Sparshbandh? - 11 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 11

प्रत्येक वाक्याबरोबर त्याला ' तिची ' आठवण येत होती.


त्याने तर तिच्यावर जिवापाड प्रेम केलं होत ना.....त्याच्या
जिवापेक्षा त्याने तिला जपल होत पण तिने.....


गाण्याच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या हृदयावर वार होत होते पण त्याला आता त्यांची सवय होती......कारण जखम ही तशीच होती.


विराजने पटकन त्याच्या डोळयात आलेलं पाणी पटकन पुसून टाकल...... तेवढ्यात मिष्टीने ही ते पाहिलं होत पण त्याच्या डोळ्यात पाहून तिच्या हृदयात कळ उठली.


गाण संपल्यासंपल्या त्याने fm बंद केला.....ह्यावेळी तिनेही त्याला अडवल नाही.


थोड्याच वेळात त्याने त्याची गाडी थांबवली आणि बाहेर येत मिष्टीच्या साईडच डोअर ओपन केलं.


मिष्टी बाहेर आली आणि समोर बघतच राहिली.


समोर मोठ्या अक्षरात भल्यामोठ्या गेटवर ' गोकुळ आश्रम ' अस लिहिलं होत.


" Let's go." विराज तीच्याकडे बघून पुढे बघत बोलला.


तरीही तिने काहीच हालचाल केली नाही.

विराजने तीच्याकडे निरखून पाहिलं तर मिष्टीचे डोळे आता भरून आले होते.

"हिला आता काय झाल??" विराज मनात विचार करत बोलला.

" मिष्टी काय झाल??" विराजने जरा बारीक डोळे करून विचारलं.

नाही नाही म्हणता म्हणता तरीही तिच्या डोळ्यातून एक टपोरा पाण्याचा थेंब अश्रूच्या रुपात तिच्या गालावरती ओघळलाच.

आश्रम पाहून नीटस नाही पण अंधुक अंधुक तिच्या आयुष्यातल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या होता.

तिच्या डोळ्यात पाणी पाहून आपण काही चुकीचं तर करत नाहीये ना?? उगाच असा प्रश्न विराजच्या मनात चमकून गेला.

पण आता पाऊल पुढे टाकत होत ते मागे जायचं नाही त्याने मनाशी पक्क ठरवलं.


" आ.... आपण इकडे का...का आलो आहोत??" मिष्टी स्वतःला सावरत आणि डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली.


" आत गेलं की कळेलच ना." विराज तिच्याकडेच एकटक बघत म्हणाला.


का कोण जाणे पण तिला सावरून घेण्याची तिला आधार देण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात आली.

त्याने नकळतपणे तिचा हात हातात घेतला आणि हळूच आश्वासक रित्या दाबला.


जणू तो तिला खात्री करून देत होता की ' मी आहे ना.'


पण त्याच्या एका स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे उठले होते.....पहिल्यांदा तिला त्याचा पहिला स्पर्श झाला होता.


मगाशी नाही म्हणलं तरीही त्याने मिष्टीचा हात हातात घेऊन धीर दिलेला मनाला स्पर्शून गेलं होत तिच्या.


दोघेही आश्रमात दाखल झाले.


संध्याकाळ असल्यामुळे बरीच मुले वेगवेगळे खेळ खेळत होती.
आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला काही तिथेच काम करणाऱ्या बायका एकमेकींशी गप्पा मारत बसलेल्या होत्या.

त्यांना तिथे आलेलं पाहून त्यापैकी एक म्हातारी बाई पटकन पुढे आली.


" अरे जहागीरदार साहेब तुम्ही!!!.....किती दिवसांनी इथे आलात ." कुसुम (त्या आश्रमात काम करणारी म्हातारी बाई) विराजकडे हसून बघत म्हणाली.


" हो आजी....ते जरा कामात व्यस्त होतो तर वेळ नाही मिळाला आज अनायसा वेळ होता तर म्हंटल की इथे येऊन भेट देऊन जाउ.....आणि आज्जी मी तुला किती वेळा सांगितल आहे की नावाने हाक मारत जा म्हणून मला ते जहागीरदार साहेब वैगरे नको म्हणत जाऊस." विराजने देखील थोड हसत उत्तर दिलं.


