Tu Hi re majha Mitwa - 13 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 13

#तू_ही_रे_माझा_मितवा 💖💖💖💖💖

#भाग_13

गोवा म्हणजे फ्रीडम,गोवा म्हणजे सुशेगात भटकंती आणि गोवा म्हणजे रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला दिलेलं एक रॉ कीस..!

सगळ्यांसाठी गोव्यातला दुसरा दिवस देखील स्कूटीवरून मनमुराद भटकून,पबमध्ये थिरकून मजा मस्ती करण्यात गेला.नाश्ता आणि जेवायच्या वेळेला रेवाने ऋतुजाच्या लक्षात येईल बरोबर अश्या पद्धतीने वेदला काय खायचं,काय नाही ह्याबद्दल वॉर्न केलं.ऋतूने ह्यावेळी दुर्लक्ष केलं तिला ह्या रंगीत वातावरणात काहीही किल्मिष नको होती.
रात्र झाली तशी क्लोजग्रुपमध्ये असणाऱ्यांनी त्यांचे वेगवेगळे प्लान्स बनवले होते. जरा फ्रेश होऊन,चेंजकरून सगळे हॉटेलच्या रेस्ट्रोबारमध्ये भेटणार होते.

ऋतू आणि सौम्यादेखील त्यांच्या रुममध्ये आल्या. शॉवर घेऊन ऋतू अगदी फ्रेश झाली होती.हेयर ड्रायरने केस वाळवत असताना कालची संध्याकाळ आठवून तिच्या ओठंवर हसू उमललं.सौम्याच्या नजरेतून ते सुटलं नाही.

“आम्हाला सगळं समजतंय बरं...कुणीतरी इतकं ब्लश का होतंय ते आणि आज लिपस्टिक पुन्हा पुन्हा का लावावी लागत होती ते. सगळं कळतंय. ”

“सौम्या...ohh my god असं काहीही झालं नाहीये.मी तुझ्यासोबतच होते ना? आम्ही ग्रुपला सोडून जरादेखील इकडे तिकडे गेलो का?” ती सारवासारव करत म्हणाली.

“There you are….चोमचा! चोराच्या मनात चांदणं! मी तर आपण दिवसभर जे खा खा खात होतो त्यामुळे लिपस्टिक पुसल्याचं बोलत होते,तुला काय वाटलं चोमचा?”

“सौम्या बास हा...अजून काही ऑफिशियल नाहीये.त्याने कुठे प्रपोज केलंय.”

“मॅडम उद्या तुमचा birthday आहे आणि काहीतरी सरप्राईज प्लॅन वर चालू आहे,समजलं का?

“हो का? बरं बाबा...बघू उद्या.”

****** **
ग्रुपमधले काही कपल टिटोलेनला जाणार होत तर कुणी बागाबीचला. काही रिसोर्टला थांबणार होते.सौम्या आणि ऋतू यांचं काय करायचं हे ठरत नव्हतं,ऋतूने आजूबाजूला पाहिलं,वेद दिसला नाही.
रेवा आणि जय गप्पा मारत बसले होते.जयला विचारलं तर त्यानेही फटकून ‘माहित नाही’ असं नेहमीच्या टोनमध्ये उत्तर दिलं.

जरावेळाने तो आला.त्याला एका कोपऱ्यात घेऊन जात ती रागाने म्हणाली.

“कुठे गायब होतास रे,मी वाट बघतेय मघापासून ?” सिल्वर सिक्वेन्स पोन्चो टॉप,कार्बन ब्लॅक शॉर्ट स्कर्ट नाकावर लटका राग,वेद बघतच राहिला.

“बोल ना?”

“बार्बी दिसतेय...रुसून बसलेली बार्बी ” तिच्या नाकावर एक टिचकी मारत तो म्हणाला.

“अरे काय ठरतंय? कुठे जायचं? टिटोलेनला जायचं?” तिने उत्सुकतेने विचारलं.

“कुठेच नाही जायचं...थोडा वेळ गप्पा,मग आराम,उद्या प्रिन्सेसचा स्पेशल दिवस आहे म्हणून आज आराम करायचा.बाकीच्यांना जाऊदे कुठेही.ही ऑर्डर आहे माझी समजलं ना?”

