Sparshbandh? - 9 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 9

कम इन." आतून विराजने काम करता करताच उत्तर दिलं....

मिष्टीने त्याच्या समोर ती फाइल ठेवली आणि तशीच उभी राहिली...... इतक्या वेळ काहीच कोणी बोललं नाही म्हणून विराजने त्याच लॅपटॉप मधून म्हणजेच कामातून डोक वर काढल 🤭 आणि त्याच्या डेस्क समोर उभ्या असणाऱ्या मिष्टीकडे पाहिलं......

ती खाली पाहून आपल्या बोटांशी चाळे करत होती..... पण त्यावरून तिला काहितरी बोलायचं आहे हे त्याला कळलं..... हॉस्पिटल नंतर पहिल्यांदा आज तिला तो निरखून अगदी जवळून पाहत होता.....साधा ब्लॅक कुर्ता आणि रेड लेगिंस तिने घातली होती.....सिंपल बट elegent दिसत होती ती......

" काही बोलायचं आहे का ??" शेवटी ती काही बोलत नाही म्हणून विराजनेच बोलायला सुरुवात केली.

" हो....तुम्हाला thank you म्हणायचं होत.....ते त्या दिवशी मला वाचवून तुम्ही मला हॉस्पिटल मध्ये नेल त्याबद्दल खरच मनापासून Thank you." मिष्टी म्हणाली.

" माझ्या ऑफीस मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणं माझं कर्तव्यच आहे..... पण मी तुमचं thank you नाही स्वीकारू शकत...." विराज तीच्याकडे बघत म्हणाला आणि हे वाक्य ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तिच्या इंनोसन्स वर मनातल्या मनातच हसत होता.....

" का नाही स्वीकारू शकत??" मिष्टीने न कळून त्याला विराजला विचारलं......

" नाही करू शकत एकदा सांगितल ना." विराज तिच्यावरून लक्ष हटवत फाईल मध्ये बघत बोलला.

"अहो मी पण तुम्हाला तेच विचारते आहे....का नाही स्वीकारू शकत?" मिष्टी पण नाक फुगवून म्हणाली.

" मिष्टी माझी मर्जी....आता तुम्ही काम करणार आहात का??कारण मला टाइमपास करणाऱ्या लोकांना पैसे द्यायला माझे पैसे वर आलेले नाहीयेत.आणि हो लंच ब्रेक व्हायच्या आधी मला ती फाईल पूर्ण करून हवी आहे...." विराज मनातल्या मनात तिच्यावर हसत म्हणाला पण बाहेरून त्याने nutral चेहरा ठेवत बोलला.

मिष्टी त्याच्या कडे एक नजर टाकत धाडकन दरवाजा लावून त्याच्या केबिनच्या बाहेर आली ....दरवाज्याच्या आवाज आल्याने सगळे तिच्याकडेच बघत होते आतून विराज पण तीच्याकडे बघू लागला आणि तिच्या क्यूट पणा वर हसत होता.

" अम्.....ते चुकून दरवाजा आपटला गेला.... सॉरी." म्हणत मिष्टी तिच्या डेस्क पाशी गेली.

तिचा pc on केला पण मनात विराजलाच बोलत होती.

" कोण समजतात कोण स्वतःला हे?? मदत केली म्हणून मी त्यांना थँक यू म्हणायला गेले तर म्हणतात की की मी स्वीकारू नाहीत..... एखाद्याने भाव खावा पण किती खावा ह्याला पण एक मर्यादा असते.....जाऊदेत मी आपल thank you म्हणायचं काम केलं त्यांनी स्वीकारो अथवा न स्वीकारो मला काय त्याच्याशी??..... पण अस कसं ना??.....त्यांनी स्वीकारायला पाहिजे ना ह्यात भाव खाण्यासारख काय आहे??.....ahhh किती अकडू आहेत ते..... पण मी का त्यांचा एवढं विचार करत आहे....."

पुढे अजून काही विचार करणार तेवढ्यात तिची कुर्ती कोणीतरी ओढत असल्यासारखं तिला जाणवलं आणि मिष्टी भानावर आली.....तिने खाली बघितल तर एक छोटीशी गोड, दोन क्यूटसे पोनी घातलेली मुलगी तीच्याकडे हसत खिदळत बघत होती....त्यात छोट्याशा लाल रंगाच्या फ्रॉक मध्ये ती अजूनच गोड दिसत होती......तिला पाहून तिच्या गालाचा पापा घ्यावा आणि तिला घट्ट कवटाळून घ्यावं असं मिष्टीला वाटल.....

पण तिला कुठेतरी पाहायला सारखं जाणवत होत.... पण नक्की कुठे ते आठवत नव्हत??

मिष्टी तिला काही विचारणार तेवढ्यात मागून आवाज आला.....

