Naate Janmapalikdache in Marathi Love Stories by lekhani books and stories PDF | नाते जन्मापलिकडचे - भाग 8

The Author
Featured Books
Categories
Share

नाते जन्मापलिकडचे - भाग 8

वैदेही हॉल च्या आत प्रवेशली. शिव ची आकृती त्या गर्दीत देखील लख्ख चमकून येत होती. त्याने अबोली रंगाचा रेशमी कुर्ता घातला होता.
फेटा बांधून घेण्यासाठी तिथे उभा होता. तिला तो पाठमोरा होता.

त्याच्या आकर्षक पाठ कडे बघताना वैदेहीला आनंद होत होता.
"चेहऱ्यासोबत त्याची पाठ देखील किती आकर्षक वाटते हो."ती हलकीच हसली.पण तिचं हृदय मात्र मॅरेथॉन धावत होतं...
"मी कशी सामोरे जाणार आहे त्याला, तत, पप झालं तर??त्याला मी nervous आहे हे कळलं तर?शांत वैदेही शांत 😮‍💨बी पॉसिटीव्ह "ती कोमल पावलांनी त्याच्याकडे वळली. पायातील पैंजणांचा कोमल 'छुम छुम'त्या हॉल मध्ये घुमला.

इथं शिवच्या मनात.
"अरे,आज वैदेही ताई पाडेकर आल्या नाहीत का?कमाल आहे.."वैदेहीच्या पैंजणांचा आवाज आल्यावर "एवढे कोमल,पण मधुर घुंगरू कोणाचे वाजत आहेत? ऐकायलाच खूप सुमधुर वाटते."या आवाजाचा आनंद तो घेत होता.
End of Shiv's pov

वैदेहीने अखेर मनावर ताबा मिळवला. तिने प्रेमळ हाक मारली,"शिवsss"त्या हाकेला त्याने मागे वळून बघितले.

शिवचे सौंदर्य पाहून वैदेहीचे मन आणखी धडधडू लागले."He is looking handsome as always, my heart can't take it.असं वाटतंय आताच मी पाघळून जाईल."तिने हँडशेक साठी हात वर केला.शिवचे डोळे देखील हलकेच विस्फारले होते हे तिच्या लक्षात आले. हँडशेक केल्यावर तिने एक गोड smile दिली.त्याच्या मनात ही त्या गोडपणाने असंख्य पाखरू भिरभीरले.ही पहिली वेळ होती जेव्हा ते दोघे थेट एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. वैदेहीला शिवच्या डोळ्यात काहीतरी गूढ दडल आहे हे जाणवल.. आणि शिव ला कळले होते कि तिच्या डोळ्यातून भावना वाहत आहेत..
पण कोणत्या, हे काही कळले नाही....


"उशीर झाला यायला "
"हो गं मिली एकटी राहत नकही ना, म्हणून थांबावं लागलं."
"फेटा बांधत आहेस?"
" हो, तू नाही बांधणार? "
ती हलकीच हसली, "अरे मी अंबाडा घातला आहे, फेटा बसणारच नाही."
"हं, ते पण आहे.. पण मग स्वतःच्या पक्षाला कसं रिप्रेझेन्ट करशील गं?"वैदेही गोंधळली.

"अरे तुम्ही वैदेही ताई पाडेकर. लहान मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही लढता. तुमचा right hand यधण्या आणि तुमचा left hand पायल. कालच नाही का तुम्ही पेपर sign केले, त्यात असे लिहले होते कि आज पासून वैदेही ताई पाडेकर आंदोलनाला बसणार आहेत😂"यधण्या शिव सोबत खळखळून हसत होती..
"मला हरकत नाही आहे.. मी बसेल पण.. कारण पुढे शिक्षण काय रूप घेईल याचा अंदाज नाही लावता यायचा.."तिने गंभीर स्वरात उत्तर दिले. शिवने ते ओळखलं...

"मी येतोच फेटा बांधून. भेटूया कार्यक्रमाच्या वेळेस "त्याने वैदेहीला डोळा मारला.. ती हलकीच लाजली.

कार्यक्रम सुरु होण्याची वेळ झाली. सगळे जमले. पहिले महाराजांची पालखी अखख्या, सोसायटी मध्ये फिरवण्यात आली.. वैदेही लेझीम मध्ये सामील होती. ढोल ताशाच्या आवाजात लेझीम खेळू लागलं.

वैदेहीने पाहिले कि शिव तिला बघण्यासाठी आटापिटा करत आहे..ती मनातून खुश होती पण हा असा अचानक का करतोय कळायला काही मार्ग नाही.

पालखी सोहळा समाप्त झाला. मुख्य कार्यक्रमाला आरंभ झाला. बाळ शिवाजीचा पाळणा हलवण्यात आला.. आपण प्रत्यक्षात शिवनेरी वरच आहोत का असा भास वैदेही ला होऊ लागला.

ती पूर्णपणे त्यात हरवली होती.तिच्या डोळ्यातून पाणथेंब ओघळले.नंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रत्येक जन आपली कलाकृती सादर करत होते. कोणी गात होते तर कोणी नृत्य करत होते,कोणी महाराष्ट्राच्या मातीतील खेळ दाखवत होते.

आता बारी आली वैदेहीची.. तिने खास इंद्र जिमी जंभ पर ह्या गाण्यावर खास नृत्य रचिले.. ती सादर करण्यास मंचावर गेली.. गाणे लागले आणि तिने ताकदीचा परफॉर्मन्स तिथे दिला.. तिच्या नृत्यला भरपूर टाळ्या वाजल्या.. ती खाली यधण्यापाशी आली..

"भाई खूप छान केलंस ना गं 🥰"
"वेडी तुला पण बोलवत होते तर आली नाहीस.., सोबत अजून छान झाला असता "थोड्या धापा टाकत ती म्हणाली..
"काही नाही, मला एवढेच माहित आहे कि तू खूप छान परफॉर्म केलंस "
"थँक्स 😉. बरं... तू ते पाहिलंस का??"


वैदेही यधण्याला कश्याबद्धल विचारात असेल?? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.