Home management books and stories free download online pdf in Marathi

गृह व्यवस्थापन

'गृह व्यवस्थापन' ( Family Management)ही अगदी शुल्लक बाब समजली जाते. आपल्यापैकी प्रत्येकालाच कुटूंब या सामाजिक संस्थेचा अनुभव आहे. त्यामूळे आपण असा विचार करणार की त्यात व्यवस्थापन ते काय ? परंतू श्रेत्र कोणतेही असो व्यवस्थापन अतिशय आवश्यक अशी बाब आहे .यात आदर्श कुटुंब तेंव्हाच बनत जेव्हा त्यातील सर्व सदस्य अनुशाशीत चुस्त आणि योग्य असतील .प्रत्येक सदस्यांमधील वर्तनात सामंजस्य असणे अतिशय आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांच्या विसंवादाचे परीणाम घरीदारी दिसतात. आता अशोकचंच पहा. अशोकच्या घरी सकाळी भांडणे, आरडा- ओरडी, आदळआपट करण्याचे आवाज येत असतात .आजही तो पाय आपटत धाडकन दखाजा बंद करून जीण्याकडे निघाला. पाय-या उतरून उतरलेल्या चेहे-याने तो बस स्टॉपवर पोहचतो, पुर्विच बसस्टॉप वर असणारे मित्र हसतमुख चेहर्‍याने त्याचे स्वागत करतात आणि उत्तरादाखल अशोक उसन हसू चेहेऱ्यावर आणून चेहरा झुकवून घेतो. अशोकची परीस्थीती सर्वांना परिचित आहे. कारण हे रोजचच आहे. अशोक सर्वाच्या नंतर बसस्टॉपवर पोहोचतो . बरेचदा त्याची बस सुटून जाते. कधी धावतपळत वेंधळ्यासारखा तो बस स्टॉपवर पोहचतो ,तेव्हा त्याचे मित्र इकडे तिकडे पाहात हसत असतात. एक दिवस निशा स्वतः अशोकच्या मागे धावत बस स्टॉपवर आली व जबरदस्ती लंचबॉक्स त्याच्या हातात द्यायला लागली. सर्व मित्र हसत होते. तो अतिशय ओशाळला . अस म्हणतात की भीतींनाही कान असतात. मग शहरातील नऊ इंच भींत आवाज, भांडणे कसे लपवू शकणार ! जेव्हा घरात भांडी वाजवात तेव्हा त्याची बातमी शेजान्यापाजान्यांपर्यंत लगेच पोहचते. मग एका घरून दुसऱ्या व दुसऱ्या घरून सान्या कॉलनीभर ही पसरते .कोणतीही चांगली गोष्ट, बातमी संकोचीत मानसीकतेमुळे लोकांत पसरत नाही परंतू वाईट बातमी जंगलातील आगीप्रमाणे तात्काळ पसरते.
अशोकसारख्या अनेकांची दिनचर्या घरी उठापटकणीने शुरू होऊन नाराजगी, मनवा-मनवी आणि माफी देण्यात ,घेण्यात संपुष्टात येते. जेव्हा भोडणतंटे ,मनमुटाव घरातील सदस्यांमध्ये होतात तेव्हा घरातील सदस्य त्याला जवाबदार असतात. अर्थात पती किंवा पत्नी किंवा बरेचदा दोघेही. प्रत्येक गोष्ट अथवा प्रथा, पध्दत जी आम्हांला दुसऱ्यांच्या घरी किंवा त्यांच्या व्यवहारात योग्य वाटत नाही ती अव्यवस्था होय, आणि अशा अव्यवस्थेमुळेच कलहाची सुखात होते.
मळलेले अव्यवस्थीत कपडे, त्यांची शिवण उघडलेली किंवा शर्टची बटने तूटलेली, जोड्यावरील धुळ यावरून व्यक्तीच्या घरातील व्यवस्थेचा अंदाज सहज लावता येतो. याचा अर्थ असा नाही की फक्त महाग कपडे जोड़े घातल्यानेच आपण व्यवस्थीत व रुबाबदार दिसतो .महाग पण अव्यवस्थीत कपड्यांपेक्षा स्वस्त पण स्वच्छ कपडेच अधिक चांगले दिसतात. अर्थात सुव्यवस्थीत बणण्यासाठी हातपाय हलवायची म्हणजेच महेनतीची, प्रयत्नांची गरज असतेच.
