Sparshbandh? - 13 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 13

मीरा झोपलेली बघताच मिष्टिने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

विरजची वाट बघत बघत तिला बसल्याबसल्याच कधी झोप लागली हे कळलच नाही.


.
....
............


रात्री 2 वाजता विराज रूम मध्ये आला..... त्याने पाहिलं कि मिरा मिष्टी ला एकदम घट्ट पकडून झोपली होती..........


मिष्टी बसल्या बसल्याच झोपली होती..... मीरा तिच्या मांडीवर डोक ठेवून तिला घट्ट बिलगून झोपली होती.


त्यांच्याकडे बघून कोणालाही वाटणार नाही की त्या सख्ख्या मायलेकी नाहीयेत.


मिष्टी अजूनही सकाळच्या साध्याच साडीत होती......अर्धे केस वर लटकवलेले होते तर अर्धे खाली आले होते झोपेत आणि त्यात तिच्या त्याला आवडणाऱ्या चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या.....


विराजला त्या बटा सावरायचा मोह आवरताच आला नाही.....तो हळूच पुढे आला आणि तिच्या बटा कानामागे सारल्या.


"किती नाजूक आणि निरागस आहे ही!!" अचानक त्याच्या मनात विचार चमकून गेला.


त्याला स्वतःच्याच विचारांवर आश्चर्य वाटल..... विराजची नजर तिच्यावरच स्थिर होती.


त्याच्या हात लावण्याने तिची झोप चाळवली.....तिने डोळे कीलकीले करून पाहिलं तर अगदी तिच्याजवळ उभा असलेला विराज तिच्या नजरेस पडला.


" तुम्ही इथे!!" मिष्टी थोडी दचकून मागे सरत म्हणाली.


" हो.....म्हणजे ही बेडरूम माझीच आहे मग मी इथेच असणार ना ." विराज मागे नीट उभा राहत म्हणाला.


" ह्मममम.....सॉरी ते माझ्या लक्षातच नाही आलं." मिष्टी मीराला नीट झोपवत तिच्या अंगावर पांघरूण टाकत म्हणाली.


मीराच्या आजूबाजूला उश्या लावून ती उभी राहीली.


मिष्टीने तिचे केस नीट क्लचर मध्ये अडकवले आणि साडी नीट करत ती उभी राहिली.....साडीची सवय नसल्यामुळे तिला थोड uncomfartable फील होत होत..... पण मीरा कडे लक्ष गेल्यावर तिने मिराच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले.


विराज त्या दोघींमधल कमी वेळात तयार झालेलं घट्ट नात आज बघत होता!!


" तुम्ही आवरून घ्या..... मी जेवण गरम करते." मिष्टी विराजकडे न बघता दरवाज्याकडे जात म्हणाली.


" हे लिसन...." विराज तिला थांबवेपर्यंत ती खाली निघूनही गेली होती.


" अरे ह्या माझं काही न ऐकताच गेल्या." विराज ती गेलेल्या दिशेला पाहत म्हणाला.


त्याने पटकन बाथरूम मध्ये जाऊन त्याच आवरलं.....आणि खाली किचनपाशी गेला.


आत मध्ये मिष्टी सराईतपणे वावरत होती......तिच्या पायातल्या पैजणांचा आवाज पूर्ण किचन मध्ये घुमत होता मध्ये मध्ये तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज ही येत होता.


छूम छूम आणि किणकिण एकत्रच ऐकू येत होत!!


आज पर्यंत घरी रात्री उशिरा आल्यावर त्याला कोणी जेवायचं विचारलं सुद्धा नव्हत.


स्वतःच्या घरात असून सुध्दा त्याला हॉटेल मध्ये राहील्यासारख फील यायचं!
पण आज पहिल्यांदा त्याला घरी असण्याचा फील येत होता.

घरातले असून नसल्यासारखेच होते सगळे!!


त्याला जेवायची इच्छा नसूनही फक्त तिचा आदर म्हणून तो जेवणार होता.


