nate baharle premache - 10 books and stories free download online pdf in Marathi

नाते बहरले प्रेमाचे - 10

यार भाई बोल ना लवकर. सर्वांवर ओरडायचं असलं तर तुझ आवाज आणि स्पीड ट्रेन पेक्षा जास्त असते.. आणि हा काय टाईम आहे फोन करण्याचा.. भाई रात्रीचा वाजला आणि तु... " काजल वैतागून बोलली

ये बाई बंद कर तूझा एवढा भयानक आणि कर्कश आवाज... कळलं मला . " विक्रांत पण तिला चिडवत बोलला

भाईईई... ओके मी उठवते वहिनी ला .

काजु नको उठवू आरोहीला.. सकाळी सांग तिला काॅल करायला ...." विक्रांत

आणि ऐक.. अजून

भाई प्लीज ना झोपू दे आधीच तुमची अर्धागींनी मिसेस आरोहिने आमच्या सर्वांची वाट लावली आहे.. बरं झालं नागपूर खुप मोठा आहे नाहीतर हिने एका दिवसात पूर्ण नागपूर दाखवलं असतं ...

ओके ..झोप झोपाळू प्राणी.. विक्रांतने हसून फोन ठेवला..

त्याने फोन ठेवला आणि आरोहीचा whatsapp वरचा डी. पी पाहीला

...Beautiful ❤.... " विक्रांत मनातच बोलला

*******


आरोही आणि तिची गँग मस्तपैकी ...नागपूर आणि मेन तिथला fun and food water park तिथे तिथे तर फुल धम्माल केली त्यांनी ..

यार आरु आपण कीती वर्षांनी वाॅटरपार्क ला आलो ना.. " समीर

हो.. आणि कशाला बालची खाल काढत आहे ..छान कर ना एन्जॉय... " आरोहीने त्याला पाण्यात धकललं आणि जिथे सर्व डान्स करत होते तिथे जाउन मनसोक्त डान्स केला ..

"वहिनी आपण काल पण इथेच यायला हवं होतं.. कीती मज्जा येत आहे इथे.... " काजल

" हो ना नागपुरात राहुन वाॅटर पार्क ला नाही गेलं.. ये भी कोई बात है ...मी तर एकही चान्स सोडत नाही ..." आरोही खुश होऊन बोलली

" सर्व एन्जॉय करत होते आणि आभा एका बाजूला चुपचाप उभी होती..

" आभा माझी जान काय झालं आणि असं तोंड पाडून का आहेस... " आरोही

"आरू तुला नाही का वाटत.. विक्रांत भाईला तुझ्या पास्ट बद्दल माहिती असायला हवं?????... " आभा

"आभा झालं ते गेलं ना आणी मी कशाला झालेली गोष्ट सांगून विक्रांत ला टेन्शन देऊ... " आरोही

आरू तुला नाही का वाटत तुमच्या दोघांनाही नवीन सुरुवात करायला पाहिजे ..आणि खरंच ग विक्रांत भाई वरुन जरी स्वतला कडक दाखवत असला तरी आतून प्रेमळ आहे ग.. " आभा

हो.. अजून काही.. " आरोही गोष्ट टाळण्यासाठी बोलली

" आरोही तो सुहास तुला परेशान करत आहे मग तु का नाही सांगत भाईला ???... " आभा

" आभा मला नाही वाटत तो सुहास काहीही करेल.. आणि समजावेल ना त्याला मी काही गोष्टी शांतीने समजावून सांगितलेल्या बर्या असतात
...
आरु तरी पण यार तो तुझा रोजच पिच्छा करतो.. At least समीर ला तरी सांगते.. " आभा

आभा तु काहीही कोणाला सांगणार नाही आहे.. तुला माझी शपथ... " आरोही

आभा जडमनानेच हो बोलली..

