Relationships blossom with love - 7 books and stories free download online pdf in Marathi

नाते बहरले प्रेमाचे - 7



















आधी तर साॅरी खूप जणांना कन्फ्यूज झालं की विक्रांत च्या मांडीवर कोण होती .. विक्रांत च्या मांडीवर नव्या बसून होती ....बाय् मिस्टेक मी समीक्षा लिहलं ( बिचाऱ्या समिक्षा ला मी विनाकारण बदनाम केलंय 😂😃 ) होते बाबा एखाद्या वेळी चुकी ...



मागच्या भागात

विक्रांतने आरोहीला रागात रूमच्या बाहेर काढून टाकलं ...

आता पुढे ...


विक्रांत please open the door... माझ्या मुळे स्वत: ला कशाला त्रास देत आहात.. " आरोही

समजते काय स्वतः ला माझ्या सोबत अशी बोलणारी आहे कोण ती .. मला ती मुलगी माझ्या लाईफमध्ये तर दुरची गोष्ट मला ती माझ्या घरात पण नकोय.. विक्रांत स्वतः शीच बोलला .. त्याने पुर्ण रूमची वाट लावली होती.. पुर्ण सामान. टिव्ही पण फोडून रुमचा स्वाह करून ठेवलं..


आरोही चा फोन वाजला..

हा बोला ना पप्पा... " आरोही

बेटा विक्रांत आणि तु येत आहेस ना? ... " विक्रांत चे डॅड

नाही पप्पा विक्रांत ला बरं नाही आहे त्यामुळे आम्ही दोघे येणार नाही.. " आरोही

ओके काळजी घ्या.. " पप्पा

विक्रांत तुम्ही डोअर ओपन करत आहात ना की मी आईंना फोन करुन सांगु सर्व... Ok मी फोन करते आईसाहेब यांना... " आरोही

त्याने डोअर ओपन केलं.. आरोही ला आत खेचून तिला भिंतीवर टेकवलं...

What's wrong with you ? आरोही.. माझं चुकलं मी तुला एक्सप्लेन करतोय ना.. माझी चुकी आहे यात.. आणि खरं बोलली तु.. बायको नाही आहेस माझी तु.. पण एकदा ऐकून घ्यायला काय चाललं तूझं.. मला ना राग येतोय मुलींचा.. आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून घ्यायचं आणि मग जेव्हा ते प्रेम निभावण्याचा टाईम येतो तेव्हा हात वर करुन घेउन मोकळे.. " विक्रांत

विक्रांत काय❓ झालं.. तुम्ही सांगाल तर कळेल ना.. " आरोही शांतपणे बोलली

काही नाही तु जा इथून मला एकटं रहायचं आहे.. Go... " विक्रांत

नाही जाणार मी.. आधी विक्रांत इथे बसा.. कीती लागलंय हाताला.. तिने जबरदस्तीने त्याला बेडवर बसवलं आणि हाताला लागलेलं रक्त काॅटनने साफ केलं.. माझा राग स्वत वर काढायची काय गरज आहे...." आरोही रागाने बोलली

काही गरज नाही आहे. .. " विक्रांत

गप्प बसा इथे.. तिने त्याच्या हातात घुसलेले काचेचे बारीक तुकडे हळूहळू काढले...

खूप दुःखतय का। ?.." आरोही

विक्रांत काहीच बोलला नाही ...

माहिती आहे विक्रांत तुम्ही बाहेर चा राग घरी काढत आहात ..पण एक गोष्ट लक्षात ठेवा.. प्रेम असं असते

... प्रेम म्हणजे, समजली तर भावना
प्रेमात केली तर मस्करी ...
!!! प्रेमाचा मांडला तर खेळ !!!
विश्वास ठेवलं तर ते प्रेम
प्रेमाला समजून घेतलं तर ते श्वास
आणि
त्याच् प्रेमासोबत संसार मांडून निभावलं
** तर ते जीवन आणि निःस्वार्थ प्रेम **

ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये असल्या तर त्या प्रेमात कितीही प्राॅब्लेमस् असून ते प्रेम निभावणे... यालाच खरं प्रेम म्हणतात.. मग ते नातं कोणतही असो आई-वडील, भाऊ-बहीन , आणि सरळ शब्दात बोलायला गेलं तर लाईफपार्टनर मग मुलगा असो की मुलगी ..." आरोही येवढं बोलून शांत झाली ..

