ego... in Marathi Women Focused by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | अहंकार...

Featured Books
  • બાળપણ - ભાગ 2

    પ્રકરણ 5: માતૃત્વનો અહેસાસ ઘરમાં હવે એક નાનો રાજકુમાર હતો…તે...

  • The Madness Towards Greatness - 25

    Part 25 :SK એ ફરી એક નવા રહસ્યો વિશે વાત કરી , આ સાંભળીને રિ...

  • ક્રિસ્ટોફર કોલમ્બસ

    ઇતિહાસના પાનાઓમાં જેને આપણે 'મહાન સાગરખેડુ' તરીકે ઓળ...

  • જયપુર

    *જયપુર* રાજસ્થાનની રાજધાની જયપુરની ઓળખાણ એવો હવામહલ પહેલાં જ...

  • તારા વિનાના શહેરમાં

    સાંજ નમવા આવી હતી અને સાબરમતી રિવરફ્રન્ટ પર ઠંડો પવન ફૂંકાઈ...

Categories
Share

अहंकार...





साधारण सहा महिने झाले असतील.... आमचं बोलणं बंद होऊन..... विसरला असेल कदाचित.... काहीही असो पण, त्याच्या सोबत होते तेव्हा, मला वेगळीच सुरक्षितता वाटायची.... त्याचं ते पब्लिक प्लेसमध्ये, स्वतःला माझ्या पासून दूर सारण.... मनाला खात्री देऊन जायचं की, हा एकमेव असा पुरुष आहे जो माझा आदर करतो..... कधीच मनाविरुद्ध त्याने चुकीचं केलं नसल्याने, माझं स्व: त्याला सोपवताना मी मन मोकळं केलं होतं..... मनात, ना कुठलं टेन्शन होतं ना कुठला नकारात्मक भाव.... बिनधास्त होते..... त्याचं असणं मला तेव्हा मूलभूत गरजांपैकी एक वाटू लागलं होतं.....

सगळं व्यवस्थित सुरू असताना जाणवलं की, समोर आमचं भविष्य नाही मग एकमेकांत बुडून जीव जाण्यापेक्षा सावरलेलं बरं..... म्हणून, एक दिवस......

मी : "अस का बोलतोस यार तु? आता पर्यंत होतो ना माहीत असून की आपलं पुढे फ्युचर नाही.... मग आताच वेगळं होणं गरजेचं आहे का??🥺"

तो : "तसं नाही ग बाळ (हा शब्द तोच ज्याने मला त्याचं व्हायला मजबूर केले होते)"

मी : "मग कस रे सांग ना...🥺"

तो : "माझ्या घरचे कधीच अदर कास्टला सपोर्ट नाहीत करणार ग.... उगाच प्रेमात पडलो अस वाटतंय..... तुझ्यासारखी मुलगी मी शोधून ही मिळवू शकणार नाही.... तुला एक सांगू, मला जर तुझ्याच सारखी देखणी मुलगी माझ्या कास्ट मध्ये मिळाली ना...... कधीच तिला जाऊ देणार नाही.....😘"

मी : "पण मग मीच का नाही.... वाटल्यास मी सर्व सोडून तू जसं म्हणशील तस वागेल..... प्लीज एकदा फक्त बोल तू की, लग्न करशील....."

तो : "कसं म्हणू ग.... मला माहितीये आपल्या नात्याला कोणीच एक्सेप्ट करणार नाही..... मग??"

मी : "काही गोष्टी कधीच स्वीकारल्या जात नसतात अरे.... म्हणून, आपण त्या करूच नये हा कुठला नियम....?? आणि तू खूप आवडतोस यार मला.....🥺"

तो : "मला पण आवडतेस यार तु..... पण, मी नाही स्टँड घेऊ शकणार घरच्यांसमोर..... जिथं आपलं फ्युचरच नाही तिथं पुढे वाढून काय अर्थ अग....."

मी : "हे बोलताना जरा विचार केला असता अरे..... पुढे तर कधीच वाढलो आपण.... आता तू मागे यायला सांगतो आहेस...."

तो : "झालं असेल ना आता.... दोघांना मान्य होतं ते.... दोघांच्या इच्छेने केलं ना... पण, इथून पुढे नसेल आपलं फ्युचर सो विसर यार मला....."

येवढं बोलून तो कधीच निघून गेला होता.... मी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे या आशेने बघत उभे होते की, तो परत येईल..... कारण, आमच्यात जे झालं ते कधीही या अटीवर झालं नव्हतं की, नंतर आमचं भविष्य नसेल.... आमचं भविष्य नसलं तरीही आम्ही ते निर्माण करू या अटीवर त्याने माझा विश्वास जिंकला होता.... पण, आता या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ नव्हता.... महिना गेला असेल स्वतःला समजावण्यात.... नको बास झालं आता..... गेलाय तो..... इट्स टाईम फॉर चेंज.... म्हणून, स्वतःवर काम सुरू केलं..... लाईफ स्टाईल बदलली जी आधी ओल्ड फॅशन होती... टॉकिंग सेन्स ऑलमोस्ट चेंज केलं.... कारण, कधी तरी माझं बोलणं कळलं नाही म्हणून भांडणारा तो आठवला..... त्यामुळे आता इथून पुढे स्वतः मध्ये काही कमी नको दिसायला म्हणून सगळच बदललं.....

