lead... books and stories free download online pdf in Marathi

नेणिव...

पैसा !!
कुठे घेऊन जाणार आहात हा पैसा ! शेवटी सगळं इथेच तर ठेवायचं आहे.... खरच ? हे वाक्य जितकं सहज बोलल जात तितकं सोप आहे... ? साधं कोणी गरज म्हणून सुद्धा १० रुपये खिशातून काढून द्यायला विचार करतं.. आणि तेच लोक म्हणतात पैसा काय तुम्हाला चाटायचा आहे का ? भूक लागते तेव्हा अन्नच लागत पोट भरायला. अहो पण तेच अन्न विकत आणायला पैसाच लागतो.. दुकानदार म्हणत नाही “भूक लागली आहे का ? हे फुकट घेऊन जा.” ह्या जगात जो तो फक्त स्वत : चा विचार करतो... करतो ना ?
“ मी निधी देशमुख..” साधी सरळ मेहनत करून करियर..अहह ना ना.. नोकरी करणारी एक सामान्य कुटुंबातली मुलगी ! 9AM TO 6 PM हाच काय ते SO CALLED करियर घडवायचा टाइम बाकी वेळ घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहायच्या....

“आजचीच परिस्थिती बघा ना..सगळं जग एका सेकंदात बदललं आहे.. माझ जग माझी आई...

“MISS. देशमुख”

“आले डॉक्टर..” निधी

“सॉरी MISS देशमुख... ब्रेन वर प्रेशर वाढतय... तुमच्या आईंना वाचवयचं असेल तर लवकरात लवकर पैसे भरा..” डॉक्टर

“डॉक्टर मी व्यवस्था करतेय..होईल ही लवकरच अरेजमेंट..प्लीज तुम्ही उपचार थांबवू नका..” निधी हात जोडून बोलते

“आमचेही हात दगडा खाली आहेत.. ऑल रेडी आजवरचं बिल लाखाच्या घरात गेलं आहे.. त्यात ऑपरेशन.. तुम्हाला झेपणार आहे का..” डॉक्टर

“डॉक्टर मी करते काही तरी लवकरच..तुम्ही तुमचे उपचार आणि प्रयत्न चालू ठेवा...” निधी

“जर लवकरात लवकर पैसे नाही भरले गेले तर I am sorry बेटा..” तिच्या डोक्यावर हात ठेवून डॉक्टर निघून जातात...

*****

“I am sorry बेटा.. आम्ही आमचे सगळे प्रयत्न केले but रेस्पोंस zero..” डॉक्टर

“डॉक्टर असं नका बोलू.. हवं तर बाहेरून बेस्ट डॉक्टर बोलवा... पण माझ्या आईला वाचवा..मी किती ही पैसे खर्च करायला तयार आहे..” निलय

“प्रश्न पैशांचा नाहीय.. प्रश्न त्यांच्या श्वासांचा आहे..तुझ्या कडे पैसे खूप आहेत पण तुझ्या आईकडे श्वास नाही आहेत तेवढे..” डॉक्टर त्याच्या डोक्यावर हात ठेवून बोलतात…

निलय राणे... सॉफ्टवेअर डेव्हलपर...नोकरी होतीच पण स्वत : चा स्टार्टअप ही होता... थोड थोड इनव्हेस्ट करून उभा केला होता..दोन्हीकडे चांगला जम बसला होता त्याचा आता...पैसाही बक्कळ कमावत होता..आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळायची म्हणजे वेळ अपुराच पडायचा तसा.. सतत काम आणि काम... काम सोडूनही आजूबाजूलाही जग असतं हेच विसरून तो कामात गुंग असायचा...

तो हतबल होऊन आईच्या बेड जवळ येतो..

"मलाही महितेय नाहीये आता वेळ माझ्याकडे... “ आई

“अस नाही आहे आई काही...तू नक्की बरी होणार.. फक्त....” निलय

“मला कळतयं वेळ संपली आहे...” त्या थरथरत्या हाताने त्यांचे अश्रु पुसतात

“अरे.. रडू नकोस.. तुझ्या आयुष्यात माणसांना महत्त्व आहेच कुठे..” आई शांतपणे म्हणाली..

