Village Village Hope - Part 5 books and stories free download online pdf in Marathi

गावा गावाची आशा - भाग ५

एक हजार लोकसंख्येला एक आशा या प्रमाणामध्ये गावोगावी आशा पदे भरली गेली होती. आशाची वर्करची भरती होणार आहे असं त्यांना पीएचसीला कळलं . कोणी असल्यास सांगावे .ती व्यक्ती स्थानिक असावी. त्याच गावात राहणारी असावी . शक्यतो लग्न झालेली असावी.अशी अट होती.भरतीसाठी... त्यांची एक आशा होती त्या आशाने आधीची आशा वर्करची नोकरी सोडली होती. ती उपसरपंच बनली होती. परंतु उपसरपंच पदाला मानधन नाही म्हटल्यावर ती पुन्हा अशा बनायला तयार होती. तीने आधीच्या आशा वर्करच्या नोकरीचा राजीनामा दिला होता.



मीनाक्षीआशा पूजाआशा वर जाम भडकली होती. त्यांची आपसात कशावरून तरी जुंपली होती.तिची समजूत गौरीआशा आणि दुसऱ्या गावातल्या आशा काढीत होत्या. पण ती शांत होत नव्हती..

तू कशाला एवढी तीच्यावर भडकतेस गौरी. मीनाक्षी बोलली.
मी कुठे ओरडतेय. तीच स्वतः भांडण्यासाठी नेहमी वातावरण तयार करते.
म्हणजे तुमचं भांडण तरी काय आहे दोघींचं .गौरीने विचारले.

अगं काही नाही ग .ती पूजा आहे ना. दरवर्षी आदर्श आशाचा पुरस्कार पटकावते. त्याच्यामुळे तिची आणि माझी दुष्मनी आहे.

हे असं होय. कपाळावर हात मारत गौरी बोलली.
त्यां मध्ये तिचा काय दोष ना. ती चांगलं काम करते .त्यामुळे तीला पुरस्कार मिळतो.
चांगलं काम काही नाही ग. चांगलं काम वगैरे नाही .ती दिसायला सुंदर आहे ना. त्यामुळे मिळतो हा पुरस्कार. तिच्या रूपावर तिला पुरस्कार मिळतो.

ए गपे मीनाक्षी. काहीतरी बोलू नकोस. इतर आशांनी तिला झापले

तू पण दिसायला काय एवढी वाईट नाहीस. तु पण खूपच सुंदर आहेस. तुला कां नाही मिळत पुरस्कार. साधना तीला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाली.
तेच तर मी म्हणते ना.
म्हणजे तू पूजा वर जळतेस असंच ना. साधनाने तिला बोलचिंमटा काढला.
तसं तर तसं . समजा तुम्ही ज्ञ पण माझं दुःख तुम्हाला समजत नाही.किंवा दिसला कां नाही. यापुढे जर पूजा मला बोलली तर मी पण तीला नडणार . मीनाक्षी ठामपणे बोलली.
तुझं दुःख नाही. तुझा तो गैरसमज आहे. कुणी सुंदर दिसायला असले तरी त्याचं काम नको कां चांगलं.वरचे काम पहाणारे अधिकारी डोळे मिटून बसले नाही आहेत. त्यांना समजते कुणाचं काम चांगल आणि कुणाचं वाईट...ते..
आता तू पण त्या पूजाचीच बाजू घे. एक दिवस बघते बघते आणि पूजाची दुसरी तंगडी सुद्धा मोडते. ती रागाने फणकारली.
नको ग नको .असं काही करू नकोस. ती बिच्चारी आधीच एका पायाने अधू आहे .त्यामध्ये दुसऱ्या पायाला दुखापत केली तर तिची खूपच गैरसोय होईल.
होउदे तसेच पाहिजेल.तिला मिनाक्षी धुसफूस करीत बोलली.
नको .ती आपली सहकारी आहे असं अजिबात करण्याचा तू मनात विचार सुद्धा आणू नकोस .कोणाला जर कळलं ना.तु पूजाला त्रास देतेस .तर तुलाच दंड होईल . कारवाई होईल.

काय व्हायचे ते होऊ दे . पण मी तीला अद्घल घडवणार म्हणजे घडवणार. मीनाक्षी शब्दावर जोर देत बोलली.
एकतर पूजा नियमात बसत नाही. तिचं लग्न झाले नाही. काय गोड बंगाल आहे काही कळत नाही ते. मी शोधून काढते बघ. मी तिला लटकवते चांगलीच. तीची नोकरी गेली ना. मग बस बोंबलत म्हणाव.

नको असा विचार करू नकोस. जर आपण दुसऱ्याच्या असा विचार केला तर आपल्याला पण तसंच होतं. सोडून दे विषय. आता चल.निघ.डोकं शांत ठेव...
बरं चल. सोडून देते विषय...
आणि यापुढे आदर्श आशा होण्याचे स्वप्न तूला जर पूर्ण करायचे असेल तुला तर तू आदर्श काम करत राहा. तरच तु आदर्श आशा म्हणून निवडली जाशील.
बरंबरं तू आता मला शिकवू नकोस. मीनाक्षीने गौरीला दम दिला.
बरं बाई मी नाही काय बोलत . त्या दोघी उठल्या आणि बाहेर पडून घरी निघाल्या.

Share

NEW REALESED