Beggar books and stories free download online pdf in Marathi

भिकारीण

मी घाईघाईतच आज सकाळी घरातुन निघालो. समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीवर चिडचिड होती. मी बांद्रा स्टेशनवर मुंबईला जाण्यासाठी ७ नं. प्लॅटफॉर्म धावत चाललो होतो, बांद्रावरुन मला ९ वाजुन ३६ मिनीटांची मुंबईला जाण्यासाठी ट्रेन होती. पण प्रोब्लेम हा होता की...काही करुन मला ती ट्रेन पकडायचीच होती. नाहीतर मला ऑफीसमध्ये इंट्री नव्हती. मी धावतोय धावतोय तोच माझा पाय एका वृद्ध स्त्रिच्या पायाला लागला आणि मला तोल न सावरता आल्यामुळे मी खाली पडलो. मी क्षणाचाही विचार नाही केला आणि मनात येतील तेवढ्या शिव्या आणि असभ्य भाषा मी त्या स्त्रिसाठी वापरत राहीलो. ती मात्र काहीच बोलली नाही माझ्याकडे शांत बघत बसलेली आणि तसंही मी तिला बोलण्याची संधीच दिली नाही आणि मी आधीच्याच वेगात ट्रेनसाठी धावत निघालो. मी प्लॅटफॉर्मवर पोहचण्याआधीच ट्रेन सुटली होती आणि मी चढु ही शकत नव्हतो कारण ट्रेन फास्ट झाली होती. मला आता राग कंट्रोल होत नव्हता, माझ्या तोंडातुन शिव्या फक्त त्या स्त्रिसाठीच निघत होत्या कारण ती मध्ये आली आणि मी पडलो.
मी मागे वळणारच तर ती स्त्री हातात काठी घेऊन मळलेल्या साडीत, विस्कटलेल्या केसांच्या अवतारात माझ्या मागे ऊभी होती. मी तिला बघून थोडा कोड्यात पडलो पण मी तिला रागातच बोललो..
काय आहे ??? माझ्या मागे काय करते तु??? मला पाडुन शांतता नाही झाली का तुझी??? अरे हा... तु तर भिकारीण आहेस तुला पैसे हवे असतील... मी १०० रुपये काढुन तिच्या हातावर टेकवले आणि पुढे निघुन गेलो. ती तरीही माझ्या मागे येत होती. मी थांबलो की ती माझ्याकडे बघत बसायची आणि मी चालायला लागलो की माझ्या मागोमाग यायची. मी घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. ती मागे काही अंतरावर थांबुन बघत होती.. एक रिक्षा माझ्याशेजारी थांबणार म्हणुन ती स्त्रीही मागून माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी आटापिटा करत होती. मला आता प्रश्न पडत होते ही भिकारीण माझ्या का मागे येते?? तेवढ्यात रिक्षा माझ्याबाजुला येऊन थांबली...
बसा सर... काय झालं सर ??असं का बघता त्या भिकारीणला??? ती काही बोलली का तुम्हांला?? मला सांगा पोलीसांनाच सांगतो.. परत येणारच नाही ती कोणाच्या मागे??
तो रिक्षावाला इतकं माझ्यासोबत बोलत होता पण मी काही नाही म्हणुन चल बोललो.. रिक्षा सुरु झाली थोडी पुढे गेली आणि मागुन आवाज ऐकायला येत होता..
खडु... ये खडु बाळा... खडु... थांब ना... अरे..
रिक्षावाल्याला कदाचित आवाज येत नव्हता.. पण रिक्षा जशी पुढे जात होती तसा मला आवाज कमी येऊ लागला आणि नंतर बंदच झाला. माझ्या समोर आता ती भिकारीण येत होती, कोण असेल ती ?? ती माझ्या मागे का आली असावी ?? आणि एक भिकारीणच ती ?? तिची आणि माझी काय ओळख असणार??? तेवढ्यात मी दारावरची बेल वाजवली..
अविष्कार तु का परत आलास?.??
अगं आई ट्रेन गेली माझी.. मग, नाही जाता आलं ऑफिसला मला... इतकंच बोलुन मी माझ्या बेडरुम मध्ये गेलो.. माझ्या कानावर तो आवाज सुरुच होता..
खडु.. खडु..
काय आहे ?? मी का एका भिकारीणला मनावर घेतलंय इतकं?? जाऊदे....
अविष्कार काय रे काय झालं?.? तु अजुन कपडे पण बदलले नाही? बरं नाही वाटत का तुला???
नाही गं.. ठीक आहे...
तु प्रोब्लेममध्ये आहेस का???
नाही गं... काही नाही...
