Sant Eknath Maharaj--13 Shri Krishna Uddhav Dialogue in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | संत एकनाथ महाराज--१३ श्रीकृष्ण उद्धव संवाद

संत एकनाथ महाराज--१३ श्रीकृष्ण उद्धव संवाद

श्रीसंतानाथमहाराज१३श्रीकृष्ण संवाद

श्लोक १० वा

स्यान्नस्तवाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः । क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः । यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्भिःभ । व्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥१०॥

आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु । तुझाचि जी विख्यातु । त्रैलोक्यांतु श्रीकृष्णा ॥११॥ पापइंिधनाचा मेळु । तेथ तुझा चरण वडवानळु । लागतां तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥१२॥ ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता । तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥१३॥ तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें । तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥१४॥ करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान । त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥१५॥ तोचि चरण सात्वतीं । पावावया समविभूती । पूजिला जी श्रीपती । चतुर्मूती व्यूहरूपें ॥१६॥ 'वासुदेव' 'संकर्षण' । 'अनिरुद्ध' आणि 'प्रद्युम्न' । हाचि चतुर्व्यूह जाण । पूजास्थान भक्तांचें ॥१७॥ भिन्न भिन्न चारी व्यक्ती । चहूं रूपीं एक मूर्ती । ऐसें जाणोनि पूजिजे भक्तीं । 'व्यूहस्थिति' त्या नांव ॥१८॥ 'सात्वत' म्हणिपती ते भक्त । भगवत्पदऐथश्वर्यातें वांछित । चतुर्व्यूहरूपें पूजित । ऐश्वर्यीं चित्त ठेवूनी ॥१९॥ जन्ममरणप्रवाहस्थिती । नासावया एक भक्तीं । पूजा कीजे चतुर्मुर्ती । आत्मवंती सज्ञानीं ॥१२०॥ त्रिषवण* त्रिकाळ । पूजा करितां अविकळ । [*तीन

सवने] भजोनि जिंतिला कळिकाळ । जन्ममूळ छेदावया ॥२१॥ आणिकही भक्तजन । तुझें करिताति भजन । यज्ञद्वारा होमहवन । विधि विधान वेदोक्त ॥

श्लोक ११ वा

यश्चिन्त्यते प्रयतपाणिभिरध्वराग्नौ । त्रय्या निरुक्तविधिनेश हविर्गृहीत्वा । अध्यात्मयोग उत योगिभिरात्ममायां । जिज्ञासुभिः परमभागवतैः परीष्टः ॥११॥

दीक्षाग्रहणीं अतिसादर । यज्ञद्वारा भजनतत्पर । क्रियेपासोनि नेमिले कर । हस्तव्यापार न करिती ॥२३॥ तेथ वेदत्रयीची विधानकळा । बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा । आंत यज्ञपुरुष आव्हानिला । चैतन्यतेजाळा सर्वात्मा ॥२४॥ तेथ ओंकार वषट्कार । लक्षणोक्त मंत्रउळच्चार । द्रव्यें अर्पिती अपार । अतिपवित्र अवदानीं ॥२५॥ आणिक एक योगयुक्त । योगधारणा तूतें भजत । प्राणापानांची समता देत । आसनस्थ होऊनियां ॥२६॥ वज्रासनीं दृढ बंध । भेदोनि षट्चक्रांचे भेद । कुंडलिनीचा स्कंध । अतिसुबद्ध थापटिला ॥२७॥ ते खवळली महाशक्ती । वेगें चालिली ऊर्ध्वगती । पवन प्राशूनि ग्रासिती । योगस्थिती गगनातें ॥२८॥ शोषूनि सहस्त्रदळाचे पाट । आटपीठ आणि गोल्हाट । क्रमोनियां श्रीहाट । आली अतिउद्भट ब्रह्मस्थाना ॥२९॥ तेथ परमानंदाचा भोग । शिवशक्तींचा संयोग । यापरी अभ्यासोनि योग । हा भजनमार्ग योग्यांचा ॥१३०॥ तुझी जाणावया माया । एक भजों लागले तुझिया पाया । सर्वथा अतर्क्य तुझी माया । देवराया श्रीकृष्णा ॥३१॥ माया न लक्षेचि लक्षितां । तोचि मायामोह जाहला चित्ता । मग ते सिद्धीलागीं तत्वतां । चरण भगवंता पूजिती ॥३२॥ आणिकही एक पक्ष । तुज भजावया मुमुक्ष । जाले गा अतिदक्ष । अध्यात्मपक्षनिजयोगें ॥३३॥ आत्ममायेचा नाशु । करावया जिज्ञासु । निजात्मबोधें सावकाशु । अतिउल्हासु पूजेचा ॥३४॥ विवेकाचिया भावना । नित्यानित्याची विवंचना । करूनि आणितां अनुसंधाना । सर्वत्र जाणा तूंचि तूं ॥३५॥ जें अनित्यपणें वाळिलें । मायिकत्वें मिथ्या जाहलें । मग चिन्मात्रैक उरलें । निर्वाळिलें निजरूप ॥३६॥ एवं पाहतां चहूंकडे । तुझेंचि स्वरूप जिकडे तिकडे । मग पूजिती वाडेंकोडें । निजसुरवाडें सर्वत्र ॥३७॥ जें जें देखती जे जे ठायीं । तें तें तुजवांचूनि आन नाहीं । ऐसा सर्वत्र चरण पाहीं । ठायींचा ठायीं पूजिला ॥३८॥

