Hari - 4 books and stories free download online pdf in Marathi

हरि - पाठ ४

हरिपाठ

२६
नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥
विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥३॥
नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामें ॥४॥
२७
सर्वांभूतीं भजें नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥
ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥
न लगतीं साधनें वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥
नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्‍ता ॥४॥

२८
तूं तव नेणता परि हरि तो जाणता । आहे तो समता सर्वां भूतीं ॥१॥
सर्वब्रह्म हरि एकचि निर्धारी । होशी झडकरी ब्रह्म तूंचि ॥२॥
अच्युत माधव अमृताच्या पाठें । लागतांचि वाते वंदी यम ॥३॥
नामा म्हणे होशी जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता ॥४॥
२९
कां करिसी सोस मायेचा असोस । नव्हे तुझा सौरस नामेंविण ॥१॥
नामचेचि मंत्र नामचेचि तंत्र । नामविण पवित्र न होती देखा ॥२॥
तिहीं लोकीं काहीं नामेंविण सर्वथा । अच्युत म्हणतां पुण्यकोटी ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म आदि अंतीं नेम । तें विटेवरी सम उभें असे ॥४॥
३०
पवित्र परिकर हा उच्चार । उद्धरण साचार जगासी या ॥१॥
गोविंद केशव उच्चारीं श्रीराम । न लगती नेम अमूप जप ॥२॥
तें हें विठ्ठलरूप पिकलें पंढरीं । नाम चराचरीं विठ्ठल ऐसें ॥३॥
नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल । उच्चारितां मोल न लगे तुज ॥४॥

३१
पोशिसी शरीर इंद्रियांची बाधा । शेखीं तें आपदा करील तुज ॥१॥
नव्हे तुझें हित विषय पोषितां । हरी हरी म्हणतां उद्धरसी ॥२॥
वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी । परी नाम न म्हणसी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे हेचि पंढरीये निधान । उच्चारिता जन तरले ऐसें ॥४॥
३२
विषय खटपट आचार सांगसी । विठ्ठल न म्हणसी अरे मूढा ॥१॥
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी । अंतीं हा निर्धारीं तारील सत्य ॥२॥
न लगे सायास करणें उपवास । नामाचा विश्वास ऐसा धरीं ॥३॥
नामा म्हणे प्रेम धरीं सप्रेम । विठ्ठल हाचि नेम दिनदिशीं ॥४॥
३३
नव्हे तुज हित म्हणतां विषय पोषिता । हरी हरी म्हणतां तरशील ॥१॥
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी । वेगीं हें उच्चारीं लवलाहीं ॥२॥
घडतील यज्ञ पापें भग्न होत । प्रपञ्च सर्वत्र होईल ब्रह्म ॥३॥
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा । उद्धरसी सर्वथा भाक माझी ॥४॥

३४
उपदेश सुगम आइके रे एक । नाम हें सम्यक विठ्ठलाचें ॥१॥
जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ॥२॥
साधेल निधान पुरेल मनोरथ । नामेंचि कृतार्थ होसी जनी ॥३॥
नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी । पावशी निर्धारीं वैकुंठपद ॥४॥

श्री निवृत्ति महाराज हरिपाठ


हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचे ॥ १॥
रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ॥ २॥
नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नेणो आम्ही ॥ ३॥
निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं केशीराज ॥ ४॥

हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामें ॥ १॥
विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे । जेथें तेथें सांग रामनाम ॥ २॥
व्यासादिक भले रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ॥ ३॥
शुकादिक मुनि विरक्‍त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलें ॥ ४॥
चोरटा वाल्मीकि रामनामीं रत । तोही एक तरत रामनामीं ॥ ५॥
निवृत्ति साचार रामनामी दृढ । अवघेचि गूढ उगविले ॥ ६॥


हरिमार्ग सार येणेंचि तरिजे । येरवीं उभिजे संसार रथ ॥ १॥
जपतां श्रीहरी मोक्ष नांदे नित्य । तरेल पैं सत्य हरि नामें ॥ २॥
काय हें ओखद नामनामामृत । हरिनामें तृप्त करी राया ॥ ३॥
निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ॥ ४॥

एकेविण दुजें नाहीं पैं ये सृष्टी । हें ध्यान किरीटी दिधलें हरी ॥ १॥
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला । द्वैताचा अबोला तया घरीं ॥ २॥
हरीविणें देवो नाहीं नाहीं जनीं । अखंड पर्वणी हरी जपतां ॥ ३॥
निवृत्ति साकार हरिनाम पाठ । नित्यता वैकुंठ हरिपाठ ॥ ४॥