' घराला घरपण स्त्रीमुळे येते 'अशी म्हण आहे. याचा अर्थ असा की कुठलाही संसार सफल असफल होण्यात त्या कुटुंबातील स्त्रीचा मोठा वाटा असतो. आणि अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पहात असतो. रंजनाचा पती चांगल्या पदावर कार्यरत आहे .सोबत जोडव्यवसाय आहे .दोन्ही मुल शहरातील चांगल्या शाळेत शिकतात. कुटुंबात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. तरी घरात रोज भांडण ,कलह सुरूच असतात. बरेचदा भांडणाच कारण शुल्लक असत .परंतू घरात बरेच दिवसांपर्यंत तणाव चालू असतो. रमेशला कधीही कुठलीही वस्तू वेळेवर मिळत नाही. कधी बनीयन शोधत असतो , तर कधी रुमाल ,मोजे-पॅन्ट सापडली तर शर्टचे बटन तुटलेल बघून त्याची ओरडा-ओरड सुरू होते. इकडे रमेश त्याच्या चाव्यांसाठी ओरडत असतो तर रंजना स्वयंपाकघरात नियत वस्तू जागेवर न मिळाल्याने ओरडत असते. बरेचदा रमेश घरात मदत करत नाही म्हणून ती तनतनत असते. त्यात कधी भाजी करपते तर कधी आमटी, बस अशाच प्रकारे त्यांची संसाराची गाडी तणाव, चिडचीड, राग, निराशेच्या पटरीवर रखडत ,रखडत चाललेली आहे. दुसरीकडे निला आहे जी आपला पती व मुलांसोबत आनंदी, सुखी जिवन जगते आहे .तिला गृहव्यवस्थापणाची कला अवगत आहे. पती उमेश नगरपालीकेन क्लर्क आहे.जोड कमाईच इतर कुठल साधन नाही .निलाच काम अतिशय व्यवस्थीत आहे. घरातील वस्तु व्यवस्थीत ठेवण्याची आणि वापरण्याच्यी तीला सवय आहे. घरातील स्वच्छता, इस्त्री, खरेदी तसेच मुलांचा अभ्यास घेण्यापर्यंत सर्व काम ती अतीशय कौशल्याने व वेळात पूर्ण करते. बैंठक असो स्वयंपाकघर प्रत्येक वस्तु आपापल्या जागेवर लावलेल्या असतात .पर्स, चाबी, जोडे, कपडे, भांडे, पुस्तक इ. सर्व सामान त्यांच्या नियत जागेवर ठेवते. घरातल्या सदस्यांसोबतच बाहेरचे लोकही तीची प्रशंसा करतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य समाधानी आनंदी असतात व जिवणात उत्तरोत्तर विकसीत होतात. ज्याप्रमाणे एखादया फॅक्टरीत उत्पादकता व कार्यक्षमता बनवून ठेवण्यासाठी पूर्ण सुव्यवस्था जरूरी असते, त्याचप्रमाणे घरातील वातावरण सुख, शान्ती व आनंदाने परीपूर्ण असण्यासाठी निश्चित व्यवस्थेच ( (management) असणं अत्यंत आवश्यक आहे .सुनियोजीत पद्धतीने केलेले काम फार महत्वाचे असते. योग्य वेळी, योग्य पध्दतीने केलेल्या कामाचे परीणाम उत्साहवर्धक असतात.
सुव्यवस्थेच महत्व निसर्गाकडे बघितल्यावर सहज समजते निसर्गात सर्विकडे नियमीतता व व्यवस्था आहे. जसे पृथ्वी विशिष्ट वेळात विशिष्ठ क्रमानेच सुर्या भोवती भ्रमण करतांना दिसते. सुर्यचंद्र निश्चीत वेळेस उगवतात ,मावळतात. हवामानातील बदल व्यवस्थीत नियमबद्ध होतात .यामुळेच प्रकृतीची मर्यादा कायम आहे. मानवी जिवनाला त्यामुळे स्थैर्य लाभलेल आहे.