तु सांग तर मला..
आई अगं ऐक ना... आज काहीतरी विचित्रच घडलं माझ्यासोबत..
काय रे काय झालं??? सांग मला..
आई, अगं मी सकाळी धावपळीत गेलो, तेव्हा एका वृद्ध स्त्रिच्या पायात गुंतुन पडलो, मी तिला खुप असभ्य भाषेत बोललो पण माझी ट्रेन गेली तेव्हा ती स्त्री माझ्या मागेच आली...
तुला काही बोलली का ती????
नाही गं .. ती काहीच बोलत नव्हती ती भिकारीण होती गं..पण मी जेव्हा रिक्षात बसलो तेव्हा मला मागुन खडु.. खडु ..आवाज ऐकायला येत होता, असं वाटलं ती मलाच आवाज देते.
अरे... अविष्कार हे काय सांगतोय तु... ??
का गं काय झालं??? तु पण बघितले का तिला...
अरे तु पण ओळखतो तीला..आणि सॉरी अरे तुला आठवतंय का??? तु छोटा होतास तेव्हा बालवाडीपासून दुसरी पर्यंत एक शिक्षीका होत्या, कानसे बाई.. अरे त्या तुला खडु आवाज द्यायच्या.. आई आई.. थांब..अगं आठवल्या मला..
अरे अविष्कार त्या असतील का रे त्या???
अगं पण त्या तिथे, अशा अवस्थेत कश्या काय आल्या??.
अविष्कार ऐक तु चल लवकर आपण जाऊन बघु त्या आहेत का तिथे.??
आई आणि मी लगेचच बांद्रा स्टेशनला गेलो. आम्ही त्यांना शोधतच होतो तर त्या एका प्लॅटफॉर्मवर कोप-यात बसुन वडापाव खात होत्या. आम्ही त्यांना त्या अवस्थेत बघुन शॉक झालो.. आम्ही त्यांच्या बाजुला जाऊन बसलो. त्यांनी पण आई आणि मला बघितलं, त्यांनी हातामधला वडापाव खाली ठेवुन.. काय झालं तु का परत आलास??? तु तर गेला होतास ना..???
तेवढ्यात आई बोलली.. बाई अहो मी खडुची आई ...
तुम्ही पहीले ऊठा इथुन आणि चला आमच्यासोबत..
नाही, नको मी ठीक आहे...
मला रहावलंच एक शिक्षीका आज या अवस्थेत मला सहन होत नव्हतं.. मी हात धरुन उठवलं त्यांना आणि लगेच रिक्षात बसवुन घरी घेऊन गेलो..
आईनी त्यांना पहिल्यांदा फ्रेश व्हायला सांगितलं..
बाईंनी आता आईची साडी नेसली होती, त्यांच्यामध्ये शिक्षकाची छबी अजुन दिसुन होती. पण आता आई आणि मला रहावलंच नाही.. मी बाईंना चहा प्यायला दिला...
आईला आता शांत रहाणं योग्य नाही वाटलं..
बाई, पण तुम्ही त्या अवस्थेत????
बाईंनी हातातला कप खाली ठेवला आणि रडु लागल्या, बाई अहो रडु नका ओ.. आईनी बाईंचा हातात घेतला.. तुम्ही फक्त मन मोकळं करा जर तुम्हांला वाटलं तर.. नाही तर आमची तुमच्यावर कोणतीच जबरदस्ती नाही...
"माझ्या मुलानी मला फसवलं.."
काय?? अमेय नी.. तुम्ही तो बारिक होता म्हणुन त्याला पेन्सिल आणि अविष्कार त्याच्यापेक्षा जास्त होता म्हणुन तुम्ही ह्याला खडु बोलत होतात ना..?? पण तो तर अविष्कार सारखाच होता ना???
हो पण मा ह्यांच्या दुसरी इयत्तेनंतर बदली झाली आणि आम्ही दोघे साता-याला शिफ्ट झालो.. आम्ही दोघेच घरी, त्याचे वडिल पण त्याच्या जन्माच्यावेळी अपघातात गेले. म्हणुन मी अमेयला कधी बाबांची जाणिव नाही होऊन दिली. पण त्याला मी जास्तच प्रेम दिले आणि त्यामध्ये त्याच्या खोटं बोलण्याकडे पण दुर्लक्ष झाले. तो सांगेल ते ऐकत गेली, मी त्याच्या बोलण्यात येत गेली. मी रिटायर्ड झाल्यानंतर माझे सर्व पैसे मी त्याला दाखवुन ठेवले पण त्याने माझ्या नकळत माझे सर्व पैसे, कार्ड आणि घर पण त्याच्या नावावर करुन घेतले. मला घरातुनबाहेर काढले. आणि त्या नंतर मी अशी एकटी बाहेर जागा भेटेल तिथे फिरु लागली. कधी लोकांच्या दारात तर कधी स्टेशन..
बास.. नाही ऐकवत बस झालं.. आज पासुन तुम्ही इथेच राहायचं मी आणि अमेय सोबत..

सौ. वृषाली रोहीत जाधव.