RIMZIM DHUN - 15 books and stories free download online pdf in Marathi

रिमझिम धून - १५

'बाहेर पुन्हा गाडीचा हॉर्न वाजला होता. मंगेश बाहेर आला. हॉलमध्ये आल्यावर जुईने पहिले, फारुख भाई तिथे आले होते. अर्जुनचे दुसरे बॉडीगार्ड.'
''अरे मॅडम आप, कैसे है? और यहा कैसे ?'' तो हात दाखवत म्हणाला.

''मॅडम डॉक्टर आहेत. पेशण्टच्या उपचारासाठी बोलावून घेतलं.'' मंगेश त्याला सांगत होता.

''आपसे मिलने के बाद साहब बी खोंये खोंये रहेते हैं, कुछ दवा दुवा दे दो.'' म्हणत फारुख भाई बॅग ठेवून खाली सोफ्यावर बसला. मंगेश हसायला लागला. जुईला काय बोलावं कळेना. ती गालातच स्माईल देऊन वरती पळाली. 

''फारुख सेठ क्या खबर हैं?''  एवढ्यात अर्जुन तिथे आला होता. त्याला बघून सगळे एकाएकी शांत झाले. आणि फारुख त्यांना केसच्या संबंधी माहिती देऊ लागला. जुई पेशंटला चेक करून वरती येऊन झोपली होती. अर्जुन आणि मंगेश केस च्या संदर्भित गोष्टीवर स्टडी करत बसले. थोडं डिस्कशन आणि प्लॅनिंग झाल्यावर फारुख आणि मंगेश झोपायला निघून गेले. आणि अर्जुन एकटाच विचार करत बसून राहिला.  मावशींनी येऊन त्याला झोपायला जायला सांगितले आणि तो आपल्या विचाराच्या तंदरीतून जागा झाला. 

दार उघडून तो रूममध्ये आला. जुई बेडच्या एका बाजूला कुशीवर हातात एक उशी घेऊन झोपलेली होती. तिच्या अंगावर एक ब्लॅंकेट घालून तो बाजूला आडवा झाला. पण झोप काही लागत नव्हती. त्याने बाजूला पहिले. बेडच्या टोकाला जुई शांत झोपली होती. तो तिच्या जवळ गेला. हळूच तिच्या गालावरून हात फिरवत त्याने तिच्या डोक्यावर ओठ टेकले होते. आणि त्याच्या स्पर्शाने जुईला जाग आली. डोळे किलकिले करत तिने त्याच्याकडे पहिले.
''अर्जुन अजून झोपला नाहीय?''

''झोपतोय. तू ती उशी घेऊन का झोपतेस?'' अर्जुन उशी तिच्या हातातून घेत म्हणाला.

''सवय झाली. का रे?'' जुई

''सवयी बदल आता. ठेव ती बाजूला, आणि ये इकडे.'' उशी बाजूला करून तो तिच्या जवळ आला. जुई सरकत त्याच्या जवळ जाऊन हातावर डोकं ठेवून झोपली.

''आता ओके?'' जुई

''ओके, तुझे हार्टबीट्स का वाढलेत एवढे?'' अर्जुनला तिच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती.

''अर्जुन दीक्षित M.I.S. चा हेड, तुला बघून भल्या भल्या गुंडाना धडकी भरते, मग माझे हार्टबीट्स वाढणार नाहीत का?'' जुई हसत म्हणाली.

''हि ती धडकी नाही आहे. समथिंग डिफरंट.'' तो तिच्या हनुवटीला वरती करत म्हणाला.

''तू माझ्या अवतो भोवती असलास तरी हार्टबीट्स वाढतात. आता तर अगदी चिकटून झोपाला आहेस . काय होणार?'' जुई त्याच्या टीशर्टच्या बटन्सशी खेळत वरती न बघताच म्हणाली.

''यु आर सो इनोसंट. फीलिंग्स लगेच एक्सप्रेस करतेस.'' अर्जुन तिला मिठीत घेत म्हणाला.

''धडकनो को तो थोडा रास्ता दे दीजिए जनाब,
आप तो सारे दिल पर कब्जा किए बैठे है.''
जुई हसत हसत एक शायरी बोलू गेली होती. आणि अर्जुन तिच्याकडे एक टक लावून बघतच बसला.

''जु, तू डॉक्टर होती, आता शायर पण झाली. ''

''आपके प्यार का असर है जनाब.'' जुई त्याच नाक ओढत म्हणाली.

''लहानपनापासून अशी वेडेपणा करतेस ना म्हणून तुला विसरणं शक्य नाही.'' अर्जुन

''अर्जुन, ज्या दिवशी तू मला विसरशील ना, त्या दिवशी माझ्या आयुष्याने फुलस्टॉप घेतलेला असेल.'' जुई

''वेडी आहेस का? असं वेड्यासारखं बोलत जाऊ नकोस. शांत झोप बघू.'' अर्जुन तिला थोपटत होता आणि ती थोड्याच वेळात झोपूनही गेली. तीच ते शेवटचं वाक्य मात्र अर्जुनच्या कानात अजूनही ऐकू येत होत. तो त्याच्याच विचार करत राहिला.  