"ह्या खडूसला मीराशीच हसत बोलताना पाहिलं आहे..... दुसऱ्यांशी पण ह्यांना हसून बोलता येत म्हणजे मग कायम उखडलेला मूड घेऊन का फिरत असतात??....एवढी छान तर smile आहे ह्यांची आणि कोणाचीही नजर लागेल अशी लोभसवाणी गालावर खळी पण आहेच की मग सगळ्यांशी हसून बोलायला काय जात ह्यांना काय माहिती??" मिष्टी मनातच विचार करत होती पण तिची नजर त्याच्या गालावरच्या खळीवरच खिळलेली होती.


आपल्यावर स्थिरावलेली तिची नजर त्याने अचूक हेरली होती.


"बर.....आता इथून पुढे मी लक्षात ठेवेन..... पण हे एक बर झाल तु आलास ते बाळा." कुसुम आज्जी हसत मायेने म्हणल्या.


" आणि ही कोण म्हणायची ??" कुसुम आज्जी मिष्टीकडे पाहत जरास हसत म्हणाल्या.


"आज्जी अग ते.....ते....." विराजला आता काय ओळख करून द्यावी मिष्टीची तेच कळत नव्हत.....मैत्रीण तर ती नव्हती म्हणजे त्यांचं नात अजून मैत्रीपर्यंत पण नव्हत गेलं मग सांगणार तरी काय??


" ते ते ऑफिस मध्ये काम करणारी कोलिग ग ना ते काहितरी म्हणता ना तुम्ही आजची पोर तेच असेल ना ही?" आज्जी च त्याच वाक्य पूर्ण करत म्हणाल्या.


(आज्जी खूपच पुढारलेल्या होत्या 😂😂😂)


" अन् हो....हो..." विराज कसनुस हसत म्हणाला.


मिष्टी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत त्याच्या बाजूला उभी होती.

आज पहिल्यांदा त्याला एवढं बोलताना ती पाहत होती.

" बर.... चला रे बाळांनो मी इकडे बोलतच बसेन आपली.....चला आत चला तसही मुलांना आत आत न्यायची वेळ झाली आहे." आज्जी मागे भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे एकदा नजर टाकत म्हणाल्या.


" ए पोरांनो चला आता आत.....सगळ्यांनी हातपाय धुवन देवघरात या पटकन.....आता नंतर खेळा मस्तपैकी" आज्जी आत जात सगळ्यांना म्हणाली.


आज्जी आत गेली तशी तिथे असलेल्या बाकीच्या बायका पण मुलांना आत घ्यायला पुढे सरसावल्या.

तरीही आपल काही मुलं खेळतच होती..... मिष्टी एकटक त्या मुलांकडे बघत होती......त्या मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता आणि एक समाधान होत.....आश्रमात असूनही ते एकटे जगाशी लढायला शिकत होते......आनंद शोधायला शिकले होते आणि काही लोकांकडे सगळी माणसं घरात असूनही प्रेम,सुख ,आनंद मिळत नाही.


किती वेगळी रीत आहे ना जगाची!!


ज्या माणसांकडे एखादी गोष्ट नसते तेव्हाच त्या माणसाला त्याची किंमत कळते आणि जेव्हा ती गोष्ट न झटता ओंजळीत येत तेव्हा त्या माणसाला त्याची काडीचीही किंमत नसते.


त्या मुलाच्या मनमोकळ्या हास्याने मिष्टीचाही मनात बंद असलेल्या एका कोपऱ्यात हालचाल होत होती.....तिला तीच बालपण नीट आठवत नव्हत पण समोरच्या मुलांमध्ये ती तीच बालपण शोधत होती.


तिच्या मनात एक प्रश्न चमकून गेला." आपलंही बालपण असच होत का??"
पण त्या प्रश्नाचं उत्तर तीच्याकडे नव्हत.


सगळी मुलं आत निघून गेली तशी तिही भानावर आली आणि विराजच्या मागे आत गेली.


सगळे हातपाय धुवून देवघरात जमले होते.

आज्जीनी देवासमोर संध्याकाळचा दिवा लावला आणि सगळ्यांनी शुभंकरोती म्हणायला सुरुवात केली.

आपसूक मिष्टीच्याही तोंडातून ते सगळे श्लोक बाहेर पडत होते.....तिनेही नकळत हात जोडले.

श्लोक संपले तसे सर्वांनी डोळे उघडले.

आज्जिनी मिष्टीला हात केला आणि त्यांच्याकडे बोलावून घेतले.

पहिले तर तिला काही कळलच नाही नंतर ती पटकन पुढे गेली आज्जिनि तिच्या हातात एक ताट दिलं आणि सगळ्या मुलांना वाटायला सांगितल.