विक्रांत फक्त गुपचुप ऐकून घेत होता... त्याला बोलायचं होतं पण तोंडातून शब्द निघत नव्हते..

मला नाही माहित विक्रांत तुमच्या लाईफमध्ये असं काय झालं आहे.. पण काही गोष्टी विसरून वेळेवर सोडलेल्या बर्‍या ....." आरोही

हम्म्म.... " विक्रांत

आरोहीने बोलत असतांनीच त्याचा हातात घुसलेले काचेचे बारीक तुकडे हळूहळू काढुन घेतले ...

साॅरी.. " विक्रांत आरोहीला बोलला

का आणि कशासाठी साॅरी?... " आरोही नसमजून बोलली

तुझ्या हातातल्या बांगड्या माझ्या हातानी तुटल्या आणि तुला त्या बांगड्या हाताला रुतल्या त्यासाठी... " विक्रांत

It's okay... माझे पण तर नख तुमच्या हाताला लागले ना.. " आरोही

नख नाही आहेत तुझे.. चुडैल सारखे नख आहेत बघ तुझे नख कीती रूतले मला.. "विक्रांत हसुन बोलला

Oh असं .." आरोही पण खोट खोटं रागावून बोलली

आरोहीने पुर्ण रुम आवरली आणि झोपली...

*******

सकाळी नाश्ता करतांना आरोही आणि विक्रांत उशीराच आले ...

आज इतका वेळ कसा काय झाला..नाही म्हणजे आरोही आधीच येते ना म्हणुन विचारलं.... " विक्रांत ची माॅम

झाला तर झालं त्यात काय येवढं... "आईसाहेब मोठ्या आवाजात बोलल्या

विक्रांत आणि आरोही तुमच्या हाताला का लागलं... " आईसाहेब काळजीने दोघांना बोलल्या

आई काही काही असच लागलं... " आरोही

आईसाहेब तुम्ही पण ना ..अहो दोघांचं नवीन लग्न झालं आहे तर हे सर्व होणारच ना .." संध्या काकु हसुन बोलल्या

यांना फालतुपणा कसा काय सुचते... " विक्रांत मनात बोलून नाष्टा केला आणि आँफीस ला निघाला

आरोही पण काॅलेजला गेली ..

*****


बेटा डोअर ओपन कर.. काय झालं सांगशील तरच मी काही करु शकेल ना .." नव्याचे डॅडी नव्याला बोलले

डॅड मला विक्रांत हवाय.. त्या विक्रांत ने माझा इन्सल्ट केला.. आणि लग्न केलंय ना त्याने बघतेच तो त्याच्या मॅरेड लाईफमध्ये कसा हॅप्पी राहतो तर... " नव्या रागात बोलली

तुला काय वाटते तो विक्रांत काय एखाद्या खेळना आहे..जो तुला तो विक्रांत पाहीजे आणि मी तुला आणुन देणार.. " तिचे डॅड रागावून बोलले

मला नाही माहित... मला विक्रांत पाहीजे बस.. नाही तर मी सुसाईड करेल डॅड आणि तुम्ही जबाबदार राहाल ..."नव्या हट्ट धरून बोलली

तो विक्रांत आहे..the most successful business man आणि त्याच्या सामोरं चांगल्या चांगल्याचीं चालत नाही तर मी काय एक साधारन आमदार आहे ..मी त्याच काहीच वाकडं करु शकत नाही आणि तुझ्या मुळे त्या विक्रांतने आपल्या कंपनीची डील कॅन्सल केली तुझ्या मुळे कीती लाॅस झाला कळतर का तुला .." प्रकाश देशमुख रागात नव्या ला साफ नकार देत बोलले

ठीक आहे तुम्ही नका करु काही.. आता जे पण मी करेल ना त्या विक्रांत ला कळणार सुद्धा नाही.. " नव्याने मनातच प्लान बनवला आणि हसली