“ओके..” तिने सहमती दर्शवली.

इकडे जय आणि रेवाची वेगळीच खलबतं चालली होती.

“रेवा तू आता प्रिया,निकी,तनय यांच्या ग्रुपसोबत जा ,मुद्दाम तिच्यासमोर वेदला सांगून जा,ओके?”

“आणि तू?”

“मी गेम खेळतो...” तो हसून म्हणाला.तशी त्याच्या खांद्यावर एक जोरदार थाप पडली.

“साल्या कसला गेम खेळतोय तू, समजलंय मला सगळं...” वेद त्याची कॉलर पकडत म्हणाला.

रेवा आणि जयला एसीमध्येही घाम फुटला.

“काय समजलं साक्षात तुला?” तो घाबरत म्हणाला.

“हेच , सॅम भेटला होता थोड्यावेळापूर्वी म्हणत होता की बेटिंग कसं करतात हे विचारात होता तू त्याला.आता बेटिंग पण खेळणार का तू साल्या ”

“बेटिंग....ओह्ह हा बेटिंग..” रेवा आणि जय थोडेसे सैलावले.

“लाज वाटते का वर्षही पूर्ण झालं नाही अजून जॉब सुरु होऊन आणि..”

“ये वेद महाराज बास ना,साक्षात गोव्याला आहोत,प्रवचन नको देऊ..ते मी गमतीत बोललो..सोड ते.”
ऋतुला त्यांच्याजवळ आलेलं पाहून रेवा म्हणाली-

“बरं गाईज,तुम्ही एन्जॉय करा,वेद , मी प्रियाच्या ग्रुपसोबत जातेय डिनरला.”
वेदने आज पहिल्यांदा रेवाला स्पेगटी शोर्ट ड्रेसमध्ये बघितलं.

“You are looking absolutely stunning Reva.”
तो तिला मनापासून कॉम्प्लिमेंट देत बोलला.
ऋतूच्या चेहऱ्यावरचा रंग खर्रकन उतरला पण चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत ती म्हणाली – “ohh yes”

“Thanks” ती ही नाटकीपणे म्हणाली.

“ रेवा कर की आराम इथेच,भरपूर फिरलोय आज.त्या ग्रुपसोबत नको जाऊ.” त्याच्या आवाजातली नाराजी,तिच्यासाठी वाटणारी काळजी बघून रेवा जरा सुखावली.

“वेद माझी काळजी करू नको,I will be ok, एन्जॉय करू दे यार.” ती जरा खेळीमेळीने म्हणाली.

“ओके”

रेवा निघून गेली.

जरावेळ गप्पा मारत,साडेनऊच्या सुमारास डिनर संपवून वेदच्या आग्रहास्तव ऋतुजा रूमकडे जायला निघाली.
सौम्या अनुजसोबत टिटोलेनला गेली. ऋतू रुममध्ये आली.
की इन्सर्ट करताच लाईटस लागली आणि तिने बघितलं तिच्या बेडवर एका मोठ्या बास्केटमध्ये काहीतरी गिफ्ट सुंदर पद्धतीने ठेवलं होतं,तिने जवळ जाऊन बघितलं त्यावर एक कार्ड होतं.

“Sona this is for you…open it immediately.”

तिने अधिरतेने ते उघडलं आत अजून एक कार्ड होतं.

“Sona this dress is specially for you.. & Don’t bother about size तुझ्या लाडक्या तनुसोबत जाऊन घेतला आहे. हा ड्रेस घालून छान तयार हो,शार्प ११.४0 ला रिसेप्शनिस्ट येईल तिच्यासोबत जा.Don’t forget to switch off your phone.मला कुणीही माझ्या अगोदर तुला विश केललं चालणार नाही.Waiting for you ...!!”-- VED

तिने ड्रेस उघडून पहिला-कलोसल पर्पल,सेक्वीन वर्क आणि शॅलो बॅकलेस,हॉलटर नेक मिडी ड्रेस...तिला खुदकन हसू आलं,तनुने तिची चॉईस अगदी बरोबर सांगितली होती त्याला.
काय काय तयारी करायची ह्या आनंदात ती पार बुडून गेली.