तिनेही हसत हसत सर्व मुलांना प्रसाद देऊ लागली.
सगळी मुलं तीच्याकडे हसून बघत होती.

नंतर सगळे परत बाहेर येऊन खेळायला लागले पण आता त्यात मिष्टीलाही त्यांनी ओढत ओढत सामील करून घेतलं होत.

तीही सगळ्यांबरोबर अगदी लहान होऊन खेळत मनमोकळेपणाने खेळत होती.

जणू ती त्यांच्यातीलच एक झाली होती.

विराज फक्त तिची वागणूक बघत होता एकेठीकणी बसून.....


तिचं ते हसण....मध्येच पुढे आलेल्या बटांना हळूच कानामागे सारण......तिच्या कानातल्यांचा होणार आवाज.....आणि तीच लहान मुलांबरोबर लहान होऊन खेळण.....त्यांचे लाड करण.


तुझ्या हसण्याने नकळत गुंतत आहे मी,
तुझ्या बोलण्याने नकळत ओढला जात आहे मी,
तुझ्या असण्याने ही वाटही सोपी होईल,
तुझ्या साथीने मी परिपूर्ण ही होईल.

( स्व-लिखित कविता आहे......Madhura (Angel ❤️))


ती लहान मुलांना जशी सांभाळत होती तशी तशी विराजची तिच्या बाबतीत मिराबद्दलची खात्री पटत होती.....त्यासाठीच तर तो तिला इथे घेऊन आला होता.


तो एकटक तिच्याकडेच पाहत होता......तोपर्यंत मागून आज्जी पदराला हात पुसत आल्या आणि त्याला तीच्याकडे एकटक बघताना पाहिलं आणि हसतच त्याच्याशेजारी हळूच जाऊन बसल्या.


" गोड आहे ना??" आज्जीनी त्याच्याकडे पाहत त्याला विचारलं.


" हो ना.....तीच हसण,तीच बोलणं....अगदी सगळच गोड आहे." तोही नकळतपणे तंद्रीत बोलून गेला.


आणि इथे आज्जी हसू लागल्या......तेव्हा विराज भानावर आला आणि मगाशी आपण काय बोलून गेलं ते आठवताच त्याचे डोळे मोठे झाले.


" खरच गोड आहे पोरगी...... पण पोरीच्या मनात खूप दुःख आहे तिच्या....... पण खरच खूप लाघवी स्वभावाची आहे......शोभून दिसेल तुमच्या दोघांचा जोडा.....अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटेल." आज्जी मायेने तीच्याकडे पाहत त्याला सांगत होत्या.


" तस काहीच नाहीये आज्जी.....ते आपल मी चुकून बोलून गेलो..... पण दुःखाचा काय बोलत आहेस तू??" वीराजने गडबडून विचारलं.


" हे केस असेच नाही पांढरे झालेत.......अनुभव आहे आणि ही नजर अशीच नाही तीक्ष्ण आहे .....मनातल कळायला लागत फक्त.....चेहरा आणि डोळे पाहून कळत कोण खर आहे आणि कोण खरेपणाचा मुखवटा घालून फिरत आहे." आज्जी हसत त्याला म्हणाल्या.


" आज्जी सगळ्या मुली एकसारख्याच असतात......फक्त पैसा हवा असतो त्यांना......पैसा नसेल तर कसलं प्रेम आणि कसलं काय??" विराज जरा रागात तोंड वाकडं करत म्हणाला.


" अस कोण म्हणाल तुला??......सगळ्यांना एकाच नजरेच्या चष्म्यातून पाहिलस तर सगळे एकसारखेच दिसतील पण प्रत्येकाला योग्य त्या नजरेच्या चष्म्यातून पाहिले ना की तूझा गैरसमज दूर होतील .....मान्य आहे अश्या मुली पण आहेत पण प्रेम आणि माणसांना महत्व देणाऱ्या पण कित्येक जणी आहेत की.....फक्त बरोबर माणसाची पारख करता आली पाहिजे." आज्जी त्याला समजावत बोलल्या.


" Hmmm" विराज ने फक्त मान डोलावली.....मनाला पटत होत पण बुद्धीला पटत नव्हत.


" बघ तू विचार करून.....आणि आता चला जेवूनच जा." आज्जी तिथून उठत म्हणाल्या.


" नको....उगाच कशाला त्रास??" विराज नकार देत म्हणाला.


" त्रास कसला त्यात??....आज्जी म्हणतोस ना मग ह्या आज्जीच ऐक आणि गपचुप आत चल." आज्जी दटावतच बोलल्या.