तो किचन मध्ये आला आणि तीच्याशेजारी खेटून उभा राहिला.


ती आमटी ढवळत होती...... मिष्टीने नजरेच्या कोपऱ्यातून त्याला आत आलेलं पाहिलं होत पण जसा विराज जवळ येऊन उभा राहिला तेव्हा तिचा श्वासच अडकला..... जस्ट फ्रेश होऊन आल्यामुळे त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध तिच्या नाकात शिरला...... चॉकलेट बॉडी वॉश विथ आलमंड पिंच!!


उगाच तिला पोटात काहितरी होताना जाणवायला लागलं.......लाजेची फुलपाखर तिच्या पोटात उडत होती.


" मी आत आलोय कळलं आहे तरी माझ्याकडे बघत नाहीत ह्या.....मगाशी पण मला इग्नोर करून गेल्या." विराज मनातच खट्टू होत म्हणाला.


उगाच काहीतरी करायचं म्हणून त्याने फ्रीज उघडला आणि परत बंद केला.


मिष्टी नजरेच्या कोपऱ्यातून त्याच्या सगळ्या हालचाली टिपत होती आणि एकीकडे तीच हसू ही आवरत होती.


विराज अजूनही ती आपल्याकडे बघत नाही म्हणून मनातच चिडत होता पण तोंडाने सांगणार कस ना की बाई बघ माझ्याकडे ! 😂🤭


" अम्......ते ....ते जेवण गरम झाल का?" शेवटी तीच लक्ष वेधुन घ्यायचं म्हणून काहीतरी त्याने विचारलं.


" हो.....होतच आल आहे.....तुम्ही डायनिंग टेबल वर जाऊन बसता का मी आलेच हे घेऊन." मिष्टी मुद्दामून त्याच्याकडे बघायचं टाळत होती.


आता विराजला रागच आला......एवढं बोलून पण तिने एकदाही त्याच्याकडे बघू नये म्हणजे 😠🙄😡😤


तो पाय आपटतच बाहेर खुर्चीवर जाऊन बसला.


त्याच्या अश्या वागण्यावर तिला खूप हसूच येत होत......मीरा लहान की हे लहान हेच तिला कळत नव्हतं 😂


आमटी गरम झाली तशी ती बाहेर घेऊन आली आणि त्याला नीट ताटात जेवायला वाढल.


साधासच जेवण होत.


त्याने वर न बघता खायला सुरुवात केली.....पहिलाच घास खाऊन त्याच मन तृप्त झाल.....जेवण साधच असून त्याने सगळ चाटूनपुसून खाल्ल......नाही म्हणता म्हणता दोन घास जास्तच खाल्ले विराजने.


तिच्या हातचं जेवण त्याला आवडल हे पाहून मिष्टीलाही बर वाटलं.


त्याच जेवण झाल तस तिने सगळ आवरायला घेतलं..... ओटा आवरता आवरता भांडीही घासून टाकली.


आणि बाहेर विराज ती आता येईल नंतर येईल म्हणून हॉलला लागूनच असलेल्या वरांडामध्ये चकरा मरत बसला.


जवळ जवळ अर्ध्या - पाऊण तासाने ती हात पदराला पुसत बाहेर आली.


वर जायला निघाली तर विराजला खाली पाहून तिथेच थबकली.


ती वर जायला पायऱ्या चढणार तोच मागून विराजने खचकन तिचा हात धरुन तिला मागे ओढले आणि तिथल्याच भिंतीला मागे टेकवल.


"आ ssssss" मिष्टीने घाबरून म्हणाली.


तिने तर आपण पडणार म्हणून डोळेच घट्ट बंद करून घेतले पण विराजला वाटल तिला आत्ताही त्याच्याकडे पहायचं नाही म्हणून तिने डोळे बंद करून घेतले.....म्हणून आपसूकच त्याची तिच्या हातावरची पकड अजून घट्ट झाली.


