Saptpadi - 9 in Marathi Love Stories by Sangieta Devkar books and stories PDF | सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 9

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 9

हो ग मी थांबणार आहे तुझ्या सोबत मल्हार म्हणाला. विक्रांत ने सगळे प्रदर्शन बघितले सगळयांच्या कलाकृती बघितल्या. आता कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे बक्षीस समारंभ होता. सगळे जण तिथेच बाजूला असणाऱ्या हॉल मध्ये जमा झाले होते. कार्यक्रमाचे आयोजक,अजून काही मंडळी आणि विक्रांत स्टेजवर खुर्च्यावर बसले होते. आयोजक बोलत होते. सगळ्यांचे काम छान आहे पण तरी ही तीन नंबर आम्ही काढणार आहोत आणि त्यांना बक्षीस दिले जाईल. मग तीन नंबरचे नाव पाहिले जाहीर केले . त्यांनतर दोन नंबर . आता सर्वांना उत्सुकता होती की पहिला नंबर कोणत्या शिल्पा ला मिळाला असेल तसे आयोजकांनी संयोगीता निंबाळकर यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळत आहे असं जाहीर केले आणि टाळयांचा कडकडाट झाला.संयोगीता ला खूप आनंद झाला. संयु जा आणि बक्षीस घे मल्हार म्हणाला. संयु उठून स्टेज कडे आली आणि विक्रांत च्या हातून तिला प्रशस्तीपत्र आणि बक्षीस म्हणून एक ट्रॉफी मिळाली आणि काही रोख रक्कम ही. विक्रांत नेच हे तीन नंबर काढले होते. तो आता ही संयु कडे एकटक बघत होता त्याला संयु आवडली होती. थँक्यू सो मच सर तिच्या आवाजाने तो भानावर आला. वेलकम अँड कीप इट अप अस विक्रांत तिला म्हणाला. तिने हसून त्याच्या कडे बघितले आणि खाली आली. मग आयोजकांनी विक्रांत ला थोडं बोलण्याची विनंती केली. विक्रांत बोलायला उभा राहिला त्याचा आवाज एकदम भारदस्त होता. त्याच्या पर्सनॅलिटी ला सूट करत होता. संयु ही त्याच्या आवाजाने भारावून गेली. एका नजरेत कोणालाही आवडेल असाच विक्रांत होता. कार्यक्रम संपला. संयु मल्हार सोबत घरी निघाली. संयु चल आज माझ्या कडून तुला ट्रीट इतके मोठे यश तू मिळवलेस. बर जाऊयात मी आई ला कॉल करून ही आनंदाची बातमी देते संयु म्हणाली. मग दोघे एका हॉटेलमध्ये आले. मल्हार ते विक्रांत किती मस्त पर्सनॅलिटी आहे ना त्यांची. शोभतात ते टॉप बिझनेसमन हो ना? संयु त्याच्यात विशेष काय आहे माणसा सारखा माणूस आहे. तरी पण मल्हार त्यांच्या कडे बघितले की एक आकर्षण जाणवते. भावून जाते त्यांची पर्सनॅलिटी. संयु माझ्या समोर तू त्या विक्रांत ची तारीफ करतेस ? आय एम नॉट गुड? मी ही एका बिझनेस मन चा मुलगा आहे. हा मला सगळं माझ्या डॅडा मूळे मिळाले आणि त्या विक्रांत ने स्वतः कमवले इतकाच फरक आहे. मल्हार तसे नाही पण जे जाणवले ते बोलले सॉरी डियर बट आय ऑलवेज लव यु खुश संयु हसत म्हणाली. येस अँड आय अल्सो लव यु स्वीटी. अस म्हणत त्याने हलकेच संयु च्या गालावर किस केले. काय खाणार तू संयु त्याने विचारले.