.
.
.
.


सगळेजण सतरंजी अंथरून समोरासमोर रांगेत बसले होते.


सगळ्यांना वाढून सगळे एकत्रच जेवायला बसायचे.....नियमच होता तिथे तसा.


सगळ्यांनी वदनीकवळ घेता म्हणलं आणि जेवायला सुरुवात केली.


सगळी चिल्लीपिल्ली मिष्टीशी मनमोकळे पणाने खूप गप्पा मारत होती आणि ती ही अगदी ते कान देऊन ऐकून त्यांच्याशी बोलत होती.


हसत खेळत गप्पा मारत जेवण कधी संपल ते कोणाला कळलच नाही.


विराजचा निर्णय आता पक्का झाला होता.

जाण्याची वेळ जशी जशी जवळ येऊ लागली तशी सगळी मुलं मिष्टीकडे इथेच थांबायचं निरागस हट्ट करू लागली.

तीचही मन नव्हत जायचं पण जावं ते लागणार होतच ना.

कसबस सगळ्यांना समजावून आणि लवकरच परत येण्याचं वचन तिने सगळ्यांना दिलं तशी सगळी मुलं नाराजीनेच हो म्हणाले.

जाताना ती आज्जिंपाशी आली आणि खाली वाकतच त्यांना नमस्कार केला.

त्यांनी लगेच तिला छातीशी कवटाळल.


खूप दिवसांनी तिला कोणीतरी मायेची मिठी मारली होती......तीच मन भरून आल होत.......डोळ्यातही पाणी जमा झालं होत.


" ए वेडाबाई रडतेस कशाला??...... हसतानाच छान दिसतेस बघ." आज्जी तिच्यावरून हात फिरवत कडा कडा बोट फिरवत बोलल्या.


" ते आईबाबांची आठवण आली म्हणून थोड....." मिष्टी डोळे पुसत म्हणाली.


" बर.....रडू नकोस पण......मी आहे ना आता .......तुला कधीही वाटलं तेव्हा इकडे येत जा माझ्याकडे.......मला माझ्या मुलीसारखी च आहेस आता तू." आज्जी तिला समजावत बोलल्या.

मिष्टीने मान हलवतच होकार दिला आणि परत त्यांना मिठी मारून बाजूला झाली.


विराजनेही मग आज्जीच्या पाया पडत तिला मिठी मारली.

" माझ्या मुलीची आणि होणाऱ्या सुनेची काळजी घे.....तिला काही त्रास झाला ना तर बघ......आणि मी बोललेल्या गोष्टीवर विचार कर." आज्जी हळूच त्याच्या कानात बोलल्या.

तसे विराजचे डोळेच ताठ झाले.

" आजी अग असं काही..... " विराज जरा कावरा बावरा होत आजी ला बोलत होता तस आजी म्हणाली.


" असुदे रे... समजत मला सगळं आता जावा तुम्ही दोघ , खूप उशीर झाला आहे... " आजी....


" हम.." विराज......


विराज आणि मिष्टी जायला निघाले , जाताना मिष्टी आजीच्या पाया पडून गेली... आणि सगळ्या मुलांना बाय करून निघाली...


तिला तर इथून जायचीच इच्छा न्हवती.... पण जावं तर लागणार होत...


दोघ सुद्धा कार मध्ये बसले... मिष्टी विंडो मधून बाहेर पाहत आजचा दिवस आठवत होती.....

मनात खूप सारे विचार चालू होते तिचे.....
किती भारी दिवस गेला ना आज.....खूप मज्जा आली आणि आज्जी ही त्या किती मस्त होत्या.....

त्यांच्या मिठीतच राहावं वाटत होत , सगळं किती भारीच होते ते आश्रम त्यातील लोक आणि ती लहानमुले..... आजचा दिवस आनंदी फक्त आणि फक्त विराज सरांमुळेच गेला आहे....

त्यांना थँक यू तर म्हंटलंच पाहिजे.... ती जरा खुश होत त्याच्या कडे पाहू लागली तर तो ड्रायविंग करताना कसल्या तरी विचारात होता... उगाच त्याला डिस्टर्ब नको... म्हणून ती शांत बसली...


" मिष्टी रात्रभर असच फिरत राहायचं आहे का??"
विराज समोर बघतच बोलला.

तिला काही कळलच नाही.


" काय झाल सर तुम्ही अस का म्हणत आहात??" मिष्टीने गोंधळून विचारलं.


