Tu Hi re majha Mitwa - 28 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 28

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_28

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

“वेद किती दिवस झाले ऋतूला मुंबईला जाऊन पण तू एकदाही तिला फोन केला नाहीये.ती ठीक नाहीये वेद. खरंच तू सगळं संपवलंय तुझ्या बाजूने?”

ऋतूचा विषय वेदने बंदच केल्यासारखा होता पण अभयला ही घुसमट सहन होत नव्हती.

“अभय तुला जरा जास्त माहिती असते तिच्याविषयी असं नाही वाटत तुला? अरे हो, होणारा जीजू आहेस ना तिचा, सो लाडकी मेव्हणी सगळं सांगत असेल नाही.” वेद उपहासाने हसत म्हणाला.

“वेद,मी तुला खूप वेळा सॉरी म्हटलंय..ते रफ पेजेस तुझ्या स्टोरीचे होते हे मला खरंच माहित नव्हतं रे,मी जाणूनबुजून का करेन हे?”

“ब्रो...चिल त्या स्टोरी न पेपर्सचा ब्रेकअपशी काहीही संबंध नाहीये, हे मी तुला खूप वेळा सांगितलंय.”

“मग प्रॉब्लेम काय आहे वेद? ती अल्लड आहे रे अजूनही. तू समजून घे ना आणि यार एक चूक तर माफ करूच शकतो ना तू आणि तुझी पण चूक आहेच की. ते काही नाही, तू ह्या रविवारी मुंबईला जा आणि तिला भेट,एकत्र वेळ घालवा,एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न तरी करा..प्रेम असं संपत नसतं रे.”

“कमाल आहे,आजकाल सगळेच सद्गुरू झालेय,प्रत्येक जण लेक्चर देतोय. पण काय आहे ना अभय मीसुद्धा काहीतरी अपूर्ण राहिलेलं काम करतोय.” अगदी खोटं,उसनं हसत तो म्हणाला.

“म्हणजे?”

“Two days before ,रेवा...she proposed me! आहे की नाही गंमत..ती मला म्हटली की ‘तिने आणि जयने आमच्यात गैरसमज निर्माण करायचे खूप प्रयत्न केले, इव्हन गोव्याचा प्लान पण सॅमला हाताशी धरून त्यांनीच फ्लॉप केला पण हे सगळं तिने केवळ माझ्यावर असलेल्या प्रेमासाठी केलं आणि माझ्याशिवाय ती कुणालाही तिच्या आयुष्यात इम्याजीन देखील करू शकत नाही. सो खूप उशीर होईल त्या अगोदर मला तिने स्वतःहून प्रपोज केलं.”

“मग तू काय उत्तर दिलंस?” अभय आश्चर्याने म्हणाला.

“अभय मी का नाकारू तिचं प्रेम? मी तुला मागे ही म्हटलं होतं-‘पहिलं लव्ह यु मुलीकडूनच यायला हवं,कारण ती तिच्या प्रेमाच्या बाबतीत शुअर असते.मी रेवासाठी priority आहे..आणि खरं सांगू ‘आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याला निवडावं’ हा असा थम्बरूल आहे,हो ना?”

‘वेद,काय करतोय तू?अरे ह्या तुझ्या फ्रेंड्सने तुमची रिलेशनशिप संपवली तरी तू हे म्हणतोय? कमाल आहे राव! तू विसरू शकणार आहे का ऋतूला? का तू रेवाचं,तुझं आणि ऋतूचंही आयुष्य खराब करतोय?’

“ऋतूचं?”

अभयकडे बघत तो अगदीच बराच वेळ उपहासाने हसत राहिला इतकं की डोळ्यात पाणी जमा झालं,नंतर थोडं शांत होत थेट अभयच्या डोळ्यात बघत तो म्हणाला-

“अभय शांततेत भेट एकदा ऋतूजाला, कबीरचा विषय काढ आणि फक्त तिचे डोळे वाच.अभय मी लेखक आहे,समोरच्या व्यक्तीचे भाव अगोदर हृदयावर कोरतो मग ते पानांवर उमटतात.माझं प्रेम लिखाणासाठी स्वार्थी झालं असेल पण ऋतूचे डोळे जे बोलतात ना अभ्या तो शब्द न शब्द समजतो मला.एका अनोळखी व्यक्तीच्या सहवासात तिला जो ‘ठेहराव’ गवसला ना तो माझ्यासोबत कधीच नव्हता.’मी फक्त तुझा आहे’ ह्या वाक्यातली जाणीव तिच्या हृदयापर्यंत पोहचली असेल म्हणून तर तो तिच्या ओठांपर्यंत..”