मिष्टीच्या डोळ्यात टचकन पाणीच आल....त्याच्या घट्ट हात पकडण्यामुळे तिच्या बांगड्या तिच्या हातात रुतल्या गेल्या.


" ओपन युर आईज." विराजने धारदार शब्दात तिला सांगितल.


तस मिष्टीने डोळ्यातलं पाणी कसबस रोखत डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं.


त्याच्या डोळ्यात राग दिसत स्पष्ट दिसत होता तिला...... मगास पर्यंत तर तो हसत खेळत होता अचानक काय झाल काहीच कळत नव्हत मिष्टीला.


" मी पहिलं आणि शेवटचं सांगत आहे.... माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं मला चालणार नाही.....मला कधीही इग्नोर करायचं नाही......मला अजिबात इग्नोर केलेलं आवडत नाही.....ह्या विराज जहागीरदारला इग्नोर करायची हिम्मत कोणीच करत नाही आणि इथून पुढे तू ही करू नकोस नाहीतर परिणाम खूप वाईट होतील......नेहमी माझ्याकडे बघून बोलायचं आणि इथून पुढे माझं जेवण तूच बनवशिल.....बाकी कोणाच्या हातचं मी खाणार नाही......लक्षात ठेव." विराज रागात तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला.

तस तिने घाबरूनच मान हलवली.


मगासपासून मनात उठलेलं वादळ तिने पाहिल्यावर थोड कुठेतरी शमल होत.


" अहो हात सोडा ना प्लिज 🥺🥺" मिष्टी कळवळून शेवटी त्याला म्हणाली.


तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून त्याने चटकन तिच्या हातावरची पकड सैल केली आणि तिला घेऊन तसाच वरती त्याच्या बेडरूम मध्ये आला.


मीरा गाढ झोपेत होती...... मिष्टीला तसच क्लोसेट मध्ये नेऊन तिथल्या सोफ्यावर बसवलं आणि क्रीम घेऊन आला.


हळूच तिच्या बांगड्या मागे सरकवत त्याने त्याच्याच बोटांचे वळ तिच्या हातांवर पाहिले तस त्याला स्वतःचाच जास्त राग येऊ लागला पण आधी तिला औषध लावणं गरजेचं होत.

त्याने फुंकर मारत तिच्या हातांना क्रीम लावलं.


किती वेगळीच रीत होती त्याची....
जखम पण त्यानेच दिली होती आणि मलमपट्टी पण तोच करत होता !!


मगाशी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून रागावलेला तो विराज खरा होता की आता त्याच्यमुळे तिला लागलं म्हणून तिच्या हातावर फुंकर मारत तिची काळजी करणारा विराज खरा होता??


किती वेगवेगळी रूप होती त्याची..... घरातल्यांचा स्वभाव माहिती असून तो सर्वांना सांभाळून जगत होता पण त्याच्या जगात तिला तिची अशी जागा कधी मिळणार होती का??


सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त येणारा काळच ठरवणार होता !!


आज कोणीतरी पहिल्यांदा तिची मायेने काळजी घेतय अस वाटत होत......आधीच तिला काहीच आठवत नव्हत आणि रुद्र तिच्यापेक्षा लहान असल्यामुळे तीच त्याला माया लावायची.


हातांना क्रीम लावून झाल तस ते काहीही न बोलता बेडरूम मध्ये आले.


पहिल्यांदाच दोघे एका बेडरूम मध्ये राहणार होते.


" बाप्पा आता ह्यांना तर सोफ्यावर झोपायची सवय नसेल किंवा खालीही झोपायची सवय नसेल......आणि सांगणार तरी कस मी की तुमच्याच बेडरूम मध्ये तुम्ही दुसरीकडे झोपा....मग झोपायच कस पण आता??......मीच सोफ्यावर जाऊन झोपते..... माझ्या येण्यामुळे उगाच ह्यांना त्रास नको......मगाशी त्यांच्यामुळे मला लागलं ते साधं सॉरी पण नाही बोलले......त्यात लहान मुलांसारखे त्यांच्याकडे पाहिलं नाही म्हणून रागवून बसले." मिष्टी मनात विचार करत बोलली.


