Night Games - Episode 13 books and stories free download online pdf in Marathi

रात्र खेळीते खेळ - भाग 13

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रकाश गिळूनच टाकला. तो दरबारही रिकामा झालेला. खालची जमीन हादरू लागली. व वीरच्या कानावर एक आवाज येवू लागला. तस त्याच मन जास्तच अस्वस्थ झाले.
वीर ये वीर वाचव वाचव मला........... राजचा आवाज त्याच्या कानी येत होता....
तो हळूहळू येणाऱ्या आवाजाचा वेध घेत त्या अंधारात चाचपडत पुढे चालला...
तोपर्यंत दुसऱ्या बाजूने आणखी एक आवाज येवू लागला...
वीर वीर इकडे ये ना आधी हा हा माणूस मला मारायला येतोय बघ ये ना लवकर प्लिज... अनुश्रीचा रडवेल्या स्वरूपात आवाज येत होता.....
त्याला कळेना नेमक कोठे जाव आधी दोन्हीकडून दोन दोघे जण त्याला बोलवत होते.....
तोपर्यंत अचानकच त्याच्या पाठीमागून कोणीतरी जोरात धावत गेल तो तर गरकन मागेच वळला.... पण जसा मागे वळला तसा त्याचा तोल गेला कारण तो जिथे उभा होता तिथून खाली जीना होता.... तो त्या जिन्यावरून घरंगळत खाली गेला.. त्याला जागोजागी खरचटल... परत त्याला आवाज ऐकू आला... ये वीर ये ना इकडे प्लिज वाचव मला ही बाई माझ्याकडे चाकू घेऊन येत आहे. ये ना प्लिज.... तो जिथे होता तिथून काही अंतरावरून अधिराजचा आवाज कानी येत होता.... त्या येत्या आवाजाने परत तो तसच स्वतः ला सावरत उठला.... अचानक वीरला काहितरी क्लिक झाल व तो मोठ्याने म्हणाला तेरी मेरी यारी........ यावेळी मात्र सारे आवाजच बंद झाले.. व एक मोठ्याने हसण्याचा आवाज येवू लागला.... तसच विचकळत बोलण्याचा.... हुषार हुषार हाइसा र पोरांनो पर तुमची हुषारी फार नाय चालायची..... जरी एकमेकांना वळकत असशीला तरीबी तुम्हची भेट नाय व्हायची... इथ आमचच राज्य हाय.... आणि अचानकच वीर जिथे होता तिथे एक जंगली श्वापद येवू लागल. वीरला मात्र याची खबरच नव्हती कारण तिथे फक्त अंधारच दिसत होता... ते जंगली श्वापद त्याचा वास घेत घेत त्याच्याकडेच झडप घालण्यासाठी येत होत... ते श्वापद जास्तच जवळ आल तस वीरला त्याचा आवाज येवू लागला... त्याने तसच सार बळ एकवटल आणि दुसऱ्या बाजूने जावू लागला...
तो तसच धडपडत पुढे जावू लागला तस त्याला परत आठवण झाली कि आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. काहीही करून आपल्याला यांचा सामना करत पुस्तक शोधलच पाहिजे....
तो पुढे जातच होता कि एक काळी आकृती त्याच्या जवळ आली व तीने त्याचा पाय जोरात ओढला. तो आहे तसाच मागे पडला ... परत जिथे खरचटल होत. तिथे त्या काळ्या आकृतीच्या नखाने परत वार केला तस त्याची ती खरचटून बाहेर आलेली खपली बाहेर आली व त्यातून रक्त बाहेर येवू लागल तस वीरला जोरात कळ आली तरीही त्याने मनाशी केलेला निश्चय ढळू दिला नाही त्याने त्या आकृतीला जोरात बाजूला ढकलल. तस ती दूरच फेकली गेली व हवेत तरंगत तरंगत परत त्याच्याकडे येवू लागली.. त्याला ती आकृती परत येत आहे हे जाणवताच तो तसाच एके ठिकाणी एका वस्तू असल्याच्या जाणीवेने त्या वस्तूला स्पर्श करून पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो बेड आहे तो तसाच चाचपडत त्या बेडखाली गेला.. त्याला वाटल ती आकृती जाता क्षणी बाहेर पडूया पण तिथे तर आणखी एक संकट त्याची वाट पाहत थांबलेल तो जिथे होता.... तिथेच एका बाजूला एक प्रेत होत. जे त्याला पाहून खुष झाले.. वीरला याची जरा पण कल्पना नव्हती.... तो धाप टाकत तसाच थांबलेला... त्याने हातात एक चाकू घेतलेला... त्याने वीर वर चाकू फिरवायला हात पुढे केला... तोच वीरला कोणीतरी जोरात बाहेर ओढल...........‌...