**********

थोड्यावेळाने वेद अगदी तयार होऊन आला.जरावेळ मित्रांसोबत बसून तो निघणार होता. सॅम चेतन,वेद आणि जय यांना घेऊन टेरेसवर गेला.
तिथे छोटासा,रस्टिक बार बनवला होता.खाली बिछायतीवर दोन-तीन हुक्का पॉट मांडून ठेवले होते. led दिव्यांची माफक,वातावरणाला साजेशी रोषणाई होती.

“Here you are guys…private bar,this party is Sponsered by me !!” सॅम आनंदाने जवळ जवळ ओरडतच म्हणाला.

“तूच भाई..तूच,लव्ह यु ब्रो.” जयने त्याला घट्ट मिठी मारली.

चेतन लगेच लिकरचा कुठला स्टोक आहे ते बघायला गेला.

“साल्यानो पिण्याशिवाय काही सुचत नाही का?” वेद हसत म्हणाला.

“ये महाराजा, गोव्याला लोक्स खायला-प्यायला येतात,तुझ्यासारखं बाबू-शोनाला फक्त फिरवायला नाही येत.” ‘फक्त’ शब्दावर खास जोर देत जय म्हणाला.

“ये साल्या साक्षात,तुझ्या घाणेरड्या डोक्यात हेच येणार म्हणून तुला बाबू-शोना म्हणायला पण कुणी नाहीये कळलं का” वेद त्याची गम्मत करत म्हणाला.

“बरंच आहे नाहीये कुणी ते आणि बॉस आज तिला प्रो मारल्यावर तर अगदी ऑफिशियली गळ्यात गळे घालायला मोकळे होणार तुम्ही.”

सॅमने सगळ्यांसाठी पेग भरून आणले.

“सॅम मी नाही घेणार..आज तरी.” वेद हसून म्हणाला.

“come on yaar तुझ्यासाठी फक्त बियर आहे जयने सांगितलंय मला तूला थोडही अल्कोहोल चढतं ते. कमाल आहे यार अरे पोरी पितात बियर न तुलाच काय होतं? ”

“वेद यार आज आमच्या सोबत थोडी तरी घे बघ उद्यापासून ‘यार यार नाही रहेगा..बाबू शोना बन जायेगा..’ मग सगळं तिला विचरून होणार..भाई प्लीज़ आज अपना दिन है..अगदी एकच मग बियर चियर्स करण्यापुरती.” जय त्याला विनवणी करत म्हणाला.
चेतन आणि सॅमने ही त्याला भरीस पाडलं.

“अजिबात नाही” वेद ठामपणे म्हणाला.

बराच वेळ झाला,गप्पा रंगात आल्या होत्या.जयची चलबिचल वाढली,प्लॅन फ्लॉप होतोय का काय म्हणून तो घाबरला.जय आणि चेतन ने हुक्का ट्राय केला.वेदला ऑफर केला तो ते ही नाही म्हणाला.

अकरा वाजले होते.फुल ड्रिंक करून चेतन निघून गेला.

“वेद यार तूला अल्कॉहोलचा प्रोब्लेम आहे ना पण एक सिगरेट तर घेऊच शकतो ना आमच्यासाठी,ब्रो तुला थोडं तरी बिघडायचं आहे आज..उद्यापासून प्रॉमिस काहीच नाही.प्लीज़ भाई प्लीज़” एक मास्टरस्ट्रोक म्हणून जय ने पुन्हा त्याला विनवलं.

“ओके” ह्यावेळी तो नाईलाजाने म्हणाला.

जयने त्याला एक सिगरेट दिली.

थोडा वेळ पुन्हा गप्पांमध्ये गेला वेद्ला जरा डोकं भणभणल्या सारखं झालं.बोलणं असंबद्ध होत होतं.अगदी एका सिगरेटने हे असं इतकी भ्रमिष्टासारखी त्याची अवस्था व्हायची नाही.
वेद बोलत होता पण त्याला काहीतरी चुकल्या सारखं वाटत होतं.

“किती वाजले?” शक्य तेवढं नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला.

“ ११ ” जय जरा जड आवाजात मनाला.

“ओके मी जातो..खाली ” वेदने आजूबाजूला बघितलं, सॅम खाली टाकलेल्या गाद्यांवर आडवा झाला होता.
जय अजून एक पेग भरून घेत होता.