साॅरी आभा पण


तुला माहीत आहे ना सुरज च्या मॅटर मध्ये काय झालं होतं.. मला भिती वाटते ग त्याची.. सुरज माझ्या लाईफमध्ये वापस आला ना तर काय करेल मी .... " आरोही

त्याच्या नावानेही तुझा थरकाप होतोय.. तसच हा सुहास निघाला तर काय करशील??? ... " आभा

मला नाही वाटत तो सुहास काही करेल... " आरोही


आणि आभा यार आपण एन्जॉय करायला आले आहोत ना मग कशाला नको त्या गोष्टी काढून happiness वर विर्जन घालून वाट लावत आहे.. " आरोही

ओके चल आज नाचू दिवसभर.. " आभा पण थोडी चिल होऊन बोलली

अभिषेक त्याने छान सर्वांचे फोटो काढून स्टेट्स ला ठेवले.. सोबत काजल तिने तर हद्दच केली तिने सर्व फोटोज विक्रांत ला सेन्ड केले..

जो विक्रांत मिटींग मध्ये होता त्याने ह्या फोटोज पाहिल्या आणि शाॅक झाला.. आरोही एखाद्या डाॅल सारखी दिसत होती.. तिने क्राॅप हुडी वीथ डेनिम ड्रेस घातलं होतं

It looks so beautiful😍❤... " विक्रांत न राहवून बोलला..

विक्रांत त्याने आपल्या मनातले विचार बाजूला ठेवून सध्या तरी मिटींग वर फोकस केलं..


आरोहीची गॅंग चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे पण छान फिरुन आले..

( मी सांगितलेले.. Fun and food water park...नागपूर ला कधी गेलात तर तिथे नक्की जा आणि ताडोबा तर बेस्ट आहे तिथे पण जा नक्की) ..

अशे करत चार पाच दिवसांसाठी गेलेले सर्व सकाळच्या फ्लाईटने पुणे ला वापस आलेत...


★★★★★★विक्रांत सायंकाळी जेव्हा ऑफिस मधून वापस आला तेव्हा त्याला कळलं की आरोही आली असणार.. कारण तिच्या पायात नेहमी पैजन असायची.. आणि आरोही चालत असतांनी पैजनांचा आवाज एखाद्या मधूर संगितासारखा संपूर्ण घरात फिरत असायचा ...

आईसाहेब आरोही आली ना .. " विक्रांत घाईत बोलला..

हो.. तुला कसं कळलं ???.... " संध्या काकु

ते मला.. मला ते.. असंच वाटलं.. " विक्रांत अडखळत बोलला

अरे हो हो आली तुझी बायको... " आईसाहेब हसून म्हणाल्या

ओके.. बोलून विक्रांत किचन कडे जात होता..

विक्रांत भाऊजी काय हवंय तुम्हाला ????... " भाग्यश्री मुद्दाम बोलली

ते मला पाणी पाहिजे होतं.. तेच घ्यायला.. " विक्रांत अजून काही बोलणार की

अहो भाऊजी हे आहे ना पाणी.. घ्या ना.. " भाग्यश्री ने स्वत उठून विक्रांत ला पाणी दिलं..

विक्रांत ने पाणी पिलं.. आणि त्याचे पाय निघत नव्हते रूममध्ये जायला..

विक्रांत काय रे अजून काही हवंय का.. " संध्या काकु अजून शब्दावर जोर देऊन बोलल्या..

नाही नाही.. मी जातोय.. असं बोलून विक्रांत रूममध्ये गेला..

काय ग भाग्यश्री विक्रांत ला का जाऊ दिलं नाही??? .. " आईसाहेब

आईसाहेब पाहीलं नाही का विक्रांत भाऊजीं मध्ये कीती बदलाव आला आहे.. यायला वेळ नाही तर आधी आरोही चा नाव निघालं तोंडून.. " भाग्यश्री

हो ग.. विक्रांत बदलत आहे.. आधी कसा होता ना शांत शांत राहायचा.. " आईसाहेब

हो चला कुठे तरी सुरवात होतं आहे.. " संध्या काकु

*****

"आरोही रूममध्ये आली छानसा सुगंध रूममध्ये दरवळत होता.. "

वाॅव कसला भारी परफ्यूम आहे.. " आरोही परफ्यूम हातात घेऊन बोलली..

