Saptpadi - 4 books and stories free download online pdf in Marathi

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 4

मी ,विराज आहोत ना सोबत तुझ्या सगळ निट होईल.मग संदीप ने जबरदस्ती विक्रांत ला झोपवले.

संदीप ही आता विचारात पडला होता की संयोगीता ला लग्ना आधी चे सगळं आठवत होते पण लग्ना नंतरचे काहीच कसे आठवत नाही ? असे खरच झाले असेल तर विक्रांत कसा जगणार संयोगीता शिवाय ? आणि तिची मेमरी परत नाही आली तर काय? विक्रांत ला तर ही गोष्ट सहनच नाही होऊ शकणार खूप प्रेम करतो तो संयोगीता वर. त्याला तिच्या शिवाय जवळच आपलं अस कोणीच नाही . तो नालायक मल्हार मात्र संयोगीता च्या अजून लक्षात आहे . कसे होणार पुढे ? मी काय मदत करू शकतो विक्रांत ची. असा खूप विचार संदीप करत बसला होता. संध्याकाळी विराज विक्रांत ला भेटायला आला. विक्रांत ने विचारले ,विराज अपघाता बद्दल काही समजले का? नाही विक्रांत काहीच तस तू म्हणतो तस नाही घडलेलं. मुद्दाम कोणी तुझा अपघात नाही घडवून आणला. तुझ्या कार च्या मागे एक पाण्याचा टँकर होता. त्या टॅंकर चा ड्राइवर ड्रिंक करून टॅंकर चालवत होता सो तो स्पीडमध्ये चालवत होता त्यामुळे त्याला टँकर कंट्रोल नाही करता आला आणि पुढे तुझ्या कार ला येऊन धडकला. त्या ड्राइवर ला हाय वे पोलीसांनी अटक केली आहे तो ही सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. ओके विराज. विक्रांत वहिनी शुद्धीवर आल्या का? कशा आहेत त्या? विराज ने विचारले. विक्रांत ने मग संयोगीता च्या मेमरी लॉस बद्दल सांगितले. ओहह नो विक्रांत चल आपण वहिनी ना भेटून येऊ बघू मला तरी ओळखतात का चल म्हणत विराज विक्रांत आणि संदीप ला घेऊन संयोगीता च्या रूम मधये आले. संयोगीता उठून बसली होती नुकताच तिने चहा घेतला होता. वहिनी कशा आहात? विराज ने संयोगीता ला विचारले. मी ठीक आहे पण तुम्ही कोण? वहिनी मी तुमच्या नवऱ्याचा बेस्ट फ्रेंड इन्स्पेक्टर विराज नाही ओळखले का मला? नाही मला खरच आठवत नाही ओ काहीच. हे विक्रांत आणि माझी आई म्हणते की माझं लग्न झाले आहे या विक्रांत यांच्या सोबत . पण ते म्हणतात म्हणून मी विश्वास ठेवते की माझं लग्न झाले ही असेल पण मला थोडं तरी आठवायला नको का? मला या विक्रांत यांच्या सोबत चे कोणतेच क्षण आठवत नाहीत. मग मी कसा मान्य करू की माझं लग्न झाले आहे. माझं लग्न तर मल्हार सोबत ठरले होते. आमची एंगेजमेण्ट सुध्दा झाली होती. माझ्या बोटात मल्हार ने एंगेजमेण्ट रिंग ही घातली होती ती बहुतेक अँक्सीडेंट मध्ये हरवली असेल कारण आता माझ्या कडे ती रिंग नाही आहे. ओके वहिनी नका जास्त टेन्शन घेऊ. हळूहळू तुम्हाला सगळं आठवायला लागेल. विक्रांत तर आपल्या लाडक्या गितु ला लांबूनच बघू शकत होता ती त्याची बायको असून ही तो तिचा हात हातात घेऊ शकत नवहता. त्याला खूप वाईट होते. पण आता नियती ने मांडलेल्या खेळा पुढे कोणाचेच काही चालत नवहते. ते लोक बोलत असतानाच मल्हार तिथे आला.