“ये साक्षात बास किती पितोय,बंद कर आता.चल मी जातो”

मुश्किलीने वाक्य जुळवत तो म्हणाला आणि खाली निघाला.
तो गेला तसं जयने रेवाला फोन केला.

“कुठेय तू?

“आहे खालीच रुमजवळ”

“लवकर आलीस?”

“हो,बोर झालेलं खूप..,बरं वेद येतोय ना खाली?”

“आला असेल बघ,काळजी घे त्याची.सॉलिड गंडलाय तो.” जयने खदखदून हसत फोन ठेवला.

“सॅम साल्या अगदी थोडंच टाकलय ना वीड त्यात?” जय ने सॅमला विचारलं.

“*** मारीज्युएनाच काय सगळ्या प्रकारच्या ड्रग्जचा डॉक्टर आहे मी,कोण किती हाय जाणार मी ठरवतो,***” सॅम ही हसत म्हणाला.

“Happy Birthday Rutuja..” खदखदून हसत जय म्हणाला आणि खालच्या गादीवर मस्त अंग टाकून झोपला.

**********

पावलं कुठे पडताय हे सुद्धा वेद्ला कळत नव्हतं,रेलिंगला पकडून तो सावकाश उतरत होता.
त्याला सगळं समजत होतं पण डोकं अगदी थॉटलेस झालेलं,
का आलोय,कुठे जातोय हे लक्षात येतंय तोच विसरून जात होता.
तो खाली आला.रिसेप्शनच्या उजव्या बाजूला पहिली रूम रेवाची होती.
तो रिसेप्शनला पोहचणार त्या अगोदर रेवाने त्याला बघितलं.त्याचा तोल जात होता, तोच तिने त्याला सांभाळलं आणि आधार देत तिच्या रूममध्ये आणलं आणि बेडवर बसवलं.

“काय होतंय वेद?are you ok?”

“I don’t know?..मला चक्कर येताय..मी जरा वेळ पडतो..leave me alone please...आणि Rutu…”
त्याने नशेतच मोबाईलसाठी खिशे चाचपडले,मोबाईल नव्हता.... थोडावेळ त्याला पुन्हा भ्रमिष्टासारखं झालं..आता त्याला काही दिसत नव्हतं..शांत ..शरीर अगदी पिसासारखं हलकं झालय आणि आपण ह्या जगातच नाहीये या नशेत तो शांत झोपी गेला.

रेवा समोर खुर्चीवर बसून होती.अजून फक्त थोडावेळ तिला असं बसायचं होतं,एकदा का ऋतू वेदला शोधत आली की..जोरदार भांडण होणार होतं आणि त्यासाठी ती तयार होती.तिचा फोन प्रियाच्या पर्समध्ये ठेवायला म्हणून दिलेला तो ती जाणीवपूर्वक विसरून आली होती. आता जे काही बोलणं होणार होतं ते सॅम ने दिलेल्या ह्या फोनवरच...तिला ह्या परिस्थितीत ही हसू आलं ...छद्मी हसू.

**********

परीकथेतून अलगद खाली उतरून आलेल्या एखाद्या राजकन्येसारखी ती सुंदर दिसत होती,
शार्प वेळेवर रिसेप्शनिस्ट आली. ऋतू तिच्यामागून निघाली..रिसॉर्ट शांत होतं,बाहेरही बऱ्यापैकी शांतता होती. बागेचे तीन सेक्शन ओलांडून गेल्यावर ते बाहेर आले,उजव्या बाजूला रिसोर्टचा प्रायव्हेट वॉक वे होता.काही अंतर त्या वॉकवे वर चालल्यावर पुढे रेड कार्पेट होतं,त्याच्या दोन्ही बाजूंना मंद रोषणाई केलेली होती.