काय भारी आहे परफ्यूम की मी???.. " विक्रांत

काही नाही काय भारी असणार.. ते मी असच बोलत होती.. आरोही नजर खाली करुनच बोलली.. कारण विक्रांत शर्टलेस होता..काय मग.. मला एकदाही सांगितलं नाही ना.. त्यांची नजर आरोही वर गेली ती खुप सुंदर दिसत होती.. तिने येल्लो कलरची कुर्ती आणि व्हाईट लॅगिंन सिंपल पण खूप ब्युटिफुल दिसत होती आरोही
विक्रांत आरोही जवळ आला आणि क्षणात त्याने तिला मिठी मारली.. आरोही बिचारी शाॅक.. विक्रांत आधीच शर्टलेस होता त्यात त्याने मिठी मारली.. तिचा हार्ट बाहेर येतो की काय तिला असं झालं होतं..


मला काय होतेय.. हे विक्रांत अशे जवळ आले की मला काही सुचत नाही.. Oh god..."

वि.. क्रा.त.. तिने हळूच आवाज दिला ...

हम्म.. " विक्रांत

ते मला खाली जायचं आहे.. " आरोही

नाही जाणार आहेस तु.. मला कळत नाही खाली तु सारखी का जात असते तुला रुममध्ये नाही का राहता येत.. " विक्रांत जरा बावरलाच आरोही वर

आरोही अजून काही बोलणार की.. विक्रांत बोलला..

ओके जा पण लवकर ये मला बोलायचं आहे तुझ्याशी... " विक्रांत

ओके बोलून आरोही पळालीच तिथून.. "


डिनर करून सर्व रुममध्ये गेले.. आरोही आली पण सोबत आरुष होता..

विक्रांत ला कधी नव्हे... आज आरुष का आला असचं वाटलं..

हे.. लिटील चॅम्प.. इथे काय करत आहे.. " विक्रांत

चाचु तुम्ही बेडवलून उतरा.. " आरुष

का????.... " विक्रांत न समजून बोलला

आज मी चाची जवळ झोपणार आहे.. " आरुष

नाही कशाला जा तुझी आहे ना रुम मग.. " विक्रांत

नाही मी इथेच झोपणार्.. चाची बघ ना. .. चाचु ऐकत नाही आहेत.. " आरुष

विक्रांत ठीक आहे ना आजच झोपणार् आहे ना.. " आरोही

ओके बोलून विक्रांत तिथून उठला तर नाही पण बेडवर च्या एका कोपऱ्यात बसून लॅपटॉप घेऊन त्याच काय करत बसला..

तुम्ही कुठे झोपणार् आहात.. ???.. ' आरोही

तु झोप मला वेळ आहे .. " विक्रांत

ओके बोलून आरोही ने झोपून घेतलं छान...

" सकाळी आरोहीला जाग आलं तर ती शाॅक झाली.. विक्रांत पण तिथेच आरोही च्या बाजूला झोपला होता..


मला ना कळत नाही... विक्रांत आहेत तरी कशे.. कधी ओरडतात कधी काळजी घेतात.. आणि आज स्वतच इथे झोपले आहेत.. काय करू मी यांच.... " आरोही


बापरे कीती वेळ झालाय..

आरोहीने पण पटापट स्वतः चं आवरलं आणि खाली गेली ..

विक्रांत पण आज फ्री होता .. फ्री कसला त्याने ऑफ़िसचा काम पण घरीच आणलं होतं.. विक्रांत आणि फ्री राहणारा..

आज संडे होता त्यामुळे घरीच होते .. सर्व निवांत होऊन हाॅलमध्ये होते..


" अभिषेक आला आणि त्याने एक मोठा बाॅक्स आणला.. त्या बाॅक्स ला पाहून कोणीही समजेल की कीती पुराना आहे ते..

अभिषेक काय आहे ह्या बाॅक्स मध्ये आणि तू का आणलं... " विजय

ते काका.. हे आरोही ला द्यायचं आहे.. " अभिषेक..

विक्रांत बाहेर जात होता तो तिथेच थांबला.. त्याला पहायचं होतं की बाॅक्स मध्ये काय आहे ते.. आरोही आली..

अभिषेक काय झालं.. तुम्ही बोलावलं ना.. " आरोही

" ह्म्म आरु. तु तर मला विसरली होती.. पण मी नाही विसरु शकत तुला.. " अभिषेक बोलला..