तो बोलता बोलता थांबला,त्याने डोळे पुसले.

“वेद एकदा,एकदा त्या प्रसंगाच्या पुढे जाऊन विचार कर ना,come on यार तुमची न्यू जनरेशन आह. ह्या गोष्टी,I mean ..let it be yaar...प्लीज तू एकदा..”

वेद्च्या पाठीवर हलकेच थोपटत तो बोलत होता पण त्याला थांबवत वेद म्हणाला -

“अभ्या let it be चा विषयच नाही. मी नाही विसरू शकत,अजिबात नाही. that’s it ! मी असाच आहे.तुला खरं सांगू का,मी ऋतू वाचलीय, माझं स्टोरी कॅरेक्टर म्हणून तिच्याविषयी माझा अभ्यास पक्का आहे.ती कबीरच्या प्रेमात आहे. इथे मला समजावत बसण्यापेक्षा तिला जे काही कबीरबद्दल वाटतंय ना ते प्रेम आहे हे तिला समजावून सांगा.ती सगळं नाकारतेय कारण तिलाच विश्वास बसत नाहीये की माझ्या प्रेमात असतांना कबीर तिला आपलासा का वाटला.त्याची सोबत हवीहवीशी का वाटली. तुम्हाला कळत कसं नाही यार.” तो वैतागून बोलला.

“वेद मग तुमचं प्रेम खोटं होतं का?” काहीसा वैतागत अभय म्हणाला.

“ प्रेम खरं-खोटं नसतं रे कधी, ‘तो प्रवास असतो त्याला डेस्टिनेशन मिळत नाही तोपर्यंत तो अव्याहतपणे चालू असतो’ ही माझी फिलोसॉफी आहे.मी म्हणत नाही आमच्यात प्रेम नव्हतं, होतं! जरूर होतं पण ट्रस्ट कमी पडला यार,मी सतत तिला संभ्रमात ठेवलं. खरतरं तिला एका भक्कम मानसिक आधाराची गरज होती पण मी माझ्याच कथेच्या विश्वात एवढा गुंतलो की तिची मानसिक घुसमट होतेय,परवड होतेय ह्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. ‘इतकं प्रेमात असल्यावर मला सोडून जाणार कुठे आहे’ हा फाजील आत्मविश्वास होता यार मनात म्हणून कथेलाच पूर्ण न्याय देत होतो,त्यात तिच्या इमोशन्स मी कन्सिडरच केल्या नाही.मी पण चुकलोय.”

“हो ना मान्य करतोस ना तू? मग ती चूक सुधार न यार,ती देखील माफी मागेल,माफ करून द्या एकमेकांना...come on”

“विषयच नाही! ब्रो तुला कळतंय का, ती कबीरसोबत खुश राहील. ‘मी शब्दशः प्रेम करण्यासाठी ऋतूला स्वतःहून निवडलं होतं,इथे प्रेमाने स्वतः कबीरला तिच्यासाठी निवडलंय’ फरक आहे यार. अभ्या मीसुद्धा काही दिवसांपासून ‘बरोबर-चूक’ ,‘खरं प्रेम-खोट प्रेम’ या सगळ्या गुंत्यात अडकून पडलो होतो पण आता हसू येतंय त्या विचारांवर-प्यार में धोका अंड ऑल असं काही नसतं रे, काहीतरी कमतरता असते जी पूर्णत्व शोधते.आपण आपल्याला माहित असलेल्याच कसोट्या लावतो प्रेमाला पण ते तर न बोलता आपलं काम हळुवारपणे करत असतं.मी रेवाचं प्रेम आता नाकारू शकत नाही अभय.मितवासाठी सोनाली शोधतांना रेवाचाही ऑप्शन मी ठेवला होताच पण ऋतू इतकी सुंदर आहे की चॉईस ठेवली तर कुणीही तिलाच पसंती देईल माझंही तसच काहीतरी झालं.तिचं प्रेम कळत असूनही मी नाकारत राहिलो तिला, आता तिचं तरी प्रेम पूर्णत्वाला जाऊ देत.वेड्यासारखं प्रेम करते ती मुलगी माझ्यावर,अगदी पहिल्या भेटीपासून.” त्याचा आवाज कमालीचा जडावला होता.