" मीरा बेबी.....किती पळता तुम्ही??.....दोन मिनिट काही स्थिर धरवत नाही ना तुम्हाला??" ती बाई थोड्याशा धापा टाकत म्हणाली.


" गीता आंती तुम्ही खूप श्लो श्लो येत होतात मनून मी पतकन आले." मीरा तोंडावर हात ठेवत हसत म्हणाली.


" मीरा किती गोड नाव आहे ना ??कुठेतरी ऐकल आहे हे नाव मी.... " मिष्टीच्या डोक्यात अचानक एक विचार आला.

"विराज सर...... हो....beach वर तेव्हा मीराच माझ्याजवळ आली होती......" थोड डोक्यावर जोर दिल्यावर तिला मीराला पहिल्यांदा भेटलेलो आठवलं.

किती छोटीशी पण आपलेपणाची भेट होती ना ती.

छोटीशी आहे ती मीरा पण किती लाघवी आणि निरागस आहे....त्यादिवशी मी रडत असताना आपुलकीने माझे डोळे पुसून मला समजावलं.

मिष्टी मीराकडे बघत म्हणाली.....डोळ्यात हलकस पाणी तरळतच होत.

" मीच हळू चालते.......मीरा बेबी आपण विराज बाबांना भेटायचं आहे ना??" गीता थोडीशी हसत मिष्टीकडे बघत म्हणाली.

" हो.....डॅडाला भेटायचं आहे." मीरा उड्या मारत एक्साईट होत म्हणाली

पण उड्या मारता मारता तिचा पाय जोरात सटकला.....मीरा जोरात खाली आपटणार तेवढ्यात मिष्टिने तिला पकडल आणि आपल्या कुशीत घेतल.....तिला पडताना पाहून गीता पण घाबरून ओरडली......

"मीरा बेबीssssss" गीता ओरडली.

मिष्टी तर सुन्न झाली होती.....ते छोटस लेकरू आता पडल असत म्हणजे??ह्याचा विचार करूनच तिचा थरकाप उडाला.....दोन मिनिट मिष्टीला आपल्या आजूबाजूच जग थांबतय की काय असं वाटून गेलं.

मीरा घाबरून मुसमुसायला लागली.....तिने लगेच आपला चेहरा अजून मिष्टीच्या कुशीत खुपसला आणि तिला घट्ट पकडुन ठेवल..... मीरा थोडीशी थरथरत होती.

आजूबाजूचे सगळे employees त्यांच्याकडेच पाहत होते..... विराजने एवढा आवाज का येत आहे म्हणून पटकन बाहेर बघायला आला तर मीराचा पाय सटकून ती खाली पडताना दिसली.

त्याला तर तीला हाक मारायच पण सुचलं नाही.....थिजून गेला होता तो त्याच जागी.....त्याच हृदय भीतीने जोरजोरात धडधडत होत....त्याला त्याक्षणी काय करावं काहीच उमजत नव्हत......तिच्या मुसमुसण्याच्या आवाजाने तो भानावर आला.

मिष्टीच्या कुशीत तिला सुरक्षित पाहून त्याला हायस वाटल नाहीतर त्याच हृदय त्याच्यापासून कोणीतरी काढून घेतय की काय असं काहीसं फील झाल त्याला त्या काही सेकंदात.

विराज लगेच त्यांच्यापाशी आला तर मिष्टी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती.....


" मीरू काही नाही झालय....शांत हो बघू....brave आहे ना माझ बाळ??.... हं.....शांत हो....नाही रडायचं आपण.... शहाणं ना माझ ते पिल्लू??" मिष्टी तिला प्रेमाने गोंजारत म्हणाली.


मीराला रडताना पाहून डोळ्यात तर तिच्याही पाणी आल होत पण आपणही रडलो तर मीरा अजूनच जास्त रडेल म्हणून मिष्टीने तसेच तिचे अश्रू रोखून ठेवले..

मिष्टी च्या समजावण्याने मीरा रडायची शांत झाली , मीरा ने हळूच तिच्याकडे पाहिल आणि छानशी स्माईल दिली.....

मिष्टी काही बोलणारच कि तिथे विराज पटकन आला आणि त्याने पटकन मीराला उचलल......

"प्रिन्सेस तू इथे का आलीस बर??? आणि जरा हळू चालत जा , आता पडली असतीस." विराज अजूनही थोड्या काळजीत म्हणाला.

"डॅडा मला तुला भेटायचं होतं.... मनून मी आले , ई गीता खूप स्लो स्लो येत होती...." मीरा त्याच्या कुशीतून त्याच्याकडे वर बघत छोटूस तोंड करून म्हणाली...🙁🙁

"बर ठीक आहे , चलं माझ्या केबिन मध्ये जावून बसुया आपण......" विराज तिला परत एकदा कवटाळत म्हणाला.

