Sant Eknath Maharaj 10 Bhakti Yoga books and stories free download online pdf in Marathi

संत एकनाथ महाराज १० भक्ती योग

श्री संत एकनाथ महाराज10 भक्ती योग

श्लोक ४९


माऽपत्यबुद्धिमकृथाः, कृष्णे सर्वात्मनीश्वरे

मायामनुष्यभावेन, गूढैश्वर्ये परेऽव्यये ॥४९॥

तुम्ही बाळकु माना श्रीकृष्ण हा भावो अतिकृपण

तो परमात्मा परिपूर्ण अवतरला निर्गुण कृष्णावतारें ॥३१॥

यासी झणें म्हणाल लेंकरूं हा ईश्र्वराचा ईश्र्वरु

सर्वात्मा सर्वश्र्वरु योगियां योगींद्रु श्रीकृष्ण ॥३२॥

हा अविकारु अविनाशु परात्परु परमहंसु

इंद्रियनियंता हृषीकेशु जगन्निवासु जगदात्मा ॥३३॥

मायामनुष्यवेषाकृती हा भासताहे सकळांप्रती

गूढऐश्र्वर्य महामूर्ती व्यापक त्रिजगतीं गुणातीतु ॥३४॥

श्लोक ५० वा


भूभारासुरराजन्यहंतवे गुप्तये सताम् ।

अवतीर्णस्य निर्वृत्यै, यशो लोके वितन्यते ॥५०॥

काळयवनादि असुर । कां जरासंधादि महावीर ।

अथवा राजे अधर्मकर । अतिभूभार सेना ज्यांची ॥३५॥

तो उतरावया धराभार । धर्म वाढवावया निर्विकार ।

संतसंरक्षणीं शार्ङगधर । पूर्णावतार श्रीकृष्ण ॥३६॥

प्रतिपाळावया निजभक्तांसी । सुख द्यावया साधूंसी ।

अवतरला यदुवंशीं । हृषीकेशी श्रीकृष्ण ॥३७॥

तो असुरगजपंचाननु । सज्जनवन‍आनंदघनु ।

तुमच्या उदरीं श्रीकृष्णु । अवतार पूर्णु पूर्णांशेंसीं ॥३८॥

उद्धरावया त्रिजगती । थोर उदार केली कीर्ती ।

ज्याच्या अवताराची ख्याती । पवाडे पढती ब्रह्मादिक ॥३९॥

तरावया अतिदुस्तर । ज्याची कीर्ति गाती सुरनर ।

परमादरें ऋषीश्र्वर । कृष्णचरित्र सर्वदा गाती ॥५४०॥

ज्याचें नाम स्मरतां भक्त । कळिकाळ नागवत ।

तो अवतार श्रीकृष्णनाथ । तुम्हांआंत प्रगटला ॥४१॥

श्रीकृष्ण परब्रह्मैकनिधी । त्यासी पाहूं नका बाळबुद्धीं ।

इतुकेन तुम्ही भवाब्धी । जाणा त्रिशुद्धी तरलेती ॥४२॥

ऐशी श्रीकृष्ण‍अवतारकथा । नारद वसुदेवा सांगतां ।

शुक म्हणे गा नृपनाथा । विस्मयो समस्तां थोर झाला ॥४३॥श्लोक ५१ वा


शुक उवाच-एतच्छ्रुत्वा महाभागो वसुदेवोऽतिविस्मितः

देवकी महाभागा जहतुर्मोहमात्मनः ॥५१॥

निमिजायंत मुनिगण इतिहास पुरातन जीर्ण

कृष्ण परमात्मा ब्रह्म पूर्ण नारद आपण निरूपी हर्षें ॥४४॥

शुक म्हणे परीक्षिती ऐकोनि नारदावचनोक्ती

देवकीवसुदेवो चित्तीं अतिविस्मितीं तटस्थ ॥४५॥

तया नारदाचेनि वचनें कृष्ण परमात्मा बोलें येणें

देवकी वसुदेव निजमनें दोघें जणें विस्मित ॥४६॥

तीं परम भाग्यवंत दोन्ही जो पुत्रस्नेहो होता श्रीकृष्णीं

तो सांडोनियां तत्क्षणीं कृष्णपरब्रह्मपणीं निश्र्चयो केला ॥४७॥

श्रीकृष्णीं ब्रह्मभावो धरितां निःशेष मोहस्नेहो

हृदयींचा निघोनि गेला पहा हो बाप नवलावो भाग्याचा श्लोक ५२ वा


इतिहासमिमं पुण्यं, धारयेद्यः समाहितः

विधूयेह शमलं, ब्रह्मभूयाय कल्पते ॥५२॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे पंचमोऽध्यायः ॥५॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

जो निमि-जायंतसंवादु वसुदेवा सांगे नारदु

हा इतिहास अतिशुद्धु जीवशिवभेदुच्छेदकु ॥४९॥

सावधानपणें श्रोता तल्लीन होऊनि तत्त्वतां

हे इतिहासाची कथा सादरता जो परिसे ॥५५०॥

तेणें सकळ पुण्यांचिया राशी श्रवणें जोडिल्या अहर्निशीं

तो गा पुरुषु अवश्यतेसी ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र ॥५१॥