तिने बेडवरची एक उशी उचलली आणि सोफ्याकडे जायला निघाली तेवढ्यात मागून विराजने तिला हाक मारली.


" तुम्ही कुठे चालला आहात ती उशी घेऊन??" विराज...


" मी ना ही उशी घेऊन देवळात चालले आहे कुठे झोपायला जागा मिळते का ते बघायला." मिष्टी त्याच्याकडे एकटक बघत म्हणाली.(मनात 😂🤭)


" अहो मी तुम्हाला काहितरी विचारलं." तिने उत्तर नाही दिलं म्हणून परत विराजने तिला विचारलं.


तशी ती मनातून भानावर आली.


" ते मी सोफ्यावर चालेल होते झोपायला." मिष्टी सोफ्यकडे इशारा करत म्हणाली.


" बर ठीके." विराज काहीसा विचार करत म्हणाला आणि त्याने त्याचा टीशर्ट काढून मीरापाशी जाऊन बेडवर झोपला आणि वरून सगळे लाइट्स पण बंद करून टाकले.


मिष्टी तर अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच उभी राहीली.


" हा मनुष्य साधं चुकीसाठी सॉरी सोडाच पण शुभ रात्री पण न म्हणता डायरेक्ट लाईट बंद करून झोपून गेला.....आपल्या बरोबर दुसरी व्यक्ती पण आता राहते ह्याचं काही भान??....एक लहान मुलगी रूम मध्ये असताना टीशर्ट काढून झोपले पण हे......बाप्पा काय म्हणायचं आता मी ह्या वागण्याला??......सगळच कोड आहे.....नाही नाही.....विराज जहागीरदार हेच एक मोठं कोड आहेत." मिष्टी तिथेच उभी राहून उसासा सोडत मनात बोलत होती.


" मिष्टी रात्रभर तिथेच उभ्या राहणार आहात का??" विराजचा आवाज आला तशी पटकन ती सोफ्यावर जाऊन आडवी झाली.


झोपायच्या आधी मिष्टीने न विसरता सकाळी 6 चा अलार्म लावून ठेवला...!! लग्न झालंय आता लवकरच उठाव लागेल अस तिच्या मनात होत.


पण याची खरंतर तिला गरज ही नव्हती..... घरात खूप नोकर जण कामाला होती..... सगळ्या गोष्टी हातात मिळतात पण माहीत नाही का तिला सगळ्यांसाठी करावस वाटत होत.....त्यांच्या मनात तिला जागा मिळवायची होती....!! आणि पहिल्यांदा अशी फॅमिली तिला मिळाली होती..... त्यामुळे तिला सगळं करण्यात एक आनंदच मिळत होता..!! उद्या ती एकटी लवकर उठेल सगळ्यांसाठी काहीतरी चांगल बनवेल..... असा विचार ती करत होती.....सगळ्यांना जपण्याचा विचार मनापासून ती करत होती.


विचार करत करत करतच ती झोपली थोडं uncomfortable वाटतच होत पण काय करणार स्वतःचा शहाणं पणा...


.
..
...
......
......


सकाळचे 6 वाजले....... मिष्टी एकाच अलार्म मध्ये उठली......ती तशीच पटकन उठत आपले कपडे घेत वॉशरूम मध्ये शिरली.... बाथरूम सुद्धा एकदम पॉश होत....


मिष्टी पटकन आवरून बाहेर आली तिने एक नजर बेड वर टाकली तर तिथे विराज नव्हता....


मीरा अजूनही झोपली होती.


" उम्म्म... आता हे कुठे गेले...???? " मिष्टी विचार करत राहिली.


ती रूमच्या बाहेर यायला निघाली तस डोअर जवळच तिची आणि विराजची टक्कर झाली....


