न्यू........one....." माझा प्रवास."..... "दगडाच्या देवाला सजवण्यापेक्षा विचारांना सजवा..."
हे मी असंच काही म्हणत नाही. मीही त्यात खूप गुरफटलेली नव्हते, पण ते मीही केलं. आणि ते करण्यामागे कारण होतं—आई, माझे विचार, मन आणि माझ्याच समाजातील काही माझे काका-काकूंचा आवाज.काहीजण बोलायचे पण तेही घाबरत असायचेच, की देव आणि ही श्रद्धा तेही आतून मानत पण तरीही ते आईला म्हणायचे, "का करता तुम्ही एवढं देव-देव?"अगदी मी लहान होते ,तेव्हापासून हे ऐकत आले. पण मी सर्वांचाच आदर करत असे. माझ्यासाठी जशी माझी आई बरोबर, तसेच इतरही बरोबर असतील, असंच मला वाटायचं.आणि आई... जे करायची ते घाबरत नव्हती ती बिनधास्त करायची मग म्हणायची की नाही आई जे आहे ते खंबीर पणे करते ...काय आहे ह्यात ते बघायला हवं...आई एवढं करायची की, जेवण एकाच वेळचं असायचं. आईचा उपवास असला की मला खूप अस्वस्थ व्हायचं. आईसोबत जेवायला बसायचं, किंवा आई जेवली की मला जेवल्यासारखंच वाटायचं.आणि मग आईचा उपवास असेल, तर मी जेवते ते मी काय जेवते? त्या जेवणाला काही महत्त्वच नसल्यासारखं वाटायचं.अगदी आजही शेजारी कोणी म्हणालं, "आज माझा उपवास आहे", तरी मला अस्वस्थ होते. त्यांना काहींना म्हणते सुद्धा उपवास वाईट गोष्टींचा, चुकीच्या चालिरीतींचा, अन्यायचा, अपमानाचा, वागणुकीचा...असच बरच..काही..जे योग्य नाही त्यांचा उपवास करायचा असतो..हेच..सांगते..असो...मग मी आईला विचारायचे,"आई, तू हे का करतेस? यामधून तुला काय मिळतं?"आई म्हणायची,"माझ्या मनाचं समाधान."आई जेवढी देवपूजा करायची, ती माझ्याकडूनच करून घ्यायची. घरात बहिणी होत्या, पण त्यांच्या हातून केलेली पूजा तिला कधीच आवडायची नाही.माझं मराठी वाचन पहिलीपासूनच अगदी स्पष्ट होतं. घरात मी लहान आणि दादा, काका, सगळ्यांची लाडकी. त्यामुळे शाळेत जाण्याच्या आधीच मी पुस्तकं वाचायला शिकले. सगळे कौतुक करायचे. आई-बाबा तर जास्तच.मग तेच मी आईलाही शिकवायचे.आईने शिक्षण घेतलं नव्हतं. तिला नेहमी वाटायचं, "मी शिकले असते, तर मला वाचता आलं असतं."ती बोलून दाखवायची.मग मी जसं मराठी वाचायला शिकले, तसं रोज आईला बसवून बाराखडी शिकवायचे आणि तिच्याकडून वाचून घ्यायचे.आई ते करायची.सर्वात आधी तिने स्वतःचं नाव लिहिलं.तेव्हा तिला खूप आनंद झाला.ती वाचायची.मग माझ्याकडून तिची पूजा, वाचन करून घ्यायची.मी मोठी होत गेले, तसं तिचं वाचनही सुधारलं.मग मी आईला म्हणायचे,"आता तूच वाचू शकतेस. हे तूच वाच."ती वाचायची.काही वेळा म्हणायची,"आता पूजा झाली असं वाटत नाही."तरीही ती स्वतःच वाचायची.आईला नेहमी माझं कौतुक वाटायचं की मी तिला वाचायला शिकवलं.पण खरं पाहिलं, तर तिची जिद्द होती. म्हणून ती शिकली. ...पण बाबांचं वेगळंच होतं.माझ्या जन्माच्या आधीच बाबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला होता. काही वर्षे ते भिक्खूही झाले होते. आणि त्यांनी आयुष्यभर बुद्धांच्या तत्त्वांनुसारच जीवन जगलं.कधीच कोणत्याही मोहात, मायेत, रागात किंवा लोभात मी त्यांना पाहिलं नाही.ते नेहमी शांत असायचे. हसतमुख असायचे. सर्वांशी करुणेने, प्रेमाने वागायचे.आई आणि बाबा दोघे खूप वेगळे होते, पण एकमेकांना खूप समजून घेणारे होते.