Family Endanger - Video Games. books and stories free download online pdf in Marathi

फॅमिली इन् डेंजर - व्हिडिओ गेम.




सकाळी दहा वाजता उठलो आणि घरात फेरफटका मारत किचन मध्ये पोहचलो.... पण, आज घरात कोणीच कसं दिसत नाही.... 🤨

मी : "आई..... आई..... अग कुठे आहेस तू.... माझा चहा.....😣 उशीर होतोय मला अग....😣 हे काय कोणीच उत्तर देईना..... कुठे गेले सगळे....."

कोणाचंच उत्तर न आल्याने टिव्ही सुरू करून, चॅनल बदलवू लागलो..... अचानक एक चॅनल सुरू राहिला...... बदलत ही नव्हता म्हणून बघितलं आणि धक्काच बसला..... त्यात माझी फॅमिली अतिशय अवघड स्थितीत बघून, अजूनच मन गोंधळात पडले...... अरे देवा!! आता काय करणार होतो मी..... लगेच पोलिसांना कंप्लेंट करायला फोन हातात घेतला आणि कळून चुकलं.... माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? म्हणून वैतागून तसाच सोफ्यावर डोकं पकडून बसलो.... तेवढ्यात मला आतून कोणाचा तरी, माझ्या दिशेने चालत येण्याचा आवाज आला..... एक ट्रे घेऊन एक विचित्र माणूस मला रिमोट देऊन, न सांगता निघून गेला..... मी मात्र तो रिमोट न बघता आधी तो आला कुठून या विचारात गुंतलो..... माझी तंद्री तोडणारा एक आवाज कानावर पडला..... बघितलं तर अन् नोन नंबर वरून कॉल...... मी पटकन मदतीच्या हावापोटी कॉल रिसिव्ह केला....

तिकडून : "आता तुम्हाला ह्या खेळाचे नियम सांगण्यात येत आहेत.... कृपया लक्षपूर्वक ऐकावे जर एकाही नियमाचे पालन करण्यास तुम्ही चुकलात तर, तुमच्या कुटुंबातून एक जीव उठवला जाईल.....😁😁"

मी : "अरे कोण बोलतोस..... मी कुठले गेम्स खेळत नाही आणि हे काय माझी फॅमिली.... आता तुझ्या इशाऱ्यावर ठरेल की, ते जगणार की नाहीत.....😡😡😡"

तिकडून : "वेळ न घालवता सुरुवात केली तर आपण आपल्या घरातील सदस्यांचे जीव वाचवू शकाल.... खेळाचे नियम.... तुम्हाला एक टास्क दीले जाईल. ते टास्क पूर्ण करत असता, एक विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाईल..... जर पॅनिक न होता तुम्ही तो टास्क पूर्ण केला तर आणि तरच तुम्ही घरातील सदस्यांना वाचवू शकता...."

मी : "पण, ती परिस्थीती काय असेल....."

तिकडून : "ते आम्ही सध्या सांगू शकत नाही...."

मी : "अरे मग हा कसला गेम... इथ माझ्याच फॅमिलीचा गेम करायला लावताय..... प्रेशराइज सिच्युएशन मध्ये माणूस पॅनिक होणारच ना..... मग काय तुम्ही तर उठलाच आहात माझ्या फॅमिलीच्या जीवावर....😡😡"

तिकडून : "खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला खूप - खूप शुभेच्छा....😁"

मी : "हॅलो - हॅलो.....😡"

आतून परत एक ट्रे घेऊन तोच विचित्र माणूस येतो..... अंगावर पूर्ण काळे कपडे आणि तोंडावर फक्त डोळे दिसतील इतकीच जागा उघडी..... मनात घरच्यांची काळजी होती.... नाहीतर, याला कधीचा फोडून काढला असता.... त्या ट्रेमध्ये एक चिट होती..... त्यात लिहिलं होतं....

"पलीकडच्या घरात जाऊन, एखाद्याला मारून, त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकायचा"

आता ह्या नियमात पॅनिक नसतो झालो तरच नवल...! मी एकदा त्या ट्रे वाल्याच्या चेहऱ्याकडे आणि एकदा त्या टिव्ही मधल्या माझ्या फॅमिलीच्या अवस्थेकडे बघितले आणि हा वेडेपणा करण्याचा पवित्रा घेतला.....😣 पराक्रम करून घरी आलो..... त्याला हे आताच कळणार नव्हते कारण, तो सध्या तरी सोशल मीडिया बघणार नाही हा माझा आत्मविश्वास! म्हणून त्याचे फोटो अपलोड करूनही झाले...... पण, झालं नेमकं उलट तो रागातच अंगावर धावून आला..... कसं तरी त्याला समजावलं वाटल्यास मला नंतर हाण आधी मला गेम खेळू दे....😣 तो ही माझ्या ह्या बोलण्यावर अजूनच पॅनिक झाला आणि घातली ना राव भुक्की, पूर्ण तोंडच सुजवलं.... पण, प्रश्न फॅमिलीचा म्हणून, सुजलेलं तोंड घेऊन शांत बसलो..... तो मला फोडून, निघून गेला.....