"हो." मिरा खुश होत म्हणाली.

गीताने तिकडच्या पियुनकडे मीराच सगळं सामान दिल आणि निघून गेली....

विराज आणि मीरा दोघेसुद्धा गेले.... मिष्टी तशीच दोघांकडे पाहत राहिली....

तिला फक्त एकच आठवत होतं मीरा विराजला 'डॅडा' बोलली ते.....

पण लगेच भानावर येत तिने स्वतःला सावरलं आणि आपल्या जागेवर जावून काम करू लागली..... तोपर्यंत बाकी सगळे जण पण आपापल्या कामाला परत लागले होते.


थोड्यावेळाने लंच ब्रेक झाला तस मीराला आठवलं कि विराजने तिला ती फाईल लंच ब्रेकच्या आधी पूर्ण करून मागितली होती.....

" शीट....माझ काम अजून झालंच नाही आणि तसही इतक्या लवकर थोडी होतं लगेच कंप्लिट करून.... असूदे मी नंतरच देईल..... सांगेल काहीतरी कारण.... " असं बोलत मिष्टी बाकीच्यांन सोबत लंचला गेली....


मिष्टी पण त्यांच्यात लवकर मिसळली होती.... तशीही ती आधीपासून बोलकीच होती त्यामुळे लगेच मिसळून जायची.

सगळ्या मुलींचा आता विराज वरून विषय चालू होता....

" ए विराज सरांना मुलगी पण आहे?? म्हणजे त्यांचं लग्न पण झालं असेल ना....??" सृष्टी म्हणाली.

"मुलगी आहे म्हणजे लग्न पण झालंच असणार ना...?? ईडीयट सारखे प्रश्न नको करुस...." पूजा म्हणाली.


दोघी भांडत होत्या आणि बाकी सगळे एन्जॉय करत होते....... तोच मिष्टी म्हणाली...

" मला नाही वाटत विराज सरांच लग्न झालं असेल......" मिष्टी बोलून गेली.

ती थोडा विचार करत बसली..... तस पूजा म्हणाली...

'आधीच त्यांच्या वर लाईन मारणाऱ्या मुलींची कमी नाही..... सगळा लेडीज स्टाफ फिदा आहे त्याच्यावर त्यात तू शेवटची अशील..."त्यांच्या वर लाईन मारून ते तुम्हाला पटणार नाही आहेत ते कुठे तुम्ही कुठे..... हह"" पूजा थोडस खोचकपणे म्हणाली.

"ए पन लाईन मारायला काय जात... 😫" सृष्टी म्हणाली.

" तू तर गप्पच बस बाई..." पूजा सृष्टीला थांबवत म्हणाली.

" ए पण मी असं कुठे म्हंटल कि मला ते आवडतात म्हणून.... दिसायला आहेत भारी पण मला ते आवडत नाहीत.... पण काहीही असो मला त्यांची मुलगी खूप आवडते....." मिष्टी विराजच्या केबिनच्या दिशेने पाहत म्हणाली...


....
........


मीराने ती फाईल पटापट कंप्लिट केली आणि विराजच्या केबिन जवळ गेली आणि नॉक केल.....


" yes....come in" विराज......


मिष्टी आत आली आणि विराजच्या टेबल वर ती फाईल ठेवून दिली आणि आजूबाजूला पाहिले... तर तिला मीरा दिसली नाही.....

ती सगळ्या केबिन भर नजर फिरवत होती...!! विराज तिच्याकडेच पाहत होता.... ती नक्की शोधतेय तरी काय?? 😑


त्याने ती पाहतेय त्या दिशेने पाहिले ती पाठी झोपलेल्या मीरा कडे पाहत होती.....!!

" तर मिस मिष्टी..." विराज तिचं लक्ष स्वतः वर वळवत म्हणाला.

तस मिष्टीने पटकन विराज कडे पाहिले...

मिष्टी...."हो....."

विराज तिच्या वर आपली नजर रोखत म्हणाला...." मी तुम्हाला लंच ब्रेकच्या आधी द्यायला सांगितलं होतं...आता तर ऑफिस संपत आलं आहे अल्मोस्ट "

" अ... ते माझं झालं न्हवत म्हणून मी आता दिल आहे...." मिष्टी म्हणाली.

"हम्म ठीक आहे तुम्ही जाऊ शकता....फक्त पुढच्या वेळेपासून वेळेत काम पूर्ण केलं तर जास्त आवडेल." विराज....


मिष्टी त्याच्याकडे एक नजर आणि मीरा कडे पाहून मग निघून गेली....!!


....
.........