“आई माणसं नाही पण तू महत्वाची आहेस..” निलय

“महत्तवांच्या व्यक्तीला तरी वेळ द्यावं मग निलय.” आई

“आई अस कस म्हणतेय तू मी वेळा दिला नाही.... ? हे सगळं स्वत: साठी करतोय का मी.... तुम्हाला चांगली लाइफ..” निलय पुढे बोलतच असतो की त्या हात दाखवून थांबवतात

“मला माहिती आहे निलय.. तू येवढा पैसा ओतला नसतास तर येवढ्या सुंदर हॉस्पिटलमध्ये मरण आलंच नसतं मला.. माझी तक्रार काहीच नाहीये... पण तुमचा वेळ हवा असतो आम्हा म्हाताऱ्या माणसांना... मान्य की तुमचं हेच वय आहे कमवायचं.. तरी फक्त पैसाच सगळं काही नसतो... कधी तरी रात्री एकटी वाटेल तेव्हा ह्याच माणसां सोबतच्या आठवणी उपयोगी पडतात...निलय नेहमी नेहमी काय वर्कहॉलीक असावं माणसाने केव्हा तर माणसाहॉलीक असावं ना...” त्या बोलतात.... बोलताना ही त्यांना खोकला उठत होता..

“आई समजलं मला तू शांत रहा बोलू नकोस...त्रास होतोय तुला..” तो त्यांना शांत करत बोलतो

“निलय..सगळ्यांना नीट सांभाळ... स्वत:ची ही काळजी घे” त्या थरथरता हात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवतात...

“आई थांब ना गं नको जाऊ प्लीज...” निलय रडत बोलतो… पण त्या त्याची हाक ऐकायला थांबल्याच नाहीत !!

*****

“आई थांब ना ग.. नको ना जाऊ सोडून..आई...” निधी
तिची हाक खूप जोरात होती पण ऐकणारीने कान बंद केले होते...

“आई मी एकटी आहे ह्या जगात तुला तर माहितीच आहे ना...थांब ना गं..” निधी

“सॉरी बेटा... आम्ही प्रयत्न केला पण हॉस्पिटलचे नियम मोडणं शक्य नाहीय आमच्यासाठी ही... तू वेळेवर पैसे भरले असतेस तर कदाचित त्या काही काळ अजून तुझ्या सोबत असत्या..” डॉक्टर

“डॉक्टर… घरी नातेवाईक आले आहेत.... आईला घरी केव्हा घेऊन जाता येईल.. “ निधी

“हॉस्पिटलच बिल भरलं की लगेच” डॉक्टर

“डॉक्टर एक लाख बावन्न हजार बिल झालं आहे.. एक रक्कमी पैसे कसे भरणार आहे मी ?” ती अविश्वासाने डॉक्टरांकडे बघत असते

“नातेवाईक ? " डॉक्टर...

"मी सगळ्यांना पैशांसाठी फोन केला होता कोणी उचलत नाही आहेत... प्लीज डॉक्टर तुम्ही काही करू शकता का बघा ना ?" निधी

" माझ्याकडून जेवढं शक्यं आहे तेवढं केलं आहे मी बेटा...आता पुढचं तुलाच करायचं आहे...जो पर्यंत पैसे भरत नाहीत तो पर्यंत डेड बॉडी हातात मिळणार नाही" डॉक्टर बोलून निघून जातात...


" देवा... कुठून आणू मी आता येवढे पैसे... जेवढी रक्कम मी एकत्र कधी पाहिलीच नाही तेवढी रक्कम उभी करायची आहे फक्त काही तासात... कसं होणार आहे माझ्याच्याने..." ती हतबल होऊन आईच्या पार्थिवा जवळ अशीच बसते...


आई गेल्याच धड दुःख ही करता आलं नाही तो वर येवढं मोठं संकट उभं राहिलं ...

ती रडून मोकळी होती...आता तिचं तिला जाणवत...पैसे असतील तर च आई वर योग्य ते अंतिम संस्कार होतील...त्या साठी आपल्यालाच आता काही तरी करावं लागेल... ती डोळे पुसते आणि चेहऱ्यावरून हात फिरवते... तेव्हा तिच्या लक्षात येतं... सोनं...! हे विकून आपल्याला हवी ती रक्कम आपण उभी करू शकतो...

तिने पटकन स्वतः चे कानातले, चैन, अंगठी काढली... आई बाबांनी पै नी पैं जमून तिच्या लग्नासाठी जमवलं होत ते थोडं सोनं... आता त्यांची मेहतन अशी विकून टाकायला तिला जीवावर आलं होतं....

तिने आई कडे पाहिलं तर तिचं सोनं तिच्याच अंगावर होत...तिने रडतच एक एक दागिने काढायला घेतले...

गळ्यात मण्यांची माळ होती...कानात कुड्या... हातातल्या २ बांगड्या... कानातल्या चैन... खूप नाही पण तिचं काम होईल येवढं सोनं नक्कीच होतं ते...