“ह्याला काय अर्थय यार,हे ब्रेकअप म्हणजे कम्प्लीट मॅडनेस आहे.”

“नाही, हे प्रेम आहे..” वेदने दाटून आलेला हुंदका आवरत अभयला मिठी मारली.

“वेद, नको ना प्लीज.”

“खूप उशीर झाला रे अभ्या आता. प्रेम होणं खूप सोपी, गोड आणि obvious गोष्ट असते म्हणून त्याला आपण खूप लाइटली घेतो,कमिटमेंटच्या नावाखाली गृहीत धरायला लागतो.मला नाही सांभाळता आलं माझं प्रेम.अभय ही लव्हस्टोरी मी सुरु केली होती, ती मी माझ्या पद्धतीने संपवणार.कधी कधी आयुष्यात आपला मितवा कोण आहे हा प्रश्न सुटतच नाही आणि तो तसाच उनुत्तरीत ठेवला की मग इतर प्रश्न सहज सुटतात.”

“वेद......” अभयला गहिवरून आलं,त्याची समजूत काढायचा तो परोपरीने प्रयत्न करत होता.

“अभय...बस्स आता एकही प्रश्न नकोय,मी उत्तरं द्यायला बांधील नाहीय.मी बोलेन ऋतूसोबत.don’t worry.”

परीकथेतून व्यावहारिक आयुष्याकडे जेव्हा प्रेम यायला लागतं खरतरं प्रेमाचा प्रवास तिथून सुरु होतं त्याआधी ते फक्त स्वप्न असतं,गोड गुलाबी.फक्त स्वप्न.

*******
‘कसं चालूये काम? कसं वाटतंय मुंबई?”

रीमा ऋतूच्या केसांना तेल लावत होती,ताईच्या प्रेमळ स्पर्शाने कामाचा ताण हळूहळू विरत जातोय ह्या भावनेने ती डोळे बंद करून बसली होती.ताई भेटायला येणार असलेला विकेंड किंवा तनु-प्रियाशी तासंतास फोनवर बोलणं म्हणजे तिचा विकपॉइंट होता.

“काम खूप आहे ग ताई,मी तर अजून शिकतेय, उद्या दोन रीपोर्ट सबमिट करेन तेव्हा कळेन बरोबर काम चालूय की नाही.”

ऋतूला अजूनही नवीन पोर्टफ़ोलिओ अंगवळणी पडला नव्हता.आयुष्यात झालेल्या प्रचंड मानसिक उलथापालथीने ऋतू कोमेजून गेली होती,एरवी उत्साहाने एकदम सळसळत असायची ती,तिला जरा बोलतं करायचा,हसतं खेळतं करायचा प्रयत्न रीमा,तनु प्रिया आणि आता मोनाचा ही असायचा.
तिच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा थांग लागणं कठीण असायचं,म्हणून तिला बोलतं करायच्या प्रयत्नांत ती होती.

“आणि तुझी रुममेट मोना,how is she? ”

“खूप कूल आहे गं ती.एकदम बिनधास्त,गपिष्ट एकदम,तिच्या त्या नाशिकच्या ,गंगेच्या,त्रंबकेश्वर,देवळाली,कॉलेजरोडच्या गप्पा ऐकतांना मज्जा वाटते.छान ट्युनिंग जुळलंय आमचं.”

“ती आली नाही अजून रूमवर?” रीमाने काळजीने विचारलं.

“अग आज डिनरप्लान होता ऑफिसफ्रेंड्सचा तिकडे गेलीय,येईल इतक्यात.”

“तूला नव्हतं इन्व्हाईट केलं?”

“केलं होतं गं ताई,पण मला आताश्या ह्या पार्टी,मस्ती नाही आवडत,शांतात चांगली वाटते,एकांत चांगला वाटतो.”

नकळत ऋतू बोलून गेली,रीमालाही हाच धागा पकडून तिच्याशी बोलायचं होतं.

“ऋतू, वेदचा फोन आलेला का? अभय म्हटला मला की वेद फोन करणार होता तुला.”

