Sparshbandh? - 1 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 1

"बाबा...आज पण तू लेट येणार का...???" एक 4 वर्षाची मुलगी.. आपल्या बोबड्या भाषेत तिच्या बाबाला म्हणाली...!!


जाणार तो...जागीच थांबला तिचा ' बाबा ' तो पाठी वळला....!! आणि गुडघ्या वर बसतं तिचे इवलेसे हात हातात घेत तिला म्हणाला...." नो बेबी....आज मी नक्कीच लवकर येणार...आणि तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार..." तो विश्वासाने म्हणाला...


तशी ती खुश होत त्याला बिलगली.. " प्रॉमिश बाबा? " ती तिचा छोटा हात पुढे करत त्याला म्हणाली.... तस त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवतं तिला म्हणाला...


"बेबी आय प्रॉमिस... मी नक्कीच लवकर येईल..."तो तिच्या गालावर किस करत म्हणाला... तशी ती खुदकन गालात हसली आणि त्याच्या गालावर किस दिली....


"बाय बाय बाबा.... लवकर ये" ती छोटी मुलगी त्याला म्हणाली..


तो पण मग आपलं ब्लेझर चढवत झपझप आपली पावल टाकत बाहेर निघाला....!!


ती 4 वर्षाची मुलगी तो गेल्या त्या वाटेने नाराज होत पाहत होती...


तिथून गीता आली... 'तिची आया '.... " मीरा बेबी चला आपण नाश्ता करूया.. तुम्हाला भूक लागली असेल ना???" गीताने मीराला विचारलं....


तशी मीरा टुनकन उडी मारत "हो." म्हणाली...गीताने तिला कडेवर घेतल आणि डायनिंग टेबल कडे गेली....तिला चीज सॅन्डविच दिले....तशी ती खुश होत खाऊ लागली.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

एक मुलगा केबिनच्या दारावर टकटक करतो....


आतून आवाज येतो....."come in"


तो मुलगा त्याच्यासमोर फोन धरतो...


"बॉस घरून मॅमचा फोन आहे." तो मुलगा त्याला फोन देत म्हणतो.


" हा बोल ना आई..." तो फोन कानाला लावत म्हणतो.

"
किती वाजले ते बघितलं का??" त्याची आई जरा रागवत म्हणाली.


"का काय झालाय??" तो जरा वैतागत म्हणाला.


"तुझ्या मुलीने पूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे." त्याची आई जरा चिडत म्हणाली.


" का??" तो जरा न कळून बोलला.


" जर वचन पाळता येत नसतील तर देऊ नये... आणि वेळ पाळता येत नसेल तर मुळीच वेळ देऊ नये." त्याची आई रागवत म्हणाली.


वेळ म्हणल्या क्षणी त्याने घड्याळात पाहिलं.... संध्याकाळचे पाच वाजले होते.


" येतो मी घरी." म्हणून त्याने फोन कट केला आणि तो फोन त्याने त्याच्यासमोर उभ्या असणाऱ्या त्याच्या सेक्रेटरीकडे रागाने फेकला.... त्याने बिचाऱ्याने कसाबसा तो झेलला.


रागातच त्याच्या खुर्चीतून उठून त्याने ब्लेझर अंगावर चढवत तो त्याच्या सेक्रेटरीशी बोलायला लागला.


" मला किती वाजले ते सांगता येत नाही का आदित्य तुला??...मी तुला सकाळीच सांगितल होत की मला आज लवकर घरी जायचं आहे तरीही तू मला आठवण नाही करून दिली.... तुम्हा लोकांना कामाचा पगार देतो ना मी?? मग माझं साध एक काम नाही करता येत??" तो त्याच्या सेक्रेटरीवर म्हणजेच आदित्यवर चिडत म्हणाला.


" बॉस पण...." आदित्य काही बोलायचा प्रयत्न करणार तेवढ्यात परत तो बोलला.


" तुझ पण बिण काही नकोय... कॅन्सल ऑल माय रिमेनिंग मीटिंग्स." तो हे म्हणत त्याची दमदार पावल टाकत त्याच्या केबिनमधून बाहेर पडला.


बाहेर त्याची गाडी उभीच होती ' पॉर्शे '..... तो ऑफिसच्या
बाहेर आल्याक्षणी ड्रायव्हरने गाडीच दार उघडलं.... त्याने ब्लेझर ची खालची दोन बटन्स काढत तो गाडीत बसला.... ड्रायव्हरने लगेच दरवाजा बंद केला आणि ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडी सुरू केली.


" घरी घ्या." तो फोनमध्ये बघतच म्हणाला.


थोड्याच वेळात ते घरी पोहचतात..... लगेच ड्रायव्हर त्याच्या साईडच दार उघडतो.... तो त्याच्या ब्लेझर काढत एका हातावर घेतो आणि ड्रायव्हरच्या दिशेने मान हलवतो.... तो घरात जातो... गेल्यागेल्या त्याच्या पायाशी एक टेडीबिअर येऊन पडतो.... तो त्याच्या उजव्या भुवाईच्या वर अंगठा चोळत खाली एका गुडघ्यावर बसतो आणि तो टेडीबिअर उचलतो.... उठून तिथंच सोफ्यावर त्याचं ब्लेझर ठेवतो आणि टेडीबिअर घेऊन मीराच्या बेडरूमपाशी जातो.


" जा...मला नाही बोलायचं तुझ्याशी." आतून मीरा रडत त्याला बोलते.


" डॅडा इज सॉरी.... कामात होता ना डॅडा म्हणून उशिर झाला." तो मीराच्या समोर गुढग्यावर बसत म्हणाला.


" पण तू प्रोमिश केलं होतं की लवकर येऊन मला फिरायला घेऊन जाणार." मीरा तिचं नाक वर ओढत म्हणाली जे की रडून रडून लाल झाल होत.


" सॉरी.... रडू नको.... तुला माहितीये ना मला तू रडलेली अजिबात आवडत नाही." तो तिचे डोळे पुसत म्हणाला.... मीराने फक्त मान हलवली.


" चल....आपण जाऊ फिरायला... एवढा छान ड्रेस घातला की नाही माझ्या प्रिन्सेसने ??.... किती सुंदर दिसत आहे माझी प्रिन्सेस." तो तिचा टेडीबिअर बेडवर ठेवून तिला कडेवर उचलत म्हणाला..... टिश्यू पेपर ने तिचे गाल पुसत तो तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन आला.


तोच आई सोफ्यावर बसत त्याला ऐकू जाईल अस बोलू लागली... " डोक्याला नुसता ताप आहे, सकाळ पासून आधीच डोकं दुखतय त्यातं ही पोरगी रडून रडून जीव काढतेय....कोणाची आहे काही माहीती नाही .... कोणाची औलाद आणून ठेवली आहे ह्या घरात....ही कार्टी आल्यापासुन माझ्या घराला जणू ग्रहणच लागलं आहे '
आई टोमणा मारतं म्हणाली....आता त्याच्या रागाला सीमाच न्हवती उरली....!!


त्याने कपाळावर अंगठा घासत मीरा कडे नजर टाकतली....त्याने गीताला बोलावून मीरालां बाहेर जाऊन गाडीत बसविण्यास सांगितले आणि त्याच्या आई कडे वळला...तोपर्यंत घरातले सर्वचजण खाली आलेच होते.....!!

त्याने सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकला आणि आई कडे पाहत सगळ्यांना उद्देशून म्हणाला." जर कोणाला मीराचा त्रास होत असेल तर हया घराचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत आणि ह्यावेळेस मी शेवटचं सांगतोय पुढच्यावेळी हात धरुन घराबाहेर काढायलाही मागे पुढे बघणार नाही. " तो थंड नजरेने पाहत पण कठोर शब्दात म्हणाला.

सगळ्यांना त्याच्या बोलण्याने धक्काचं बसला,"आणि राहिली कोणाची औलाद तर मीरा माझाच अंश आहे, हे मला कोणाला दाखवून द्यायची गरज नाही....इतकच डोकं दुखत होत तर डॉक्टर कडे जावून चेक अप करून या...." असं बोलत तो झपाझप पावलं टाकतं बाहेर निघाला.


" अहो बघितलं का!, कसा बोलतोय स्वतः च्या जन्मदात्या आईला घरातून हाकलून देतोय... हे देवा रें देवा कोणत्या जन्मीच्या पापांची शिक्षा तू मला अशी देतोय... " त्या आपले डोळे पुसत रूम च्या दिशेने जात म्हणाल्या.


सगळे हाताश होऊन दोघांच्या जाणाऱ्या दिशेने पाहत राहिले.

तो गाडीत मागे मीरापाशी बसला आणि ड्रायव्हरला गाडी समुद्राकडे न्यायला सांगितली.

" डॅडा आज्जीला मी आवडत नाही ना." मीरा त्याच्या बोटाशी खेळत लहान तोंड करत म्हणाली.