काय तुम्हाला लाज नाही का वाटत असं सर्वांसमोर एकमेकांना विसरण्याचा गोष्टी करत आहात.. " विक्रांत ची माॅम ठसक्यात बोलली..

" तुम्हाला म्हणायचं काय आहे.. आणि माहिती नाही आहे ना काही. .. मग आधी ऐकून घ्या ना मग बोला.. तुम्ही नेहमी अभिषेक आणि माझ्या वर शक करता.. पण त्या आधी कधी माहिती करून घेतलं का आमच्यात काय रिलेशन आहे.. " आरोही रागातच बोलली.. कारण तिला माहिती होतं की विक्रांत ची माॅम तिच्या वर आणि अभिषेक वर नेहमी डाउट घेते ते.. पण आरोही काही बोलायची नाही..


पाहिलं सासू सोबत बोलतांनी तोंड कसं कैची सारखा चालत आहे.. हेच शिकवलं आहे का तूझ्या आई वडीलांनी.. " विक्रांत ची माॅम

माॅम प्लीज. .. गोष्टी कोणत्या चालू आहेत आणि तु त्या गोष्टी कुठे नेत आहे.. आणि नेहमी आई वडीलांना काढायची काय गरज आहे.. " विक्रांत पण चिडत बोलला

काहीही करा मला काय... " विक्रांत ची माॅम रागाने बोलत रूममध्ये गेली..

ओके सोड सर्व.. अभिषेक तु सांग.. " विक्रांत

आरोही बाॅक्स ओपण कर.. " अभिषेक

आरोहीने तो बाॅक्स ओपन केला.. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.. तिला काय बोलावं सुचत नव्हतं..

त्या बाॅक्स मध्ये खूप सारे गिफ्ट आणि 7 राख्या होत्या..

आरोही तु सात वर्षे कुठे होती माहिती नाही पण आता तरी तुझ्या भावाला बांधशील ना राखी???.. " अभिषेक पण इमोशनल होऊन बोलला..

साॅरी अभिषेक मी.. मध्येच काॅलेज सोडलं होतं.. त्यामुळे.. " आरोही भावुक झाली होती..

ओके काही हरकत नाही.. पण मला आताच तु राखी बांधणार आहे. .. " अभिषेक

हो चालेल.. पण मला अजून पण तूझ्या कडून गिफ्ट हवेत.. " आरोही..

घे तु पण बाकी मुलींसारखी.. गिफ्ट्स ची दिवानी.. " अभिषेक हसून त्याने आरोही ला मिठी मारली..

तिने सातही राख्या अभिषेक च्या हाताला बांधल्या..

भाई आता कसं वाटतं तुला.. कारण तु पहिल्या दिवशी मी आरोही ला मिठी मारली होती तर तू jealous🙄 झाला होता.. " अभिषेक हसून बोलला.

. असं नाही आहे काही.. " विक्रांत हसत बोलला.. पण त्याला आतून खूप आनंद झाला होता.. पण मग सांगणार कोनाला..

*******

काही दिवस असच छान चालले होते.. पण आरोही मात्र टेन्शन मध्ये असायची .. हे विक्रांत ला खटकत होतं त्याने तिला वेळ दिला..

आज घरात आनंदात होते सर्व.. .. कारण आरुष ला छोटीशी बहीण जे झाली होती..

मम्मा मी पकडते ना माझ्या छोट्या प्रिन्सेस ला.. " आरुष ओठांचा चंबू करत बोलला..

नाही बाळा लहान आहे ना.. बेबी आहे ती थोडी मोठी झाल्यावर पकडशील.. " आईसाहेब..

आई कीती छोटी आहे ना ही.. हीचे हात पाय पण कीती क्युट आणि छोटे छोटे आहेत ना.. मला पकडायचं आहे बेबीला... पकडु का मी??? ... " आरोही येवढूसा तोंड करून बोलली..

विक्रांत हसला.. त्याने बेबीला पकडून तिच्या मांडीवर दिलं..

आरोही ला जबरदस्त आनंद झाला..

आई मला विश्वास बसत नाही आहे.. मी छोटुस्या बेबीला पकडलं आहे तै..