. तो तुझ्यावर कीती प्रेम करत होता आणि तु त्याच्याशी फक्त टाईमपास करत होती.. तो लग्न करणार होता तुझ्या सोबत.. आज करोडो ची मालकीन असती तु..
एक वेळच तु धोका दिलंय त्या साठी त्याने केलं असतं माफ पण दुसऱ्या मुलाच्या बेडवर त्या विक्रांतने तुला पाहीलं त्यासाठी तो तुला कधीच माफ करणार नाही.... " प्रकाश देशमुख ठामपणे बोलले

Shut up dad😠... आणि मी पाहुन घेईन.. काहीही झालं तरी चालेल ...मला विक्रांत पाहीजे म्हणजे पाहीजे.. " नव्या



दुसरीकडे


बाॅस नव्या मॅमला तुमच्या घरूनच कोणीतरी माहिती दिली आहे तुमच्या लग्नाची.. .. " विकास

ओके.. देशमुख यांच्या पुर्ण काळ्या धंड्यांची माहिती काढ.. आमदार आहे ना तिचा बाप.. तिने काल ऑफ़िसला येऊन खूप मोठी चुकी केली... आणि सर्वात जास्त माझ्या जवळ येऊन.. " विक्रांत

विकास नव्याचे पुर्ण वन मंथचे काॅल रेकॉर्ड काढ..

हो बाॅस असं पण होऊ शकते....ती नव्या जिद्दी सायको आहे आरोही मॅमला नुकसान पोहचवण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही.. " विकास

बघतो मी काय आहे तर..

आज कोणकोणत्या मिटींगस् आहेत ते समीक्षाला त्याचा टाईम टेबल द्यायला सांग ... " विक्रांत

ओके...



काॅलेजमध्ये..

आरोही तु थांब इथे मला थोड प्रिसिंपल सरांनी बोलावलं आहे..

ओके ये लवकर... " आरोही बोलून गाडीला टेकून उभी होती..तिचा फोन केव्हाचा वाजत होता तिने बॅग मधून काढून रिसिव केला.. आरोही खूपदा हेल्लो बोलली पण सामोरं चा व्यक्ती काही केल्या बोलत नव्हता..

तुम्हाला काही काम नाही आहेत का ❓... ' आरोही चिडून बोलली

हेल्लो आरु बाळा ओळखली का... " तो सामोरं चा व्यक्ती

तुम्ही 😡.. तुमचा फोन रिसिव केला म्हणजे जिवंतच असणार ना.. आणि का केलं फोन अजून काही म्हणणं बाकी आहे का. . " आरोही रागाने बोलली

बेटा ऐकून तर घे... " तो व्यक्ती

काही गरज नाही आहे.. माझ्या सोबत बोलाल असं होऊ शकते ना की तुमची राहीलेली इज्जत पण चाल्ली जाईल.. " आरोही

आरु बाप आहे तुझा मी.. अशी बोलशील का माझ्याशी....❓.... " तो व्यक्ती

खरचं तुम्ही आणि माझे पप्पा... माझी ह्या पुर्ण जगात ना माझी मम्मी होती फक्त. आणि ती पण मला सोडून गेली.. आता कोणीच नाही आहे माझा... " आरोही

आरु मी आहे ना.. तु तुझ्या पप्पांना कसं विसरू शकते.. आणि चुकलं माझं मी तेव्हा तुझ्यावर अविश्वास दाखवला.. पण बेटा त्या गोष्टीला सात वर्षे झाली.. " आरोही चे पप्पा

खरं बोललात तुम्ही सात वर्षे झालले ना त्या गोष्टीला.. तसच सात वर्षे झाली माझे तेव्हा पप्पा पण ह्या जगात नाही आहेत असं समजून जगत आहे मी ..." आरोहीने काॅल कट केला आणि मोबाईल खाली फेकला ..

