Navra baaykoche rusve-fugve - 9 books and stories free download online pdf in Marathi

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...९

________________________________________
तुम्ही पाहिलच भाग ८ मध्ये रितूची करामत...😜 पान तोडणीच्या वेळी पदर दोघांच्या डोक्यावर घेऊन मोठीच करामत केली. आणि जावई माणसाचा तर थाटच मोठा असतो सासरवाडी मध्ये. नवरदेव नवरीला जेवायला बसायला पाठ देतात परंतु रीतुचा पाठ छोटा असल्यामुळे तिला काही निट बसता येत नाही... तिथेच तिचे माझ्यावर मोठ मोठे डोळे करून बघन आणि खुणे न बोलणं तुमचा पाठ मला द्या.. बसता येत नही इथ....😠
________________________________________

आता यापुढे.....

पाठ द्यावाच लागला बाबा शेवटी बायको ती, 😝 पाकिस्तान भारताचा काश्मीर मुद्दा, किंवा कोणत्याही देशाचा राष्ट्रीय मुद्दा सोडवुन घेइल पण बायकोचा "घरराष्ट्रीय मुद्दा" नाही सोडवता येत बाबा...😝😝😁 लय बेक्कार असतो, इथं वकील पण तीच, गुन्हेगार सुद्धा तीच, आणि निर्णय लावणारी सुद्धा तीच, सर्व खाते तिच्याकडे असतात.. 😜😁 बायको म्हणजे जाऊद्या नाही सांगत...😜


जेवायला बसलेल्या नवरदेव नवरीला वाढायला सर्वांची मोठी आतुरताच असते... आता रीतुला म्हणजेच नवरीला सात देर साथ दिरा कडून प्रत्येकी दोन-दोन मटणाचे दोन दोन पीस... थाटामध्ये रस्सा कमी आणि पिसच जास्त.. लाडाची वहिनी म्हटल्यावर हे तर सहाजिकच आहे.😁
पण इथं नवरदेवा कडे कोणी बघत नाही... सर्वच लाडाच्या वहिनीला बघतात.. माझी तर अवस्था त्या समोरच्या पंगतीमध्ये बसलेल्या माणसा सारखी झाली.. बस रीतुच्या ताटाकडे बघुन पोट भरून घेणे असंच झालं. जो तो लाडाच्या वहिनीला बघतो आणि भावाला दिलं सोडून...😏 शेवटी असं बघून रितुची बहिन/मैत्रीण मितू कडून काही राहावलं नाही.
मितुने तर कमालच केली. अख्खा मटनाच पातेल उचलून आणले आणि माझ्याच पुढे ठेवल... घ्या जीजू पिस पिस घ्या ना हं...
इतका भारी वाटलं ना माझ्यासाठी माझ्या सालीबाईने घेतलेली माझी काळजी .. खरंच खूप छान वाटलं..😊
पन काय सांगू....
मनात होत पीस पीस टाक, पण कस आहे ना, म्हणावं लागतं, नको नको खूप झालं, जास्त नको देऊ...😝
इकडे मनात असते ह्या छोट्या चमच्याने नको वाढू मोठा चमचा घे आणि नुसते पिस पिस टाक.
पण कसा आहे ना, म्हणावं लागतं नको नको नको ूप झाल ...😜😜

नको नको म्हणत होतो तसतसं मितु, अहो जीजू थोडं घ्या ना... फक्त थोडं घ्या, आमचा मान नाही राखता का जिजू तुम्ही.. ( मि इथं मनातल्या मनात अगबाई पातेल्या मध्ये जेवतो आण ते पातेल इकडे) 😜😜😝
मटण खायची जीभेला मोठी आस..😝 आता तुम्ही एवढं मानाने बोलत आहात तर टाका दोन चार चमचे पीस पीस, तुमचा मान तर राखावा लागेल. 😁
शेवटी जेवण वगैरे आटोपून मस्तपैकी खाऊन रात्री झोपायची तयारी चालू असते.

