Rahasyachi Navin Kinch - 1 books and stories free download online pdf in Marathi

रहस्याची नवीन कींच - भाग 1

हि गोष्ट आहे चार मित्रांची श्रेया, राधा, राघव आणी प्रविण हे एकाच कॉलेज मध्ये शिकायचे. तरुणाईत असल्यामुळे ते मजागंमत पण करायचे. ते तसे अभ्यासात हुशारही होते. राघव व प्रविण हे बालपणाचे मित्र ते दोघे असे राहायचे जणू सख्खे भाऊ. त्या दोघांचे पुढील शिक्षण करण्यासाठी ते शहरात शिकायला जातात ते मुंबईला येतात. त्याची राहण्याचा व्यवस्था राघवच्या मामाकडे होते व त्यांना मुंबईच्या एका प्रतीष्ठीत महाविदयालयात प्रवेश मिळतो व ते त्या शहराच्या वातावरणात रमू लागतात. त्यांचे शिक्षण छान सुरु असते व त्याचे तेथे मीत्र पण बनतात. त्यापैकी त्यांच्या जवळच्या मैत्रिणी म्हणजे श्रेया व राधा. राघव आणि प्रविन थोडयाच काळात श्रेया आणि राधाचे खुप छान मीत्र बनतात. ते महाविदयालयात सोबतंच राहायचे. ते चौघे अभ्यासात हुशार पण तितकेच खोडकर ते महाविदयालयात खूप धमाल करायचे . त्यांच्या महाविदयालयाची सहल दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जायची या वर्षी त्याची सहल हि विशाखापटनमला जाणार होती. सहलीला जाण्यासाठी सर्वच उत्साही होते. सर्व विद्यार्थी सहलीला जाण्याची तैयारी करत होते. हे चौघेही तयारी करत होते. राघव ज्यावस्तूंची गरज आहे त्यांची तो यादी करत होता व प्रविण त्याची मदत करत होता. दुसरीकडे राधा व श्रेयाची सुद्धा तयारी झाली होती. बघता बघता सहलीचा दिवस उजाडला. सर्वे विदयार्थी बस मध्ये चढले व सर सर्वांना सहलीत सोबत राहन्यासाठी व जवाबदारीने वागण्यासाठी सांगत होते व नीयम सांगत होते. सर सर्व विद्यार्थ्यांना नीयम सांगून झाल्यावर बस विशाखापट्टनम ला निघाली बस मध्ये सर्व जण अंताक्षरी खेळत होते. राघव, प्रविण श्रेया आणी राधा हे ही प्रवासाचा आनंद घेत होते. बघता-बघता प्रवास संपला त सर्वजण विशाखापट्टनम ला पोहोचले सर्वांची राहण्याची व्यवस्था ही सरांच्या एका मित्राच्या फार्महाउस मध्ये करण्यात आली पण सरांच्या मित्राने एक गोष्ट सांगीतली होती फार्महाउस च्या मागे एक हवेली होती जे खुप वर्ष झाले बंद होते. सरांचे मीत्र म्हणाले त्या हवेली मध्ये विद्यार्थ्यांना जाण्यास मनाई केली, तसेच सरांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगीतले. सर्वांनी सरांची गोष्ट ऐकली पण प्रविण हा थोडा हट्टी प्रवृत्तीच्या होता. त्याने ठरवले सर्वजन झोपल्यानंतर त्या बंद हवेली मध्ये जायचे व बघायचे की काय आहे त्या हवेली मध्ये व का ते इतके वर्ष झाले बंद आहे. सर्वे जन फार्महाउस मधे गेले व सरानी सांगीतले प्रवास खूप लाबचा होता व सर्वांनी आराम करुन घ्या. सर्वे जन झोपले पण प्रविण मात्र जागा होता तो वाटच पाहात होता सर्वांच्या झोपण्याची.
सर्वजण झोपल्यावर तो त्या बंद हवेली मधे गेला, तो त्या हवेलीत खिडकीतून शिरला. हवेलीमध्ये अंधार होता म्हणून प्रतीव मोबाईलचा लाईट चालू करतो तो पाहातो हवेलीत सर्व वस्तू या धुळखात पडुन होत्या. त्याने काही वस्तू पहिल्या व नंतर त्याच लक्ष्य शिडीकडे गेल तो शिडी चढून वर गेला व तेथील खोल्यांमध्ये काही भेटते ते पाहत होता तो कपाट उघडून पाहत होता. कपाटात शोधता शोधता त्याला एक गुप्त खाना सापडतो त्या खान्यामध्ये त्याला एक डब्बा सापडतो. तो डब्बा उघडून पाहतो. त्यात त्याला एक लॉकेट सापडते.
प्रविण विचार करतो हे लॉकेट कोणाचे असेल म्हणून तो खोलीत थोडाफार शोध, घेतो व लॉकेट घेऊन फार्महाउस मधे जातो व लाॅकेट बॅग मध्ये ठेउन तो झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सर्वे उठतात व नाश्त्याच्या वेळेला भेटतात व फीराला कुठे-कुठे जायचे याचा विचार करतात तेवढ्यात सर येतात व सर्वांना विचारतात की झाली का झोप सगळ्यांची कारण खुप ठीकाणी फीरायला जायचे आहे आज आपल्याला .
यांच्यावर सर्व विदयार्थी "हो" या स्वरात उत्तर देतात सर्वांचा नाश्ता होता व ते बसमध्ये बसाला जातात इतक्यातच सरांना फोन येतो की त्याचा मित्राचा अचानक मृत्यू होतो हे ऐकुण सरांना खुप दुख होतो. त्यामुळे बाहेर फिरायला जात नाही. सर विचार करतात की त्याच्या मीत्राचा मुत्यु असा अचानक उसा काय झाला. बाहेर फिराला जाणे रद्द झाल्यामुळे सर्व जण फार्महाऊस मध्येच खेळतात दमशराद, अंताक्षरी पण प्रविण राघवला त्याच्या खोलीत नेतो व त्याला ते लाॅकट दाखवतो व म्हणतो त्याला हे लॉकेट त्या बंद हवेलीत मिळाले. राघव हे ऐकताच त्याच्यावर रागवतो व म्हणतो सरांनी म्हटल होते ही त्या हवलीत कोणीही जाणार नाही. प्रविण म्हणतो "अरे काही नाही होत" अशी त्याची चेष्ट करतो व लॉकेट बॅग मध्ये ठेवतो व राघवला घेऊन हॉल मध्ये गेला व सर्वांन सोबत अंताक्षरी खेळू लागला. त्या दिवशी बाहेर जाने रद्द झाल्यामुळे सर्वजण लवकर झोपले. पण प्रविण मात्र झोपत नाही व ते लॉकेट हातात घेउन बसला असतो व त्या लाॅकेट कडे एकटक बघत असतो. तो वीचार करतो की हे लॉकेट कोणाचे असेल व का ते त्या हवेलीत इतके सांभाळून एका डब्यामध्ये काही तावीज बाधून ठेवले होते. याच्या मागचे गूढ उलघडल्या साठी त्याला पुन्हा हवेलीत जावे लागणार ह्याच गोष्टीचा तो वीचार करीत होता.
-------------------------------
काय असेल त्या लाॅकेट चे रहस्य!
प्रविणला त्या बंद हवेलीत त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल का !!!!