"आऊच.... 😣" मिष्टी डोकं चोळत म्हणाली....समोर विराज उभा होता....


आता पण तो फक्त त्याच्या शॉर्ट्स वरच होता.... थोडा भिजलेला वाटत होता......


मिष्टी त्याला काही बोलायला जाणार तोच तिची नजर त्याच्या शरीरावर खिळली.


आधीच गोरा रंग आता exercise करून आल्यामुळे थोडा लाल लाल झाला होता....त्याच्या एका हातात त्याच्या शेक ची बॉटल होती.....त्याचे हाताचे बायसेप्स उठून दिसत होते.....त्यातून त्याच्या फुगीर नसा स्पष्ट दिसत होत्या.....त्याचे अगदीच सिक्स पॅक नव्हते पण बॉडी एकदम फिट आणि कोणत्याही मॉडेलला मागे सोडेल अशी होती.

आजपर्यंत तिने कधी आपल्याला एवढा हँडसम नवरा मिळेल असा कधी विचारच केला नव्हता....मुळात ती कधी लग्न करेल हे पण तिच्या कधी ध्यानीमनी नव्हतं.....तीच जग तिच्या भावाला मोठ करायचं एवढंच होत.


मिष्टी त्याच्याकडेच पाहतच राहिली होती...... " OMG काय सेक्सी बॉडी आहे तुमची....... " ती डोळे मोठे करत म्हणाली...


" काय...?? " विराज जरा शॉक होत तिला म्हणाला.....


मिष्टी जरा गडबडली.... तिला समजलंच नाही ती अचानक काय बोलून गेली ते... तिला जरा स्वतःचीच लाज वाटली.... आपण जरा जास्तच बोललो वाटत....


" मी.. ते मी... आलीच " म्हणतं मिष्टी धावतच खाली पळून गेली.....


" विराज तिच्याकडे पाहत विचार करू लागला..... मी हिला खूपच साधी समजत होतो पण ही तर...... " विराज... पण गालातच हसत आतमध्ये निघून गेला....

.
..
...
.....
........

खाली येत मिष्टी विचार करू लागली की हे इतक्या सकाळी रोज उठतात का ?


मिष्टी किचन मध्ये आली तर आधीच बरेच नोकर आलेले होते....आणि सगळेच आपापल्या कामात व्यस्त होते....


तिला किचनमध्ये आलेलं पाहून एकाने लगेच पुढे होऊन विचारलं.


" बाईसाहेब काही हवं होत का तुम्हाला??.....अहो तुम्ही कशा पायी खाली यायचे कष्ट घेतलेत? तुम्ही खाली कॉल करून सांगितल असत तरी चाललं असत." तिथेच खूप वर्षांपासून काम करणारा सदू तिला थोड्या गावठी भाषेत म्हणाला.


" पहिले तर हे बाईसाहेब नका म्हणू मला.....मी तुमच्यापेक्षा लहान आहे ना ओ दादा." मिष्टी....


" असं कस?......तुम्ही आमच्या विराज बाबांच्या बायकु आहात मग तुम्ही बाईसाहेबच झालात ना आमच्यासाठी." सदू थोडा बिचकतच म्हणाला.


" बर......मग तुमचं नाही माझ नाही सदू दादा तुम्ही मला ताईसाहेब म्हणा.." मिष्टी थोडा विचार करत म्हणाली.


" बर ठीक हाय मग.......थांबा मी तुम्हाला ओळीख करून देतो इथल्या सगळ्यांशी." सदू....


" रखमे ए रखमे...अस हिकड ये की जरा." सदू कोणाला तरी आवाज देत म्हणाला.


" काय ओ काय झाल??....कशा पायी माझ्या नावानी ओरडुन राहालाय??" एक मध्यम वयाची बाई तिच्या साडीच्या पदराला हात पुसत येत म्हणाली.


