Sparshbandh? - 6 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 6

डॅडा."

तिच्या कापऱ्या आणि लहान,रडवेला आवाज पाहून त्याच लक्ष तीच्याकडे गेलं....ती कोणत्याही क्षणी रडून देइल इतके मीराचे डोळे काठोकाठ भरले होते... त्याने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि मीराला उचलून मांडीवर घेतल.

" सॉरी प्रिन्सेस.... डॅडाने तुला घाबरवल ना...परत नाही होणार अस कधी." विराज तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला.

" तूझ्या डोल्यांमुळे मी घाबरले." मीरा थोडी मुसमुसत म्हणाली.

" सॉरी प्रिन्सेस." विराज म्हणाला.

"इट्स ओके." मीरा म्हणाली.

मीरा लगेच त्याला बिलगली आणि स्वतःच तोंड त्याचा मानेत लपवून घेतल.... विराजही मायेने तिच्या पाठीवर थोपटत राहिला.

ट्रॅफिक कमी झाल तस त्यांचीही गाडी पुढे निघून गेली आणि मिष्टीचीही....

.
पण मनात विचार आला कि आपण तिच्याबद्दल असा कसा विचार करू शकतो इतक हि कळेना ना आपल्याला..आपलं फक्त एकाच मुलीवर प्रेम होत आणी कायम तिच्यावरच राहील..

असा विचार करत विराज मनाचे विचार थांबवत म्हणाला....!!



2 महिन्यानंतर.....
.


ऑफिस मध्ये ती आता चांगलीच रूळली होती...!! या वेळेत विराज ला हि तिचा विसर पडला होता..

इथे मिष्टी तिच्या ऑफिस मध्ये काम करत होती.... तोच पियुन तिच्याकडे एक निरोप घेऊन आला कि तिला सरांनी बोलावलं आहे...!! ती ओके बोलत आपलं काम आवरून निघाली...


" may i coming sir... " मिष्टी ने दरवाजा थोडा नॉक करत विचारलं......

" yesss " परांजपे सर.....


मिष्टी आत आली.... परांजपे सरांनी तिला सर्व सांगितलं..... आपल्याला आता एका मोठ्या प्रोजेक्ट वर काम करायचं आहे...... आणी तो प्रोजेक्ट आपल्यालाच मिळाला पाहिजे.... म्हणुन त्यांनी मिष्टी ला.... प्रेझेंटेशन बनवायला सांगितलं, मिष्टी तर आधी घाबरलीच.... कारण आत्ताच नवीन होती आणी.. त्यात इतक मोठं काम जमेल का...? पण सरांनी तिला समजावलं.... आणी प्रेझेंटेशन ची जबाबदारी मिष्टी वर सोपावली.......

आणी हो...... यात तुझी मदत माझा मुलगा " अविनाश " सुद्धा करेल......

" ओके सर... " मिष्टी स्मित हास्य करत बाहेर गेली......

.
.

.
.

" बॉस कॉन्फरन्स रूम तयार आहे..... ज्यांनी ज्यांनी टेंडर भरले होते ते सर्वजण प्रेझेंटेशन साठी आले आहेत." आदित्य विराजला माहिती देत म्हणाला.

" ओके..... लेट्स गो." विराज त्याच्या खुर्चीवरून उठत ब्लेझरची बटण लावत म्हणाला.

दोघेही कॉन्फरन्स रूमच्या दारापाशी पोहोचले..... दार उघडणार तेवढ्यात मागून आवाज आला....

" सॉरी सॉरी सर..... उशीर झाला मला यायला.... खरच सॉरी सर....." एक मुलगी पळत पळत आल्यामुळे धापा टाकत बोलली.

" इट्स ओके मिष्टी....आणि तसही अजून मीटिंग सुरू नाही झालिये.... चल आत जाऊ." तिच्यासमोर उभा असलेला मुलगा तिला म्हणाला.

" येस सर.... आफ्टर यू." मिष्टी हसत म्हणाली.... ते दोघेही दुसऱ्या दारातून आत निघून गेले.

ह्या दोघांचं चाललेलं हे संभाषण विराज आणि आदित्य ऐकत होते..... तिचं त्या मुलाशी हसत खेळत बोलण ऐकून नकळत विराजच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या आणि राग आल्यामुळे त्याच्या कपाळावरील एक नस देखील फुगली होती..... आदित्य विराजकडे थोड घाबरून पाहत होता.

" सर..... तुम्ही ठीक आहात ना?" आदित्यने थोड घाबरतच विचारलं.

