Hari - 3 books and stories free download online pdf in Marathi

हरि - पाठ ३

हरि पाठ १०
हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥
राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥२॥न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥
नाम म्हणे राम आम्हां हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥४॥
११
करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें ॥१॥
जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां विवेक स्मरें राम ॥२॥
तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥
नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥४॥
१२
मायेचीं भूचरे रज तम सात्त्विक । रामनाम एक सोडवणें एक ॥१॥
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । नामें घडती यज्ञ कोटी देवा ॥२॥
न लगती साधनें नाना मंत्र विवेक । रामनामीं मुख रंगवी कां रे ॥३॥
नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां। नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ॥४॥
१३
माझें मी करितां गेले हे दिवस । न धरीच विश्वास राम नामीं ॥१॥
अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ॥२॥
कां करिशी सांठा प्रपंच विस्तार। न तुटे येरझार नामेंविण ॥३॥
नामा म्हणे ऐसें रामनामीं पिसें । तो उद्धरेल आपैसें इहलोकी|

॥४॥

१४
नको नको माया सांडीं लवलाह्या । पुढील उपाया झोंबें कां रे ॥१॥
राम नाम म्हणे तुटेल बंधन । भावबंधमोचन एक्या नामें ॥२॥
स्मरतां पतित उद्धरेल यतार्थ । नाम हाचि स्वार्थ तया झाला ॥३॥
नामा म्हणे हा जप करी तूं अमूप । नामें चुके खेप इये जनीं ॥४॥
१५
स्मरण करितां रामनामध्वनी । ऐकतांचि कर्णीं पळती यम ॥१॥
नामपाठ करा राम कृष्ण हरी । होतील कामारी ऋद्धि सिद्धि ॥२॥
साध्य तेंचि साधीं न करी उपाधी । जन्मांतरीच्या व्याधी हरती नामें ॥३॥
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव । नाहीं आणिक देव रामेंविण ॥४॥

१६
रामकृष्णमाळा घालितां अढळ । तुटेल भवजाळ मायामोह ॥१॥
होशील तूं साधु न पावती बाधु । पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टेल तुज ॥२॥
जपतां रामनाम पुरती सर्व काम । आदि अंति नेम साधेल तुज ॥३॥
नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ । न लगती ते अर्थ मायापाश ॥४॥
१७
शरीर संपत्ती मायेचें टवाळ । वायांचि पाल्हाळ मिरवितोसी ॥१॥
नाम हेचि तारी विठ्ठलनिर्धारीं । म्हणे हरी हरी एक वेळां ॥२॥
स्मरतां गोपाळनामा वंदितील यम । न लगती नेम मंत्रबाधा ॥३॥
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेंचि नाम स्मरें कां रे ॥४॥

१८
कृष्णकथा संग जेणें तुटे पांग । न लगे तुज उद्योग करणें कांहीं ॥१॥
समर्थ सोयरा राम हा निधान । जनीं जनार्दनीं एक ध्यायी ॥२॥
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार । तुटेल येरझार भवाब्धीची ॥३॥
१९
भवाब्धीतारक रामकृष्ण नांव । रोहिणीची माव सकळ दिसे ॥१॥
नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर । वैकुंठीं बिढार रामनामें ॥२॥
राम हे निशाणी जपतांची अढळ । वैकुंठ तात्काळ तया जीवा ॥३॥
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल । अंतीं तुज पावेल राम एक ॥४॥
२०
जळाचा जळबिंदु जळींच तो विरे । तैसें हें विधारे पांचाठायीं ॥१॥
जीव शिव विचार नाम हें मधुर । जिव्हेसी उपचार रामनाम ॥२॥
रामनाम तारक शिव षडक्षरी । तैची वाचा करीं अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे ध्यान शिवाचें उत्तम । मंत्र हा परम रामनाम ॥४॥

२१
करितां हरिकथा नाम सुखराशी । उद्धरी जीवासी एका नामें ॥१॥
तें हें रामनाम जपे तूं सप्रेम । जप हा सुगम सुफळ सदा ॥२॥
नामेंचि तरले नामेंचि पावले । नाम म्हणतां गेले वैकुंठासी ॥३॥
नामा म्हणे एका नामेंसी विनटे । ते वैकुंठींचे पेठे पावले देखा ॥४॥
२२
नामावांचूनि कांहीं दुकें येथें नाहीं । वेगीं लवलाहीं राम जपा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ । पावसी केवळ निजपद ॥२॥
धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामेंचि चित्पद पावले देख ॥३॥
नामा म्हणे राम वाचे जपा नाम । संसार भवभ्रम हरे नामें ॥४॥

२३
म्हणतां वाचे नाम वंदी तया यम । काळादिक सम वंदी तया ॥१॥
ऐसें नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ । उच्चारितां नीट वैकुंठ गाजे ॥२॥
तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा। न कळे तया उपमा आदिअंतीं॥ ३॥
नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटें । तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी ॥४॥
२४
विष्णुनाम श्रेष्ठ गाती देवऋषी । नाम अहर्निशी गोपाळाचें ॥१॥
हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि । असे चराचरीं जनार्दना ॥२॥
आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी । उमेप्रति करी उपदेश ॥३॥
नामा म्हणे नाम महाजप परम । शंकरासी नेम दिनदिशीं ॥४॥
२५
कां करतोसी सीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज ॥१॥
राम कृष्ण हरी नारायण गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ ॥२॥
वंदील तो यम कळिकाळ सर्वदा । न पावसी आपदा असत देही ॥३॥
नामा म्हणे ओळंग शीण झाला संगें । प्रपंच वाउगे सांडी परते ॥४॥