Excitement unfolded books and stories free download online pdf in Marathi

उत्कंठा अनावरली

आज नितीन फारच खुश होता, कारण त्याला आज ६ महिन्यानंतर एकदाची सुटी मिळाली होती. पहाटे लवकर उठून तो घरी जाण्याची तयारी करू लागला. पॅकिंगमध्ये तेव्हा त्याचे चीत्त नव्हते, कारण कि त्याला ओढ लागली होती ती त्याचा चिमुकलीला भेटण्याची. हो नितीन ला २ वर्षांची बाहुली सारखी कन्या आहे. तीला बघून, तीचे लाड करुन आज त्याला जवळ जवळ ६ महिने होत असतील. सोबतच त्याला पत्नींचा सहवास सुद्धा लाभलेला नव्हता. शितल हे त्याचा पत्नीचे नाव. शितल हि दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक व्यक्तीमत्वाची स्त्री आहे. तर तीच्यापासून ६ महिने आणि या उफानलेल्या तारुण्यात तीचा स्पर्शापासून दुर रहाणे फारच कठीण होता तो काळ. तर जाऊदे या दोघांना भेटण्याची उत्कंठा नितीनचा डोक्यावर स्वार झाली होती. सर्व पॅकिंग आटपून तो नीघणार तोच अचानक त्याचा फोन वाजला. बघतो तर काय बाॅसचा नंबर त्याला दिसला.
बाॅसचा फोन उचलू कि नाही या पेचात तो पडला. मग पटकन त्याला आठवले कि मला सूटी मिळाली आहे तर कशाला घाबरायचे. त्याने फोन उचलला तर बाॅसने त्याला अर्जंट ऑफिसला बोलावले. नितीन बाॅसला म्हणाला कि सर मी सूटीवर आहे. बाॅस समोरून म्हणाला, सूटी बूटी ठिक आहे फक्त ५ मिनटांचे काम आहे. ते करून येथूनच तू निघून जा. नितीनला बाॅसचा स्वभाव ठाऊक होता. तर त्यानं विचार केला जे काहि असेल लवकर आटपून निघून जाईल. तर तो ऑफिसला गेला, ऑफिसमध्ये गेस्ट आलेले होते. बाॅस त्यांचासोबत बोलत होते. या परिस्थितीत त्याना डिस्टर्ब करायचे म्हणजे वाघाचा तोंडात हात घालायचा. म्हणून नितीन बाहेरच वाट बघू लागला. बघता बघता १ तास जवळ जवळ होत आला. बाॅस बाहेर आलेच नव्हते, आणि आता नितीनची उत्कंठा अधिकच वाढू लागली. त्याने ठरवीले कि बाॅस समोर जाण्यास काही युक्ती करावी लागेल. त्याने थेट बाॅसचा काचेचा कॅबीन समोर बाॅसला दिसेल अशाप्रकारे त्यांचा तोंडासमोर हालचाल सूरू केली. बोलता बोलता बाॅसचे लक्ष गेले. त्यांनी नितीनला आत बोलावले, आणि म्हणाले अरे मी तूला १ तासापूर्वी बोलावले होते, तू उशिरा का बरं आलास. तेव्हा नितीनने सांगीतले सर मी १ तासापूर्वीच आलो बाहेर प्रतीक्षा करीत होतो. तर बाॅसने म्हटले अरे काहि नाही तू अमरावतीला जात आहेस तर हा लीफ़ाफा या पत्यावर देऊन जाशील म्हणून बोलावले होते तूला आता तू जाऊ शकतो.