“हम्म, काल रात्री आलेला.बराच वेळ बोललो,अगदी शांततेत बोलत होता.”

“काय म्हणतेयस? काही वर्क आऊट होईल मग?”

“तो यापूर्वी फोन करायचा ना ताई तेव्हा अगदी त्याच्या कानात बोलतेय एवढा जवळ वाटायचा आणि काल त्याच्या बोलण्यात इतका परकेपणा होता की मी त्याच्या इतक्या जवळ होते हे खरंच वाटत नव्हतं. आता कधी फोन करणारच नाही अशी शंका यावी इतकं सगळं एकदमच सांगून मोकळा झाला.”

“असं काय सांगितलं त्याने?”

“रेवा आणि तो,they are moving together.”

“काय?” रीमाला जे ऐकलं ते खरं वाटेना.

“ हो ताई. रेवाने तिच्या सगळ्या फिलिंग्ज त्याला सांगितल्या,त्याच्यासाठी ती किती पझेसिव्ह आहे हे पण सांगितलं.हे देखील मान्य केलं की तिने आणि जयने आम्हीसोबत असतांना आम्हाला दूर करण्याचे बरेच प्रयत्न केले.गोव्याला जे काही झालं ते त्यांनी च ठरवलं होतं हे पण सांगितलं.वेदने गोव्याच्या त्या मित्राला ,सॅमला याविषयी फोन केला तेव्हा त्याने जयचा नवीनच अँगल वेद्ला सांगितला.विशेष म्हणजे हे रेवाला देखील माहित नव्हतं. तो जय वेदला आणि रेवाला इमोशनली फुल बनवत होता इतके दिवस.त्या मुर्खाला राग होता शहरी मुलांवर असं काहीतरी प्रकरण होतं आणि can you believe मी पण आवडत होती त्याला असं काहीतरी सांगत होता. वेदने यावर त्याला confront केल्यावर लगेच माफी मागायला लागला.ऋतूची पण माफी मागतो म्हणाला.you know what tai वेदने त्याला माफ केलं.रेवाला सगळ्या चुका माफ केल्या .तिचं प्रपोज पण accept केलं,म्हणतो तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि मला अश्याच प्रेमाची गरज आहे.” उदासपणे हसत ती म्हणाली.

“सगळ्यांना माफ केलं फक्त तुझी चूक विसरू शकत नाहीय हो ना?”

“चूक...!!” ती ओठातल्या ओठात पुटपुटली.मग उठून, खिडकीतून दूरवर बघत म्हणाली.

“ताई काय गम्मत आहे ना,हा जो जय आहे तो रेवा आणि वेद्ला इमोशनल फुल बनून त्याचा वेगळाच अजेंडा राबवत होता. वेद माझ्या,रेवाच्याआणि जयच्या इमोशन वापरून त्याची स्टोरी लिहित होता.रेवा जयच्या मदतीने वेद्चं प्रेम मिळवायचा प्रयत्न करत होती आणि मी ? मी मूर्ख जयच्या अजेंड्याच्या टार्गेटवर, वेदच्या स्टोरीच्या हिरोईनच्या भूमिकेत,रेवाच्या निशाण्यावर आणि प्रेमात असतांना एका अनोळखी टप्प्यावर,एका अनोळखी व्यक्तीच्या सहवासात निर्व्याज तळमळ,निस्वार्थी,अनामिक जवळीक त्यात गुंतलेली! सगळा गुंता,इमोशनल खिचडी ! नको वाटतंय आता सगळं. ताई, वेदच्यासोबतचे क्षण इतके गोड होते,पण आता आठवले की वाटतं हे कसं लिहिलं असेल त्याने कथेत? माझा चेहरा तेव्हा निरखत असेल तो, माझ्या भावना टिपून घेत असेल मग त्या क्षणांमध्ये मी एकटीच गुंतले होते का? वेद कुठे होता? निशांत आणि निशांतच होता सगळीकडे आणि आमच्यातल्या पर्सनल गप्पा? त्या त्याच्या कथेत डायलॉगस म्हणून उतरत होत्या,ह्याचा विचार करून आता हसू येतं. मूर्ख ऋतुजा,इमोशनल फूल,बालिश ,Miss rutuja mohite you deserve this.You deserve to be unlove. ”
तिचा आवाज जाडावला होता.

