Saptpadi - 1 books and stories free download online pdf in Marathi

सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 1

हळूहळू विक्रांत ने आपले डोळे उघडले त्याच्या नाकात त्याला औषधाचा वास जाणवू लागला. डोकं जड झाले होते. उजवा हात बांधलेला जाणवत होता. त्याने पूर्ण डोळे उघडले पाहतो तर तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर होता. त्याने आपला उजवा हात उचलला पण त्याला प्लास्टर होते. मग डाव्या हाताने त्याने आपल्या डोक्याला स्पर्श केला तर डोक्याला बैंडेज होते. त्याला झटकन आठवले की त्याचा आणि गीतु चा एक्सीडेंट झाला होता तो ही हाय वे वर. जेव्हा ते दोघे त्यांची दूसरी मॅरेज एनिवर्सरी गोव्यात साजरी करून परत निघाले होते. त्यांच्या ध्यानिमनी नसताना अचानक एक टैंकर मागून येवून जोरात त्यांच्या कार ला धडकला होता. संयोगीता विक्रांत ची बायको तिने नेमका सीट बेल्ट लावला नव्हता. कार ला धड़क बसली आणि संयोगीता जोरात बाहेर फेकली गेली. गीतु ची आठवण येताच (विक्रांत तिला प्रेमाने गीतु म्हणायचा) विक्रांत बेड वरुन उठला . अहो मिस्टर विक्रांत कुठे निघालात रूम मध्ये येणाऱ्या नर्स ने त्याला आवाज दिला. नर्स माझी वाईफ़ कुठे आहे संयोगीता नाव तीच. मि.विक्रांत तुमची वाईफ आय सी यू मध्ये आहे. नर्स ती बरी आहे ना? मी बघू शकतो का तिला प्लीज. नर्स ला माहित होते की संयोगीता ची कंडीशन क्रिटीकल आहे सध्या ती अंडर ऑब्झरवेशन होती. ओके मि. विक्रांत तुम्ही फ़क्त त्यांना बाहेरुन बघू शकता. ठीक आहे तो म्हणाला. अरे विकी का उठलास तू? संदीप त्याचा मित्र आत येत म्हणाला त्याच्या हातातील फळे,औषधे त्याने बाजुच्या टेबलवर ठेवली. सैंडी मला गीतु ला बघायचे आहे. चल म्हणत संदीप ने त्याला आधार देत उभे केले हळू हळू चालत ते दोघे आय सी यू कड़े आले.विक्रांत ने बाहेरुनच आत बघितले संयोगीता शांत झोपुन होती. तिच्या नाकात ,तोंडात नळया घातल्या होत्या. सलाईन ही चालू होते. डोक्याला मोठे बैंडेज होते. तिला या अवस्थेत बघुन विक्रांत च्या डोळ्यात पाणी आले. विक्रांत नका काळजी करू संयु बरी होईल मागून संयु ची आई त्याला म्हणत होती. त्याने वळून पाहिले. गीतु ची आई कल्पना होती. हो आई गीतु बरी व्हायला हवी तिच्या शिवाय मी जगूच नाही शकणार. हैल्लो मि. विक्रांत हॉउ यू फील नॉउ? गीतु चे वडील विलास तिथे आले होते. त्यांना बघुन विक्रांत ला ख़ुप राग आला होता पण आता ही वेळ नव्हती काही बोलायची सो तो फ़क्त ठीक आहे बोलला. विकी चल रूम कड़े जावूयात म्हणत संदीप त्याला घेवून निघाला.विकी तुझी ही तब्येत अजुन बरी नाही आहे उगाच स्ट्रेस घेवू नकोस. पण सैंडी माझी गीतु बरी होईल ना रे? तिला अस नाही बघू शकत मी. हो विकी काळजी नको करू ती ही लवकरच बरी होईल. डॉक्टर रूम मध्ये आले. मि. विक्रांत काळजी नका करू लवकर तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. डॉक्टर पन माझी वाईफ़ कशी आहे? तिला जास्त लागले तर नाही ना? मि. विक्रांत तुम्हाला तुमच्या वाईफ़ बद्दल सगळ समजन गरजेचे आहे त्यांना डोक्याला जबरदस्त मार बसला आहे. त्यांचे ऑपरेशन सुद्धा झाले आहे पन अजुन ही त्यांची कंडीशन म्हणावी तितकी ठीक नाही . म्हणजे काय डॉक्टर काही प्रोब्लेम आहे का? डॉक्टरांना मध्येच टोकत विक्रांत बोलला. तुमच्या मिसेस ना 72 तास अंडर ऑब्झरवेशन साठी ठेवले आहे. या वेळेत त्या शुद्धिवर आल्या तर ठीक नाहीतर काही सांगु शकत नाही. नो डॉक्टर कीती ही पैसा लागला तरी मी देइन पण प्लीज सेव हर लाइफ प्लीज ,विक्रांत अक्षरशः हात जोडत म्हणाला. डॉक्टरांना ही त्याच्या भावना समजत होत्या पण संयोगीता ची कंडीशनच क्रिटीकल झाली होती त्याला डॉक्टर तरी काय करणार होते. मि. विक्रांत असे निराश नका होऊ वुई विल ट्राय आवर बेस्ट. डॉक्टर काही ही करा पण माझ्या वाईफ़ ला वाचवा. नक़्क़ी म्हणत डॉक्टर त्याला चेक करून निघुन गेले. विकी अरे तुच असा डेस्परेट झालास तर संयोगीता कड़े कोण लक्ष देणार सैंडी गीतु माझ जग आहे रे आय कान्ट लिव्ह विदाउट हर. मला माहित नाही का विकी डोन्ट वरि सगळ नीट होईल. तू आता आराम कर आणि मी आहे इथेच काही लागले तर सांग मला. सैंडी तू थोड़ा वेळ जा घरी रमेश ला सांग इथे थांबायला. राहु दे विकी मी थाम्बतो थोड़ा वेळ. रमेश ऑफिस मध्ये गेला आहे तिकडे पण लक्ष द्यायला हवे . ओके पण एक सांग सैंडी तो गीतु चा बाप तो कशाला आला आहे इथे ? लाज नाही वाटत का त्याला हरामखोर काय तोंड घेवून आला आहे इथे. विकी आता ही वेळ आहे का हे बोलण्याची? जावू दे सोड तुला आरामाची गरज आहे. शांत रहा. मग नर्स ने येऊन त्याला मेडिसिन दिले आणि झोपायला सांगितले.
संदीप ने रमेश ला जो विक्रांत चा पी ए होता त्याला कामा बाबत काही सूचना दिल्या. संदीप आणि विक्रांत एकत्र काम करत होते पार्टनरशिप होती त्यांची. कंस्ट्रक्शन चे काम करत होते . विक्रांत आर्किटेक्ट होता आणि संदीप त्याचा जिवलग मित्र तो इंजीनियर होता. विक्रांत अनाथ मुलगा होता. अनाथश्रमात राहुन त्याने शिक्षण पुर्ण केले होते. मुळातच तो हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला होता. अभ्यासात कमालीचा हुशार त्यामुळे कधी ही तो मागे नाही राहिला. कायम यश आणि यश च त्याला मिळत गेले. तो राहत असलेल्या आश्रमचे जे ट्रस्टी होते त्यांनी विक्रांत ची हुशारी ओळखली होती म्हणुनच त्यांनी त्याला उच्च शिक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. पुण्यात त्याने आर्किटेक्चर चे शिक्षण पुर्ण केले त्यानंतर त्याला मास्टर्स करण्या साठी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली लंडन ला जावून त्याने आर्किटेक्चर मध्ये मास्टर्स केले होते.दोन वर्ष तो लंडन मध्ये होता त्यानन्तर भारतात परत आला होता. त्याला तिथे ही ख़ुप चांगल्या संधी आणि भरपूर पगारा ची नोकरी मिळत होती पण विक्रांत ला आपली मायभूमि प्रिय होती. ज्या अनाथ मुलाला ज्या शहरा ने आपले मानले त्याला वाढवले ते शहर त्याला ख़ुप प्रिय होते. तिथेच काम करून आपल्या सारख्या अनाथ मुलांना शिक्षण द्यायचे हे त्याचे ध्येय होते.

क्रमश