विराजने दीर्घ श्वास घेत स्वतःचा राग शांत केला आणि मानेनेच आदित्यला हो उत्तर दिले......आदित्यने लगेच कॉन्फरन्स रूमच दार उघडलं.....विराज आत आला..... तो आत येताच सर्वजण उभे राहिले..... विराज मेन चेअरवर जाऊन बसला.....सगळे देखील बसले.....सगळ्या कंपनी एकएक करून आपापले प्रेझेंटेशन देत होत्या.... विराज आणि सगळे बोर्ड डायरेक्टर्स सगळी प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहत होते..... आता मिष्टी ज्या कंपनी काम करत असते त्यांची पुढची बारी येणारं असते.... ती सगळ परत एकदा लॅपटॉप वर चेक करत असते.....

" मिष्टी महत्वाचा कॉल आहे.... मी आलोच दोन मिनिटात." अविनाश (तिच्याबरोबर आलेला मुलगा तिला म्हणाला.)

" अविनाश सर.... आपल्याला आता प्रेसेंट करायचं आहे." मिष्टी त्याला थांबवत म्हणाली.

" अग तूझ्या मेन बॉस म्हणजेच बाबांचा कॉल आहे मीटिंग बद्दल त्यांना डाऊट आहे.... मी येतोच दोन मिनिटात तो सांगून." अविनाश तिला सांगून बाहेर गेला.

त्याला बाहेर जाऊन पाच मिनिट होऊन गेली तरी तो परत आला नाही.... आता त्यांच्या कंपनीच नाव घेण्यात आल....ती नाव घेताच उभी राहिली.... विराजने तीच्याकडे पाहिलं आणि ती एकदा दाराकडे आणि एकदा जिथे प्रेसेंट करायचं तिथे आळीपाळीने बघत होती.... त्यांनी तिला प्रेझेंटेशन करण्यास विनंती केली.... तिने लॅपटॉप घेतला आणि पुढे आली.... सगळ कनेक्ट केलं आणि प्रेझेंटेशनची फाईल चालू केली.... मिष्टीने एकदा दाराकडे विराजस आला आहे की नाही हे पाहिलं तरीही तो नव्हता आला मग तिनेच प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली.....मिष्टी अगदी फुल्ल कॉन्फिडन्सने प्रेसेंट करत होती..... तीनेच हे प्रेझेंटेशन करण्यास अविनाश मदत केली होती म्हणून तिला सगळ माहिती होत....

विराज तिलाच पाहण्यात गुंग होता.... तिचे हावभाव, चेहऱ्यावरील चमक, डोळयात करारीपणा आणि ओठांवरील नितळ हास्य सगळच त्याच्या मायारा सारखं होत पण ही मिष्टी होती..... ज्या व्यक्तीच्या आठवणी गेले महिनाभर तो विसरण्याचा प्रयत्न करत होता आज त्याच व्यक्तीच्या हुबेहूब रूप त्याला समोर दिसत होत.... आणि त्यात तिचा फॉर्मल आऊटफिट तिच्या दिसण्यात अजून भर टाकत होता.... टाळ्यांच्या आवाजाने तो त्याच्या विचारांमधून बाहेर आला....तिचं प्रेझेंटेशन झाल होत.... तिने लॅपटॉप बंद केला आणि सगळ्यांना हसून धन्यवाद म्हणाली.... सर्वांना थोडावेळ वाट बघण्यास सांगून सगळे बोर्ड डायरेक्टर्स आणि विराज मिळून चर्चा करण्यासाठी दुसऱ्या मीटिंग रूममध्ये गेले.... सर्वांच मत मिष्टी काम करत असलेल्या कंपनीला म्हणजेच '. ' ह्या कंपनीला देण्याचा निर्णय झाला..... मिष्टीच्या प्रेझेंटेशनने सर्वांवर छाप सोडली होती..... विराज नाही हो करत तयार झाला....


कॉन्फरन्स रूम:

" ह्या कंपनीला हे प्रोजेक्ट देण्यात आलेले आहे..... प्लिज ह्या कंपनीचे रिप्रेसेंटेटीव्हज् ने पुढे यावे..... अविनाश थोडा पुढे आला...

" मिष्टी अग चल ना तू पण.... तूच तर एवढं छान प्रेसेंट केलं आहेस." अविनाश म्हणाला.

" नाही सर.... तुम्हीच जा.... मी फक्त प्रेसेंट केल आहे." मिष्टी म्हणाली.

"अग चल ग." अविनाश तिच्या हाताला धरून घेउन जात म्हणाला..... आणि तिच्या हाताला त्याचा स्पर्श होताच विराजने पाहिलं आणि त्याच्या मनात एक इन्सेक्युर फिलिंग आली.... थोडा राग आणि थोडी जेलसी सगळच त्या फिलिंग मध्ये होत..... त्याने प्रोफेशनल चेहरा ठेवतच त्यांच्याकडे पाहत होता.... मिष्टी आणि अविनाश दोघेही त्यांच्या समोर आले.....सगळ्यांनी त्यांना अभिनंदन केलं.

" अभिनंदन." विराज अविनाश समोर हात करत म्हणाला.

अविनाशने देखील त्याच्या हातात हात मिळवला.... अविनाश त्याचा हात सोडवून घेणार पण विराजने तो हात घट्ट पकडून ठेवला होता..... ह्याक्षणी तिला स्पर्श केलेला हात उपटून टाकावा अशी तीव्र इच्छा विराजला होत होती....शेवटी त्याने त्याचा राग गिळून त्याचा हात सोडला.

" तुम्हाला हा प्रोजेक्ट मिळाला आहे पण आमची एकच अट आहे की ह्या प्रोजेक्टवर मिस.मिष्टी देसाई काम करतील." बोर्ड डायरेक्टर पैकी एकजण म्हणाले.....सगळ्यांनी त्याच्यात होकार दर्शवला.

अविनाशने एकदा मिष्टी कडे पाहिलं आणि हसून म्हणाला,"नक्कीच."

"बट सर...." मिष्टी म्हणाली.

" आपण नंतर बोलू मिष्टी." अविनाश तिच वाक्य तोडत म्हणाला.

" मग ठरल तर..... उद्या ऑफिस मध्ये येऊन बाकीचे डॉक्युमेंट्स भरुन सुरुवात करुयात कामाला..... उद्याचं रुल्स अँड रेगुलेशन्स पण डिसकस करूयात." विराज म्हणाला.

" हो." अविनाश म्हणाला... आणी मिष्टी ला घेऊन कॉन्फरन्स रूम च्या बाहेर पडला...

" हा आता... बोल मिष्टी काही प्रॉब्लेम??" अविनाश तिला काळजीने विचारत म्हणाला.

" सर..... पण मला या प्रोजेक्ट वर काम करायला नाही जमणार. " मिष्टी म्हणाली.

" पण का?? " अविनाश थोडं चकित होत म्हणाला......

" सर मला......हे काम जमेल की नाही माहित नाही, आणी हा प्रोजेक्ट सरांसाठी खूप इम्पॉर्टन्ट आहे.... मला नाही वाटतं मला जमेल." मिष्टी. म्हणाली.

" हे बघ मिष्टी तू उगाच इतकी टेन्स होत आहेस....मी आहेच की सोबत तुझ्या..... " अविनाश तीचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.....

" जसं आपण प्रेझेंटेशन वर काम केल तसच आपण या प्रोजेक्ट वर सुद्धा काम करूया." अविनाश तिला समजावत म्हणाला......

आणी त्याने पकडलेला हात नकळत मिष्टी ने घट्ट केला.....!! आणी हे विराज त्याच्या केबिनच्या विंडो मधून पाहत होता......!! नकळत त्याच्या मनात विचार आला जर त्याने मिष्टीला रिजेक्ट केली नसत तर आज ती त्याच्या बरोबर असती....... असं त्याच्या मनात विचार चमकून गेला....पण काय करणार....तिचा चेहरा मायरा सारखा होता......मग मिष्टीचे विचार येणारच मध्ये..........

त्याने मनात एक विचार पक्का केला आणी आदित्यला बोलवून त्याने कामाला लावल....

" इथे दुसऱ्या दिवशी मिष्टीला समजल कि तिला विराजच्या कंपनी मध्ये जावून काम करायचं आहे....ते पण प्रोजेक्ट संपेपर्यंत...... तिच्याबरोबर अजून 5 जण तिथे काम करणार होते." तिला जरा रागच आला कारण त्याच कंपनीने तिला रिजेक्ट केल आणी त्याच ऑफिस मध्ये जाऊनं काम करायचं.......

नकळत ऑकवर्ड नेस आला होता......आता मोठी कंपनी आहे मग नक्कीच त्यांच्या कंपनीला शोभेल असे कपडे घालावे लागतील.....

एक तर त्या कंपनी मध्ये कुर्ते , ड्रेस चालत न्हवते...मग शर्ट आणी जीन्स घालावीच लागेल किंवा फॉर्मल कपडे.....