"आई तूच म्हणायचीस बघ...पैसा सर्वश्रेष्ठ कधीच नसतो माणसचं महत्त्वाची... बघ ना आज तोच पैसा सर्वश्रेष्ठ बनवतोय... तुझा एक ही माणूस कामाला आला नाही गं... आज तुझी आणि माझी ही जी ताटातुट झाली ना ही ह्या पैशांमुळे च...." ती आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवते...आता कोणी नव्हतं तिचं... एकच हक्काची आपली व्यक्ती होती ती ही फक्त अपुऱ्या पैशांमुळे तिच्या पासून कोसो सुरू गेली...


"दादा मी येई पर्यंत आईची काळजी घ्या हा माझ्या" निधी बोलून पटकन हॉस्पिटल बाहेर पडते...


सर्व सोनं विकून जवळ जवळ एक लाख ऐंशी हजार तिच्या हातात पडतात...ती हॉस्पिटलचं बिल भरते आणि आईला घेऊन घरी येते... घरी गोतावडा जमला होता... पण आज सगळं जग तिला समजल होतं...

ज्यांनी ती जगावी म्हणून प्रयत्न केले नाहीत त्यांनी ती मेली म्हणून दुःख तरी का करतील...


तिचं आज ह्या घरची लक्ष्मी आणि तिचं घराचा वारस होती... सगळे सोपस्कार तिच्या हस्तेच पार पडले...अग्नी ही तिने च दिला... नातेवाईक पाठीमागे खूप बोलले ही... पण आज तिला ती आणि आई सोडून कोणी दिसतच नव्हतं ते...


"आई आज हरली मी... सपशेल हरली...मी एक मुलगी म्हणवून घ्यायच्या लायकीची ही उरली नाही... हरली ग मी" निधी त्या जळत्या चित्ते कडे पाहून बोलते...


********
"आई आज हरलो मी...सपशेल हार... निरोप ही असा दिलास की त्याला निरोप ही म्हणाता येई ना...आई आज समजलं मला... तुझं ते माणसांमध्ये देव शोधणं... पैशांपेक्षा माणसांना आणि माणुसकीला जास्त महत्त्व देणं.. कोणी न बोलता ही किती लोक होती तुझ दर्शन घेण्यासाठी... तुला शेवटचं पाहण्यासाठी...तुला सुखरूप देवाकडे सोडण्यासाठी...आई मी पैसा कमावला पण सोबत माणसं कमवायची राहिलीच ग... तूझ्या सोबत ही नवीन अश्या आठवणीच कुठे आहेत आपल्या... पण आई मी प्रॉमिस करतो... तू जोडलेली माणसं मी जपेन..." तो समुद्राच्या किनारी बसला होता... पाण्याकडे एकटक बघत तो आईशी बोलत होता... पण संवाद एकतर्फीच !!


******"आई प्रॉमिस करते मी तुला... ज्या पैशांमुळे आपल्यात आज हे अंतर आलं आहे ना त्या पैशाला आपल्या घरात लोळण घालायला लावेन... जी तू तुझी माणसं म्हणून ज्यांनी ज्यांनी तुला लुबाडलं त्या सगळ्यांना पैसा म्हणजे नक्की काय ते दाखवेन... तू नेहमी बोलयचीस ना.. पैसा सर्वश्रेष्ठ नसतो मदतीला माणूसच येतो माणसाच्या... पण आज मला समजलेलं जग वेगळचं आहे बघ.... इथे पैसा असेल तरच माणूस माणसाच्या मदतीला येतो... हे शिकली मी... आज कोणी साधं 'तु ठीक आहेस का ?' असं ही नाही विचारलं ग मला... कुठे आहेत तुझी माणसं... आज हाच पैसा मला जगवणार आहे आणि वाढवणार आहे... तुझी माणसं नाही... ' आई मान्य कर... पैसाच सर्वश्रेष्ठ असतो '" ती आईच्या फोटो कडे बघत बोलत असते...गालावरचे अश्रू सुकले होते... निर्विकार चेहऱ्याने ती आईच्या फोटोशी बोलत होती...पण संवाद मात्र एकतर्फीच !!

शेवटी काय तर... पैसा काय आणि माणूस काय महत्वाचे दोघे ही... गरजेच्या वेळी दोघांची ही साथ गरजेचीच... जगण्यासाठी पैसा महत्वाचा पण त्याचा जीवनात मोजकेच आनंदाचे क्षण साजरे करायला माणसंही लागतातच...
जसा माणूस महत्वाचा तसचं त्या माणसा मधली माणुसकी ही अत्यंत महत्त्वाची !!END

Vaishu 🤍