Dear Navroba... books and stories free download online pdf in Marathi

Dear नवरोबा...

Hiiii नवरोबा...

काय आज अचानक पत्र....पाहून तर हसूच आल...माझी morning तर good च झाली राव...२ सेकंदात पूर्ण कॉलेज जगून आले... आणि काय रे आज काल हे असे पत्र लिहायचं का थांबवलं ??? विचारेन विचारेन म्हणता म्हणता २० वर्ष उलटून गेली...तुझ एक पत्र पुन्हा नव्याने जगायची ताकद देत...पण काय माझा नवरोबांना तर माझासाठी वेळच नाही...आणि काय रे तू चक्क मला...मला i love you बोलला...तुला माहिती आहे तू पूर्ण २० वर्षामध्ये मला फक्त आणि फक्त दोनदा i love you बोलला आहे...एकदा ते पाहिलं पत्र लिहाल तेव्हा आणि एकदा आता..आणि दोन्ही वेळेला बोलला ते पत्रातून...वाचलं तेव्हा अस वाटत ते पत्र घ्यावं आणि डोक्यात घालावं तूझ्या...पण म्हटल जाऊदे...कसा का असे ना नवरा आहे...


आणि तू मला त्या १ रुपया वरून पुन्हा चिडवल....पण खरच होत ते समजल...पण तू असं भान हरपून माझा कडे बघत होता तेव्हा मी पण तूझ्या कडे पाहिलं...जसा बरा दिसत होतास...आणि तुला एक गम्मत माहिती आहे...त्या रात्री तू माझा स्वप्नात आला होतास.....

नंतर त्या बस मधल्या भेटी....एकत्र कॉलेजला जाणं....हळूहळू तुझी सवय होत गेली....आणि ते हळुवार फुलणारं प्रेम...वेड लावलं होत मला तू....फुल वेडी झाली होते तूझ्या प्रेमात...तू एक दिवस उशिरा जरी आला तर मन बेचैन व्हायचं...मग मनाला आवरता आवरता नाकी नऊ यायचे....मस्त होते ते दिवस...तुझ ते चोरुन बघणं खूप एन्जॉय केलं आहे मी...कोणीतरी आपल्याकडे बघत हे सुखावून जायचं...तुझासाठी केलेला तो साज तू बघितल्यावर मन धावत तुझ्याकडे जायचं... स्वतःला विसरून तुझात जगात होते... स्वता साठी एक वेगळं विश्व तयार केलं होत...

तुझ पत्र मिळाल्यावर तर मी फुल ढगात होते....ते आज मै ऊपर अस्मान खीचे... टाईप होते....त्यादिवशी मी रात्र कधी होते त्याची वाट बघत होते...पण म्हणतात ना आपल्याला हवी असलेली वेळ लवकर जाते आणि नको असलेली वेळ जाता जात नाही... तसच झालं माझ पण...वेळच जात नव्हता...मनातल्या मनात सगळ्यांना शिव्या देऊन झाल्या...पण रात्र काय होत नव्हती...शेवटी एकदाची रात्र झाली...

सगळे झोपल्यावर हळूच तो कागद दप्तरातून काढल...एक अनामिक हुरहुर...ओढ...भीती...लज्जा...सगळे मिश्रित भाव मनात होते...

वाचताना प्रत्येक शब्द तू माझा कानात बोलतो अस वाटत होत...त्या तू बोलला तुझा होकार असेल तर निळा रंगाचा ड्रेस घालं...अख्खं कपाट उपसल पण निळा रंगाचा ड्रेस काय साधी ओढणी पण नाही भेटली...ताई ला पण विचारल तिच्या कडे पण नाही...रात्रभर विचार केला आणि मग ठरवलं लाल रंगाचा ड्रेस घालायचा...कारण लाल रंग प्रेमाचा असतो...तुला नीट समजावून सांगणार होती...पण ऐन टाईमला मेधा सोबत आली..म्हणून चिठ्ठी लिहली...द्यायची अशी कारण सोबत ती मग हिंदी सिनेमा आठवला...पुस्तकात ठेवून पुस्तक तुझा कडे दिलं..वरून सांगितलं पण ११ नंबरच पण बघ...महत्त्वाचं आहे...नंतर २ दिवस साहेब गायब...पाहिले वाटल घरी काही तरी काम असेल...उद्या येईल...दुसऱ्या दिवशी पण नाही...मग मी घाबरले...काय करू समजत नव्हतं...असतील नसतील ते सगळे विचार मनात येऊन गेले...
शेवटी तू आलास...तुझ भल मोठ smile घेऊन...असा राग आला ना तुझा...अस वाटल समोरचा दगड तूझ्या डोक्यात टाकावा...