ओहह मल्हार कुठे होतास तू? माझा इतका मोठा अँक्सीडेंट झाला तरी तू मला भेटायला का नाही आलास. हो संयु तू शान्त हो आधी ,अग मी कामासाठी बाहेर गावी गेलो होतो जसे मला समजले तुझ्या अँक्सिडेंट बद्दल तसा थेट आता इकडे निघून आलो. तू बरी आहेस ना? हो मल्हार आता तू आलास ना मग मी लवकर बरी होईन. विक्रांत ला हे सगळं बघून भयानक राग येत होता. मल्हार त्याला त्याच्या नजरे समोर नको असायचा आणि आता तो चक्क माझ्या गितु सोबत होता. याला जनाची नाही पण निदान मनाची तरी लाज नसेल का? मल्हार हे सर्व जण बोलत आहेत की माझं या विक्रांत यांच्या सोबत लग्न झाले आहे म्हणून तू त्यांना सांग ना की आपलं लग्न होणार आहे संयोगीता म्हणाली. हो हो संयु तू नको काळजी करू मी सांगतो ओके तू पडून रहा आणि मी आहे इथेच. मल्हार बोलला. विक्रांत रूम च्या बाहेर निघून आला आपल्याच बायको ला तो अस दुसऱ्या सोबत आणि ते ही त्या नालायक मल्हार सोबत बघू शकत नवहता. संदीप ही बाहेर आला. विक्रांत मला समजते सगळं तुला काय वाटत असेल आता पण परिस्थितीच तशी आहे आपण काय करू शकतो. ते बोलत असतानाच कल्पना बाहेर आल्या. विक्रांत डॉक्टरांनीच सांगितले की मल्हार कोण त्याला बोलवून घ्या पण त्याला ही संयोगीता च्या तब्येती बद्दल सांगा . आता संयोगीता ज्या कंडिशन मध्ये तसच तिला राहू द्या कदाचित मल्हार सोबत राहून तिची मेमरी परत येऊ शकते. म्हणून मल्हार आला इथे आणि त्याला ही डॉक्टर तेच बोलले की संयोगीता ला जे वाटते तेच खरे आहे असं दाखवा . हो आई मी समजू शकतो. एव्हाना विराज ही बाहेर आला होता. विक्रांत तुम्ही काळजी नका करू सगळं नीट होईल. हो आई पण आता प्रश्न हा आहे की गितु तुमच्या कडे राहणार की माझ्या कडे? ऑफकोर्स आमच्या घरी राहणार जो पर्यंत तिची मेमरी परत येत नाही अचानक विलास संयोगीता चे बाबा तिथे आले. विक्रांत ला त्यांना बघून ही चेहऱ्यावर आठ्या पडल्या. तसे विराज ने त्याच्या खांद्यावर थोपटले. मल्हार ही बाहेर आला होता. त्याला बघून विक्रांत म्हणाला,मल्हार आता गितु ची कंडिशन बघता तुला इथे बोलवले आहे पण एक लक्षात ठेव गितु माझी बायको आहे तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल आणि कुठल्याही परिस्थितीत तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न पण करू नकोस तुला असाच अख्खा कापून टाकीन समजले. विक्रांत तू नको काळजी करू तो असे काही ही करणार नाही आणि काही केले तर मी आहे ना विराज ही बोलला. मल्हार शान्त पणे ऐकून घेत होता. त्याला माहित होते विक्रांत काय चीज आहे. पुण्यातील नामांकित टॉप टेन बिझनेस मेन पैकी विक्रांत एक होता त्याच्या कडे पॉवर ,पैसा सगळं होत त्याच्या मनात आले तर तो एका क्षणात मल्हार ला उध्वस्त करू शकला असता.

क्रमश.. आता विक्रांत काय करेल? मल्हार आणि संयोगिता ची एंगेजमेंट झाली होती मग त्याचे काय झाले. मल्हार सोबत संयोगिता ला विक्रांत बघू शकेल? पाहुया पुढील भागात तो पर्यंत वाचत रहा. हा भाग कसा वाटला नक़्क़ी सांगा