Living life ..... books and stories free download online pdf in Marathi

जीवन जगताना.....


आई.....

कधी आवाज वाढवला मी
त्याला घाबरतेस का ग आई
दिवसरात्र काम करून,
तू थकत नाही का ग "बाई..."

काळजीपोटी रागवतेस मला
काळजी करतेस हे का सांगत नाहीस
राग असेल माझ्या मनात तुझा
पण, रागात सुद्धा उपाशी ठेवत नाहीस...

घरी यायला झाला उशीर
तर, फोन करतेस न राहवून
दारात येऊन बघतेस वाट
एकही घास न खावून...

रात्री कवटाळत बसता तुला
कुशीत तुझ्या वेगळेच सुख
प्रेमाने आई थोपट ना मला
पळून जातील सारे दुःख...



खंत.....

न जावे गुंतूनी इतके कल्पनेत
विसरून वास्तविकतेची पायवाट
कल्पनेत भासवून आपुलकी
वास्तवात नव्हतीच बांधिलकी...

सुखद भाव अनुभवते सहवासात मन
एकांतात मात्र नेहमीच दुःखद राहीले क्षण
बाहेरून असते भक्कम पाठिंब्याची ग्वाही
आतून मात्र ख्याती बघवत नाही...

मैत्रीत भ्रमनिरास होऊनी
मन परत मैत्री हिमतीने करते
कुजबुज आवाज कानी पडताच
मैत्रीवरचा विश्वास धुळीस मिळते...

झाले गेले विसरून पुन्हा नव्याने जगावे
विचार येताच मनी, पुन्हा कोणी यावे
भ्रमनिरासतेचा कधीच नसणार का अंत
"मैत्रीत होणारा भ्रमनिरास" ही नेहमीच खंत...


राधा ही बावरी....


का ग राधे अशी बघतेस लपून - छपून

ये ना मज समोर जाऊ दोघेही एकांतात हरवून

बासरी वाजवून घालेन तुझ्या मनाला भूरळ

मन होते निराश ऐकुनी तुझ्या हृदयाची तळमळ...


नको छळुस मन माझे सख्या रे

बैचेन होते तन - मन सारे

असशील तू नटखट माखनचोर

पण, चेहरा आहे माझा चंद्रकोर...


तुझ्या रुपासमान नाहीच सखे कोणी

विश्व सुंदरी साऱ्या भरतात तुज समोर पाणी

माझ्या मनातील प्रेम सांगेल का तुज कोणी

करून निःस्वार्थ प्रेम देऊ संदेश प्रत्येक मनी...


इतकं प्रेम करतोस का मज सख्या रे

प्रश्नार्थक होते आधी मन माझे हे बावरे

मन धुंद तुझ्या मधुर बासुरीच्या स्वराने

असाच नेहमी करशील ना वेडा तुझ्या प्रेमाने...





ही शंकरपाळी आकाराची असल्याने, हिला "शंकरपाळी काव्य रचना" म्हणतात.....😘 शंकरपाळीचा आकार जरी, बिघडला तरी स्वाद परिपूर्ण येईल.... "रिमझीम पावसावर" शंकरपाळी काव्य रचना...... वाचा...... आणि नक्की कळवा...😁







सरी

ग ये सरी

ये ग लवकर

माझ्या तू घरी

आलीस की

करून जा

मला

बरी

🌧️




तो

मदमस्त

करणारा

मनाला हुरहूर

हृदयाला सुखद स्पर्शून

काहूर उठवून

मदमस्त

करणारा

तो

🌧️




माझ्या

सख्या रे

परतशील ना रे

या रिमझिम सरिंना

उत्तर उरेल ना रे

सख्या रे

माझ्या

🌧️




अशी

रिमझिम

त्या पावसाची

उधळते अंतर्मन जशी

विसर स्वतःचा

पडता गुमसून

असा मी

तुझाच....

🌧️




सखे

पावसासम

नितळ निर्मळ

मन तुझे बसले हृदयी

खुलता कमळ

जसा ओठी

तुझ्या.....

🌧️




सांज वेळी

बसता निवांत

व्हावे मनी गोंधळ

चाहूल जशी

तुझी मला

रिमझिम

पावसा

सम.....

🌧️


फक्त तू......


माझ्या आयुष्याच्या

एक छोटासा दिवा तू.....

काळोख्या या मनात

आशेचा एक किरण तू.....


जीवनाचा ध्यास तू

स्वतःवरील विश्वास तू.....

कधी जर हरवलो मी

मिळणारा मदतीचा हात तू.....


तुझ्या प्रेमाचे ऋतू......


वसंत ऋतुत तुझे प्रेम कळाले...🤗

ग्रीष्म ऋतुत ऊब देऊन ते आपले करून गेले...😍

वर्षा ऋतुत प्रेमाचा वर्षाव होतच राहिला...🌧️

शरद ऋतुत जन्माची साथ देण्याचे वचन तू दिलेस...🤝💕🤝

हेमंत ऋतुत एक होण्याआधीची घडी ती आली...😍🤗😍

शिशिर ऋतुत प्रेमाच्या वर्षावात दोघेही नाहून गेलो.....💕


आम्ही दोघी......



खूप लांब असूनही, एका वळणावरची भेट

घुसली मनी, दडली आत ही भयंकर थेट

प्रवास प्रेमळ मैत्रीचा, झाला मस्त सुरू

मन म्हणे, आता कसं स्वतःस आवरू...


दोघीही मनाने होत्या अगदीच जवळ

दोघींनी जपली एकमेकींची प्रत्येकच आवड

दोघीत तीसऱ्याचे येणे होते अवघड

कारण, गैरसमज नगण्य होता तो जड...


विश्वास होता दोघींचा निर्मळ

स्वभाव नसेल का मग प्रेमळ?

जुळवूनी ठेवत नेहमीच परस्पर संबंध

नातं निभावण्यात नव्हते कुठलेच निर्बंध...


प्रयत्न नाती खिळखिळी करण्याचा

मानस त्यांची मैत्री हाणून पाडण्याचा

झाला नाही सफल कुविचार हरवण्याचा

कारण, त्या दोघींच्या मैत्रीत होता अदृश्य धागा विश्वासाचा...


परत नसेल अविश्वास फक्त मैत्री असेल घट्ट

नेहमी हक्काने पुरवू एकमेकींना कुठलेही हट्ट

वाईट वृत्ती आणि जळणारे, झाले जळून खाक

जळताना ऐकलीच नाही, कोणी ती आकांत हाक...!


येतील किती पण, गवसणार नाही प्रवेश वाट

राहू दोघीच नेहमी सोबत, घालू नात्यात झिंगाट

तुझ्या नि माझ्या विश्वासावरच असते नेहमी सर्वांचे लक्ष

आपल्या नात्यातील निःस्वार्थी भावच देईल नेहमी मैत्रीची साक्ष...





डियर आस्मी...... धिस इज ओन्ली फॉर यू अँड युअर बेस्ट फ्रेंड......💕