" ताईसाहेब ही रखमा माझी बायकू.....आम्ही दोघंबी हितच काम करतो.....विराज बाबा लहान व्हते तेव्हापासून आम्ही हीतच आहोत......इथली सगळी कामं आम्हीच बघतो.......ते काय म्हणतात मेन का फेन त्ये हाय आम्ही इथल्या सगळ्या कामासाठीच" सदू मिष्टीला माहिती पुरवत म्हणाला.


" हो ताईसाहेब.......आव ताईसाहेब तुम्हासनी काही हवं असल तर मला सांगत जावा मी करेन सगळ......ते काल आम्ही घरला गेलो होतो आमच्या गावी मनून आपली भेट नाही झाली बघा......आजच पहाटल परत आलो." रखमा पुढे येत म्हणाली.


" रखमे नंतर बोलीत बस आधी त्यांना काय हवं नको ती बघ की" सदू मधेच म्हणाला.


"व्हय व्हय......काय हवं होत तुम्हाला ताईसाहेब?" रखमाने मिष्टीकडे बघत विचारलं


त्यांचं संभाषण पाहून मिष्टीला खूप छान वाटत होत......कोणीतरी आपुलकीने तिच्याशी बोलत होत इथे.


" ते मला नाश्ता करायचा होता." मिष्टी.....


" काय देऊ तुम्हास्नी?? तुम्हाला काय हवं ते सांगा त्यो शेफ सगळी बनवतो आणि मी बी बनवून देईल की तुम्हाला.....तुम्ही फक्सत सांगा." रखमा पदर खोचत म्हणाली.


" तस नाही रखमा ताई म्हणजे मला ते सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा होता." मिष्टी...


" तुम्ही बनिवणार??" रखमा आणि सदू दोघेही थोडेसे आश्चर्य चकित होऊन म्हणाले.


" हो..... काल पण मी जेवण बनवलं होत.......काही प्रॉब्लेम आहे का??" मिष्टीने थोड गोंधळून विचारलं.


" आव तस काय बी नाहीये.....ते आम्हीच सगळ करतो ना मनून विचारलं आम्ही......ते इथे प्रत्येकाचा येगयेगळा नाष्टा अस्तोया...... कोनिबी एका येळेस नाष्टा नाय करत." रखमा....


" पण एकदा मी बनवून बघते ना सगळ्यांसाठी एकत्र नाष्टा......तुम्हाला काही अडचण नसेल तर..... प्लिज" मिष्टी विनवणीच्या सुरात म्हणाली.



" आव प्लिज काउन बोलताया??..... तुमचंच हाय हे समद.....बनवा तुम्ही." सदू आणि रखमा दोघंही तिला म्हणाले.


" तुम्ही माझी मदत करा फक्त." मिष्टी पण तिचा पदर खोचत म्हणाली.



त्यांनी तिला सगळं लागेल ते सामान काढून दिल आणि तिथेच बाजूला उभे राहिले......


मिष्टीला नाश्ता मध्ये उपमा बनवायचा होता..... आणि ते नाश्ता साठी तिला परफेक्ट वाटत होत... त्यामुळे तिने तेच बनवायला घेतलं....


थोड्याच वेळात विराज तयार होतं खाली आला.... तो खाली आल्यावर नाश्ता लगेच रेडी असायचा पण आज न्हवता....!! त्याने बाहेर उभ्या असलेल्या शेफकडे नजर टाकली आणि सदू ला हाक मारली.


" सदू दादा ssss....हे असे सगळे बाहेर का उभे आहेत??" विराज....

त्यांनी मिष्टी किचन मध्ये असल्याच सांगितलं....आणि आपल्या कामाला बाहेर निघून गेला.


" oh... तर हे सगळं करायला ही लवकर उठलेय...?? " विराज विचार करत म्हणाला.....


विराज तसंच डायनिंग टेबल वर बसला.. तस एका नोकराने जाऊन मिष्टीला कळवल....
पण आताशी तिने बनवायला सुरुवात केली होती.....तिने फक्त 5 मिनट वेट करायला सांगितलं...