" तुमच्या घराचा पत्ता कोण सांगणार मग मला ?.....तुम्ही नाही सांगितला तर असच फिरत राहावं लागेल." विराज म्हणाला.

मिष्टीने ही मग त्याला पत्ता सांगितला.


मिष्टीच्या घराच्या खाली विराजने कार थांबवली तशी मिष्टी कार मधून उतरली आणि थोडं खाली विंडो मध्ये वाकून त्याला थँक यू म्हणारच होती कि विराजने गाडी फुल स्पीडने नेली......


मिष्टी डोळे मोठे करून त्या कार कडे पाहत राहिली.... " 2 मिनट थांबले असते जरा तर काही अडलं असत का यांचं..... ह्ह थँक यू म्हणायचा सुद्धा चान्स दिला नाही..... ह्ह माझंच चूकल उतरायच्या आधीच त्यांच्याशी बोलायला हवं होते... असो " मिष्टी हताशपणे तो गेला त्या दिशेने पाहत बोलली आणि वर निघून गेली.

..
.....


थोड्याचवेळात विराज घरी आला..... सगळे जण हॉल मध्ये बसले होते......त्याला थोडं वेगळंच वाटलं....

गीता थोडी घाबरलेली वाटत होती त्याने गीताला मिरा बद्दल विचारलं...

तशी तिच्या पाठी लपलेली मीरा रडत रडत विराजपाशी आली...

तिला रडताना पाहून त्याला धक्काच बसला.

" मिरा.... का रडतेय तु??? मिरु अग....... प्रिन्सेस काय झाल??" विराजने मिराला काळजीत विचारलं.

तस लगेच तिने त्याच्या पायाला घट्ट मिठी मारली.....
त्याने तिला उचलल तस तिने त्याला गच्च मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागली....

विराजला काहीच समजत नव्हत......ती इतकी रडत होती कि तिला बोलता पण येत नव्हत.


विराजला आता काहीच सुचेना त्याने गीताकडे पाहिलं आणि सगळ्यांकडे एक नजर टाकत त्याने तिला विचारल....


" गीता मीरा का रडतेय?? याच कारण समजेल का मला....?? " विराज थोडा आवाज वाढवत म्हणाला.


" ते ते....म.. " गीता खूपच अडखळत बोलत होती.


तोच विराजची आई म्हणाली," तिला का विचारत आहेस मला विचार..... "


" हिच्यामुळे आज मी मरता मरता वाचले.....हिला रूम दिली आहे ना खेळायला मग तिथेच खेळायचं कि .....त्या त्या जिन्यानवरून मी पडणार होते.... नशीब गीता होती म्हणून थोडक्यात वाचले... आणि एक फटका काय दिला तर इतकी रडतेय देव जाणो... डोकं फिरवून ठेवलं या कार्टीन नुसत.... " आई रागात म्हणाली....


" एक मिनिट...... पण मीराला मारायची हिम्मतच कशी झाली तुमची??? आणि आई तुला तर कारणच हवं असत ना मिराला मारायचं आणि तिला ऐकवायचं.... तुला जरा सुद्धा दया नाही येत का ग इतक्या लहान मुलीवर हात उचलताना ?? आणि जर इतकाच प्रॉब्लेम होत असेल तर मी मिराला घेऊन दुसरीकडे निघून जातो..... " विराज त्याचा आवाज थंड ठेवत म्हणाला...


" का तुला तुझ्या आईची दया येत नाही का?? आम्ही इतकी लाडात तुला वाढवल...... जे हवं ते दिल.... आणि एका मुली साठी तू घर सोडायला तयार आहेस??? आपल्या आईबाबांचा पण विचार नाही करवत का तुला?? " आई रागारागात बोलू लागली.


" प्लिज आई हे काय आहे रोज रोजच तुझं??माहीत आहे खूप केल तुम्ही माझ्यासाठी.....मी सुद्धा माझं कर्तव्य निभावतच आहे कि...... सगळं देतोय कि तुम्हाला अजून काय हवं आहे...???" विराज....


" परत लग्न कर कि मग तू , इतकी सुद्धा इच्छा तू पूर्ण नाही करू शकत.... मरायच्या आधी निदान सुनेच तरी तोंड बघुदे मला....ह्या पोरीला तिची आई सोडून निघून गेली आणि तू बसला आहेस तिला सांभाळत.....आणि लग्न केल्यावर मिराला सुद्धा आई मिळेलच कि...... काय वाईट आहे त्यात??....नाहीतर तू म्हणशील त्या मुलीशी लग्न लावून द्यायला तयार आहे मी....... पण तू ऐकायचं नावच घेत नाहीस" आई ....


