nate baharle premache - 9 in Marathi Love Stories by Reshu books and stories PDF | नाते बहरले प्रेमाचे - 9

The Author
Featured Books
Share

नाते बहरले प्रेमाचे - 9

मागच्या भागात
विक्रांत ला आरोही कुठेच दिसली नाही तो तसा वार्याच्या वेगाने खाली गेला....

आईसाहेब आरोही कुठे गेली ????...." विक्रांत पॅनीक होऊन बोलला

गेली ती नागपूर ला ...बरंच झालं ना तुला आरोही तुझ्या रूममध्ये नको होती... "आईसाहेब मोठ्याने बोलल्या

पण मला न सांगता ..." विक्रांत

हो तिने सांगितल आम्हाला सर्व.. मग आम्ही कोण आरोहीला थांबवणारे .. " संध्या काकु

का केलं असं आरोही इतकं परकं केलं मला.. जाण्याआधी एकदा पण नाही सांगितलं.. " विक्रांत डोळ्यात पाणी आणून बोलला


आता पुढे

विक्रांत विचार करत गॅलरीमध्ये आला.. त्याच लक्ष झोपाळ्याकडे गेला.. जिथे
आरोही नेहमीच दिसायची आणि हातात बुक्स.. विक्रांत ला तिथे श्वास घ्यायला पण जिवावर आलं होतं.. त्याने कारची की घेतली आणि बाहेर पडला...

बाळा कुठे जात आहे??? ..." विक्रांत ची माॅम

" माॅम बाहेर चाललोय मी ..."

" अरे पण डिनरचं टाईम झालं आहे जेवन करुन जा ..." विक्रांत ची माॅम

" माॅम नाही आहे भुक मला .." विक्रांत चिडत आणि खाली पाहत तो निघून पण गेला ..

याला काय झालं आता ...

" तुला तर बरंच वाटत असेल ना कारण तुझी सून जे नाही आहे घरात ..." आईसाहेब विक्रांत च्या माॅम कडे रोखून पाहत बोलल्या .

"असं काही नाही आहे मला तर आता माहिती झालं की आरोही नागपूर ला गेली आहे ते ...." विक्रांत ची माॅम

" हो कळतेय आरोही तुला कीती आवडते ते.... आणि लक्ष्मी आरोहीला कीती घालून पाडून बोलते हे पण माहिती आहे मला.. तुला तूझ्या मुलाचा संसार सुखाचा झालेला पहायचा नाही आहे म्हणून तुझे हे नाटकं आहेत.. " आईसाहेब

" हो ठीक आहे आईसाहेब मान्य करते ..माझं काहीही म्हणणं नाही आहे.. पण पाहीलं ना अभिषेक शी बोलतांनी काही लिमिट नाही आहे मोठा दिर आहे काही मान वगैरे आहे का त्या पोरीला .. " विक्रांत ची माॅम

लक्ष्मी अगं काय बोलत आहे.. आरोही आणि अभिषेक फक्त चांगले फ्रेंड्स आहेत आणि तुझं काय मधात ..." संध्या काकु चिडून बोलल्या कारण आरोही कशी आहे हे त्यांना चांगल माहिती आहे

" चांगले फ्रेंड्स चिपकत नाही एकमेकांना.... " विक्रांत ची माॅम हसत बोलली ...

बास् कर लक्ष्मी खूप बोलत आहे आणि तोंड सांभाळून बोलत जा ..आणि आरोहीला सून नंतर त्याआधी मुलगी मानलं आहे तिला मी ..तर अभिषेक आणि आरोहिला विनाकारण काहीही बोलू नकोस.. " विजय

तुम्ही पण मलाच बोला.. आणि आरोही साधी सरळ दाखवते स्वतःला काही दिवसांनी खरा चेहरा दाखवेन तिचा मी ..." लक्ष्मी

लक्ष्मी तुला आताच प्रेमाने सांगतोय.. आधी स्वतःला बघ ना ..कीटी पार्टी आणि बाहेर फिरण्यातून वेळ भेटला तर घरी वाकून पाहशील ....कधी विक्रांत आणि काजल ला जवळ घेऊन त्यांची विचारपूस करते का ??? नाही कस करणार तुला स्वत पासून फुरसत मिळेल तर खरं... खरं आहे ना लक्ष्मी???... " विजय

लक्ष्मी तु जा रूममध्ये.. आणि विजय आपण बसून बोलू.. " आईसाहेब वातावरण पाहून बोलल्या

" आईसाहेब तुम्ही तिला नेहमी समजून घेता ना म्हणून तिची एवढी हिम्मत झाली आहे बोलायची.. त्या दिवशी मी स्वतः ऐकलं ती आरोहीला बोलत होती.. आणि काय बोलली आरोहीला की तिची लायकी नाही आहे ह्या घरात सून व्हायची ..