😂.. ये बाई खरंच पकडलं आहे तु बेबीला.. ." काजल********

विक्रांत स्टडी रुममध्ये त्याच काही मिटींगस् बद्दल बोलत होता.. आरोही आली तसं त्याने काॅल कट केला..

आरोही काय झालं.. आणि बस इथे आधी.. " विक्रांत

मला तुम्हाला खूप दिवसां पासून काही तरी सांगायचं होतं.. " आरोही घाबरत बोलली..

ओके सांग.. विक्रांत आरोही चा हात पकडत बोलला..

ते मला एक मुलगा खूप परेशान करत आहे.. " आरोही

सामोरं बोल आणि कीती दिवस झाले??? .. " विक्रांत

आम..ते एक महीना झाला .. " आरोही

अजून.. " विक्रांत

मला धमकी दिली आहे त्याने मी हो नाही बोलली तर तो आत्महत्या करेल.. " आरोही..

त्याने आरोही चा हात सोडला.

विक्रांत तुम्ही.. " आरोही

माझ्या वर काहीच हक्क नाही आहे का तुझा.. ????... " विक्रांत रागाने बोलला

ते मला वाटलं तो प्रेमाने समजावलं तर समजेल पण.. तो आता खूप त्रास देत आहे.. " आरोही..

त्याने टेबल वरचा फ्लॉवर पाॅट जोरात जमिनीवर फेकला.. आरोही तु मला आता पण परकं समजत आहे ना म्हणूनच माझ्या पासून सर्व लपवून ठेवलं.. " त्याने चेअर ला जोरात लाथ मारली आणि रागाने रुमच्या बाहेर गेला..

आरोही दचकून बाजूला झाली..

विक्रांत तस नाही काही.. तुम्ही ऐकून तर घ्या ना.. एकदा.. तोपर्यंत विक्रांत बाहेर पण गेला होता..

Oh god काय करु मी.. विक्रांत चिडलेत माझ्या पासून.. आरोही डोकं पकडून बोलली..


★★★★★★

विक्रांत सकाळी रुममध्ये आला पण त्याने आरोही कडे एकदा पण पाहिलं नाही..
विक्रांत ला वाटून गेलं की तो कुठे तरी आरोही बाबतीत कमी पडत आहे..

मला आपलं मानलं असतं तर आरोहीने मला आधीच सांगितलं असतं..

विक्रांत प्लीज .. मला तुम्हाला सांगायचं होतं पण.. कसं सांगू ते कळत नव्हत.. " आरोही बोलली पण विक्रांत कुठे होता ऐकायला..

असच करत दोन तिन दिवस गेले..

पण आरोही ला कळलं होतं की विक्रांतने सुहासचा चांगलाच बंदोबस्त केला असेल म्हणून तर तो सुहास तिला दिसलाच नाही..

*****

रात्री विक्रांत आला पण.. तो सरळ स्टडी रुममध्ये गेला..

आरोही ला रागच आला विक्रांत चा केव्हाची ती विक्रांत ला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण तो ऐकेल तो विक्रांत कसला..

दुसऱ्या दिवशी

आरोही काॅलेज ला गेली पण ती नाराजच होती..

आरु काय झालं.. आणि चेहरा का पडला आहे तुझा.. " आभा

विक्रांत बोलत नाही आहेत माझ्या सोबत.. " आरोही उदास होत बोलली..

मग म्हणटलं होतं ना तुला.. की सांग आधी विक्रांत भाईला.. " आभा..

हो ठिक आहे ना झाली चूक.. मग काय आता बोलणार नाही आहेत माझ्याशी.. " आरोही रडतच बोलली..
.
ओके एक काम कर मी सांगते तुला. " आभा

ओके बोल..

ओय पागल जवळ ये अश्या गोष्टी हळूच बोलायच्या असतात..

😳🥺.. " बोल आता आरोही कान लावून ऐकत होती..

काय😧 पागल आहे का तु.. आमच्या दोघात तसलं काही नाही आहे.. " आरोही ओरडत बोलली..

ओके मग करा ना तसलं काही.. 🙈😀" आभा आरोही ला हाताचे दोन्ही कोपर मारत बोलली..

छी बाबा तु काहीही बोलते.. आणि आता मला तसं काही सांगितलं ना तर बघ खूप लाथा खाशील आज.. " आरोही आभा ला धमकावून बोलली..