मिष्टी जेवण बनवत असताना विचार करत होती " खरंच विराज सरांच लग्न झाल आहे का..??? आणि मग नाही झालं तर मग ती मुलगी कोणाची आहे जी त्यांना डॅडा बोलते.... "

मिष्टीच विचार करण काय थांबत नाही कि इथे विराजची आई त्याच्या मागे लागली होती........!!"बाळा लग्नाचं मनावर घे आता तरी....." आई

विराज वैतागत म्हणाला....." आई .... परत तेच.......कितीवेळा सांगू तुला मी आता??"

आई पण थोडी आवाज चढवत म्हणाली. " मग काय....... कधी पर्यंत टाळणार आहे तू ...... 29 वय चालू आहे तुझं...."


"बरोबर बोलत आहात सरकार , विराज बाळा अजून किती टाळणार तू लग्न??" बाबा मागून येत विराजला म्हणाले.

विराज......"बाबा तुम्ही पण??"

बाबा त्याला थांबवत म्हणाले,"यापुढे काही ऐकायचं नाही आम्हाला......मान्य आहे तुम्ही मीरासाठी लग्न नाही करत आहात , पण तिला ही आईची गरज असणारच ना...???"


आई बाबांच्या बोलण्यात होकार दर्शवत म्हणाली," हम्म ते ही आहेच.....नंतर ती मोठी झाली कि काय सांगणार तू?? कोण होती आई तिची...."


विराज त्यांच्याकडे बघत म्हणाला,"ते नंतरच नंतर बघून घेऊ.....आणि तसही मी आणि माझी प्रिन्सेस एकमेकांसाठी पुरेसे आहोत."


आई आता निर्णय देत म्हणाली,"मला काही माहित नाही विराज तुझं लग्न मी लावूनच राहणार तू बघच....."


विराज......"तुम्हाला जे करायचं ते करा..... पण यात माझी प्रिन्सेस मध्ये येता कामा नये आणि मुलगी अशीच बघा जी कमीतकमी माझ्या मीराला थोड तरी प्रेम देऊ शकेल.....!!"


असं बोलुन विराज त्याच्या रूम मध्ये निघून गेला...!!
.....
.........
हर शाम आँखों पर, तेरा आँचल लहराए
हर रात यादों की, बारात ले आए ❤

मैं सांस लेता हूँ, तेरी खुशबू आती है
एक महका महका सा, पैगाम लाती है ❤

मेरे दिल कि धड़कन भी, तेरे गीत गाती है
पल पल दिल के पास, तुम रहती हो.... ❤

विराज आज शांतपणे जुनी गाणी ऐकत त्याच्या रूमच्या बाल्कनी मध्ये बसला होता.....आत्ताच त्याने मीराला तिच्या रूम मध्ये झोपवून आपल्या खोलीत आला होता....

आज माहिती नाही का पण त्याला आधिसारख गाणी ऐकत शांत बसावस वाटल होत त्यामुळे आज तो खूप दिवसांनी गाणी लावून शांत विचार करत बसला होता.

डोळे मिटून तो सोफ्याला टेकून बसला....आणि डोळे बंद केल्यावर मिष्टीचा चेहरा समोर आला.

विराजने आज मिष्टीच्या डोळ्यात मीरा साठीची काळजी पाहिली होती......!!

मीराला पडताना पाहून त्याच्याबरोबर मिष्टिचे पण हावभाव त्याने टिपले होते ......तिच्या वागण्यातून काळजी स्पष्ट दिसून येत होती.

'मीरासाठी मिष्टी शिवाय कोणतीच मुलगी परफेक्ट नसू शकते.....!!'असा विचार विराजच्या मनात चमकून गेला......

"अनोळखी मुलगी आणण्यापेक्षा त्यातल्या त्यात ओळखीची मुलगी आणेलेली मुलगी कधीही चांगलच."विराज मनातल्या मनातच विचारात गुंतला होता.


" मला फक्त मीरा साठी तिची आई आणि घरातल्यांसाठी सून आणायची आहे.......आणि माझ्यासाठी....??????? ह्ह माझ्यासाठी मिराची आईच....तीच्यानंतर माझ्या हृदयात कोणीही नाही....माझ्या हृदयात फक्त आणि फक्त तिच आणि शेवटपर्यंत तिचं असेल.... फक्त आणि फक्त माझी मायारा."विराज.....


विराजने मिष्टीचा चेहरा पुन्हा एकदा आठवला... असं indirectly तर लग्नाची मागणी तर नाही घालू शकत.....त्यासाठी तिला मीराच्या अजून क्लोज जावं लागेल......

"तिला प्रिन्सेस ची किती काळजी आहे ते जाणून घ्यावं लागेल."


पण त्याला त्याच्या आयुष्यात नियतीने काय लिहून ठेवलं आहे कुठे माहिती होत??....त्याने केलेला निर्धार जसाचतसा राहू शकेल का??की त्याच्या हृदयात मिष्टी आपली जागा निर्माण करू शकेल?


क्रमशः...


Share

NEW REALESED