Sparshbandh? - 17 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 17

ऑफिस जवळ आल्यावर थोड्या अंतरावर मिष्टिने गाडी थांबवायला सांगितली.


" मी इथेच उतरते....उगीच कोणाला संशय नको." ती एवढं बोलून निघूनही गेली.

तो बोलणार पण ती थांबलीच कुठे त्याच ऐकायला!!


नाही म्हणलं तरी लग्न झालं असूनही लपवण त्यात मंगळसूत्र पण नाही घालायचं म्हणजे तिला नको वाटतं होत.....उगाच गिल्टी वाटत होत.....मन नाही म्हणत असतानाही करावं लागत होत.



त्यात सकाळपासून जाणवत असलेली अनामिक हुरहुर!!

तिने छातीवर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत ती ऑफिसमध्ये गेली.


ती तिच्या केबिन मध्ये शिरताच तिने तिची काम हाता वेगळी करायला घेतली...... विराजच आजच वेगळं वागणं ना जाणे पण तिच्या मनाला सुखावून गेले होत.


" मिष्टी...." अविनाश आत येत म्हणाला.


तरीही ती तिच्याच तंद्रीत होती.

" मिष्टी." अविनाश जरा मोठ्यानं म्हणाला.


" अह....काय??" ती गडबडून म्हणाली.


" कुठे होत तुझ लक्ष??" अविनाश फाईल टेबलवर ठेवत विचारत होता.


" कुठे काय?? इथेच तर होत....काय झाल??" मिष्टी सावरत म्हणाली.



" ही फाईल आज कंप्लीट करून हवी आहे..... तस सत्तर टक्के काम पूर्ण होत आल आहे.....हे ही लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे."



" हो....ठीके.....देते मी पूर्ण करून." मिष्टी स्मितहास्य करत म्हणाली.



ती पटापट कामाला लागली.

ब्रेक मध्ये सगळे कॅन्टीन मध्ये जेवायला बसले होते.


" ए आपले बॉस कसले हॉट दिसतात ना." अश्विनी म्हणाली.( त्यांचीच एक टीम मेंबर)


" हो ना.....त्यांचा आज मॅगझिनला फ्रंट कव्हर फोटो आला आहे ना." शांभवी ने ही त्यात हामी भरली.


" किती वेल मेन्टेनड आहेत ते." अश्विनी.



" हो ना.... त्यांच्याकडे बघून त्यांना एक मुलगी असेल वाटत पण नाही यार." शांभवी


" हो ना..... पण त्यांच्या बायकोला कोणीच नाही पाहिलंय ग अजून." अश्विनी प्रश्र्नार्थक नजरेने विचारत होती.



" अरे किती नको त्या चौकश्या असतात ह्यांना.....कश्याला दुसऱ्याच्या नवऱ्याबद्दल एवढी कुतूहल??" मिष्टी मनातच चरफडत बोलू लागली.

तिथून उठून निघून गेली ती.


कामातच ह्यातच दिवस कसा सरला कळलंच नाही....मीरा यायची वेळ झाली तस मिष्टी ऑफिसमधून निघाली.


खाली आली तर थोड्या अंतरावर गाडी उभीच होती.


घरी आल्यावर तिचा दिवस सगळा मीराच्या मागेच गेला.


रात्री झोपताना मीराला ती गोष्ट सांगत होती.


" मग काय कळलं गोष्टीतून??" मिष्टी पुस्तक बंद करत म्हणाली.


" आंटी." मीरा एकटक तीच्याकडे बघत म्हणाली.


" काय झाल ग सोनुल्या??" मिष्टी.


" तू माझी आंटीच आहेस ना ?? माझ्या शाळेतल्या फ्रेंड म्हणत होत्या की तू माझी नवीन आई आहेस." मीरा तिच्याकडेच बघत होती.


" मीरा तुझ्या आईची जागा मी कधीच घेणार नाही आणि घेऊ ही शकणार नाही.....आणि अस कुठे लिहिलं आहे का की तुझ्यावर प्रेम करायला आपल्या नात्याला नाव पाहिजेच?? ह्या अश्या गोष्टींचा जास्त विचार नाही करायचा आपण..... ह्ममम.." मिष्टी तिला थोपटत म्हणाली.


