Did i miss you books and stories free download online pdf in Marathi

मी चुकले का?


आज परत आम्ही नेहमीप्रमाणे भेटणार.... जागा तीच जिथे नेहमी भेटतो.... "तो"...... हो हो माझा "तो"..... आम्ही गेली सहा वर्ष आहोत सोबत.... त्याने खूप समजून घेतलंय मला..... आता जीवनातील खूप महत्त्वाचा निर्णय घरच्यांना सांगायचं म्हणून, आधी आमच्यात तो प्री प्लॅन्ड असला पाहिजे की नाही....! म्हणूनच भेटत आहोत आज..... कुठला ड्रेस घालावा???? किती कन्फ्युजन राव..... नेहमी पेक्षा आज मनात धाकधूक वाटतेय.... का असावी याचं उत्तर शोधायला वेळही नाही..... असो... घालते तोच ड्रेस ज्यात त्याला मी एका नजरेत पसंत पडले होते.... शेवटी लग्न करतेय त्याच्याशी.... मग त्याच्यानुसर, त्याला आवडेल ते करूनच मला आनंद मिळेल नाही का!?.... चला तयारी झाली निघालं पाहिजे.... उशीर झालेला साहेबांना आवडत नाही.....🤭🤭

मी : "आई येते हा कॉलेज मधून.....😘"

आई : "आज काय स्पेशल तिकडे....??🤨🧐"

मी : "काही नाही ग.... आज छोट फंक्शन आहे कॉलेज मध्ये..... त्यासाठी मी अँकरिंग करणार आहे.... म्हणून....😣"

आई : "फेब्रुवारी महिन्यात कसलं आलंय फंक्शन??"

मी : "हा अग ते..... आहे एक...... शिवाजी जयंतीला सुट्टी असेल ना सो.... आधीच आम्ही एक सोहळा करतोय...."

आई : "अग महाराजांना काय वाटेल.... त्यांचा जयंती सोहळा आधीच साजरा करताय....🤦🤦"

मी : "जाऊदे येते मी....🙄"

आई : ".....🤨🤨hmm"

सुटले नाहीतर आज हिने धरलं असतं.....😛 चला पटकन जाऊन थांबलं पाहिजे.....

हे काय मी आले आणि हा अजुन आलाच नाही...🧐 पंधरा मिनिटे लेट आहे मी तरीही....🤨 तो दिसतोय.... हा तोच आहे.....

मी : "काय रे आज इतका उशीर.... नेहमी माझ्या आधी येतोस आणि मला बोलतोस लेट आली.....🤨"

तो : "अग झाला उशीर.... ट्रॅफिक होती...."

मी : "मग समोरच्याच सुद्धा समजून घ्यावं माणसाने...😏"

तो : "ते जाऊदे आता चल निघायचं...??"

मी : "हो चल...."

छान पैकी तलावाच्या काठी झाडाखाली बसतो नेहमी आम्ही..... आजही आलोय..... पण, आज उद्देश वेगळा आहे.... त्याला आणि मला दोघांना आमच्या फ्युचर विषयी बोलायचं आहे.... मी सुद्धा त्याच्या हाताला विळखा घातला आणि बसले.....💞

मी : "बोल ना..... सांगितलं ना तू घरी... काय बोलले ते...."

तो : "काही नाही त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही.....☺️"

मी : "खरच ना.....☺️"

तो : "हो ग..... खरच..... तू कधी सांगणार घरी...?"

मी : "आजच सांगते..... पण, त्यांनी मला घरातून काढलं म्हणजे.... कारण, खूप जास्त स्ट्रीक्ट आहेत माझ्या घरचे....😣😣😟"

तो : "माझ्या घरी यायचं त्यात काय....😍 मी अा ना...😘"

मी : ".😘😘"

आमची भेट झाली आणि मी घरी निघून आले..... मनात प्रश्न होतेच काय बोलणार? कसं बोलणार??? पण, आता परिस्थितीला समोर जाणं भाग होतं..... रात्री सगळे हॉलमध्ये बसले होते..... मी गेले.....

मी : "बाबा मला काही सांगायचं आहे सर्वांना...😕😟😟"

बाबा : "काय आहे.....🤨"

मी : "बाबा ते माझं एका मुलावर....."

आमच्या घरी माझं पूर्ण वाक्य ऐकुन घेतलंच गेलं नाही.....

बाबा : "बास.....😡 यापुढे एकही शब्द तोंडून काढलास तर, जीभ बाहेर काढेल...."

