Sparsh books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श

स्पर्श ,

स्पर्श हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे …

लहान तान्ह्या बाळाला त्याच्या आईचा स्पर्श ,

आईच्या स्तनांना बाळाच्या ओठांचा आणि गालाचा स्पर्श ,

आजीनी मांडीत घेऊन एक छान पापीचा स्पर्श ,

संध्याकाळी नमस्कार केल्या वर पाठीवर किंवा डोक्या वर आजोबांचा स्पर्श ,

सहावीत असतांना अपशब्द वापरल्यावर,बाबांच्या हाताचा, डाव्या गाला वर एक कठोर स्पर्श ,

बाबांनी थोबाडीत मारल्यावर , रडतांना आई कडे गेल्या वर तो प्रेमळ स्पर्श ,

नर्क चतुर्दशीला, तेल लाऊन देतांना ताईच्या हातांचा स्पर्श ,

शाळेत पारितोषिक मिळाल्यावर class teacher आणि principal चा कौतुकाचा स्पर्श,

कॉलेजची cricket match जिंकल्यावर , team mates शी मारलेल्या मिठीचा स्पर्श,

कॉलेजचा चांगला result आल्यावर बाबांच्या मिठीचा आणी आशिर्वादाचा स्पर्श …

प्रियकराचा, प्रेमिकेला केलेला पहिला स्पर्श …

चांगली मनासारखी नोकरी लागल्यावर आई बाबांनी जवळ घेतल्याचा स्पर्श …

मुलींनी सासरी जातांना सगळ्या लोकांनी रडतांना जवळ घेतलेला स्पर्श …

वडलांच्या मृतदेहाच्या, गार पायांना केलेला अविस्मरणीय अंतिम स्पर्श ,

एक जिवलग आणि प्रिय मित्र अचानक गेल्या वर त्याच्या फोटोला केलेला स्पर्श ,

स्पर्श, हा आपल्या पाच इंद्रियान पैकी एक आहे आणि स्पर्शाचं महत्व त्यालांच कळतं ज्याला तो स्पर्श मिळत नाही …

एखाद्या १९-२० वर्षांची मुलगी, जिचे बाबा तिच्या लहान पाणीच गेले, तिला तिच्या बाबांचा स्पर्श पुन्हा कधीच मिळणार नाही, तिला जो एका पुरुषाचा स्पर्श मिळेल तो एकदम अनोळखी आणि वेगळा असेल…

एक नवं -विवाहित विधवा , तिला जो स्पर्श जन्म भर अपेक्षित राहील तो तिला पुन्हा कधीच मिळणार नाही …

आपण लहान असतांनाच, आजी / आजोबा गेले तर त्यांचा तो प्रेमळ स्पर्श आपल्याला पुन्हा कधीच मिळत नाही

महिन्या भरा नन्तर घरी आल्या वर बायकोला आणि मुलीला जवळ घेतल्या नन्तरचा स्पर्श आणि , होस्टेल वरून चार - सहा महिन्यांनी आलेल्या आपल्या मुलाला मारलेल्या मिठीचा स्पर्श, ते feeling शब्दात सांगणं कठीण आहे …

७६ वर्षाच्या आईला अधून -मधून जवळ घेऊन विचार -पूस केली तर नक्कीच तिला तो स्पर्श आवडत असेल,

काही करणा मुळे आजीवन ब्रम्हचर्य स्वीकारावं लागलेल्या , वयात आलेल्या युवकाला किंवा युवतीला कुठ्ल्याच प्रकारचा स्पर्श आयुष्यात मिळत नाही , ते किती अस्वस्थ होत असतील …

ज्या प्रमाणे, आपल्या बाकी इंद्रिया काम करत नसतील तर आयुष्याला संपूर्णता नाही, त्यांच प्रमाणे, आयुष्यात सगळ्या प्रकारच्या स्पर्षांशिवाय संपूर्णता येत नाही .

स्पर्श हा आयुष्यात फार महत्वाचा आहे…

म्हणूनच, हस्तांदोलन करणे , मिठी मारणे, जवळ घेणे, खांद्या वर हाथ ठेवणे, कमरेत हाथ घालून फिरणे , हातात-हात घालून फिरणे, आशीर्वादाचा हात डोक्या वर ठेवणे, प्रेमाने चापटी मारणे, गालाला हात लावणे, चुंबन घेणे, अश्रू पुसणे , संध्या- आचमन करतांना दोन्ही डोळ्यांना पाणी लावणे , massage करणे, पाठ चोळून किंवा घासून देणे हे सगळे आयुष्यात खूप महत्वाचे स्पर्श आहेत …

आणि आपण ज्या लोकांना मना पासून प्रेम करतो त्यांना वेळो -वेळी, समयोचित हे सगळे स्पर्श कळत -नकळत केले तर आयुष्याची गोडी आणि meaningfulness नक्कीच वाढेल …

Suresh

26 Oct 2013

Kismat ka Dhani