बाबांनी देवासमोर जाऊन हात जोडलेले मला कधी आठवत नाहीत. मी तसं कधी पाहिलंच नाही.असं करता करता मी मोठी होत गेले.एका बाजूला समाजाचा आईच्या श्रद्धेला विरोध, दुसऱ्या बाजूला आईची पूजा, आणि तिसऱ्या बाजूला माझे प्रश्न...मी मनात फक्त एकच म्हणायचे,"आईला यात असं काय मिळत असेल, की तिला हे करावंसं वाटतं?"मला त्याचा शोध घ्यायचाच होता.मग मी सातवीत असताना, आई शेतात गावी जायची. मी आणि माझे भाऊ घरी असायचो. एका ताईचं लग्न झालेलं होतं, दुसरी ताई घरी होती, तीही होती आमच्यासोबत ....तेव्हाच मी आणि ताईने पहिल्यांदा उपवास केला.ताई आईसारखाच उपवास करत असे...पण माझ्या मनात एकच विचार होता—"यातून काय मिळतं, ते मी पाहणार."मी तो उपवास एवढा कडक धरायचे की पाणीसुद्धा प्यायचे नाही.मग स्वतःलाच विचारायचे,"यातून काय मिळालं?"मग जाणवलं—शिस्त.आणि त्या शिस्तीनेच आयुष्य घडतं.त्यामुळे आई उपवास करत होती, पण तिला वाटायचं, "देव बोलतो."मला मात्र त्या उपवासातून शिस्त, सातत्य (Continuity), दिनचर्या (Routine) आणि आपण जे करतो त्यातलं ध्यान दिसायला लागलं.एकाच ठिकाणी शांत बसणं आपल्याला जमत नाही.पण तिथे आपण रोज बसू शकतो. हे करायलाच पाहिजे,पण हे का करतो हा प्रश्न विचारत नाही, की काहींना भीती, देव रागवेल, तर काहींना सवय झालेली म्हणून..मग जशी जशी मोठी होत गेले, तसं प्रत्येक मंदिर पाहिलं.प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारायचे—"हे केल्याने काय होतं?""तुम्ही बोलणार नाही, मग मी हे का करू?" हे त्या मंदिरात बोलायची त्या देवाला..."मी एवढ्या लांब का येते?"करमेश्वर, लाखाळा, पाळेश्वर...नववीत असतानापासून आम्ही जात होतो ..अगदी सायकल ने..असं अनेक ठिकाणी गेले.पण प्रत्येक वेळी तेच प्रश्न.एक दिवस मनात ठरवलं—"तुम्ही काही करणार नाही." ( काय करायला पाहिजे होत आता वाटत... मला....जे काही जीवन असते ते कष्ट, इमानदारी, नियमितपणा , आहे ते योग्य समजून पुढं जाणं...पण हे माझे प्रश्न आणि मी, माझा शोध संपत नाही.)मग मंदिरात गेल्यावरही असंच वाटायचं की,"मी जे शोधते आहे, ते मला इथे मिळणार नाही."पण जेव्हा जेव्हा तिथे जायचे, तेव्हा मला एकच गोष्ट खूप आवडायची—निसर्ग.निसर्ग अनुभवणं.आणि निसर्गासोबत माझं नातं लहानपणापासूनच खूप घट्ट होतं. सकाळी उठली की पहिला आवडता क्षण म्हणजे माझा सूर्योदय ... तेच आणि संध्याकाळचा सूर्य...मी रोज त्यांना बोलत असते...आणि (नेहमी एकच ड्रॉइंग काढत असे, आवडता सूर्य आणि नारळाचे झाड,नदी, आणि फक्त हिरवे गवत ..) वाटत ते माझे सर्व ऐकतात... तसाच माझा चंद्र मला खूप आवडतो...मी त्याच्यावर खूप प्रश्न विचारले..समजून घेतले...अगदी माझ्या शिक्षक. माझे बुक्स......पण हा शोध आहे माझा, मी अनुभवलेला , की मूर्तीत, मंदिरात जे शोधतो आहे आधी पासून माणूस, तेच आपल्यात आहे...आणि ते कसे शोधत गेली...हेच सांगत आहे ह्या मध्ये...पण ..प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल.., मी माझा सांगते........हवा, पाऊस, सर्वांना मी बोलते.....निसर्गातील प्रत्येक जीव माझ्यासाठी मझ्याचसारखे आहेत असच मला वाटत..त्यांनाही ते सर्व आहे ...सुख दुःख असच...पण पुढे बघूया...To be continue....