श्लोक १२ वा

पर्युंष्टया तव विभो वनमालयेयं । संस्पार्धिनी भगवती प्रतिपत्नीवच्छ्रीः । यः सुप्रणीतममुयाहणमाददन्नो । भूयात्सदाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः ॥१२॥

ऐसे सर्वत्र तूतें पूजिती । भक्त पढियंते होती । त्यांची पूजा तेही अतिप्रीतीं । स्वयें श्रीपती मानिसी ॥३९॥ रानींची रानवट वनमाळा । भक्तीं आणूनि घातली गळां । रमा सांडोनि उताविळा । स्वयें भाळला माळेसी ॥१४०॥ भक्तीं अर्पिली आवडीं । म्हणौनि तियेची अधिक गोडी । शिळी जाहली तरी न काढी । अर्धघडी गळांची ॥४१॥ भक्तीं भावार्थें अर्पिली । देवें सर्वांगीं धरिली । यालागीं सुकों विसरली । टवटवीत सर्वदा ॥४२॥ तिचा आस्वादितां गंधु । भावें भुलला मुकुंदु । श्रियेसी उपजला क्रोधु । सवतीसंबंधु मांडिला ॥४३॥ मज न येतां आधीं । भक्तीं अर्पिली नेणों कधीं । मी तरुण सांडोनि त्रिशुद्धी । ते वृद्ध खांदीं वाहातसे ॥४४॥ देव नेणे भोगाची खूण । ती वृद्ध मी तरुण । परी तिशींच भुलला निर्गुण । गुणागुण हा नेणे ॥४५॥ मज चरण सेवा एकादे वेळां । हे सर्वकाळ पडली गळां । मजहूनि स्नेह आगळा । नेला वनमाळा सर्वथा ॥४६॥ मातें डावलूनि वेगीं । हे बैसली दोहीं अंगीं । इसीं बोलतो श्रीशार्ङ्गीं । मजचिलागीं त्यागील ॥४७॥ मज दीधली चरणांची सेवा । इचा मत्सरु किती सहावा । आपाद आवरिलें यादवा । माझी सेवा हरितली ॥४८॥ मी कुळात्मजा क्षीराब्धीची । हे रानट रानींची । खांदीं बैसली देवाची । भीड भक्तांची म्हणवूनि ॥४९॥ हे भक्तिबळें बैसली खांदीं । कंहीं नुतरेचि त्रिशुद्धी । रमा वनमाळेतें वंदी । द्वेषबुद्धी सांडोनी ॥१५०॥ ऐशी भक्तांची पूजा । तुज आवडे गरुडध्वजा । सुप्रणीत भावो वोजा । चरणीं तुझ्या अर्पिल्या ॥५१॥ तो चरणधूमकेतु तुझा । आमुच्या पापांतें नाशू वोजा । पुनः पुनः गरुडध्वजा । पापसमाजा निर्दळू ॥५२॥ करितां चरणांचें वर्णन । न धाये देवांचें मन । पुढपुढतीं चरणस्तवन । ध्वजलक्षण वर्णिती ॥५३॥

Rate & Review

Satu Chavan

Satu Chavan 9 months ago

Sudhakar Katekar

Sudhakar Katekar Matrubharti Verified 9 months ago

उत्कृष्ट

Share