विराज तसंच निघून गेला..... मिष्टी बाहेर नाश्ता घेऊन गेली तितक्यात तो निघून ही गेला होता.....

मिष्टीला जरा विचित्रच वाटलं.......

"थोडावेळ वाट बघितली असती तर इकडचं जग तिकडे नसत झाल..... काल तर मोठमोठ्याने म्हणाले तुझ्याच हातचं सगळ खायचं आहे.....दुसऱ्यांच्या हातचं खाणार नाही मग आता काय झाल??....थोडासा उशीर झाला तर निघून गेले." मिष्टी थोड रागातच म्हणाली.

तिने उपमा डब्यात पॅक करून एका नोकराच्या हातून विरजच्या ऑफिसला पाठवून दिला आणि दुपारच्या जेवणाचा डबा ही येईल असा निरोप द्यायला सांगितला.


सकाळचा वेळ सगळा तिचा जेवण बनवण्यात आणि मीराच बघण्यातच निघून गेला.

मीरा स्कूल ला गेली तशी ती मोकळी झाली..... विराजचा डबा ही पाठवून दिला होता.

.
...
......
..........


तिला आता खरंच कंटाळा ही येत होता... सगळे आपापल्या कामाला गेले होते.. घरी फक्त आई बाबा होते.... पण ते त्यांच्या खोलीत होते....


एकच घरात राहून जणू सगळे आपापल्या वेगळ्याच विश्वात जगत होते.....ना तिथे कधी एकत्रित येऊन सकाळी नाष्ट्यावर गप्पा होत होत्या ना कधी कोणी हसत असताना तिला दिसत होत.


फक्त रात्रीच जेवण एकत्र व्हायचं जेव्हा विराज घरी असायचा तेव्हा!! पण तो नसला की तेही नाही व्हायचं!


गीता थोडे दिवस गावाला गेली होती तिच्या

मिष्टी कंटाळून रूम मधेच विचार करत बसली होती
तोच रुद्रचा call आला.....

" दी...... I miss you yaar घरी यावंसं पण नाही वाटत ग.... तू नाहीस तर...... दि मी तुझ्या इथे राहायला येऊ का ग....." रुद्र..


" ए वेडा आहेस का.... सवय लाव आता एकटं राहायची... प्रत्येक वेळी मी नसणार आहे आता तुझ्या सोबत... " मिष्टीला सुद्धा भरून आल होतं....


" दी तू कधी सांगितल नाहीस पण की तुझ जिजुंवर प्रेम होत." रुद्र तिला म्हणाला.


" तुला कोणी सांगितल हे??" मिष्टी शॉक होऊन म्हणाली.


" जिजूंनीच .....ते आले होते काल घरी त्यांनी मला सगळ सांगितल.....तुमचं प्रेम.....काही कारणास्तव अचानक करावं लागलेलं लग्न....सगळच सांगितल त्यांनी मला" रूद्र .....


" ते सांगणार होते मी तुला पण त्या आधीच हे सगळ झाल." मिष्टी सावरासावरी करत म्हणाली.


" बर दी.....तू काळजी नको करुस मी आता अभ्यास करणार आहे नंतर बोलतो." रुद्र ने बोलून कॉल कट पण केला.

तो नीट जेवत तरी असेल का..?? सगळं त्याच्या हातात द्यावं लागायचं आणि आता?? तिच्याविना करू शकेल का तो हे सगळं....
मिष्टिच्या मनात विचार घोळत होते.


विराज रुद्रच सगळं education चा खर्च पाहत होता... त्याने इतकं केल होत पण रुद्र एकटा कसा राहील हा पण प्रश्नच होता एक.......विराज आणि रूद्र मध्ये झालेल्या बोलण्याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती.


मिष्टीने मनात काहितरी विचार पक्का केला आणि मीरा आली म्हणून खाली तिला घ्यायला निघून गेली.



क्रमशः......

****************************