Rahasyachi Navin Kinch - 7 books and stories free download online pdf in Marathi

रहस्याची नवीन कींच - भाग 7

त्या तपस्वींना भेटल्या नंतर मला जे काही कळाले ते ऐकुण मी हादरलो . ते जे काही बोलले ते जर का खर असेल तर याच मणीमुळे माझ्या बॉसचा मुत्यू झाला असेल . ते तपस्वी म्हणाले की ते मणी अद्यापही जागृत अवस्थेत आहे व जो कोणी त्याला स्पर्श करेल तो त्या शापाला स्वता कडे ओढावून घेईल हे नक्की व त्याचा मृत्यू हा अटळ असेल . ते मला आणखी एक बोलले की जर तुला जगायचे असेल तर तू त्या मनी बद्दल माहिती गोळा करणे व शोध घेणे बंद कर नाही तर त्या शापाच्या आहारी जाण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही हि गोष्ट लक्षात ठेव . तेव्हा पासून मी त्या मणीचा शोध व माहिती गोळा करणे बंद केले . माझ्या बॉसने ते मणी त्याच्या हवेलीत ठेवला होता मृत्यू होण्या आधी कारण तुझ्या विद्यार्थ्यांना ते तेथेच सापडले आणी तुमच्या सोबत ज्या विचित्र घटना घटत आहे हे त्या मणी व त्याच्या शापामुळे. अद्याप त्या मणीला तिघा जणांचा स्पर्श झाला आहे म्हणून तुमच्या सर्व तिघा जणांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे . लवकरात - लवकर जर आपण काही केले नाही तर काहीही घडू शकते . पण सर्वांत पहिले ज्याने स्पर्श केला त्याच्या जीवाल सर्वाधीक धोका आहे . त्याला आपल्याला त्या तपस्वी कडे नेण्याची तयारी करावी लागेल . त्या चौघांसोबत तू माझ्या सोबत चाल खुप वेळ नाही आहे उदया पहाटेच आपल्याला निघाव लागेल त्या चौघाना सांग उदया आपल्याला कुठेतरी जायचे आहे म्हणून . चल खुप वेळ झाली उद्याची पण तयारी कराची आहे . सचीन राघव , प्रवीण, राधा व श्रेयाला सांगतात की उदया सकाळला आपल्याला कुठेतरी बाहेर जायच आहे . सर्व जण तयारी करूण झोपतात . पण उद्या जायच कुठे म्हणून प्रविण विचार करत असतो . विचार करता करता तो कधी झोपून जातो हे त्यालाच कळत नाही .
पहाटेल कोणी तरी प्रविण व राघव च्या खोलीचा दरवाजा ठोठावतो . त्यामुळे ते दोघे ही झोपेतून उठतात . राघव दरवाजा उघडतो तर पुढे सचिन उभा असतो . सचिन म्हणतो की लवकर आवरा आवर करून घ्या आपल्याला लवकरच निघायचे आहे . राघव सरांना हो म्हणतो आणि आपली तयारी करू लागतो. राघव ची तयारी होईपर्यंत प्रवीण आपली बॅग भरून घेतो. दुसरीकडे राम पूर्ण तयारी करून गाडीमध्ये सर्वांची वाट बघत असतो. सर्वांची आवरा आवर झालेली असते . फक्त श्रेयाची वाट पाहत सर्वजण थांबली असतात श्रेया तिची बॅग घेऊन आली की सर्वजण गाडीच्या दिशेने वळतात तितक्यात राधा सरांना प्रश्न विचारते की सर आपण इतक्या पहाटे कुठे चाललो आहोत आणि बाकीचे विद्यार्थी नाही येणार आहे का आपल्याबरोबर त्याचे उत्तर देत सचिन बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो फक्त तुम्ही चार विद्यार्थी आणि मी व माझा मित्र आपण एवढेच एका महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहोत सध्याच्या स्थितीत मी फक्त एवढेच सांगू शकतो की ज्या कामासाठी आपण चाललो आहोत ते खूप महत्त्वाचे आहे व तुमच्याशी निगडित आहे म्हणून फक्त आपण एवढेच जन त्या ठिकाणी चाललो आहोत बाकीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचल्यावर स्वतःच कळेल एवढे बोलत सचिन गप्प झाला व सर्वजण गाडीत बसले . रामने गाडी चालू केली व ते आपल्या प्रवासासाठी निघाले . पण हे सर्वजण अनभिग्य होते की या प्रवासात नियतीने त्यांच्यासाठी पुढे काय मांडून ठेवले आहे .
रामने गाडी सुरु केली . ते सर्वजण फार्म हाऊस पासून काही दुर येताच राघवने प्रविण कडे पाहिले व तो प्रश्नात पडला की लॉकेट हे प्रविणच्या गळ्यात कसे कारण सरांनी ते लॉकेट प्रविण कडून कधीचे घेतले होते तेव्हा तो सरळ सरांनाच बोलला की सर तुम्ही प्रविणला लॉकेट कधी परत केल . ते ऐकुण प्रविण आणि सर दोघांचे लक्ष लॉकेट कडे गेले . व ते दोघे अचंब्यात पडले की लॉकेट तर सचिन कडे होते . कारण काल रात्री सचिनने ते लॉकेट रामला दाखवले होते व नंतर बॅग मध्ये ठेवले होते . आणि प्रविण चकाकला कारण त्याला माहीत होते की लॉकेट सरांनकडे आहे . सरांनी तातडीने लॉकेट परत करायला सांगीतले . आता पुर्ण प्रवास कोणीही निवांत नव्हते कारण सगळ्याला हेच कळत नव्हते की लॉकेट सचिन च्या बॅग मधून प्रविणच्या गळ्यात कसे आले . विशेषत सचिन आणि प्रविण . राम सांगतो तस खरच असेल तर प्रविणच्या जिवाला धोका तर नाही ? हे गृढ त्या तपस्वी कडेच जाऊन उलघडेल .