" मी वडाळा च्या इथे होते..क्रांतीलाल eye क्लिनिक च्या जवळ. तर तिथे मी फिरत होते. जास्त काही नव्हते तिथे.थोडे फार बिल्डिंग आणि काही छोटीशी दुकाने होती.
पण बिल्डिंग आणि ही दुकाने लांब होती. अगदी वेग वेगळ्या भागात..
पण तिथली माणसे खूप वेगळी होती.... मारून टाकतील अश्या नजरेने बघत होती माझ्याकडे.... तिथे फिरताना मला एक psychic म्हणून ईर्षा,कामवासना, इच्छा पण sexual कारणांसाठी जाणवत होती. जवळ जवळ सगळ्याच जणांमध्ये.. आणि मुख्य तिथे सगळी तरुण पोरं होती.. खूप घाणेरड्या नजरेने बघत होती माझ्याकडे.
ती पोरं सगळी स्मोक, ड्रिंक करणारी वाटत होती..कोणी शिक्षण घेते असे मुळीच वाटतं नव्हते. सगळे कोणत्या वाईट धंद्यात होते.
तर तिथे हत्यार, गांजा,तंबाखू याचीच सगळी दुकाने होती.आणि मी चुकीची नाही तर मग तो एरिया रेड्डी अण्णा चा आहे. जास्त करून तिथे बार होते.
तिथे सगळे. अगदी बाई माणूस सुद्धा येतात.आता मुख्य म्हणजे ती माणसं खूप भयानक आहेत.हत्यार घेऊन फिरतात. त्या दोघांची पार्टनरशिप possible आहे पण तो रेड्डी अण्णा खूप भयानक आहे. काहीही करू शकतो. विक्रम तिथे रिस्क घेणार नाही. आणि विक्रम असल्यांना कधीच चाकरीला लावणार नाही. एकतर तो रेड्डी अण्णा फक्त मालकाला भेटतो. दुसऱ्या कोणाला भेटणारच नाही तो.विक्रम खाली उतरत नाही. तर मग त्याने जबरदस्ती केली तर हा काय सोडणार नाही. म्हणून वाटते कि रिस्क नाही घेणार विक्रम.
आता आत जाऊन काय जमले नाही.. बाहेरच फिरता आले.. 😕"
" हरकत नाही. बाकीचे सगळे आता उद्या बघूया.. आणि yes एक सांगायचे राहिले.. आपण जे हेर पाठवले होते ते ही सांगतीलच कि. काय काय त्यांला सापडले.😊"
" हो नक्कीच 😊" " बघूया काय काय सापडते ते 😈" मनातच ती बोलली.
" मी बाहेरून ऑर्डर केले आहे जेवण.. जेऊन घेऊया. "ऑर्डर आले आणि सगळ्यांनी जेऊन घेतले..
नियती अंगणात बसली होती.तिला शुभम ने हाक मारली. तिच्या नावाने एक चिट्ठी आली होती..
शुभम ने चिट्टी घेतली आणि नियतीला सोपावली..नियती ती चिट्ठी 'बघून काय expression देऊ 'हे कळेनाच.
" काय गं काय झाले.चेहऱ्यावर काहीच हाव भाव नाही तुझ्या?कोणाची चिट्ठी आहे? " त्याने चिट्ठी घेऊन बघण्याचा प्रयत्न केला, पण नियती ने लगेच ती आणखी आपल्या जवळ खेचली.
"नाही मी नाही दाखवणार."
" एवढे काय आहे त्या चिट्ठीत? 🤨"
"🤭काही नाही " ती लाजली. तोंड लपवण्यासाठी दुसऱ्या बाजूला ती वळली.
" oho. काय आहे hm😁? लगता है किसी special व्यक्ती का खत है 😁" तिची मज्जा घेत होता तो..
" काय रे काय चालू आहे तुमचे? " दुर्गा आणि आरोही जवळ येत म्हणाल्या.
"काही नाही गं तिला चिट्ठी आली आहे कोणाला special व्यक्तीची. म्हणून दाखवत नाहीये ती. बघ ना सुरवातीला अगदी blank होती. मी चिट्ठी वाचायचा प्रयत्न केला तर लगेच खेचून घेतली."
नियती लाजत आपल्या रूम मध्ये निघून गेली.शुभम आणि आरोही हसत होते. पण अभय आणि दुर्गा विचारात होते..