" ओके आंटी...... गूड नाईट.... यू आर द बेस्ट." मीरा तिला झोपेतच मिठी मारत म्हणाली.


" माझा बच्चा ग." मिष्टी तिची तिची पापी घेत म्हणाली.

रात्री तिला झोपवून ती त्यांच्या बेडरूम मध्ये आली.


" झोपली मीरा??" विराजने लगेच तिला विचारलं.


" हो इतक्यातच.....दमली होती म्हणाली खूप आज....तिच्या शाळेत स्पोर्ट्स डे आहे म्हणे त्याचीच तयारी होती म्हणाली.....दमली म्हणून लवकरच झोपी गेली."

सकाळपासून गाडीतल्या सवांदानंतर ते आताच एकमेकांशी बोलत होते.


" अहो मी आलेच." म्हणत मिष्टी क्लोसेट मध्ये कपडे बदलायला निघून गेली.


बाहेर आली तर विराजने त्याचा लॅपटॉप बंद केला होता.

ती तिची उशी घेऊन सोफ्याकडे चालली होती.


" थांब एक मिनिट." विराज तिला रोखत म्हणाला.


" काय झाल??" तिने प्रश्र्नानर्थ्क नजरेने त्याला बघितल.


" तू आजपासून बेडवरच झोपणार आहेस." विराज तिच्याकडून उशी घेत परत बेडवर ठेवत म्हणाला.


" अहो मग तुम्ही कुठे झोपणार?? नाही म्हणजे तुम्हाला बेडशिवाय कुठे झोप लागत नाही....नाही नको मी झोपते सोफ्यावर तुम्ही झोप ना इकडे." त्याच काहीही न ऐकता तीच बडबडत होती.


" शशशशश.....किती बोलतेस !!" त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं.

ती एकदम शांतच झाली.....


" तोंड कस दुखत नाही ग एवढं बोलून??.....आता ऐक नीट आपण दोघेही एकाच बेडवर झोपणार आहोत..... बेड नक्कीच एवढा मोठा आहे की आपण टोकाला झोपलो तरी आरामात झोपू." तो शांतपणे तिला सांगत होता.


पण तिचे डोळे हळू हळू मोठे होत होते." बास झाली चर्चा आता..... झोपूयात खूप उशीर झाला आहे." त्यानेच विषयाला पूर्णविराम दिला आणि बेडवर एका बाजूला आडवा झाला.

त्याने लाईट बंद केले आणि डोळ्यावर हात ठेवून झोपला.
ती अजूनही तिथेच तशीच उभी होती.


" रात्रभर तिथेच उभी रहाणार आहेस का??"

त्याचा आवाज आला तशी ती गडबडली आणि बेडच्या दुसऱ्या टोकाला पांघरूण डोक्यावरून घेऊन गुडूप झाली.


मिष्टीच्या अश्या वागण्यावर त्याला हसूच आल पण त्याने ते रोखून धरल.

तीच्याकडे वळून तिला बघता बघता कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही.


विराजने वळून तीच्याकडे बघितल तर ती गाढ झोपी गेली होती.

जेव्हापासून तिला स्वप्नांचा त्रास होतो कळलं तेव्हापासूनच त्याने ठरवलं होत की तिला सावरायला मदत करायची.

काही डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार त्याने काही उपायही नोंद करून घेतले होते पण सगळ्यात महत्वाचं होत ते म्हणजे प्रेम!!

हो प्रेमच...तिला आपण हवे आहोत ही एक प्रेमळ भावना तिच्या मनात जगवायची होती....तिच्या मनातली भीती काढून टाकायची होती.
आणि त्याच गोष्टीचं पहिलं पाऊल म्हणजे तिला आपलेपणाची जाणिव करुन देणं.

तिच्या कडे बघत बघत विराज झोपी गेला.

**********************


" किट्टू आता आपल्याला भेटायची वेळ जवळ आली आहे....कधी तुला एकदा पाहतोय आणि जवळ घेतोय अस झाल आहे मला पण आता जास्त वेळ वाट नाही बघावी लागणार......कारण आलोय मी आता तुला कायमच माझ करायला." सागर एकटक तिच्या फोटोकडे बघत बोलत होता.


*********************