आरोही काय झालं आणि मोबाईल का फोडला ? ..."आभा

आभा तु का दिलं त्यांना माझा नंबर माहिती आहे ना तुला सर्व तरी सुद्धा.. " आरोही रडत बोलली

आरु प्लीज तु नको ना रडूस I'm sorry मीच नंबर दिला तुझ्या पप्पांना.... " आभा

का दिलं.. माझी लाईफ आहे ना आभा का नेहमीच मला का ऐकून घ्याव लागते .." आरोही

आरु यार तुझ्या पप्पांना त्यांची चुक कळली आहे.. तु त्यांना एक चान्स तर देऊ शकते ना .."आभा

आभा ते विसरले असतील मी नाही .. मला माहिती आहे त्या वेळेस माझी काय कंन्डीशन होती.. त्या दिवशी मला ते ज्या शब्दात बोलले ना मला आता पण लक्षात आहे ..एकवेळचं दुसरे बोलले असते ना मला काही वाटलं नसतं पण माझे स्वतःचे पप्पा मला बोलले त्यांना स्वतःच्या मुलीवर विश्वास नव्हता ..." आरोही

आरु तु नको रडूस सोड ते सर्व.. आणि मी नाही करणार तुला रिक्वेस्ट तुला जसं वाटते तस कर .." आभा

ओके बाय जाते मी.. " आरोही

नाही तु एकटी नाही जाणार मी सोडते तुला घरी.. " आभा

आभा लहान नाही आहे मी.. जाऊ शकते मी स्वतः " आरोही आभा च न ऐकता निघून आली


आरोही घरी आली.. तेवढ्यात चांगलं झालं की घरी सर्व आपल्या रुममध्ये होते.. ती रुममध्ये गेली आणि मोबाईल बेडवर फेकला आणि बाथ घ्यायला गेली.. आज ती इतकी रडली की पुर्ण बाथरूम मध्ये तिच्या रडण्याचा आवाज जास्त येत होता..

बाहेर आल्यावर पाहते तर विक्रांत बेडवर बसला होता... तिने पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्याच्याशी नजर न मिळवता तयार झाली आणि गॅलरीत जाऊन ती स्टडी करत बसली..


आरोही काय झालं ❓... आणि तुझा मोबाईल कसा फुटला... " विक्रांतने विचारलं

मोबाईल खाली पडला सो म्हणून मोबाईल फुटला.. " आरोही नजर चोरून बोलली

मग रडत का आहे.. " विक्रांत

नाही मी कुठे रडत आहे.. " आरोही

खोट नको बोलू आरोही तुला पाहील्यावर कोणीही सांगेल.. आता तरी सांगशील काय झालं.. " विक्रांत

नाही झालं ना काही.. आणि प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे का.. " आरोही मोठ्या आवाजात चिडत बोलली

आरोही...

मला एकटं सोडाल काही वेळ.. प्लीज

.
त्याने पण जास्त काही न बोलता तिला एकटं राहू दिलं
....

*********


आरोही जेव्हा सकाळी उठली तर खुप वेळ झाला होता.. विक्रांत रोज बरोबर 10 ला जायचा तर तिला वाटलं तो गेला असेल समजून ती.. बिन्दास तिने शाॅवर घेतला आणि बाहेल ओले केस टाॅवेल ने पुसत बाहेर आली.. तिचा सहज लक्ष गेला बेडकडे.. विक्रांत तिथेच लॅपटॉप वर काम करत बसला होता..

विक्रांतने तिच्या कडे पाहिलं आणि तो शाॅक.. आरोही बाथ टाॅवेल गुंडाळून बाहेर आली होती..

आरोही ने हातातला टाॅवेल फेकला आणि आत पळणार त्या आधीच तीला विक्रांतने पकडलं.. कारण ती पडणार होती.. ..

हळु जा आणि आता पडली असती तर? .. " विक्रांतने तिला व्यवस्थित उभ करुन तिला सोडलं

मला वाटलं... रूम तर आतून लाॅक होती ना. मग तुम्ही... " आरोही

माझ्या कडे की आहे ह्या रुमची.. " विक्रांत

आरोही पण मग पटकन् चेंजिंग रूममध्ये पळाली..