तुला हवे ते ऑर्डर कर संयु बोलली. मी ड्रिंक घेणार आहे तुझं काय? मल्हार ने विचारले. मला वोडका चालेल मागव आज मस्त सेलिब्रेशन करू. संयु बोलली. ओके म्हणत मल्हार ने स्वतः साठी बियर आणि संयु साठी वोडका ऑर्डर केली. मल्हार दिसायला हँडसम एकदम चॉकलेट हिरो , घारे डोळे,श्रीमंत बापाचा लाडावलेला मुलगा सगळी मौजमजा करणारा. संयु ला मात्र आपली प्रॉपर्टी समजणारा,तिच्या वर फक्त त्याचा हक्क अस माननारा. तो म्हणेल तेच तिने करायचे असा रुलर टाईप होता. संयु ला त्याचा स्वभाव माहीत होता पण त्याच्या या डॉमीनन्ट पध्दतीला ती त्याच प्रेम समजत होती. त्याच्या वर आंधळ्या सारख प्रेम करत होती. गेली दोन वर्षे ते एकत्र होते. संयु ला ड्रिंक ची सवय त्यानेच लावली होती. जेव्हा ती घरच्या कटकटींना वैतागून त्याला भेटायला यायची. दोघांचे ड्रिंक आले. इकडे कार मध्ये संदीप म्हणाला,काय विकी शेट संयोगीता निंबाळकर ला बघून विकेट उडाली वाटत? काही काय बोलतो सँडी अस काही नाही. हो का मग तिला अस एकटक बघत का होतास ? पण खरंच खूप सुंदर आहे संयोगीता ,कोणी ही पाहताक्षणी प्रेमात पडेल अशी. हम्म सँडी तस काही नाही . काही नाही म्हणजे तुला आवडली नाही का ती ? नसेल तर सांग मी ट्राय करतो मग. संदीप त्याची मजा घेत होता. सँडी हो मला आवडली ती हसत विक्रांत बोलला. ओहह सी युवर फेस मि. विक्रांत ब्लश करताय चक्क तुम्ही. संदीप जोर जोरात हसत म्हणाला. सँडी बास आता चल उगाच काही स्वप्न नको दाखवू जणू ती पुन्हा आपल्याला भेटणार आहे. देव जाणे विकी पण तुझ्या नशिबात ती असेल तर पुन्हा नक्की तुमची भेट होईल. संदीप म्हणाला. सँडी चल आज डिनर बाहेर करू विक्रांत म्हणाला. ओके चल म्हणत संदीप ने एका छान हॉटेलजवळ कार पार्क केली. तो पर्यंत विक्रांत ने विराज ला कॉल केला त्याला ही डिनर साठी बोलवले आम्ही वाट बघतो तू ये अस म्हणाला. विक्रांत ने संदीप ला विराज ही येत असल्याचे सांगितले. हे तिघे अगदी जिगरी यार होते सो शक्यतो पार्टी, डिनर काही असेल तर एकत्र असायचे. विराज दहा मिनिटात येतो म्हणाला. तो होता इन्स्पेक्टर मग त्याला कामातून या दोघांना भेटायला वेळ कमीच मिळायचा पण जेव्हा वेळ असेल तेव्हा आवर्जून यायचा. मस्त हॉटेल होते ते डेकोरेशन छान होत. प्रत्येक टेबलवर कँडल लावले होते. डीम लाईट लावले होते त्यामुळे तिथले वातावरण शान्त आणि रिल्याक्स फील देत होते. संदीप म्हणाला,विकी विराज येईपर्यंत ड्रिंक ऑर्डर करूयात का? हो सांग विकी बोलला. विक्रांत ड्रिंक करायचा पण एकदम लिमिटेड आणि हाय क्वालिटी ची ड्रिंक तो करायचा. संदीप ने ऑर्डर दिली. विक्रांत चे समोरच्या टेबलकडे सहज लक्ष गेले त्याने बघितले तर संयोगीता एका मुला सोबत बसली होती ते जेवण करत होते. सँडी संयोगीता तो म्हणाला. विकी लगेचच तुला तिची स्वप्न पण पडू लागली काय? अरे ते बघ समोर ती बसली आहे विकी बोलला. तसे संदीप ने पाहिले खरच संयोगीता तिथे होती. ती आणि मल्हार ज्या हॉटेलमध्ये आले होते तिथेच विक्रांत ही आला होता

क्रमश


Rate & Review

Be the first to write a Review!