झोपते वेळी मी मस्तपैकी मोबाईल कडे बघतो आणि बघतो तर काय...! रीतूचे तीन मेसेज येऊन पडलेले असतात.
१) अहो कुठे आहे ऐका ना..?
२) किती उशीर करत आहे बघा तरी मेसेज ला रिप्लाय तर द्या..!
३) अहो माझं पोट दुखतय, खूप गडबड होते पोटामध्ये.

मेसेज बघून मी मेसेज टाईप केला,
मस्त पीस पीस खाल्ले, खातांना तोंड कसं नाही दुखलं, आता पोटात गेल्यावर पोट कस काय दुखतंय...😝😝😜 असं लिहून झाल्यावर सेंड करताच... नको बाबा जाऊदे उगाच रिकाम काम होईल आणि बसेल फुगून...😜 पुन्हा मेसेज खोडून दुसरा मेसेज "अगं थांब स्वीटहार्ट मी आलोच आपण डॉक्टरकडे जाऊ"

आता घरामध्ये पाहुणे मंडळी खूपच असतात, आणि कसं काय तिच्याजवळ जायचं मी, हाच मोठा विचार डोक्यात चालू असतो, शेवटी न राहवल्याने मी तीच्या रुमकडे धाव घेतो. आणि तिथे दोन-तीन बाया बसलेले असतात, त्यात मितु सुध्हा असते. आणि एक आजी, मला तिथे पाहून आजी लगेच बोलते....
"काय कायजी वाटस रे तुले एवढी, बायको येवाले एक दिन नहि व्हयना आणि दखा हाऊ, "बायकोना बैल नी गत गत्या व्हयी तुनी....😝😝😜

मि : व मनी माय आता तिले देखाले बि नहि यू का...? लगेच बायकोना बैल म्हणस म्हाले..😏😕

त्यात मितु सुध्हा मजाक मध्ये....अहो जिजु काय काळजी करता तुम्ही, आम्ही आहेत ना इथं... लईच काळजी वाटत बायकोची..😝 ओय होययययय...😜

मी तिथून पाय काढत सरळ बेडवर जाऊन पडतो...
बेडवर पडताच मितुचा मेसेज काय जिजु येवढी काळजी घेतात माझ्या ताईची. छान हा..😊 आणि हो तुम्हाला जर वाटत असेल ना की आम्ही काळजी नाही घेणार तुमच्या बायकोची तर बिंधास्त तुम्ही घेऊन जा, तुमच्या बायकोला तुमच्या जवळ,

मितुला रिप्लाय देत.... अग नाही ग, पण तुझ्या ताईला हॉस्पिटल घेऊन जा, त्रास होत असेल तीला..

मितु....अहो जिजु आता जातोय तुमच्या बायकोला हॉस्पिटलला घेऊन खिडकीतून तर बघा जातोय की नाही आम्ही..

मी खिडकीतून बघायला येतो तर रीतू खूपच रागात दिसते.. आणि थोड्याच वेळात रीतुचा मेसेज येतो. काळजी करू नका माझं काही पोट बीट नाही दुखत, मला फक्त तुमच्यासोबत रात्रीच्या वेळेस बाईक वर फिरायला जायचं होतं, पण तुम्ही आले आणि पळून गेले लगेच,😏 मस्त बाईकवर गार गार हवेमध्ये... मला आज तुमच्या सोबत फिरायचं होतं...😏 तुम्ही बघाच आता😠 तुम्ही नाही आले ना माझ्यासोबत.😏
एवढी काय शरम वाटते तुम्हाला..! तुमची बायको आहे ना मी आता..! कोणी बोलले तर लगेच निघून गेले....😏 उद्या बघतेच तुम्हाला आता 😠😠😠😠क्रमश:

________________________________________
शब्द बिंधास्त..mk
किरण सुरेश मगरे
जळगाव
________________________________________