मी : "आई तू तरी सांग ना त्यांना...🥺"

आई : "म्हणूनच गेलीस ना आज सजून... काय तर म्हणे शिवाजी सोहळा..... हेच शिकवलं का राज्यांनी आपल्याला मूर्ख मुली...😡"

मी : "आई राज्यांनी जे शिकवलं ना ते आपण आत्मसात करतच नाही... नाहीतर आज मला तुमच्या समोर अशी प्रेमाची भिक नसती मागावी लागली.... तुम्हीच मला जाऊ दिलं असतं..... अरे महाराजांनी स्त्री सन्मान, आंतरजातीय विवाह या सगळ्या कुप्रथांना कधी वावरूच दिलं नाही.... आणि आज त्यांच्या नावावर तुम्ही याच सगळ्या प्रथांना घेऊन फिरता.....😖"

माझं इतकं सगळं ऐकून बाबांचा पारा अगदीच वर चढला आणि त्यांनी माझ्यावर शेवटी हात उगारलाच....👋

बाबा : "लफडी करायची ना निघ इथून..... तुझ्यासारखी मुलगी जन्माला घालून पछतावत अाहो आम्ही.....😡🤬"

सगळी कल्पना असूनही मी का त्यांना सांगितल हे वाटत असताच, दुसरीकडे समजलं की, आपल्या भारतीय संस्कृतीत मुलगी कधीच आपला निर्णय बोलून दाखवत नसते.... हा प्रतिगामी समज आपल्या फिल्म इंडस्ट्री ने अजुनच रुजवण्यास मदत केली आहे.... एक मूव्ही आठवतो.... घर - संसार ज्यात जितेंद्र, त्याच्या ऑन स्क्रीन बहिणीला म्हणतो, "शरीफ घर की लडकिया अपने शादी की बात घर वालो से नहीं किया करती.." म्हणजे, जितेंद्रने केलेले ते विधान आपल्या संविधानाचा अपमान करणारे नाही का वाटत आजच्या स्वघोषित अनुयायांना.... जे एका विशिष्ट कम्युनिटीचा अपमान म्हणून पेटून उठतात....🤷

हे सगळे विचार मला त्या एका क्षणी आठवले आणि डोकं जड वाटू लागलं...... जाणार तरी कुठे.... मग आठवलं त्याचं ते बोलणं जे आजच तो मला बोलला होता.... म्हणून, बॅग पॅक करून निघाले..... आई - बाबांनी थांबवणे गरजेचे समजले नाही.... मी सुद्धा जास्त काही न बोलता निघून जाणं योग्य समजून त्याच्या घरापर्यंत येऊन पोहचले..... डोळ्यांसमोर नको ते विचार.....🥺 तो त्याचा शब्द तर पाळेल ना???? की, घरच्यांसमोर माझा अस्विकार करून माझाच अपमान करेल...?? या विचारातच मी त्याच्या दारावर जाऊन डोअर बेल वाजवली..... आतून एक म्हातारी बाई आली.....

ती : "कोण पाहिजे पोरी....🤨🤨"

मी : "रजत आहे का??"

त्या मला एका वेगळ्याच कटाक्षाने बघू लागल्या...... आतून रजत बाहेर येत.....

रजत : "... तू.... ये ना....🙂"

मी आत जाऊन बसले आणि सगळी त्याच्या घरची मंडळी मला बघू लागली..... रजतने माझ्या समोरच घरच्यांना आमचा निर्णय सांगितला..... त्यांनीही जास्त विरोध न दर्शवता, मला एक्सेप्ट केले.... कदाचित त्यांना आधीच त्याने कल्पना दिली असावी.....

लग्न मस्त पार पडले..... फक्त त्याचीच फॅमिली इन्व्हॉलव्ह असल्याने हुंडा वगैरे सारख्या मागण्यांची काळजीच मिटली..... लग्नानंतर फिरून आलो आणि मग सुरू झाले ते नेहमीचे जगणे...... रजत जॉब करायचा त्याच्या घरी तोच कमावणारा.... मला सगळं व्यवस्थित सांभाळावं लागायचं..... कंटाळले होते सगळ्याला.... कधी तरी आपण निर्णय घेऊन चुकलो असही वाटायचं..... म्हणून, एकदा निर्णय घ्यायचे ठरवून निघाले जॉब इंटरव्ह्यू साठी...... पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन मिळवून मी खूप खुश होते..... पण, रजत एक्सेप्ट करेल की, नाही यात गोंधळ उडाला...... घरी रात्री जेवणं उरकली....... मी रजतला माझा निर्णय सांगितला..... त्याने नकारण अपेक्षित होतच..... कारण, आमचं लग्ना आधी ठरलेलं की, लग्ना नंतर मला जॉब करता येणार नाही.... पण, परिस्थिती नुसार काही तरी करणं मला भाग होतं....

रजत आणि माझ्यात नेहमी याच मुद्द्यावरून भांडणं व्हायची..... भांडण खूप विकोपाला जाऊन माझ्यावर हात देखील उगारायला त्याने संकोच केला नव्हता...... एकदा मीच निर्णय घेतला..... वेगळं व्हायचं कारण, जिथं आपलं अस्तित्व फक्त घरकाम करणारी बाई म्हणूनच असणार असेल त्या मानसिकतेत राहूनही काय उपयोग.....

मनात नसून वेगळं व्हावं लागलं......

"प्रेम आणि अस्तित्व" या लढाईत जर जिंकायचं असेल तर, एखाद्या व्यक्तीवर, तिचं अस्तित्व जपून प्रेम करा... नक्कीच माणूस म्हणून तुम्ही जिंकले असाल.....

या लढाईत मी स्वतःच प्रेम गमावून बसले..... पण, मला आज एका प्रश्नाचं उत्तर हवंय........ मी चुकले का??

काही कथा काल्पनिक वाटत असल्या तरीही, वास्तविकतेशी त्यांचा जवळचा संबंध असतो..... अशीच ही कथा..🙏