बन्याच लोकांना सुव्यवस्था आवडत नाही. त्यांच्या मते जी व्यक्ती व्यवस्थीत पद्धतीने काम करते तिला बरेचदा वेगळा वेळ दयावा लागतो .या लोकांच्या मते घर म्हणजे आरामाच ठिकाण. घरी आल्याआल्या सोफ्यावर लोळण त्यांना आवडत. बरेचदा असं दिसत की पती जर उच्यपदावर आहे तर तो घरी पाणी सुद्धा स्वतःच्या हाताने घेऊ इच्छीत नाही. असे लोक टेबलावर अथवा सोफ्यावर पडलेली वस्तू देखील कोणीतरी उचलून हातात दयावी अशी अपेक्षा करतात. मान्य की ऑफीसमध्ये अशी काम त्यांचा चपराशी करतो ,परंतू घरी पत्नी किंवा मुलांकडून अशी अपेक्षा करणे निरर्थक आहे. स्वतःच काम स्वतः केल्याने व्यक्ती आळशी तर होत नाहीच परंतू त्यांची कार्यक्षमताही वाढते. शहरीकरणाच्या वाढीसोबतच विभक्त कुटुंबांची वाढ झालेली आहे. आणि विभक्त कुटुंबात ,खर्च व जबाबदार्‍या वाढलेल्या आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस काहीनाकाही काम करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला लैकर निघायची घाई असते अशावेळेस प्रत्येक सदस्यांने लहानमोठ्या कामाचा भार उचलल्यास घराच्या व्यवस्थापनस मद्त होते .
सुव्यवस्था व्यक्तीनिष्ठ असते.अर्थात घर मोठे किंवा लहान असल्याने विशेष फरक पडत नाही.मोठे घर घरातील सर्व सदस्य मिळून व्यवस्थीत ठेवू शकतात तर लहान घरही एकाच्या भरोवशावर अस्ताव्यस्त असु शकते. घराच्या व्यवस्थापनात सर्व सदस्यांनी योग्य सहभाग घेणे आवश्यक आहे. कुटुंबात गृहिणीवर घरातील सर्व कामांची जवाबदारी टाकणे किंवा अव्यवस्थेसाठी तिलाच जवाबदार धरणे कुठ पंर्यत योग्य आहे. जर ती बाहेर नौकरी करीत असल्यास तीच्या क्षमतांनाही मर्यादा पडतात .तिला बाहेरील कामासोबतच गृहीणी, आई, पत्नी अशा घरातील तिहेरी भुमीका निभवाच्या लागतात.
सुव्यवस्था (management) ही फक्त एक संकल्पना नाही तर तीचा व्यवहारात घर सुव्यवस्थीत ठेवण्यासाठी उपयोग करून घेऊन आपण आपलं जिवन अधिक आनंदी, तणावमुक्त करू शकतो. जेव्हा घरातील सर्व वस्तू विशिष्ठ जागेवर असतील तर गरज पडल्यावर ताबडतोब मिळतील तेव्हा आपोआप अनावश्यक कटकटी होणार नाहीत. वस्तू शोधण्याचे श्रम व वेळ वाचेल तोच वेळ सृजनात्मक गोष्टी करण्यात जाईल. घरातील वातावरण तणावमुक्त राहील त्यामुळे व्यक्तीला भावनिक शांती लाभेल व प्रत्येक्ष क्षेत्रात त्याचा उत्कर्ष होईल.
कुठल्याही एका सदस्याच्या लापरवाई मुळे घर बिघडू शकत. कुठलेही घर सुव्यवस्थीत चालण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्यामध्ये सहकार्य तसेच सामंजस्य अपेक्षीत असते आश्चर्याची गोष्ट अशी की फॅक्टरी व आफीसमध्ये कार्यतत्पर असणान्या व्यक्ती घरात पाय ठेवल्यावर आळशी होतात. जर घरी पण त्या तशाच
शिस्तीत वागल्या तर घर नक्कीच सुखद बनेल.