" आज्जीला बर नाहीये ना म्हणून ती अशी वागत होती." तो मीराला समजावत म्हणाला.


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

एक मुलगी समुद्राच्या वाळूवर शून्यात नजर लाऊन बसली होती.... डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले होते.... सकाळपासून तिच्या आयुष्यात काय काय घडल तेच तिला सारख आठवत होत...


"तुम्हाला आता आम्ही नाही ठेऊ शकत इथे.... प्लिज इथे साईन करा आणि दुसरीकडे जॉब शोधा." मॅनेजर तिला म्हणतो.


" प्लिज अस करू नका.... इथून पुढे नाही होणार उशिर मला.... माझ्या भावाला दवाखन्यात घेऊन गेले होते म्हणून उशिर झाला मला सर..... प्लिज शेवटची संधी दया." ती अक्षरशः रडतरडत त्याला विनवणी करत होती.


"सॉरी.... पण आता काहीच नाही होऊ शकत." मॅनेजर तिला म्हणाला..... तिने तिच्या डोळ्यातलं पाणी अडवत साईन केली आणि तिची पर्स घेऊन त्या ऑफिस मधून बाहेर पडली.... ती सरळ समुद्रावर येऊन थांबली... तिचा भाऊ आणि हा समुद्र दोघच तिला होते जे तिला जवळचे होते.... तिच्या भावाचा विचार करून परत तिचे डोळे भरून आले आणि नाही म्हणलं तरी आता तिच्या डोळ्यातून तिचे अश्रू तिच्या गालावर ओघळू लागले.... तिने तिचे पाय दुमडून घेतले आणि हाताने जवळ घेऊन डोक खाली घालून तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

त्यांची गाडी थांबल्यावर त्याने मीराला खाली उतरवल तिने लगेच त्याचं बोटं पकडलं आणि त्याला ओढतच ती समुद्रापाशी घेउन गेली..... संध्याकाळी हया वेळेस कोणी जास्त नव्ह्ते समुद्रावर .... मोजकेच लोकहोती पणती यांच्यापासून बरीच लांब होती..... त्याने एकदा सगळीकडे नजर टाकली.....मीरा समुद्राकडे टक लाऊन पाहत होति पण तिच्या डोळ्यातील चमक तिच्या चेहर्यावर पण दिसत होती.... ती टाळ्या वाजवत उड्या मारायला लागली....


"मीरा बेबी हळू..." तो तिला पडेल म्हणून हळू सांगत होता.


मीराच लक्ष तेव्हाच तिथेच त्यांच्यापासून थोड लांब कोणीतरी रडत बसल आहे असं दिसल..... ती लगेच त्या दिशेने धावत गेली.


"बेबी हळू.... तिकडे नको जाऊ... मीरा थांब..." म्हणत तो ही तीच्यामागे गेला.


" आंटी तुम्ही का रडत आहात??" मीरा तिला हात लावत बोलली.


लहान मुलीच्या आवाजाने तिने वर तोंड करुन पाहिलं.... खूप लहान छोटीशी मुलगी तिच्यासमोर होती....चबी गाल.... मऊसर केस त्याच केसांचे दोन छोटे छोटे पोनी....गोरा वर्ण.... क्यूट निळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता.... खूप क्यूट दिसत होती ती लहान मुलगी..... ती मीराच निरीक्षण करेपर्यंत तो तिथे पोहोचला.


" मीरू मी किती वेळा सांगितल आहे असं पळायचं नाही म्हणून..... कुठे अडकून पडली असतीस म्हणजे??" तो मीराला थोड रागवत म्हणाला.


मीराच्या समोर असणाऱ्या त्या मुलीने आवाज कुठून आला म्हणून मीराच्या मागे डोक थोड वर करुन पाहिलं आणि त्याच क्षणी त्यानेदेखील तीच्याकडे पाहिलं....तेच डोळे.... तोच चेहरा.... तो तिच्याकडेच पाहत राहिला.... जणू त्याला धक्का बसला होता आणि ती ही त्याच्याकडे पाहत होती.... पण तिच्या डोळ्यात ती शॉक झाली आहे असे कुठलेच भाव नव्हते पण काहीतरी होत पण काय होत ते??


क्रमशः


त्याला... भेटलेली ती कोण?? आणि मिरा कोणाची मुलगी??? घरचे का तिच्याशि असे वागत आहेत..?? माझा आणि माझ्या मत्रिणीं ने ही स्टोरी लिहिली आहे, तर पहिला भाग कसा वाटला.. हे नक्कि कळवा.. कंमेंट करा.. 💞