बरंच अंतर चालल्यावर एक चौकोनी मंडल होतं, त्याच्या चारही खांबांना पांढरे,आकाशी झिरमिळ्यांचे पारदर्शी पडदे सोडले होते. त्या पडद्यांच्या वर चांदणी आणि चंद्राच्या आकाराच्या led च्यामाळा रांगेत लावल्या होत्या.
आजूबाजूचा फुलांची दाट पखरण केलेली होती. मध्यभागी एक अँटिक टेबल आणि त्यांच्या भोवती तसल्याच दोन खुर्च्या.
टेबलवर एक बॉक्स होता बहुदा केक असावा.पाण्याच्या बॉटल,एक नक्षीदार ट्रेमध्ये खूप सारी चॉकलेट.
ती भान हरपून बघत राहिली. आजूबाजूला शांतता भरून होती, नाही म्हणायला अगदी दूरवर रिसोर्टचे शाक्स दिसत होते. बाराला फक्त पाच मिनिटे बाकी होती होती.रिसेप्शनिस्ट निघून गेली.आता ती तिथे एकटीच होती.ती शांतता,तो गारवा,समुद्राची गाज आणि बागेकडून ऐकू येणारी पानांची सळसळ...थोडे दूरवर येणारे हसण्या खिदळण्याचे आवाज जरा जवळ येत असल्यासारखे वाटले.
तिच्या छातीत अगदी धस्स झालं.

“एव्हाना वेद यायला हवा होता...” तिच्या मनात शंका आली.

तिने जरा इकडे तिकडे बघितलं..अंधारात जणू चित्र विचित्र सावल्या दिसत होत्या..ती घाबरली,खुर्चीवर बसली.

“येउदे त्याला खूप मारणार आहे मी...सरप्राईज गेलं खड्यात...” ती बॉटल उघडून घटाघटा पाणी प्यायली.

मागून पावलांचा आवाज तिच्या दिशेला येत होता.तिच्या जीवात जीव आला.हलकंस वळून तिने मागे बघितलं वॉकवे वरून कुणीतरी येतांना दिसलं.तिची कळी खुलली. अनामिक गोड धडधडीने ती हुरळून गेली.

‘शेवटी आज इतक्या दिवसांनी हा स्टुपिड मला “I love you” म्हणणार,किती वाट बघितली मी ह्या दिवसाची?..ह्या सुंदर सरप्राईजसाठी त्याला एकच रिटर्न गिफ्ट मिळणार....त्याला हवी असणारी स्वीटकॉफी !!” ती स्वतःशीच लाजली.

‘तो आत्ता पोहचेल.. काय म्हणेल अगोदर happy birthday sona or love you sona ?”

तिची धडधड अजून वाढली

‘..१,२,३,.....आत्ता बोलेल..’

ती अंक मोजत होती,तिची बैचेनी वाढली..पावलांचा आवाज मागे थांबला तसं तिने डोळे बंद केले...वेद हा क्षण डोळ्यात नाही ओठात कैद करायचा आत्ता..!! तिने ठरवून टाकलं.

-आणि तिच्या कानांवर आलं

“Excuse me”

एक वेगळाच भारदस्त, आवाजात हुकुमी जरब असलेला आवाज..

“काय?” तिने मागे वळून बघितलं.

त्या लाल पिवळसर धूसर प्रकाशात तिने त्याच्याकडे निरखून बघितलं--

जवळपास सहा फुट एखाद इंच वरही असेल,अथलेटिक बॉडी,
त्या पिवळसर प्रकाशातसुद्धा दिसणारे हेझल कलर डोळे,थोडा मेसी असलेला फ्रिंज हेयर कट..रेयर स्टबल दाढी ,डार्क ब्लू बॉडीटच टी आणि ऑलिव्ह ग्रे थ्रीफोर्थ, पायात स्नीकर्स,एका हातात भल्या मोठ्या डायलचं घड्याळ आणि दुसर्या हातात लेदरचं पायरेट ट्रेझर चार्म कफ..कानात हेडफोन,हातातल्या बियर बॉटल मधून सावकाश एक घोट घेत तो तिच्यासमोर उभा होता.

ती गोंधळली,तिचा हात सावधतेने पर्सवर गेला,त्यात पेपर स्प्रे कायम असायचा.

“Who are you?” तिच्या आवाजात आणि नजरेत धार होती.

“#कबीर”.....................!!

हवेची एक झुळूक येऊन गेली, खांबावरून निसटून एक पडदा काही क्षण दोघांमध्ये हेलकावे खात राहिला.

#क्रमशः

©हर्षदा

(लोभ असावा, कमेंटमधून दिसावा)