम्ही आल्यावर कळलं की, तू त्याला त्यादिवशी सरप्राइज देणार होतीस.... पण, खूप उशीर झाला म्हणून, त्याने ठरवलं उद्या मॉर्निंग तुला सरप्राइज देईल..... त्याच तयारीत कधी सकाळ झाली कळलच नाही...... तुझ्या घरी येऊन कळलं की, तू निघून गेलीस आणि कोणाला तुझ्याबद्दल माहीत होऊ नये म्हणून, तिथे सुद्धा तू काहीही न सांगता निघून गेलीस..... तुला माहित आहे तुझ्या या वागण्याने त्याला किती मनस्ताप होतो आहे...... हे बघ तू तुझा इगो बाजूला ठेऊन विचार करावा असच मला वाटतं..... बाकी तुझी इच्छा.... येतो मी......"

तो निघून गेला मात्र मी विचारात होते...... मीच का तो का नाही....? अरे पण त्याने तर केला होता ना प्रयत्न... मीच आले होते निघून.... तो तर आजही तिथेच होता माझी वाट बघत...... हीच वेळ होती परत अहंकार बाजूला ठेऊन, प्रेम मिळवण्याची.... लगेच फोन उचलला आणि डायल केला एक नंबर जो, आजही माझ्या हक्काचा असल्याची भावना मनात होती......

फोन उचलून तिकडून एकच आवाज आला.....🥺🥺 ज्या आवाजाने, डोळ्यांतून अश्रू मला न विचारता त्यांच्या वाटेने, न थांबता वाहू लागले.....😭😭😭😭😭😭

ऋषभ : "आय स्टिल लव्ह यू मोटो.....😘"

तोंडून शब्द बाहेर पडत नसले तरीही आतून कधीचा मी त्याच्याशी संवाद साधला होता...... लव्ह यू टू रे माय येडु......😘😘

अहंकार असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कधी प्रेम होतं ते लाँग लास्टिंग, वॉटर प्रूफ, कुठल्याही वातावरणात न डगमगता उभं राहणारं असतं..... कधीकधी वाकतं पण, मोडून उध्वस्त कधीच होत नाही हे सांगणारी ही प्रेमळ कथा.....❣️