“ऋतू नको असा विचार करू.मला सांग तो शुअर आहे रेवासोबतच्या रिलेशनशिपबाबत?”

“तिचं त्याच्यावर प्रेम होतंच ग ताई,तिच्या प्रेमाच्याबाबतीत तो काय मी पण अगदी शुअर आहे.”

“अभय म्हणत होता की माझ्या डिवोर्सचं प्रकरण पूर्ण होऊन आमचं लग्न होत नाही तोपर्यंत तो त्याच्या घरी सांगू शकत नव्हता तुमच्या प्रेमाबद्दल,हे खरंय का ?” मनात कधीपासून दडून बसलेला प्रश्न विचारल्या शिवाय रीमाला रहावलं नाही.

“ह्म्म्म,त्याच्या आईला हे पटणार नाही असं त्याचं मत होतं आणि खरं सांगू ताई हे त्याचं मत गोव्याला ऐकल्यावर माझं काळीज तीळतीळ तुटलं होतं..आणि ..” ती पुन्हा बेडवर येऊन रीमाच्या कुशीत डोकं ठेवून झोपली.

“ऋत्या मला का असं वाटतंय की माझ्यामुळे तुमचं ब्रेकअप झालंय! खूप खूप गिल्टी फील होतंय.” तिला हलकेच थोपटत,पाणावलेले डोळे पुसत ती म्हणाली.

“ताई,अजिबात नाही ! हे जे सगळं झालंय त्याला बरीच कारणं आहे आणि ते मी तुला सागितलेय त्यामुळे हा विचार करू नको प्लीज. जे झालं ते झालं. I am happy with his decision.जयला पण माफ केलंय मी.मला आता प्रेम ह्या शब्दाचीच भीती वाटायला लागलीय.मी नाही कुणावर प्रेम करू शकत आणि ते निभवून नेऊ शकत.So matter close.”

“मग पुढे? I mean ” तिला नात्यामध्ये पराभूत झालेलं पाहून रीमाला खूप वाईट वाटत होतं.

“पुढे? पुढे बघायचं सोडून दिलं मी, आता फक्त हा प्रोजेक्ट,बस्स. ”

“ऋतू , कबीर , I mean ,म्हणजे मला असं म्हणायचंय की...जर"

“ताई काहीच म्हणू नको,मी हजार वेळा सांगितलंय मला कबीरच्या आयुष्यात आणि त्याला माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाहीये आणि असं काही कंपल्शन नाहीये ना की रिलेशनशिपमध्ये असायलाच हवं.”
“ऋत्या कंपल्शन नाही गं,पण तू जे सांगितलं त्यावरून आम्हाला म्हणजे अभय,मला आणि तनु प्रियाला असं वाटतं की तो तुझ्या प्रेमात होता आणि तू जेव्हा जेव्हा ज्या हळुवारपणे,थोडंस काळीज ओतून “ कबीर” बोलतेस ना तेव्हा ते ऐकून असं वाटतं की तू फक्त त्याचंच नाव घेत राहावं."

"ताई ,ते कधीच होणार नाही. हे बघ मी किती खुश आहे आणि हा एकटेपणा वाईट नाहीये ,तो डिझर्व्ह करते मी. मला नकोय कुणीच.see,see मी अगदी statue झालीय.नो मुव्हमेंट.एकदम statue...!! ताई ह्या स्टॅच्युला काहीच इमोशन्स नाहीये ,त्याला काहीच त्रास होत नाही,फक्त statue म्हणायचं आणि दूर निघून जायचं ,हा statue काहीच प्रश्न विचारणार नाही.त्याला कुणाच्या सोबतीची गरज नाहीये,तो वाट बघणार नाही,आठवण काढणार नाही.जस्ट स्टॅच्यु!!"
ती रिमाला घट्ट मिठी मारून रडायला लागली.
रिमाला ह्या असबंध बोलण्याचा अर्थ जरी कळत नसला तरी तिच्या आसवांची भाषा तिला कळत होती.तिच्या केसांवरून हात फिरवत ती बराच वेळ तिला शांत करत राहिली.

कुणाचीतरी आठवण बनून डोळ्यांत येणाऱ्या आसवांना स्टॅच्यु करता येऊ शकतं ?

************
#क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.