कावेरीची हालत खराब होत होती तरीही ती ने स्वतः ला सावरल तिला काहीही करून इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायचा होता.... कावेरी तशीच स्वतः ला आधार देत डोक्याला लागलेल्या वेदनेचा स्वतः लाच विसर पाडण्याचा प्रयत्न करत तशीच पुढे पुढे चालली होती... अचानकच तिचा पाय एका खड्ड्यात गेल्यासारखा खाली गेला.... त्यामुळे ती खाली घसरत गेली... तिला आपण कोठे आलोय हे तर कळले नाही पण आपण कोणत्यातरी खडड्यात फसलोय अस मात्र जाणवल. त्याचबरोबर आता यातून आणि कस बाहेर पडायच याची चिंता मनात डोकावू लागली...
नको नको हरवू कावू तुम्हाला एकत्र यायच आहे.. तू जिथे आहेस तिथून समोर चालत जा. तिथे पाण्याचा आवाज येईल... त्या भिंतीला लागून पलिकडे तुला मार्ग सापडेल..... पण तुला ती भिंत पाडावी लागेल.... हे काम खूप अवघड आहे.... पण तुला आपल्या सगळ्यांसाठी करावच लागेल.... आणि हो त्या नदिपाशी मार्ग सुद्धा आहे आणि धोका सुद्धा आहे... तुला सावध राहून मनाला विचलीत न होवू देता.... तिथे जायला हव... कारण त्या नदीमुळेच मार्ग सापडत जरी असला तरी तिथली जमीन, नदितल पाणी, पक्षी, प्राणी, तुला घेता येत असलेला श्वास, वर पसलेल आकाश, त्यातल्या चांदण्या.. इतकच नव्हे तर तिथ गेल्यावर तुझ स्वतः च शरीर सुद्धा तुला मारण्यासाठी आसूसलेल असू शकत कारण ती जा सगळ्यात जास्त शापित आहे.... म्हणूनच तिथे जो कोणी जाईल तो शापितच होतो... त्यासाठी तुला इथेच तयारी करून जाव लागेल..... अस म्हणून तो आवाज ऐकू यायचा बंद झाला...
तस कावेरी विचारू लागली... कोण कोण तुम्ही आणि माझी मदत का करत आहात...
ते आता महत्त्वाच नाही आहे. वेळ आली कि कळेलच....
कावेरी परत सांगा ना कोण ते विणवू लागली.... पण तो आवाज बंदच झाला....
कावेरी विचार करू लागली आता हे काय नवीनच त्या झुंबरापर्यंत पोहोचणारच होतो तोपर्यंत त्या बाईने इथे आणल... आणि आता हा आणि कसला मार्ग म्हणायचा. असली कसली ही आपली फरफट चालले....

हो फरफट तुमच्या सगळ्यांची चालली आहे पण काय तर करण्यासाठी फरफटाव पण लागत आपल्याला आणि आपल्या समोर जितक्या अडचणी येतात तितकेच मार्ग पण असतातच पण आपण अडचणींकडे इतक लक्ष देतो काही वेळेला समोरचे किंवा जवळचे मार्ग पण पाहू शकत नाही.... परत तोच आवाज कावेरीला ऐकू आला...

कावेरी मनातच म्हणू लागली.. यांचा आवाज कोठे तरी ऐकल्यासारखा वाटतोय.. पण कोठे.....

त्याचा आता विचार करू नको.... ते समजेलच तुला... सांगेन मी स्वतः च पण आता बाहेर कस पडायचा याचाच विचार करा तुमच्याकडे वेळ कमी आहे..... तुझ्या मित्रांना काही होण्याआधीच तुला त्यांच्यापर्यंत पोहोचाव लागेल.... चल जाते आता मी माझी वेळ संपली अस म्हणून तो आवाज परत बंद झाला....

कावेरी आता तिथपर्यंत पोहोचण्याबाबत विचार करू लागली........ तिला त्या ऐकू आलेल्या आवाजाने जणू नवीनच ऊर्जा मिळालेली तसच पुन्हा एकदा विश्वास निर्माण झालेला आपण बाहेर पडू शकतो असा......