Navra baaykoche rusve-fugve - 8 books and stories free download online pdf in Marathi

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...८

________________________________________
आपण पाहिलं मागच्या भागांमध्ये लग्न वगैरे आटोपून न्हानोऱ्याचा कार्यक्रम चालू असतो, नवरी आणि नवरदेव एकमेकाच्या तोंडावर खोबऱ्याचं चावलेला खिस गुळण्या करतात...😜😜
आणि म्हातारी मधेच बोलते आणि नवरदेवाच्या तोंडात पान दिले जाते...😊
________________________________________

आता पुढे...

आणि नवरी त्या पानाला दाताने तोडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात नवरदेव त्या पानाला तोंडामध्ये ओढून घेतो. न्‌ त्यात नवरी ची बहिण मागून येते आणि मोबाईलची स्क्रीन दाखवत मेसेज दाखवते.

पहिला मेसेज..‌
"जर का जास्त पान आत मध्ये ओढायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघा तुमची खैर नाही.‌"

दुसरा मेसेज..

"बर्या बाजीने पान बाहेर राहू द्यायचं... कळलं ना.?

आणि तेवढ्यातच माझ्या स्वप्नातल्या रितुची आठवण येते. आणि मनात विचार करत यार हि पण मला धमकी देते काय कराव कळत नाही..😏
याच विचारांमध्ये विचार करता करता रीतू तिचा पदर आमच्या दोघांच्या डोक्यावर टाकुन तोंडातून पान तोडून घेते...😜 इथेच मुलांची हार होते आणि मुली ओरडायला लागतात.
तेवढ्यात दोन म्हाताऱ्या येवुन रितुला बोलतात. पोरी भलतीच हुशार शे माय तु..... मानना पडि तुले 👍

काय कराव...! लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मोबाईल वर आधीच प्लॅन करून मेसेज पद्धतीने सुद्धा धमक्या सुरू व्हायला लागल्यात बाबा...😏 रितूच्या चेहऱ्यामध्ये मला आधीची स्वप्नातली रितू दिसायला लागला. "ती धमकी देणारी, बघते तुम्हाला असं म्हणणारी" असो काय करणार....!
आधीच सवय झालेली मला धमक्या ऐकून घेण्याची आणि घाबरण्याची, आता काय सवय झाली आहे. काय घाबरायचं विषय नाही तेवढा असो...
मग काय घाबरणार...😜 असूद्या जे होईल ते होईल..😝. याच विचारावर आता पुढे.....

आता नवरीच्या म्हणजे रितूच्या तोडांमध्ये पान दिल जाते....
आता नवरदेवाची वेळ असते पान तोडायची..😜😝 भलताच खुश होवून....😁 पान तोडायचा विचार करून, पान तोडायला सुरुवात करतो.

पान तोडण्यासाठी जवळ जातात... रितू पान पूर्ण चा पूर्ण आत मध्ये ओढून घेते... आणि नकळत तिच्या ओठावर ओठ टेकतात.... असं होताच मुला-मुलींमध्ये गोंधळ होतो..‌अय्यो.. अरररररर....

आणि एक म्हातारी पुढे येऊन.....
व्वा काय रोख ठोक व्यवहार झाला. म्हातारीचा असं बोलणं ऐकून सर्व पब्लिक हसायलाच लागली😁😜

इकडे हा कार्यक्रम चालू आणि तिकडे नवरी सोबत आलेल्या मुलींवर नवरदेवाची मित्रमंडळी 576 च्या मेगापिक्सल डोळ्यांनी पाहून लाईन केव्हा क्लिअर होईल हाच उद्देश ठेवून मंडळी कामाला लागगेली असते. आणि इथूनच मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आणि काही मुली/ मुलांचे लग्न इथून तर घडून सुद्धा येतात...
काय मंडळी बरोबर आहे ना...? की चुकलं माझं काही..?😁😁😜😜

मस्त पैकी सर्व कार्यक्रम आटपुन जातो......
आता संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे तिखि (खारि) पंगत मस्तपैकी मटन वगैरे आणून पंगतीला सुरुवात होते....
पंक्तीमध्ये जावाई माणसाची मोठी व्हाह व्हाह, जावयाच्या ताटात 15/ 15 मटणाचे पीस जावायाची डेरी भरून जाते तरीपण जावायला रस्सा काय, तर्ही काय, पीस पीस काय टाकतात. आणि समोरच्या पंगतीमध्ये बसलेला माणसाला कोणी हुंगून नाही हो बघत....😏
जावाई आहे तर त्याकडे पूर्ण लक्ष आणि बिचारा एखाद्या माणसाकडे दुर्लक्ष... हे बरोबर नाहीये..😝

म्हणून तर मुलं लग्न झाले की सासरवाडीला जातात. काय हवा असते ना राव, जे मागितलं ते मिळत. मिळत न खर...! कि हि अफवा आहे...🤭
मटन काय, चिकन काय, बोकडा काय, जे म्हणाल ते मिळतं हो.... काय बरोबर ना लग्न झालेली मंडळी...? 😝😝

आणि ज्यांनी भांडण करून आले आहेत सासरवाडीला त्यांचा तर चान्स गेला...😝😝 कोणाकोणाचा गेलाय रे...? लाजू नका सांगा.
तुम्हाला माझ्याकडून पार्टी भेटेल...😝😝 सांगा फक्त इन बॉक्सला नको कमेंटमध्ये...😝😝 इनबॉक्स मध्ये तर कोणी पण सांगेल... यहा इज्जत का सवाल है! 😜

काय बरोबर ना, लग्न झालेली मंडळी....!

आणि त्या पळून जाणाऱ्यांचे हालच खूप बेकार, कोणी हुंगून बघत नाही हो..😝 सासरवाडी चे लहानापासून तर मोठ्यांपर्यंतची माणसं शिव्या शिवाय काही देत नाही...😜

आहे का कोणी असा नग...? 😝😝

पण हा, कोणी कोणी खूप नशीबवान आहे बरं, असं करून सुद्धा खूप मान-सन्मान मिळवतात...😜
आणि ही पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन... जय government बाबा कि जय...😝😜

असो जावई माणसं तर फुल जेवण करतात,😕
जावई सोडून इतर लोकांकडे लक्ष द्यावे बस यासाठी हा उद्देश...😜 काय बरोबर ना...? हे वाचून एखाद्याच्या मनावर परिणाम झाला तर समोरच्या पंगतीत बसलेला माणूस सुद्धा पोटभर जेवण करू शकेल...😜 त्या समोरच्या पंगतीत बसलेल्या माझ्या भावांचे हाल बघवत नाही रे म्हणून हा एवढा खटाटोप... बाकी काही नाही आता तुम्ही दुसरा विचार करू नका..😜

***

सर्वांचं जेवण वगैरे आटोपून आता नवरी आणि नवरदेव जेवणाला बसतात म्हणजे आम्ही बरं...😜
आता इथे आमच्या रितूला बसायला दिलेला पाट अगदी छोटा असतो. तिला काहि त्या पाटावर नीट बसता येत नाही🤪 पुन्हा माझ्याकडे मोठे डोळे करून रागावुन तुमचा पाट मला द्या..😠 असं खुनेने सांगत...

नाईलाजाने द्यावा लागला बाबा... 😏
शेवटी बायको ती ऐकावं तर लागणारच...☹️

क्रमश:
________________________________________
‌* शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव