Sparshbandh? - 5 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 5

' येस... कम इन.' आतून तिला आत येण्याची परवानगी मिळाली.



आत 5 जण समोर बसले होते....



' प्लिज टेक अ सीट.' त्यातला एक व्यक्ती तिला म्हणाला.



तिने सगळ्यांकडे बघून एकदा आत्मविश्वासाने स्माइल केली ...त्यातले 4 जण तीच्याकडे पाहत होते तर एक जण लॅपटॉपवर काम करत होते..... ती त्यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.



' युअर नेम?' 4 जणांपैकी एकाने तिला विचारलं.



' मिष्टी देसाई.' मिष्टी हसून म्हणाली.



तीच नाव ऐकताच लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीची बोट टायपिंग करायची थांबली आणि त्या व्यक्तीने वर पाहिलं.... मिष्टिने पण त्याचवेळी त्या व्यक्तीकडे पाहिलं.... दोघांचीही नजरानजर झाली.... दोघांसाठी तो क्षण तिथेच थांबला होता जणू....



' हे तर.....त्यादिवशी बीच वर दिसले होते....ओह माय गॉड.... मग हे आपलं इंटरव्ह्यू घेणार का..??? '' मिष्टी गोंधळात पडली......



पण आपण कुठे आहोत हे लक्षात येता ती भानावर आली आणी तिने नजर चोरली....


मग तिची फाईल वाचून त्यांनी त्याप्रमाणे प्रश्न विचारायला सुरुवात केली....मिष्टीही सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे नीट देत होती... तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात बघत ती उत्तर देत होती.....एक प्रकारचा आत्मविश्वास तिच्यात आला होता.... आणि विराज.....विराज तर तिलाच न्याहाळत होता....!!


आणी फायनली तिचा इंटरव्यू व्यवस्तिथ पार पडला... आणी तिच्याकडून फॉर्म भरून घेतला..... ते तिला नंतर कळवतील..असं म्हणाले तस मिष्टी पण निघाली.

" प्लिझ..... हा जॉब मिळू देत....देवा या पुढे काही मागणार नाही तुझ्याकडे.... " मिष्टी वरती पाहत मनातल्या मनात हात जोडत म्हणाली...

नकळत बोलताना डोळ्यातून पाणी आलच होत.. आणि हेच विराज मागून पाहत होता.....!! तिलाच शोधत तो आला होता....आणी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याच्या मनात चलबिचल झाली....!!

तो पुन्हा आपल्या ऑफिस मध्ये जायला वळला....मिष्टी पण रिक्षा पकडून घरी आली.....येता येता दोन तीन भाज्या पण घेऊन आली...!!

घरी येऊन काही काम न्हवत म्हणुन मिष्टी तशीच आराम करायला निघून जाते....


6 च्या दरम्यान ती उठते, दिवा बत्ती करून.... ती जेवण बनवायला घेते...

तोच रुद्रांश येतो....


" ताई अग उद्या मला..500 रुपये देशील का..?? मित्रांसोबत मी.. बाहेर जाणार आहे, प्लिझ नाही नको ना म्हणू " रुद्रांश तिला लाडीगोडी लावत म्हणाला...

" रुद्र अरे इतके पैसे...500 नाही मी.. फक्त 100 च देईल " मिष्टी त्याला रागवत म्हणाली...


" यार ताई...100 ने काय होत..500 दे ना.... " रुद्रांश पण थोडं चिडून म्हणाला....


" हे बघ....रुद्र एकतर माझा जॉब गेलाय....घरातला खर्च, तुझी कॉलेज फि, क्लासेसच्या फिझ... अजून बरच काही ऍड होत...आपण ज्या परिस्थिती आहोत ती एक्सेप्ट कर.... मी असं नाही म्हणत आहे कि.. तू तुझी कॉलेज लाईफ एन्जॉय नको करु, कर पण त्याला काही मर्यादा असतात.....आज तू इतके पैसे मागितले.... मी दिले ही असते...पण दरवेळी तू असच वागत राहिलास तर कस होईल...???? मला तुला मोठं होताना पाहायचं आहे रुद्र तुझ्याशिवाय माझं आहेच कोण...?? " मिष्टी त्याला समजावात म्हणाली..तिच्या डोळ्यात हलक पाणी सुद्धा होत....

रुद्र ला कसतरीच झालं... त्याने लगेच तिला मिठी मारली " सॉरी ताई.... मी अजिबात या पुढे हट्ट नाही करणार... सॉरी " रुद्र....

" इट्स ओके... पण हे लास्ट नंतर जर असं केलसं तर फटकेच खाशील.... " मिष्टी आपला मूड ठीक करत त्याला म्हणाली....

त्यावर रुद्र पण खुश झाला.......... त्याने पण त्याच्या ताई ला कामात थोडी मदत केली.....


इथे....मिष्टी गेल्यानंतर विराज सोबत बाकीचे 4 जण डिसकस करत होते.....त्यांना मिष्टीच सिलेक्शन करूया असं म्हणाले तस विराज म्हणाला..

" नो.... तिला रिजेक्ट करा.... " विराज म्हणाला तस त्यातला एक व्यक्ती त्याला म्हणाला....

" बट सर... शी इज व्हेरी टॅलेंटेड गर्ल, इनफॅक्ट तिने सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे एकदम....करेक्ट दिली आहेत..."

" मी.. एकदा सांगितल आहे पुन्हा पुन्हा नाही सांगणार.... " विराज तिथून उठत म्हणाला.......

मग नंतर कोणी जास्त काही म्हंटल नाही.....!!! जर ती मायरा नाही तर तिला आपल्या ऑफिस मध्ये ठेऊन तरी काय करायचं..?? फक्त दिसायला तिच्यासारखीच आहे....

विराज विचार करत म्हणाला.....!! त्याने तिचा विचार सोडून दिला..... आज पहिल्यांदा त्याच्याकडून पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र झाल होत.

इथे मिष्टीला..... रिजेक्ट केल्यामुळे थोडं वाईट वाटल... तिला मेल आला तसा.... आपण इतका काय घाण इंटरव्यू दिला यार??



मग मिष्टीने थोडा विचार करुन तिची फ्रेंड " निता " ला कॉल करत होती कि तिचाच कॉल आला..... मिष्टीने मग खुश होतच कॉल उचलला....

" हेय....मिष्टी विसरलीस ना....?? कुठे होतीस इतके दिवस... ऑनलाईन पण नाही येत तू?? " नीता....


" अग हो....मला बोलू तर दे.... " मिष्टी

" बर बोल..... तुला जॉब मिळाला का..??? " नीता

" तेच तर... अजून दुसरा जॉब मिळालाच नाही....अजून किती दिवस मी अशीच घरी राहू??? " मिष्टी दुःखी होता म्हणाली.....

" हेय... डोन्ट बी सॅड मिठू , माझ्या कंपनी मध्ये एक वेकेन्सी आहे आणी तुला पाहिजे तसाच जॉब आहे तुझ्या फिल्ड रिलेटेड.... आणी पगार पण खूप आहे इफ यू डोन्ट माईंड तू आमच्या ऑफिसमध्ये येऊ शकतेस.... जर तुझी इच्छा असेल तर..... " नीता थोडं विचार करत म्हणाली.....


त्यावर मिष्टी लगेच म्हणाली.. " खरंच... थँक्स नितू तू विचारून पहा ना तुझ्या सरांना... सध्या मला खूप जास्त गरज आहे..... " मिष्टी

" मी.....तुझा रिझ्युम देते सरांना, मग ते शॉर्ट लिस्ट चेक करतील आणी मग तुला इंटरव्यूला बोलावतील...... " निता....


" बर ठीक आहे.... थँक्स नितू तुझी खूप जास्त हेल्प झाली.... " मिष्टी....

" अग थँक्स काय... तू माझी फ्रेंड आहेस इतक तर करूच शकते मी..... " नीता...


दोघी अजून थोड्यावेळ बोलत होत्या....मग मिष्टी ने कॉल ठेवून दिला.....

थोड्याच दिवसांत मिष्टीला नीताच्या कंपनीमधून जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला बोलावले गेले.... मिष्टी चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू देउन तिथे नोकरीला देखील लागली..... ती कंपनी 'जहागीरदार इंडस्ट्रीज' एवढी मोठी नक्किच नव्हती पण अगदी नवीन आणि लहान देखील नव्हती....मिष्टीला तिच्या आधीच्या जॉबपेक्षा इथे नक्कीच चांगला पगार होता....

इथल्या नवीन जॉबमध्ये ती आता रुळली होती.... आणि विराज त्याच्या कंपनी मध्ये व्यस्त होता....विराजच्या मनातील मिष्टीचे विचार देखील काळानुसार मागे सारले गेले होते.... दोघेही आपापल्या वैयक्तिक जीवनात आणि कर्तव्य पूर्ण करण्यात गुंतले होते....


*****************************


" रुद्र हा तुझा डबा आणि हा नाष्टा...."मिष्टी रुद्र समोर पोह्याची प्लेट आणि त्याचा डबा ठेवत म्हणाली.

" थँक्यू ताई." रुद्र नाष्टा करत म्हणाला.

"रुद्र ऐक ना मला प्लिज आज ऑफिसला सोड ना.... आज उठायला उशीर झाला त्यामूळे आवरायला उशीर झाला.... प्लिज आज सोड ना मला." मिष्टी म्हणाली.

" हो.... सोडतो ताई." रुद्र होकारार्थी मान हलवत म्हणाला.

दोघेही नाष्टा करून,घर बंद करून बाहेर पडले.... नेहमीप्रमाणे मुंबईत ट्रॅफिक होतच.

" आय एम ऑन माय वे आदित्य.... प्लिज पोस्टफोन द मीटिंग." विराज वैतागत गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत आदित्य म्हणजेच त्याच्या सेक्रेटरीला फोनवर म्हणाला.

" ओके बॉस." आदित्य म्हणाला आणि फोन ठेवला.

" डॅडा अजून किती वेळ लागणार आहे??" मीरा जी त्याच्याशेजारी बाहेर बघत बसली होती तिने विचारलं.

" अजून थोडावेळ प्रिन्सेस.... ड्रायव्हर काका लवकरच आपल्याला स्कूलपाशी सोडतील." विराज मीराला म्हणाला.

" ओके." मीरा परत खिडकीतून बाहेर बघत म्हणाली.... विराज लॅपटॉपवर काम करण्यात मग्न झाला.

थोड्यावेळाने मीराने परत विराजला हाक मारली.... विराजने तीच्याकडे पाहिलं.

" डॅडा ती त्यादिवशीची बीचवरची आंटी बघ." मीरा बाहेर बोट दाखवत म्हणाली.....

विराजने त्याची नजर मीरा जिथे दाखवत आहे त्यादिशेने बाहेर वळवली..... तर बाहेर मिष्टी बाइकवर मागे बसली होती.... तिचा एक हात रुद्रांशच्या खांद्यावर होता.... ती सारखी घड्याळात आणि पुढे ट्रॅफिककडे आळीपाळीने बघत होती..... तिच्या चेहऱ्यावरून ती किती वैतागली आहे हे स्पष्ट दिसत होत..... त्यात चेहऱ्यावर काही तिच्या चुकार बटांना ती सारखी कानामागे सारत होती पण त्या बटा सारख्या तिच्या चेहऱ्यावर येत होत्या.... विराजला दोन मिनिट तिच्या त्या बटांना हळूवार कानामागे सारावं आणि तिच्या कानाची मखमली पाकळी ओठात घ्यावी अस वाटून गेल.....तो स्वतःच्याच विचारावर चमकला.... त्याने परत एकदा तीच्याकडे पाहिलं पण तिचा हात त्या मुलाच्या खांद्यावर होता.... त्याला त्या मुलाचा राग आणि हेवा दोन्ही जबरदस्त वाटतं होता.... हेवा वाटत होता कारण त्या क्षणी त्या मुलाच्या जागी तो असता तर म्हणून आणि राग कारण तिने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला
.....असा कसा ती कोणत्याही मुलाच्या खांद्यावर हात ठेवू शकते म्हणून....

त्याने त्याच विचारात त्या मुलाकडे रागाने भरलेल्या डोळ्याने पाहिले.....आणि त्याच्या डोळ्यातला राग मीराने पाहिला.... ते छोटंसं लहान पिल्लू त्याचे डोळे बघून घाबरून गेलं तरीही तिने खूप हिम्मत करून अगदी लहान आवजात त्याला हाक मारली.

" डॅडा."

तिच्या कापऱ्या आणि लहान,रडवेला आवाज पाहून त्याच लक्ष तीच्याकडे गेलं.... ती कोणत्याही क्षणी रडून देइल इतके मीराचे डोळे काठोकाठ भरले होते... त्याने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि मीराला उचलून मांडीवर घेतल.

" सॉरी प्रिन्सेस.... डॅडाने तुला घाबरवल ना...परत नाही होणार अस कधी." विराज तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला.

" तूझ्या डोल्यांमुळे मी घाबरले." मीरा थोडी मुसमुसत म्हणाली.

" सॉरी प्रिन्सेस." विराज म्हणाला.

"इट्स ओके." मीरा म्हणाली.

मीरा लगेच त्याला बिलगली आणि स्वतःच तोंड त्याचा मानेत लपवून घेतल.... विराजही मायेने तिच्या पाठीवर थोपटत राहिला.

ट्रॅफिक कमी झाल तस त्यांचीही गाडी पुढे निघून गेली आणि मिष्टीचीही....


क्रमशः......





*****************************


Share

NEW REALESED