*****

''इन्स्पेकटर राठोड शुद्धीवर आले का रे?'' पलीकडून वाघमारे साहेब विचारत होते. कॉन्स्टेबल ने फोन उचलला होता. त्याने होय सांगितले. आणि वाघमारे साहेबांनी फोन कट केला.
सकाळपासून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन येत होते. आणि त्या संशयित आरोपीला शोधण्यासाठी वरून प्रेशर टाकले जात होते. काय करावे ते त्यांना कळेना. एकतर राठोडची तब्येत बिघडलेली होती. शेवटी त्यांनी अर्जुन दीक्षितला भेटण्याचा निर्णय घेतला. आपले नाव या केसमध्ये गुंतण्याआधी अर्जुन दीक्षितला भेटून काही गोष्टी क्लिअर करणे गरजेचे होते. त्यांच्या माहिती नुसार अर्जुन नवी मुंबईला एका हॉटेलवर थांबल्याचे त्यांना समजले. आणि ते त्याला भेटण्यासाठी सारखे फोन करू लागले. पण पलीकडून त्यांना भेटण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.
वाघमारे आपल्याला भेटण्यासाठी फोन करत आहे, हे समजल्यावर अर्जुन सावध झाला. आपण नक्की कुठे आहोत याचा पत्ता कोणालाही लागायला नको, याची तो काळजी घेत होता. तसेही अर्जुन आपला फोन स्वतः उचलत नसून फारुख किंवा मंगेश हे दोघे फोनला अटेंड करत असत. त्यामुळे फारुख भाईला सकाळीच त्या हॉटेलवर पाठवून त्याच्याजवळ अर्जुनचा सरकारी फोन देण्यात आला होता. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी लागणार होती.

*****
सकाळी उठून जुईने पेशंटला चेक केले. ते काका आता नॉर्मल होते. जुईला तिथे थांबण्याची गरज नव्हती. ती संध्याकाळी तिथून निघणार होती. अर्जुन आणि मंगेश सुद्धा संध्याकाळी निघणार होते. पंडित काकाना काही दिवस इथेच ठेवण्याचे ठरले. मावशी आई मावशीचे मिस्टर तसेच दोन सुरक्षा रक्षक इथे त्यांच्या सोबत असणार होते. या केसच्या खऱ्या गुन्हेगाराला पकडे पर्यंत पंडित काकांना इथेच ठेवणे सोयीस्कर होते.

*****
दुपारचे जेवण आटोपून जुईने आपली बॅग भरली. काकांसाठी लागणारे साहित्य, मेडिसिन्स आणि इतर वस्तू तिने साइडला काढून ठेवल्या. मावशींना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. ती त्या बंगल्याच्या मागच्या आवारात जाऊन मावशींच्या मिस्टरांना चेक करून आली. त्याला थोडा ताप होता. त्यांना काही औषधे देऊन जुई परत बंगल्यावर आली. जुईच्या येण्याने मावशी खुश होत्या. ती आता संध्याकाळी निघणार म्हंटल्यावर त्या परत नाराज झाल्या होत्या.
''जुई ताई परत या इकडे. आणि आमच्या साहेबांची काळजी घेत जा.'' त्या जुईला म्हणाल्या.

''मावशी मी नक्कीच इथे परत येईन. आज थांबले असते, पण उद्या माझी एक इमर्जन्सी सर्जरी आहे. सो जावं लागेल. तुम्ही काळजी घ्या.'' जुईला सुद्धा मावशीचं प्रेमळ स्वभाव आवडला होता. त्यांना भेटून ती निघाली. अर्जुन गाडी घेऊन बाहेर तिची वाट बघत होता. मंगेशने गाडी स्टार्ट केली. आणि जुई सगळ्यांचा निरोप घेईन अर्जुनच्या शेजारी येऊन गाडीत बसली.
*****

'जवळपास आठवडा उलटून गेला होता. अर्जुनने जी जान लावून योजना पंडित केसचा तपास सुरु केला होता. पंडित काका आता बऱ्यापैकी स्थिरावलेले होते. त्यांच्या बद्दल अजूनही कोणाला काहीही पत्ता लागलेला नव्हता. त्यामुळे ते स्वस्थ होते. कर्जत च्या अर्जुनच्या फार्महाऊसवर ते लपून होते. मंगेश आणि फारुख दोघेही अर्जुनच्या मदतीला होतेच, पण इन्स्पेक्टर राठोडला अटॅक आल्याने तो महिन्याच्या मेडिकल रजेवर होता. त्याचे दोन कॉन्स्टेबल अर्जुनला मदत करत होते. वाघमारे साहेब दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत होते.  पण तो आता कोणाच्या बापाच ऐकणार नाही हे वाघमारे ओळखून होते. आपल्या इनकॉउंटर स्क्वाडच्या माणसांना घेऊन अर्जुन संशयितांना उचलून सरळ त्यांची आपल्या पद्धतीने चौकशी करत होता. '

*****
'सर्जरी आटोपून जुईने मोबाइल चेक केला. अर्जुनाचे दोन मिस्ड कॅल होते. 'आज चार दिवसांनी साहेबांना माझी आठवण आली तर?' ती स्वतःशीच बडबड करत होती. पर्स आणि इतर साहित्य आवरून ती घरी जायला निघाली. पुनः मोबाइल वाजला तिने पहिले, तर एका अनोळखी नंबर वरून मिस्ड कॅल होता. सकाळ पासून याच नंबर वरून तिला चार मिस्ड कॅल आले होते. तिने कॅल बॅक केला तर कोणी काहीच बोललं नाही. मग तिने दोन तीन वेळा अर्जुनला फोन लावला पण तो उचलत नव्हता. त्यात तिच्या आईचा फोन आला. आणि ती त्यांच्याशी बोलत बोलत घरी पोहोचली. फोन ठेवून तिने लॉक काढले आणि दार उघडले तेव्हा तोच पर्फ्युमचा वास तिच्या नाकात शिरला. काही न बोलता तिने लगेच लाईट लावली. समोर अर्जुन आराम खुर्चीवर स्वस्थ पडलेला होता. लाईट लावल्यावर त्याने डोळे उघडले. जुई डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती.

क्रमश