" मी म्हणेल त्या मुलीशी....???? " विराज... आई ला अडवत म्हणाला......


" हो......तू म्हणशील त्या मुलीशी लग्न लावून देऊ आम्ही....सून आली की ह्या मुलीलाही बघायला कोणतरी असेल.......आमचीही काळजी मिटेल." आई समजावत बोलू लागल्या.


" ठीक आहे..... बास आता हा विषय......जाऊन झोपा आता सगळ्यांनी." विराज विषयाला पूर्णविराम देत म्हणाला

विराज मीराला घेऊन त्याच्या रूम मध्ये निघून गेला तसे सगळे जणही आपापल्या रूम मध्ये झोपायला निघून गेले.

विराज रूम मध्ये आला तस त्याने दार लावून घेतलं आणि तिथेच बेडवर जाऊन बसला.

मीरा अजूनही त्याला घट्ट बिलगूनच मुसमुसत होती.

त्याने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला.

" श..... श.....काही नाही झालंय एवढं मिरू.....शांत हो.....प्रिन्सेस रडू नकोस....... डॅडा आहे ना आता....शांत ही बघू आता." विराज तिला समजावत म्हणाला.


" डॅडा खलच चुकून जाल ते...... मी मुद्दामून नाय केलं काही." मीरा अजूनही डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघत म्हणाली.


" मला माहिती आहे......मी आहे ना आता...... चल आपण आवरू आणि मस्त गायिगायी करू आता.....किती रडली आज माझी प्रिन्सेस......आज्जीने खूप जोरात मारल का??" तो तिचे डोळे पुसत म्हणाला.


तिने तस मान वर खाली करत त्याला पाठ दाखवली.


" मागे तूप जोरात मारलं मला." ती रडका चेहरा करत म्हणाली.

" आपण त्याला औषध लावू म्हणजे पटकन बर होईल ते." विराजने तिला उचलत closet मध्ये नेत म्हणाला.


त्याने पटकन तिचे कपडे बदलले आणि तिच्या पाठीला क्रीम लावून दिलं.

तिच्या पाठीवर लाल लाल व्रण बघून त्याला खूप भरून आलं आणि रागही येऊ लागला.

त्याने हळुवार त्यावर फुंकर मारली आणि स्वतःच ही पटकन आवरलं.

तिला कुशीत घेऊनच तो बेडवर आडवा झाला.......ती झोपेपर्यंत तो तिला थोपटत होता..... मिरा ही त्याला घट्ट बिलगून तिच्या डॅडाच्या कुशीत झोपून गेली.

त्याला आता लवकरच त्याने घेतलेला निर्णय अमलात आणायचा होता.


त्याने मोबाईल मध्ये कोणालातरी मेसेज पाठवला.


आता वाट होती ती फक्त उद्याची.....उद्या सगळ्यांच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळणार होती......उद्याचा दिवस खूप काही नवीन घेऊन येणार होता.


.
.
.
.

नवीन दिवस उजाडला तस ऑफिसला जायची गडबड सुरू झाली.


मीराला स्कूलमध्ये सोडूनच आज विराज ऑफिसला आला होता.

त्याने ऑफिस मध्ये पाऊल टाकलं आणि त्याची नजर नुकत्याच आलेल्या मिष्टीवर पडली.

तो त्याच्या केबिनमध्ये गेला.....मागून त्याची असिस्टंट आली आणि त्याच्याकडे काही इंपॉर्टन्ट papers देऊन गेली.

त्याने लगेच मिष्टीला त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतले.

मिष्टी ही लगेच त्याच्या केबिन मध्ये हजर झाली.


" मिस. मिष्टी बसा." विराज समोरच्या chair कडे इशारा करत म्हणाला.


" काल तर अग तुग करत होते....आज परत खडूस मोड ऑन केलेला दिसतोय." मिष्टी मनात बोलतच खुर्चीवर बसली.

विराजने तसे तिच्या समोर काही papers ठेवले.


" रिड देम." त्याने ऑर्डर सोडत म्हणलं.


तिने गोंधळूनच ते पेपर हातात घेतले आणि वाचू लागली.

ती वाचत होती तसे तसे तिचे डोळे हळू हळू मोठे होत होते.

क्रमशः.....

आणि प्लिज कंमेंट्स karaa😭😭 आणि स्टिकर पन द्या 🙂🙂


Share

NEW REALESED