Hari - 7 books and stories free download online pdf in Marathi

हरि - पाठ ७

हरिपाठ

२१
ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥
नामचेनि बळे कळिकाळ आपणा । ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २॥
न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥
निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥
२२
नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २॥
ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥
निवृत्ति अव्यक्‍त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥
२३
अखंड जपतां रामनाम वाचे । त्याहूनी दैवाचे कोण भूमी ॥ १॥
अमृतीं राहिले कैचें मरण । नित्यता शरण हरिचरणा ॥ २॥
नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी । नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या ॥ ३॥
निवृत्ति म्हणे सार रामनाम मंत्र । कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं ॥ ४।।

२४
नाम नाहीं वाचे तो नर निर्दैव । कैसेनि देव पावेल तया ॥ १॥
जपे नाम वाचें रामनाम पाठें । जाशील वैकुंठे हरी म्हणता ॥ २॥
न पाहे पैं दृष्टीं कळिकाळ तुज । रामनाम बीज मंत्रसार ॥ ३॥
निवृत्ति म्हणे नाम जपावें नित्यता । आपणचि तत्त्वतां होईल हरी ॥ ४॥
२५
नामाचेनि बळें तारिजे संसार । आणिक विचार करूं नको ॥ १॥
नाम जप वेगीं म्हणे हरी हरी । प्रपंच बोहरी आपोआप ॥ २॥
नित्यता भजन देवद्विज करी । नाम हे उच्चारि रामराम ॥ ३॥
निवृत्ति जपतु राम राम वाचे । दहन पापाचें आपोआप ॥ ४॥

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्‍ति चारी साधियेल्या ॥ १॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४॥

चहूं वेदीं जाण षट्‌शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन ॥ ३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४॥

त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १॥
सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २॥
अव्यक्‍त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४।।


भावेंवीण भक्‍ति भक्‍तिवीण मुक्‍ति । बळेंवीण शक्‍ति बोलूं नये ॥ १॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १॥
सायासें करिसी प्रपञ्च दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४॥

योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १॥
भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३॥
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४॥

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १॥
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २॥
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्‍त ॥ ३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४॥


पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्‍तांसी ॥ १॥
नाहीं ज्यांसी भक्‍ति ते पतित अभक्‍त । हरीसी न भजत दैवहत ॥ २॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥ ३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥ ४॥

संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २॥
एकतत्त्वी नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ ४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६॥