लीफाफा घेऊन नितीन तातडीेने ऑफिसचा बाहेर पडला. त्यांचे सर्व लक्ष आपल्या चिमुकलीकडे लागले होते. त्याचप्रमाणे तीला बघण्याची, तीचे लाड करण्याची, तीचा पापा घेण्याची उत्कंठा आता अधिकच वाढू लागली होती. नितीन म्हणाला आता ११ वाजले आहेत. मला ४ वाजताची बस पकडायची आहे. तर ठिक आहे जाताना पटकन बाॅसचे काम करतो आणि निघून जातो. म्हणून तो त्या पत्यावर लिफाफा देण्यास गेला. तेथे पोहचून तो पत्ता शोधू लागला. त्याला ते घर सापडले ते बाॅसचा नातलगाचे घर होते. घर सापडताच नितीन लिफाफा देण्यास गेटसमोर गेला आणि म्हणाला पटकन लिफाफा देतो आणि निघतो. परंतु हे काय गेट आणि घर बंद होते. तेथे मोठा ताला दाराला लागलेला होता. अरे देवा आता काय करु, म्हणून त्याने बाॅसला फोन लावला. त्याने बाॅसला सर्व परिस्थिती सांगीतली. बाॅसने नातलगाशी बोलून तूला सांगतो म्हणून तेथेच थांबण्यास सांगीतले. नितीन वाट बघू लागला, बाॅसचा काही फोन आलाच नाही. इकडे नितीनला चिमुकलीची खूपच आठवण येऊ लागली. जसे बाळावीना जन्मदेत्या आईच्या स्तनातून दूध ओसरते, तसेच नितीनचा हृदयात बापाचे प्रेम ओसरू लागले होते. बघता बघता १ तासाचा वर वेळ होऊन गेली बेचैन होउन त्याने पुन्हा बाॅसला फोन लावला. बाॅस समोरून म्हणाला, अरे मी वीसरलो आणि झोपून गेलो होतो. मी आता नातलगाला फोन लावतो. बाॅसचे कथन ऐकून नितीनचा राग तळपायांमधून मस्तकापर्यंत गेला. मोठ्या लोकांचा वेळेला किंमत आहे आणि आमचा सामान्य माणसाचा वेळेला नाही म्हणत तो बडबड करु लागला. त्याचबरोबर त्याची उत्कंठा अधिकच अनावर होऊ लागली. तो रागाने निराशेने कासावीस होऊ लागला. देवा या हरामखोराला लवकर पाठव मला माझा छकुलीकडे जायचे आहे. त्याने पून्हा बाॅसला फोन लावला, तर यावेळेस बाॅसने आवाज वाढवून म्हटले तूला धिर नाही काय? तुझ्यासारखे रिकामे आहेत काय ते. रस्त्यातच आहेत ते येउन राहिलेत तेथेच थांब आणि खबरदार त्यांना भेटल्याशिवाय गेलास तर. आता तर नितीन आगीप्रमाणे तापला होता. त्याने निर्णय केला या अशा निर्दयी माणसाचा कामाला लाथ मारायची. सरळ त्याला त्याची औकात दाखवीतो म्हणून तो बाॅसला फोन करणार इतक्याच बाॅसचा नातलग आला. नितीनने सर्व काही विसरून पटकन त्याला लिफाफा दिला आणि तेथून निघाला. तो निघाला तेव्हा ३ वाजले होते त्याने पटकन बस स्टॅंडला जाण्यास ऑटो केला. ऑटोने त्याला ३.३० वाजता स्टँड वर सोडले. तेथे पोहचून तो बस शोधू लागला पण त्याला बस दिसत नव्हती. त्याने विचार केला बस यायची असेल म्हणून तो वाट बघू लागला. बघता बघता ४ वाजले आता त्याची उत्कंठा त्याला बसू देत नव्हती. त्याने पटकन चौकशी केली तर त्याला समजले कि बस खराब झाली आहे, आता शेवटची ७ वाजताची बस जाणार आहे. हे ऐकून नितीनला आता खूपच केवीलवाण वाटू लागले. राहून राहुन त्याला दिवसभरातील एक एक क्षण आठवून राहून राहून पश्चाताप होत होता. त्याला राहिण्यासे झाले तरी आपल्या बाळाचा त्या सुंदर आठवणीत त्याने ती कातरवेळ काढली. ७ वाजताची बस स्टँडवर लागताच त्याला परमानंदाची अनुभूती झाली. आता त्याला परिवारजनांना भेटण्याची आशा दिसू लागली. बस ७.१५ वाजता तेथून निघाली आणि नितीन आपल्या छकुलीचा सुंदर आठवणीत खूपच रंगून गेला होता. तेव्हाच त्याला झटका बसला आणि बस थांबली. बस डोंगरघाटात उभी होती, सगळ्यांनी विचारले काय झाले. तर ड्राइव्हरने सांगीतले पूढे दरड कोसळली आहे, रस्ता बंद झाला आहे. आता सकाळी जेव्हा दरड येथून हटवली जाईल तेव्हाच पूढे जाईल. ऐवढे ऐकून नितीनची उत्कंठा आता अधिकच अनावर झाली आणि तो अक्षरशः किंचाळी मारून रडू लागला. त्याची छकुली ला भेटण्याची आशा आता निराशात बदलून गेली होती. चटकन त्याचा लक्षात आले कि निदान व्हिडिओ काॅल करून अस्वस्थ मनाला शांत करून घेतो. नियतीने तेथेही त्याचा उतावीळ मनाशी खेळ सूरुच ठेवला होता. जेथे तो अडकला होता तेथे मोबाइलला कवरेजच नव्हता. यानंतर तर त्याचा उत्कंठेचा उद्रेकच झाला आणि तो हताश निराश होऊन ओरडला नको रे देवा आता बस कर माझी परिक्षा आता रहावत नाही आणि तो जोरजोराने रडू लागला.
स्वलिखित
गजेंद्र गोविंदराव कूडमाते