ये...तुला तो टपरी वरचा चहा आठवतो...दर मंगळवारी तू मला तिथे घेऊन जायचा...काय चव होती ना...आणि देऊळ...किती प्रसन्न वाटायचं तिकडे...लग्न काय झालं तू तर सगळच विसरला...

तुला आठवत का ?? एकदा आपण सोबत कॉलेजला जात होतो...तिथे एका घरा समोर गुलाब च झाड होत...तू त्यातल एक गुलाब तोडल...आणि नेमक ते त्या घरमालकाने पहिलं...तो तूझ्या काठी घेऊन मागे धावत होता...तू जी धूम ठोकली ती सरळ कॉलेज मध्ये...खूप हसू आल तुझ...आता पण कधी आठवलं तर मी एकटीच हसत असते...एकदा तर आईंनी मला अस हसताना पहिलं आणि येऊन माझा डोक्याला हात लावला...ताप आहे का बघायला...जेव्हा आईंना हे सांगितलं तेव्हा तर आई बसून हसत होत्या...नंतर आम्ही दोघी कधी आठवली की हसत बसायचो आणि बाबा आणि मूल आम्हाला वेडे म्हणून निघून जायचे...


तू पाहिले किती बोलायचा...बापरे !! पण आता स्वतशी पण बोलत नाही...तू खूप नाही पण हा थोडा बदला आहे...पण तुझी ती खट्याळ नजर ती काही बदलली नाही...

लग्न झाल्यावर तू माझाकडे दुर्लक्ष करायचा तेव्हा खूप राग यायचं....पण तू आमच्या साठी...आपल्यासाठी करत असलेले कष्ट दिसायचे...रात्री किती थकून घरी यायचा...तुझा तो उतरलेला चेहरा पहिला की मन कासाविस व्हायच...राग तर कोसो दूर जायचा... उरायच ते फक्त प्रेम...तक्रार तरी काय करू आणि कोणाकडे करू...आणि आपल ठरल होतच की तू बाहेरच बघ मी घरी सांभाळीन...

इतकं होऊन पण तुझ प्रेम कमी झालं का ??? हा म्हणजे थोड कमी झालं आहे...मुलगी जी आली...पण चालत रे...आज पण तयार होताना पाहिले तू नजरे समोर येतो...तू आवडेल का ?? हा प्रश्न डोक्यात येतो...मी तयार झाला वर तुझ ते लग्न झाल्यावर पण चोरुन बघणं आवडायचं...आणि एक बायकोला अजून काय पाहिजे ना..ज्याच्या विश्वासावर ती तीच हक्काचं घर सोडते..तो कायम तिच्या होऊन राहतो...तिच्या वर प्रेम करतो...तिला तिच्या मान येतो...तिच्या सन्मान करतो....तीच अस्तित्त्व जपतो...तिला सगळ सुख येतो....बस असते रे तेवढंच...

खूप बोललेला ना...आज न विचार करतो लिहत आहे...चुकली तर तुझ तू बघ...कशी ही असली तरी तुझी आहे...तू खरच भारी आहेस रे...म्हणजे तू एक बेस्ट मुलगा आहेस...तू एक बेस्ट मित्र आहेस...तू एक बेस्ट नवरा आहेस...तू एक बेस्ट जावई आहेस...तू एक बेस्ट बाबा आहेस...आणि त्याहून महत्त्वाचे तू एक बेस्ट माणूस आहेस...

आणि आपण नक्की जाऊ हनिमून ला...मला पण ते आजची मुलं कशी हातात हात घालून सेल्फी घेतात तसा घायचा आहे...खूप मज्जा करायची आहे...नंतर माझ्या नातवांना पण सांगायचं आहे...तुमची आजी आधी हिरोईन होती...


मी तुझ्यातल्या माझ्या पहिल्या नवराला खूप miss करते... please मला माझा पहिल्या वाला नवरा परत भेटल का ते बघ... माझं आज पण तुझ्यावर तेवढ्याच प्रेम आहे...i love you.... नवरोबा...

तुझीच लाडकी
बायको

***************************"********


©® Vaishanvi pimple