काही दिवस, महिने गेले.... मी माझ्यात पूर्ण बिझी झाले होते..... अचानक एक दिवस त्याचा मेसेज माझ्या जुन्या नंबर वर रेड सिम्बॉल मध्ये शो झाला... बिकॉझ.... मी त्याला ब्लॉक केले होते.... ऑबविअस यार.... माझ्या फीलिंग्जची कोणी इतकी वाट लावून गेल्यावर, मी त्याला सगळीकडून वॉश आउट करेलच ना!.... दोन दिवस मी त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही..... दोन दिवसात कमीत - कमी वीस मेसेज आले असतील....!! आधी मला त्याचा एक मेसेज सुद्धा खुलवणारा असायचा आणि आज त्याचेच वीस मेसेजेस माझ्या फोनवर मला घाण वाटत होते..... इतकं वाटून सुद्धा होतं ना आपलं पहिलं प्रेम कितीही केल्या आपण विसरत नसतो यार..... तसच काहीसं झालं.....😌 मी रिप्लाय केलाच....

मी : "बोल ना...☺️"

तो : "मला वाटलं बोलणार नाहीस....🙃"

मी : "आणि तुला अस का वाटलं..??"

तो : "आपण स्टॉप केलं होतं ना रिलेशन...!! मला वाटलं रागावली असणार..😒😒"

मी : "राग तर स्वतःवर होता अरे.... दुसऱ्यावर राग करून काय करणार.... ते आपल्याला काही तरी शिकवून जातात... यात आपला फायदाच नाही का!"

तो : "रागावली आहेस ना....😣"

मी : "नाही रे.... बोल ना तू....🙂"

तो : "तुझ्या फोटो बघितल्या मी..... लूकिंग हॉट.... आधीपेक्षा खूपच क्यूट दिसते आहेस...."

मी : "ओ ह..... म्हणून केलास तर मेसेज...?"

तो : "नाही अग..... अस काही नाही.."

त्याचं आता ही माझ्यावर तेच प्रेम आहे की नाही हे चेक करायला मी माझा एक प्लॅन केला.....

मी : "बरं ऐक ना...."

तो : "हा... बोल...."

मी : "लग्न करतेय मी...."

तो : "काय...??"

मी : "हो आहे एक जो माझ्यासाठी त्याच्या फॅमिली समोर स्टँड घेऊ शकतो.... त्याच माझ्यावर खूप आधी पासून प्रेम होतं.... पण, त्याने मला आता सांगीतलं आणि त्याचं ते जेन्युन प्रेम बघून मला तो खूप आवडायला लागला आहे...🥰"

तो : "वाटलच होतं मला तू अशीच असणार..... ब्लडी बीच... तुला मी काय सोडलं तू दुसरा धरला..... एका पासून मन भरलं तर दुसरा तयार.... वाह.... ब्लडी...@#&#@🤬🤬"

मी : "माईंड युअर लँग्वेज मिस्टर..... तू इतका निर्लज्ज असणार वाटलं नव्हतं..... खरं तर माझं अजुन तरी तुझ्यावरच प्रेम होतं.... पण, तुझही ते आहे का हे बघायला मी अस बोलले आणि बघ... मी ज्याच्यावर प्रेम केलं तो किती निर्लज्ज आहे हे स्वतः त्यानेच सांगून टाकलं.....😡"

तो : "काय म्हणजे तुझं कोणावर....🙄"

मी : "नव्हतच.... पण, आता ते तुझ्यावर सुद्धा नसेल....😡🤬"

तो : "सॉरी ना ग प्लीज ऐक ना.....😔"

मी : "इथून पुढे मला मेसेज करू नकोस..... वाटलं होतं तू परत येतोय लाईफ मध्ये..... खूप खुश होते.... पण, आता कळून चुकलं.... कुठल्या दळभद्री मुलाच्या प्रेमात होते.... निर्लज्ज नुसता.....😡😡😡😡"

फोन रागातच भिंतीवर आदळला..... त्याच्या सगळ्या आठवणी जाळून टाकल्या..... परत त्यात आठवडा गेला.... मनात ठेऊन स्वतःला त्रास देत बसले..... नंतर वाटलं कोणाला सांगून मन हलकं करावं म्हणून लेखिकेच्या संपर्कात येऊन, आपण सर्वांशी आज संवाद साधत आहे.... खूप बरं वाटलं... माझ्या भावना लेखिकेच्या शब्दातून, त्यांनी सर्वांपर्यंत पोहचवल्या त्यासाठी लेखिकेचे मनःपूर्वक आभार.....

मला शेवटच्या ओळी लिहायला फोर्स केला म्हणून लिहिल्या आहेत..... तर अशा प्रकारे हा दिवस योग्य वाटला हे प्रकरण सांगायला की, एक स्त्रियांचा आदर करणारा पुरुष सुद्धा त्याच्या अहंकाराला ठेच लागली की, अस वागू शकतो.....

जो पर्यंत पुरुषी अहंकार नडेल.... तो पर्यंत एक स्त्री नेहमीच हरेल...😔😣