सार्थक एक एक पद परिसतां होय अंतर शुद्ध

यालागीं पावे ब्रह्मपद परमानंद निजबोधें ॥५२॥

हे 'पंचाध्यायी' म्हणणें घडे पंचवक्त्र चंद्रचूडें

एकादशाचें ज्ञान गाढें वर्णावया फुडें ध्वज उभविला ॥५३॥

हे पंचाध्यायी नव्हे जाण एकादशाचे पंचप्राण

उपदेशावया शुद्ध ज्ञान सामोरे आपण स्वभक्तां आले ॥५४॥

हे पंचाध्यायी नव्हे केवळ पंचम आलापे शुककोकिळ

एकादश वसंतकाळ भक्त-अलिकुळ आलापवी स्वयें ॥५५॥

हाही नव्हे प्रकार हे शर्करा पंचधार

चाखों धाडिली सत्वर ज्ञानगंभीर निजभक्त ॥५६॥

हे पंचाध्यायी नव्हे सिद्ध एकादशाचे पंच गंध

भक्त आंवतावया शुद्ध धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता ॥५७॥

एकादश अतिविवेकी यावया पंचाध्यायी पालखी

पुढें धाडिली कवतुकीं निजभक्तविखीं कृपाळुवें ॥५८॥

हे कृष्ण-उद्धवअर्धमात्रा अर्धोदयो महायात्रा

ते यात्रेलागीं हांकारा पंचाध्यायी खरा साधकां करी ॥५९॥

श्रीकृष्णउद्धवमेळा देखोनि ब्रह्मसुखाचा सोहळा

तो सांगों आली कळवळा भक्तांजवळां पंचाध्यायी ॥५६०॥

अहंकाराचें मेट होतें तें उठवूनि श्रीकृष्णनाथें

केलें आत्मतीर्थें मुक्तें अभयहस्तें उद्धवासी ॥६१॥

ते मुक्ततीर्थनवाई पुढें सांगों आली पंचाध्यायी

संसारश्रांत जे जे कांहीं ते धांवा लवलाहीं विश्रांतीसी ॥६२॥

कृष्णउद्धवगोडगोष्टी हे निर्विकल्प कपिलाषष्ठी

ते पर्वकाळकसवटी सांगों उठाउठीं पंचाध्यायी आली ॥६३॥

उद्धवालागीं भवसागरीं उतरावया पायउतारीं

भागवतमिषें श्रीहरी सुगम सोपारी पायवाट केली ॥६४॥

पव्हणियाहूनि पायउतारा भागवतमार्ग अतिसोपारा

तो मार्गु दावावया पुरा हांकारी स्त्रीशूद्रां पंचाध्यायी ॥६५॥

पुढील निरूपणआवडी अतिशयें वाढे चढोवढी

ते कृष्णवाक्यरसगोडी पंचाध्यायी फुडी साधावया सांगे ॥६६॥

कृष्णउद्धवसंवादीं होईल परब्रह्म-गवादी

साधकमुमुक्षांची मांदी धांवे त्रिशुद्धी निजसुखार्थ ॥६७॥

परब्रह्म झालें सावेव स्वरूपसुंदर ज्ञानगौरव

मनोहर रुपवैभव स्वर्गींचे देव पाहों येती ॥६८॥

तो देवांचा स्तुतिवादु सवेंचि उद्धवाचा निर्वेदु

कृष्णउद्धवमहाबोधु जेणें परमानंदु वोसंडे ॥६९॥

ते पुढील अध्यायीं कथा रसाळ सांगेन आतां

अवधान द्यावें श्रोतां ग्रंथार्था निजबोधें ॥५७०॥

स्वयें वावडी करूनि पूर्ण तिसी उडविजे जेवीं आपण

मग उडालेपणें जाण आपल्या आपण संतोषिजे ॥७१॥

तेवीं मजनांवें कविता करूनि स्वयें सद्गुरु वक्ता

एवं वदवूनियां ग्रंथार्था श्रोतेरूपें सर्वथा संतोषे स्वयें ॥७२॥

तो एकपणेंवीण एकला एका दुजेनवीण जनार्दनु सखा

तेणें पुढील ग्रंथआवांका विशदार्थें देखा विवंचिला ॥७३॥

नातळोनि दुजेपण एका जनार्दना शरण

धरोनि श्रोत्यांचे चरण पुढील अनुसंधान पावेल ॥७४॥

एका जनार्दन नांवें देख दों नांवीं स्वरूप एक

हें जाणे तो आवश्यक परम सुख स्वयें पावे ॥७५॥

एकाजनार्दना शरण त्याची कृपा परिपूर्ण

पंचाध्यायी निरूपण झाली संपूर्ण जनार्दनकृपा ॥५७६॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे वसुदेवनारदसंवादे एकाकार-टीकायां पंचमोऽध्यायः ॥५॥॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