मिष्टी सकाळ सकाळी एका बाजूला गाणी लावत ती हळूच गुणगुणच स्वतःच आवरत होती...







व्हाइट शर्ट आणी खाली ब्लॅक पॅन्ट तिने घातली होती... थोडासा हलकासा मेकअप केला......



रंग हे नवे नवे
दुनिया है नयी नयी
Mornings are just magical
शामें भी हैं सुरमई
दिल में जैसे तितलियों के

सैंकड़ों हैं पर लगे
हंसते हंसते ख़्वाब से जैसे कोई जगे
गाठ जाई बांधली
तरी कुठे दिेसे न दोर
This is not only a crush
I guess it’s something more

ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती
रंग हे नवे नवे
दुनिया है नयी नयी
Mornings are just magical


पायात ब्लॅक थोडेसे हिल असणारे बूट तिने घातली , कानात टॉप्स घातले केसांची हाय पोनि बांधली आणी स्वतः ला एकदा आरशात पाहत ती निघाली......


तिने ऑफिस मध्ये एंट्री केली..... ( मी असं म्हणार नाही कि सगळे मिष्टी कडे पाहत राहिले.... 🤭 कारण तिच्याहून सुंदर मुली आहेत ऑफिस मध्ये.... 😌 )


तिने Receptionist वर चौकशी केली.... विराज च्या PA ने तिला आत घेण्याची परमिशन दिली.......


मग आदित्यने तिला त्यांचा ऑफिस दाखवला...... कारण ती 3 महिने इथेच काम करणार होती आणी तिला जाणून घेणं गरजेचं होत.....

त्यातच तिचा अर्धा दिवस गेला....प्रोजेक्ट वर काय काम करायचं आहे तिला हे समजावून सांगितल.... अविनाश अधून मधून ह्या ऑफिसला येणार होता..... आज तो उशिरा येणार होता....


तिला एक वेगळा डेस्क दिला होता....!! ती पण बाकीच्या एम्प्लॉयी बरोबरच बसायची.....


तिला तीच काम अगदी व्यवस्थित सांगण्यात आलं होत....विराजला तिला असं फॉर्मल look मध्ये बघायला भारी वाटल..... तिला अस बघून त्याच्या डोळ्यासमोरून मागचचे मायरा बरोबरचे क्षण तरळून गेले...... विराजने आपले मन कामात गुंतवले पण शेवटी मन ते आठवणींमध्ये हरवून जाण्यात माहीर असतच..... त्याने सगळे विचार मनातून काढून टाकले.


अविनाश दुपारनंतर ऑफिसमध्ये आला..... त्याच्यासाठी एक केबिन दिली होती.... त्याने आल्या आल्या मिष्टीला बोलावून घेतलं.... विराजने तिला जाताना त्याच्या केबिन मधून पाहिलं होत.... त्याला बाहेरचं अगदी व्यवस्थित दिसायचं पण बाहेरच्या माणसाला आतल काहीच दिसायच नाही.....


संध्याकाळचे 6 वाजले होते..... तरीही मिष्टी अजून अविनाशच्या केबिन मधून बाहेर नव्हती आली..... विराजच कितीही केलं तरी तिच्या डेस्ककडे लक्ष जातच होत.....ऑफिस टायमिंग संपल होत.....विराज उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा..... थोड्याचवेळात मिष्टी परत तिच्या डेस्कवर परत आली आणि तिने तिचा pc ऑन केला.... ऑफिस मध्ये जवळजवळ सगळेच निघून गेले होते.... जे राहिले होते ते पण निघायच्या तयारीत होते.... तरीही अजून ती कामातच होती.... अविनाश देखील निघाला होता....


अविनाशने जाता जाता मिष्टीला सांगून गेला....7 वाजायला आले होते तरीही ती अजून कामच करत होती.....


"पहिल्याच दिवशी एवढ्यावेळ थांबून कोण काम करत??" विराज मिष्टीकडे बघत म्हणाला..... विराजने थोड वैतागतच घडयाळ पाहिलं 7 वाजून 5 मिनिटे झाली होती..... त्याने परत एकदा तिच्याकडे पाहिलं... मिष्टीने तिचा डेस्क आवरला होता आणि ती निघाली होती..... ती जाताना बघून विराजनेही त्याचा लॅपटॉप बंद केला आणि तो बॅगमध्ये टाकून त्याने ब्लेझर अंगावर चढवल आणि त्याच्या केबिन लॉक करून बाहेर पडला.


क्रमशः.........





************************