यांना कळत नाही का.. आता रूममध्ये नव्हते.. आणि मी बाहेर गेली तर हजर.. Oh माझीच चुकी आहे.. मला चेक करून यायला पाहिजे होतं ना.. त्यांची काय चुक.. .. " आरोही बडबड करतच रेडी झाली..

खाली नाष्टा करतांनी पण आरोहीची नजर खालीच होती.. तिला कसंतरीच वाटतं होतं विक्रांत च्या नजरेला ती नजर देत नव्हती..

विक्रांत गालातच हसला..


******

आरु प्लीज ना यार अशी चूप नको ना राहु.. मला कसं तरीच वाटते.. मला तुझं न बोलणं खटकते... " आभा..

आभा माहिती आहे चुक कोणाचीही नाही आहे गं चुकी माझी होती.. मी नेहमीच मम्मी च्या गोष्टी ऐकायची.... कारण ती नेहमी खरीच असायची.. पण चांगुलपणाचा फायदा आपलेच लोकं घेतात हे खरं आहे.जे मला मम्मी गेल्यावर कळलं.. . .. " आरोही.

आरोही विसर ना सर्व मी आहे ना.. " आभा आरोही ला मिठी मारून बोलली..

😊... " आरोही



ऑफ़िसला...


विक्रांतने आरोही सामोरं डिवोर्स पेपर सरकवले..

केबिनमध्ये आरोही, विक्रांत , आणि एक वकील हे तिघेच बसले होते..

हाय.. " तो वकील त्याने आरोही ला...

हेल्लो.. 😊... " आरोही

You are looking like beautiful❤. .. " तो वकील आरोही चा हात पकडत बोलला..

विक्रांत ला हे सर्व नाॅर्मल वाटलं... पण आरोही ला कसंतरीच वाटत होतं .. तो वकील तिच्या कडे आला तेव्हाचा सारखा पाहत होता..

आरोही ने जबरदस्तीने तीचा हात सोडवून घेतला..


आरोहीने ते पेपर्स रीड करुन त्यावर साईन केले..

ओके.. मला काॅलेजला जायचं आहे.. So I go now.. " आरोही हळू आवाजात बोलली

ओके.. ड्रायव्हर सोडून देईल तुला.. " विक्रांत

नाही मी समीर सोबत आली आहे.. तर जाते मी.. " आरोही बोलून निघून गेली



विक्रांत तु असा कसा ह्या मुलीपासून दूर राहू शकते.. कीती सेक्सी आहे ती.. मी तर असच नसतं सोडलं तिला.. तिचा वापर करून तिला डिवोर्स दिलं असतं.. नाही नाही ती एका रात्री साठी नाही पुर्ण लाईफटाईम भेटेल ना तरी कमीच आहे.. " तो वकील..

How dare you 😠😡.. आरोही बायको आहे माझी.. तु इतकं काही बोलशील आणि मी ऐकून घेईल.. विक्रांतने त्याला इतकं मारलं.. त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होता. तरी सुद्धा त्याचा राग शांत होत नव्हता विक्रांतने त्या वकीलाचा डोका भिंतींवर आपटला..

तुला बाई खेळणं वाटते.. जे एका रात्रीत वापरुन सोडायला.. आता बघच तु मी काय करतो.. माझ्याशी पंगा घेऊन तु खूप मोठी चुकी केली.. तुला हे पुणे तर दुर ह्या जगात सुद्धा राहू देणार नाही मी.. " विक्रांत रागाने लालबुंद झाला होता

विक्रांत एका मुलीपासून तु आपली मैत्री तोडत आहे.. तु हे चांगल केलं नाही.. मी त्या मुलीला सोडणार नाही.. " तो वकील कळवळून बोलला त्याला विक्रांतने येवढं मारलं त्याला धड उभ पण राहता येत नव्हत..

तु फक्त आरोही ला हात लावून दाखव.. त्या आधी तु जिवतं राहतोस का ते बघ.. " विक्रांतने त्याला जमीनीवर पडला होता त्याचा शर्टाला पकडून उचललं आणि जमीनीवर आणखी पाडत त्या वकीलाला ओढत ऑफ़िस च्या बाहेर काढलं



क्रमशः