घर व्यवस्थीत अथवा अव्यवस्थीत असण्याचा प्रभाव सर्वात जास्त मुलांवर पडतो कारण ते शाळेत पाच तास असतात ,बाकी वेळ घरीच असतात. पालकांच्या मतभेदाचा त्यांच्या मानसीक विकासावर परीणाम होतो. बरेचदा व्यक्तीमत्व विषयक समस्याही निर्माण होतात कारण ते घरात जे पाहतात, अनुभवतात, शिकतात त्यातूनच त्यांच व्यक्तीमत्व विकसीत होत असत.वरील सर्व विवेचनातून एक प्रश्न राहातोच. सुव्यवस्था कशी प्राप्त करावी?
घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून विचार विनिमय करून एक कार्ययोजना तयार करून घरातील व बाहेरील काम आवडीनुसार आपापसात वाटून घेतले पाहीजे. घरातील प्रत्येक सदस्याने स्वतः स्वतःचे काम करावे. स्वतःच्या वस्तु सांभाळून निश्चीत जागेवर ठेवणे.
एका वेळेला एकच काम कराव,परंतु काम अर्धवट सोडू नये कारण अर्धवट सोडल्याने त्या कामाशी संबंधीत सर्व वस्तू उघड्या अव्यवस्थीत पडलेल्या असल्यास इतरांना त्याचा तास होऊ शकतो.
पुस्तक, पर्स, किल्ल्या, पालजोडे सर्व वस्तू नियत रॅक अथवा सेल्फवर ठेवाव्यात. त्यामुळे त्या शोधण्यात वेळ व शक्ती वाया जाणार नाही चिडचिडही कमी होईल कुठल्याही कामावर वेळेवर, प्रसन्नचित्ताने पोहचता येईल.
पत्र ,बिल ईतर महत्वाची कागदपत्र मुलांच्या पोहचपासून दूर ठेवाव्यात. खेळण्यात मुलांनी फाडू नयेत.
घरातील सर्व सदस्यांचे मळलेले व धुतलेले कपडे ठेवण्यासाठी, ठराविक जागा अथवा कपाट असावे. इस्त्रीचे कपडे वेगळे ठेवावे रुमाल, अंडरवेअर, बनीयान स्वतः धूण्याची सवय फारच चांगली आहे. खाण्याच्या महत्वाबद्दल दुमत नाहीत त्यासाठी स्वयंपाकघर स्वच्छ असाव. स्वच्छ आणि व्यवस्थीत 'स्वयंपाकघर बघीतल्यावर भुक लागते. सर्व भांडी, वस्तू जागच्या जागी असाव्यात. स्वयंपाकघराची -शान गृहीणी असते तरीही घरचे सर्वच सदस्य स्वयंपाकघरीशी प्रत्यक्ष रूपाने जोडलेले असतात. फक्त वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यावर हात धुवून उठणे कितपत योग्य ठरेल .कमीत कमी खरकटी भांडी धूण्याच्या जागेवर प्रत्येकाने नेऊन ठेवली पाहिजेत.
घरकामाच्या बाबतीत मुलांना टाकून चालणार नाही. लहानपणापासूनच कामाची सवय लागल्याने ते सुजाण नागरीक, जवाबदार पालक होतील .त्यांना कामाची आवड व जवाबदारीची भावना येईल. व्यवस्थीत जगण्याची जाणीव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचते. घरातील मोठ्या मुलाच्या /मुलीच्या हातात घरखर्च देऊन त्यांना वास्तविकतेचा परीचय करून देता येऊ शकतो.
प्रत्येक महीण्याला धरातील सर्व सदस्यांनी मिळून घरची स्वच्छता करणे अशा प्रकारे 'एकमेका सहाय्य करू अवधे धरू सुपंथ' म्हणी प्रमाणे कुटुंबातील सदस्यांच्या सामंजस्याने गृहव्यवस्थापन सुचारू होऊ शकेल.