विजय जाऊदे... आरोही समजदार आहे तशी.. " आईसाहेब


********

विक्रांत नेहमी प्रमाणे रुममध्ये येऊन फ्रेश होऊन बेडवर पडला.. लॅपटॉप घेऊन काम करत बसला पण त्याचा काही मन लागत नव्हता.. काय राव ह्या पोरीने झोप उडवून ठेवली आहे स्वतः तर गेली नागपूर ला.. ठिक आहे ना गेली तर. सिक्स मंथनी पण गेली असती ना.. नाही करणार मी तिची आठवण.. जाऊदे गेली तर मला काय❓❓ मी राहू शकतो एकटा.. Oh काय करु मी ती नाही आहे तर रुम खायला धावत आहे. आणि तो समीर सारखा चिपकत असतो आरोहीला . " विक्रांत एकटाच बडबड करत होता..

डोअर वर नाॅक झालं..

विक्रांत येऊ का आत.. " आईसाहेब

आईसाहेब या ना..

कसा आहेस..

मला काय झालं आईसाहेब मी बराच आहे.. " विक्रांत

असंं का मग आज जेवन का नाही केलं????.. " आईसाहेब

ते मला.. आरोही कशी काय गेली..

इतकं तोंड पाडायची काय गरज आहे...हे घ्या बायको पाच दिवसांसाठी काय नागपूर ला गेली तर तुझी ही हालत आहे.. " आईसाहेब हसून म्हणाल्या.. ( I know तुम्ही शिव्या माराल मला 😜😅😅)

म्हणजे आरोही फक्त पाच दिवसांसाठी गेली???... " विक्रांत अविश्वासाने बोलला

हो मग काय.. मी तर म्हणटलं की राह बाबा पंधरा दिवस.. आईसाहेब अजून काही बोलणार की विक्रांतच मधात बोलला..

कशाला पंधरा दिवस.. म्हणजे काॅलेज असते ना तिच.. So... माझं असं म्हणणं आहे.. विक्रांत बोलला

Oh असं का.. आरोही ला मिस करत आहे ना???.. " आईसाहेब डोळे मोठे करून बोलल्या

नाही असं काही नाही.. " विक्रांत

ओ असं असतं तर जेव्हा आरोही नागपूर ला गेली म्हणटलं तर तूझा चेहरा का पडला.. " आईसाहेब

ओके सोडून दे सर्व..

एक ऐकशील विक्रांत ??? ..

हा बोला ना आईसाहेब.. " विक्रांत

" आरोही आणि तुमचं नात सामोरं जायला तुच काही करु शकते.. बेटा माहिती आहे.. नव्या मुळे तु कुठे तरी मुलींचा तिरस्कार करतो.. पण आरोही नाही आहे बाळा तशी.. मनाने खूप प्रेमळ आहे.. "

हो आई.. मी

तु विचार कर निट.. ओके.. आणि जेवून घे आधी.. आणि फोन कर आरोही ला तिने तुला दुपारी जाण्या अगोदर काॅल केला होता.. " आईसाहेब बोलून त्यांच्या रूममध्ये गेल्या..


आणि हो काजल ,आभा ,समीर ,अभिषेक आरोही हे सर्व गेले आहेत नागपूर ला..

इतके झण लागतात का.. " विक्रांत

जाउ देना तेवढाच त्यांना फीरायला भेटेल.. नागपूर.. " आईसाहेब

ओके.. शुभ रात्री आईसाहेब.. " विक्रांत

ओके बाळा जेवन करून घे..

विक्रांत हातात फोन घेत होता.. मग खाली ठेवला ..असं करत कीती तरी वेळ फोन खाली वर केला मग फायनली त्याने आरोहीला फोन केला

हेल्लो... " समोरून आवाज आला

यार भाई बोल ना लवकर. सर्वांवर ओरडायचं असलं तर तुझ आवाज आणि स्पीड ट्रेन पेक्षा जास्त असते.. आणि हा काय टाईम आहे फोन करण्याचा.. भाई रात्रीचा वाजला आणि तु... " काजल वैतागून बोलली

ये बाई बंद कर तूझा एवढा भयानक आणि कर्कश आवाज... कळलं मला . " विक्रांत पण तिला चिडवत बोलला

भाईईई... ओके मी उठवते वहिनी ला .

काजु नको उठवू आरोहीला.. सकाळी सांग तिला काॅल करायला ...." विक्रांत

आणि ऐक.. अजून

भाई प्लीज ना झोपू दे आधीच तुमची अर्धागींनी मिसेस आरोहिने आमच्या सर्वांची वाट लावली आहे.. बरं झालं नागपूर खुप मोठा आहे नाहीतर हिने एका दिवसात पूर्ण नागपूर दाखवलं असतं ...

ओके ..झोप झोपाळू प्राणी.. विक्रांतने हसून फोन ठेवला..