ओके बाबा.. आताच जा ऑफ़िसमध्ये भाईच्या. . त्याला मनवण्याचा प्रयत्न कर.. " आभा..

ओके हि छान आहे आयडिया.. " आरोही बोलून विक्रांत च्या ऑफ़िला गेली..


विक्रांत conference call वर बोलत होता..

बाॅस आरोही मॅम आल्या आहेत.. " विकास

ओके पाठव आत.. विक्रांत ला मनातच आनंद झाला... चला काही दिवस न बोलण्याचा फायदा झाला... " विक्रांतआरोही आली तरी विक्रांत त्याच्या फोन मध्येच बिझी होता..

विक्रांत मला बोलायचं आहे तुमच्याशी.. " आरोही

हम्म बोल.. विक्रांत फोन मध्ये पाहतच बोलला..

तिने विक्रांत चा हात हातात घेतला .. तुम्ही बोलणार नाही का माझ्या सोबत.. माझ्या वर जितकं ओरडायचं आहे ओरडा मला नाही सहण होत तुमचा अबोला .. . आरोही आता रडलीच..

मला नाही होत सहण त्रास होतो मला तुम्ही माझ्याशी नाही बोलत आहात तर.. आरोही

साॅरी त्याने आरोही ला मिठीत घेऊन तिला विक्रांत प्रेमाने बोलला.. त्याचा राग तर केव्हाच गेला होता पण त्याला माहिती करून घ्यायचं होतं की आरोही च्या मनात त्याच्या बद्दल काय आहे..

रडुबाई रडू नकोस.. " विक्रांत हसत बोलला

नाही आहे मी रडू बाई.. " आरोही चा नाक रडून पार लाल झाला होता..

हो मग सांग.. तुला इतका का त्रास होत आहे मी तुझ्याशी नाही बोलत तर.. " विक्रांत आता आरोही कडे रोखून पाहत बोलला..

ते नाही माहीती मला.. " आरोही नजर चोरून बोलली..

ओके बोलून विक्रांतने आरोही चा हात पकडला आणि तो बाहेर आला.. बाहेर सर्व दोघांकडे आश्चर्याने पाहत होते..

ऑफ़िस मधल्या सर्व मुली आरोही ला विक्रांत सोबत पाहून जळत होत्या.. आणि बाकी मुलं तर आरोही वर ऑलमोस्ट फिदाच झाले होते..

*********

तर दुसरीकडे

विक्रांत ची माॅम नव्या सोबत एका कॅफेमध्ये बसल्या होत्या..

तुम्ही कामाच बोलाल का???.. " नव्या वैतागून बोलली

मला आरोही आणि विक्रांत ला वेगळं करायचं आहे.. आणि तु मदत करणार आहे माझी... " विक्रांत ची माॅम

ओहो.. द विक्रांत सोरते च्या माॅमला माझी हेल्प हवी.. " नव्या हसत बोलली..

हो.. आणि तुला जेवढा पैसे पाहिजे मी देईल तुला.. " विक्रांत ची माॅम

तुम्हाला काय वाटते.. मला पण आनंद होतो का त्या दोघांना सोबत पाहून.. तुम्ही नाही बोलल्या असता तरी पण मी त्या दोघांना वेगळं करणार आहे.. " नव्या


ओके.. पण मी असं का करणार की विक्रांत माझ्या कंन्ट्रोल मध्ये येईल.. " नव्या

त्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न कर.. आणि एका पुरुषाला काय हवं असते बाई कडून ते दे त्याला.. तुमच्यात आधी पण काही झालं असेल ना??? ... विक्रांत ची माॅम

काय बोलत आहात.. तो तुमचा मुलगा कीती unromantic आहे माझ्या जवळ येणं तर दुरची गोष्ट त्याने मला कधी kiss पण केलं नाही.. " नव्या रागात आणि हसून बोलली..

आरोही आलीच नसती विक्रांत च्या लाईफमध्ये.. जर तु त्याला धोका दिली नसती तर.. सो असो काही पण विक्रांत तुझ्या वर प्रेम करत होता तुझ्या शरीरावर नाही.. मानलं पाहिजे छान फ