Women books and stories free download online pdf in Marathi

स्त्री जात

खरंच वाईट वाटतं जेव्हा एक स्त्रिच दुसर्‍या स्त्रिला समजुन घेत नाही. आज स्त्री सर्व ठिकाणी पुढे आहे. समान हक्क ही मिळाले आहेत तिला. पण काही स्त्रियांच्या मनात असलेल्या काही वाईट विचारांमुळेच ब-याच स्त्रियांना मान खाली घालावी लागते. इंजिनियर असलेली सुन ही अशिक्षित सासुचच सर्व ऐकत असते. सुन ही प्रत्येक वेळी वर आवाज चढवुन बोलते असंच नाही, तर कधी कधी न पटलेली गोष्ट ही तिला शांत राहुन स्विकारावी लागते.
आज मी असं पाहिलं की ग्रॅज्युएट झालेली सुन अशिक्षित असलेल्या किंवा विचारांनी मागे असलेल्या एका स्त्रिमुळे दिवसभर बाहेर बसली होती. आता प्रश्न असा की ती बाहेर का बसली होती.. आज गौरीच पुजन होतं आणि सायली ला पाळी आली होती. आणि म्हणुनच तिच्या सासुने तिला तिथे कुठे आजु बाजुला न थांबवता बाहेर पाठवली. पण सायलीची सासु पाळी आलेल्या स्त्रीमुळे काहीतरी अपुशकुन होईल असं विचार करण्याच्या नादात सायली दिवसभर बाहेर कशी बसेल असा विचार करायलाच विसरली. सायली मी जिथे जॉबला जात होती तिथेच राहत होती. तिचे सासु सासरे कंपनीमध्येच काम करत होते त्यामुळेच त्यांना कंपनीच्या एका खोलीच्या जागेत रहायला लागत होतं.
आज गौरीच पुजन म्हणुन सायली घराबाहेर बसली होती. मी तिला सकाळी 9.30 वाजता बाहेर बसलेली पाहिली आणि माझ्या सोबत असलेल्या एका लेडीजला मी विचारलं. या अशा बाहेर का बसल्या आहेत??? तेव्हा मला समजलं तिला पाळी आल्यामुळे तिला बाहेर बसवलं आहे.. ओ के.. मी समजुन घेतलं.. पुजा झाल्यानंतर जाईल ती घरात मनाला समजावलं. दुपारी दोन वाजता मी तिकडुन जात होती, तरीही ती बाहेर बसली होती. मी बघुन जरा शॉकच झाली पण मग मी विचारलं तिला. तुम्ही जेवलात का ?? तर ती हो म्हणाली.. मी पुन्हा विचारलं घरात कधी जाणार मग ??? ती म्हणाली गौरी गेल्यानंतर.. मी हसली आणि स्टाफ केबिन मध्ये जाऊन बसली. मला तिचं असं बसणं आवडलं नव्हतं. मला वाईट वाटलं बराच वेळ ती अशी बसलेली बघुन खरंतर वेळ घालवण्यासाठी तिच्या हातात मोबाईल होताच तसा.. पण तरीही एखादा व्यक्ती एका जागेवर किती वेळ शांत बसेल हे मी सांगायला नको..
मी संध्याकाळी सहा वाजता घरी यायच्यावेळी सहजच तिकडे डोकावलं. ती तरिही तिथेच बसली होती. आता मात्र मला सहन होत नव्हतं. ही का इतकं सहन करते असं वाटतं होतं?? इतकं का पण स्वतःला त्रास करुन घेते ही असं वाटायला लागलं.. तिचाच विचार मनात, कोणाशी बोलु यावर काही सुचत नव्हतं...
खंत वाटते मला स्त्रि जातीची ज्या पाळीमुळे या मुलांना जन्म देतात. स्वतः आनंदात वावरतात, तिच्यामुळे निरोगी राहतात. तिच्यामुळेच असं वागतात. एक स्त्रिच दुसर्‍या स्त्रिला समजुन नाही घेत???? आज तुम्ही विचार असे मानत आहात म्हणजेच पुरुषांपासुन ही पाळी हा विषय लपवत असणारच.. मग आज ती घराबाहेर पुर्ण दिवस बसली आहे हे मी बघितलं तसं कंपनीच्या ब-याच लोकांनी बघितलं असेल. ते तर जाऊ दे, तिचे दिर आणि सासरे ह्यांना नसेल का मग जाणवलं??? की तिच्या नवर्‍याला माहित नसेल??? आज तिला पाळी आल्याचा इतका गोंगाट झालं ते एका स्त्रीला चालतं पण जेव्हा तिला इतरवेळी पाळी आल्यानंतर वेदना होतात तेव्हा अशी झोपुन नको राहु.. तुझे सासरे विचारतील म्हणून तिच्याकडून कामं करून घेतात..
सायली इतकी शिकलेली असुन ही सासुला काही बोलु शकली नाही, असे वाईट विचार आपण पुढे घऊन जात आहोत. याचं वाईट वाटतं.. काय झालं असतं ती घरात थांबलीच असती तर ???? आज काही लोकं असं मानत ही नाही.. काही स्त्रिया असे विचार जोपासत नाही, समजा अशी स्त्रि जी हे विचार जोपासत नाही तीला पाळी आल्यानंतर ही घरात राहुन सर्व करत असेल तर तिच्यासोबत काय होत असेल? आज मला पाळी आली असती आणि मी न सांगता तिथे त्यांच्या घरात त्यांच्याशी बोलुन आली असती तर काय झालं असतं ???
आज स्त्रियांना सर्व हक्क जरी मिळाले तरी काही उपयोग नाही. स्त्रिया स्वतःच एकमेकींना समजुन घेत नाही तो पर्यंत काहीच बदल होणार नाहीत. आज जर सासुनी सुनेला घरात ठेवलं असतं तर सायलीचा नवरा आणि सासरा काही बोलला असता का तिला ?? नाही त्यांना काही माहितच नाही, त्यांना काही घेणं देणंच नाही .. पण स्त्री ही स्वतःच स्त्री जात किती अपशकुनी किंवा वाईट आहे हे दाखवुन देते..