mala zalel pahil prem- 2 books and stories free download online pdf in Marathi

मला झालेलं पहिल प्रेम - भाग 2

4 वाजून गेले तरी पण ति नाही आली शेवटी मलाच राहवल नाही..😐 मी तिला बघण्या साठी गेलो तर ती तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत होती" तश्या त्या पण माझ्याच क्लास मधल्या मुली होत्या, त्यांना पाहून मी वापस आलो.मला तर आता टेन्शन आल होत आता ति गाईड घ्यायला येणार का नाही.मी बराच वेळ वाट पहिली शेवटी 5 वाजून गेले ती काही आली नाही माझ्या कडे" खूप वाईट वाटत होत, पाहिजे नव्हत तर मागितल कशाला असा विचार येत होता डोक्यात, विचार करत करत रात्र झाली, झोपायची वेळ झाली होती. माझे सगळे फ्रेंड्स आता हॉस्टेल वर राहत होती कारण त्यांना माहिती होत ह्या नंतर असं राहण आणि भेटण नाही होणार, म्हणून सगळे जण मस्त गप्पा मारत होते दिवसभर काय झालं कसा गेला दिवस काय वाटत होत, प्रत्येकजणं स्वतःचा अनुभव सांगत. होत आणि त्या दिवशी असं झालं होतं की सगळे मुलं मुली एकमेकांना बोलत होते कारण मुलं मुली हे एकमेकांना बोलत नसायाची जास्त" कारण घरच्यांची खूप भीती असायची म्हणून. माझे फ्रेंड्स गप्पा मारत होते पण माझ मन तिचाच विचार करत होत, तेवढ्या मध्ये माझा फ्रेंड महेशने पूजाचा विषय काढला त्याने सगळ्यांन मुलां समोर मला विचारलं काय रे विजय पूजा बोलत होती , काय म्हणत होती नेमकं प्रोपोज वैगेरे तर नाही ना मारला असे बोलून माझी मजाक उडवत होता. तेव्हा सगळी मुल माझ्या कडे बघून हसत होती. मला पण हसू येत होत थोडी लाज पण वाटत होती पण कोणाला कळु नये असं दाखवून दिल आणि महेशला बोलो" अस काय नाही तिला इंग्लिशच गाईड पाहिजे होत म्हणून ती मला विचारत होती.तर बोला अच्छा जी आम्ही काय मेलो होतो काय आम्हाला नाही विचारलं तुलाच कस काय विचारलं तिने , दाल मे कुछ तो काला है" अस म्हणत चिडवत होता मला मी त्याला बोलो थोड जास्त होतंय झोप आता असं बोलून मी झोपायला उठलो अंथरुण टाकलो तोंडावर पांघरूण घेतल पण झोप काय येतच नव्हती, सारखा डोक्यात विचार चालू होता" काय झालं असेल बर का नाही आली ती म्हणून" शेवटी विचार करत करत कधी झोप लागली कळालं देखील नाही.मला सकाळी लवकर उठायचं सवय होती आम्ही सगळी मुलं सकाळी सकाळी रनींग साठी जायचो " सकाळी 6 वाजता जाग आली मला मी उठलो रात्री उशिरा झोपल्या मुळे झोप पूर्ण झाली नव्हती उठायची इच्छा पण होत नव्हती असं वाटत होत थोडा वेळ झोपी जाव, पण परत मला तिची आठवण आली आता असं वाटत होत कधी तिची भेट होते की कधी तिला विचारू की आणि ज्या ज्या मुला मुलींचे प्रोजेक्ट राहिले होते त्यांना उद्या सबमिट करायला सांगितले होते हे काल विज्ञानाच्या सर ने सांगितले होते. त्यात तिचा पण प्रोजेक्ट राहिला होता वाटत सबमिट करायचा हे मला ती शाळेत आल्यावर कळालं मला पण माहिती नव्हतं मला तर अस वाटत होत आता परीक्षे मध्येच भेट होईल आमची ह्या अगोदर तिला पाहून मला कधीच ख़ुशी झाली नाही तेवढी त्या दिवशी होत होती.मी तिच्या कडे पाहत होतो तिची नजर अचानक माझ्या वर पडली मी थोडासा घाबरून गेलो " पण तिने मला पाहुन छोटी गालातल्या गालात स्माईल दिली. मला खूप छान वाटलं मी पण सेम स्माईल दिली आणि सर काय बोलत होते ह्या कडे लक्ष देत होतो. खरं तर माझ पूर्ण लक्ष तिच्याकडेच होत कारण ती खूप सुंदर दिसत होती त्या दिवशी...too be continue😍