परत ट्रे घेऊन तो विचित्र माणूस आला.....😣 ट्रेमध्ये एक चाकू होता.... यावेळी माझा संशय खरा ठरला.....😣 तिथेच एका चिठ्ठीत लिहिलं होतं....

"चाकूने स्वतःचा हात कापायचा आणि रक्ताने मी जिंकलो असं एका पेजवर लिहून, त्या (विचित्र दिसणाऱ्या) माणसाजवळ द्यावयाचे."

मी आता जाम वैतागलो..... असं कुठं असतं.... पण, नंतर आठवलं आपली फॅमिली..... काय म्हणून काय विचारता... बसलो शांत..... ही त्याची दुसरी पायरी मी स्वतःला इजा पोहचवून, पूर्ण करून मोकळा होताच, त्याची पुढची तिसरी पायरी घेऊन, तोच विचित्र माणूस परत पुढं आला......😣😣😣 आता मात्र त्यालाच तू कुठचा?, राहतोस कुठ? हे सगळे प्रश्न विचारावे असंही वाटून गेलं.... पण, फोनवरचा आवाज ऐकून गप बसलो....😟

ट्रेमध्ये पायातले पैंजण होते..... ते बघून माझ्याच काय कोणाच्याही डोक्यात ॲटिट्यूड वाला किडा वळवळणारच...!! मी आणि हे करायचं आता.....🤨 पण, आठवली फॅमिली..... मग काय? हतलब होतो..... घातले पैंजण..... तिकडून गाणं लावण्यात आलं.....

पैरो में बंधन हैं..... पायल ने मचाया शोर.....

काय राव हीच दिवसं बघायची होती आता...... चला हा ही टास्क पूर्ण केला.... आता तर माझ्या फॅमिलीला सोडतील हे.....😟😟 विचारात असताच, फोन रिंग झाला.....

मी : "झालं आता तरी सोड माझ्या फॅमिलीला.....😟😟"

तिकडून : "...😁😁😁😁😁 टीव्ही बघ"

मी टीव्ही सुरू केला आणि, आणि बघतो तर काय.....😳😳😳 सगळ्यांच्या डेड बॉडीज......😳😳😳 मी तर सगळ्या पायऱ्या पार केल्या होत्या..... असं - कसं शक्य आहे....😟😟😟

मी : "😭😭😭😭 आई, श्रेया, बाबा, रवी.... नका जाऊ मला सोडून.... तू हे काय केलंस..... मी सगळ्या अटी, सगळ्या पायऱ्या पूर्ण करूनही तू माझ्या फॅमिली सोबत कसं काय असं करू शकतोस......😭😭😭"

रडतच होतो की,

आई : "सर्विन..... उठ बाळा...... नाष्टा रेडी आहे..... चल.....😘 गुड मॉर्निंग.... अजून बघितलं ना स्वप्न.... किती घाबरलं माझं बाळ.....😘😘"

मी : "आई तू ठीक आहेस ना...... श्रेया, रवी आणि बाबा....."

आई : "मला काय झालं...... चल उठ सगळे वाट बघताहेत...... ये चल..... उशीर होईल ऑफिसला....😘"

खूप वेळानंतर, मी स्वप्न बघत असल्याचा विश्वास बसला आणि पळतच डायनिंग टेबलवर येऊन सर्वांना प्रेमाने बघत बसलो.....🙂

काय डेंजर असतात राव काही - काही गेम्स अगदी जीवघेणे.... मागे ऐकण्यात आलं होतं पब - जी, त्यातलं काय ते चिकन डिनर... त्याच्या नादात किती तरी वेडे झालेत आणि किती तरी मुलांनी घरी आई - वडील फोन देत नाहीत म्हणून, आयुष्य पूर्णपणे न समजलेल्या वयातच ते संपवून टाकले.....😓 खरंच इतकं महत्त्वाचं असतं का ते व्हिडिओ गेम्स खेळणं किंबहुना आयुष्याचा अविभाज्य भाग होणं??! माझ्यावर जी पाळी स्वप्नात आली तितकीच जीवघेणी पाळी आजकालच्या मुलांच्या आयुष्यातही त्या व्हिडिओ गेम्सच्या अटी पूर्ण करताना येत असेल का.... की, फक्त एक मनोरंजनाचं साधन म्हणून, खेळलं जात असेल..... असच असेल तर मग मुलांना त्याचं इतकं व्यसन!

बरं झालं मी एक स्वप्नच बघितलं....😓 खऱ्या आयुष्यात हे परवडण्यासारखे नसते....😓



समाप्त..

कथा काल्पनिक असून, वास्तविक विषयाला धरून लिहिण्याचा प्रयत्न केलाय......🙏✍️


✍️ खुशी ढोके.