अभय ला संशय येत होता. " का नाही ही चिट्ठी दाखवत. प्रियकराची जरी असली तरी लोकं थोडासा मजकूर सांगतात.किव्हा त्याचे नाव वाचून शॉक होतात. पण हिच्या चेहऱ्यावर काहीच हाव भाव नव्हते सुरवातीला. म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळे होते. कोणाची चिट्ठी आहे आणि का आहे. "
" त्या चिट्ठीत काय लिहिले आहे? " दुर्गा तिच्या रूम च्या दिशेने भुवयी आक्रसत म्हणाली.
" चला सगळे. झोपा आता खूप उशीर झाला आहे. उद्या लवकर उठायचे आहे "
" हो 🥱. सगळे निघून गेले. पण अभय आणि दुर्गाच्या मनातले विचार हे नियतीच्या रूम जवळच उभे होते.. भुवयी आक्रसून.
नियतीने पहिले आरोही झोपली आहे ह्याची शहानिशा केली. मग हळूच ती चिट्ठी उगढून बघितली.. चिट्ठीतला मजकूर वाचला.. चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.
"Everything is going as per planned 😏😈"हळूच बडबडली
काही वेळाने तिचा फोन वाजला..फोन vibration वर होता म्हणून मग आवाज जास्त नाही झाला.
ती हळूच फोन घेऊन रूमच्या बाहेर आली.हॉलच्या खिडकी जवळ ती उभी राहिली..
" हॅलो बोल. अरे... मेसेज करत जा. तुला माहित आहे ना मी आरोही सोबत रूम share करते. "
" सॉरी, आमची चूक. मोठ्या मनाने मान्य करतो आम्ही.. आलेली चिट्ठी वाचली का तुम्ही.😏"
" हो मग.. वाचली कि. खूप आनंद झाला हे ऐकून. प्रगती छान चालली आहे आपली. 😄"
" बर ऐका. त्या चिट्ठीत पूर्ण मजकूर लिहिला नाहीये मी-"
" माहितीये मला. केव्हाच त्याला मेणबत्तीवर ठेऊन उलगडून घेतले. मला नाही कळणार का ते. 😉"
" वाचले का? "
" नाही ते राहिले. "
" बर सोडा. आम्हीच सांगतो. त्यात लिहाले होते कि.. दानवाच्या भावांची गुहा कधीच सापडली.हळू हळू त्यांला गुहेतुन स्वर्गीय,..... ooopss सॉरी नरकीय यात्रे वर पाठवेल😂😂😂😂😈😈😈. त्या दोन्ही हरामखोरांना लवकरच त्यांची लायकी दिसेल. विक्रम चा शोध चालू राहूदे जसा आहे तसा.वरतून आपण केव्हाच त्यांच्या इतर कार्य व कर्त्यांचा शोध सुरु केला आहे. बरेचसे सापडलेत देखील.तुम्हाला तर ऑलरेडी माहित आहे कोण आहे ते. But स्टील तुम्ही इनोसंट card प्ले करत आहात त्यांच्या सामोरे.. बिचारे फसलेत. 😂"
" करावे लागते.. 😉".
"नियती मॅम, एवढ्या रात्री कोणाशी बोलत आहात 🤨" अभय ने मागून विचारले. पाणी पिण्यासाठी आला होता. पण नियती ला बोलताना बघून तो थांबला.
" अं.-.. अरे " लाजत ती म्हणाली. " माझ्या होणाऱ्या ह्यांचा फोन आहे " 🤭ती आणखी लाजू लागली.
" होका बघू बरे. " त्याने जवळ येऊन बघितलं. नाव होते 'Sweetheart'. मुद्दाम चौकशी साठी हातातील फोन खेचून घेतला आणि बोलू लागला. " तुम्हीच का ज्यांनी आमच्या मॅडम ला चिट्ठी पाठवली होती 🤨"
" समोरून रांगडा आवाज आला. " हो मीच होतो तो. का काही प्रॉब्लेम तुम्हाला? 🤨"
" नाही नाही. बोला तुम्ही "फोन नियतीच्या हाती दिला.
" ऐक babe. मी ठेवते आणि काळजी नको करुस. लवकरच आपण एक होऊ आणि मज्जा करू 😉"
" कोण बोलतय एवढ्या रात्रीचे. 🥱😪😪. " दुर्गा अर्ध्या झोपेत आवाज का येतोय हे बघायला आली.तोल सावरीत होती ती.
" अगं दुर्गा कश्याला उठलीस. आम्हीच होतो. आणि आमच्या ह्यांच्याशी बोलत होते 🤭"
" अच्छा. 😪ठीके continue..नमस्कार सांग आमच्या जिजुंला. मी चालले झोपायला बाय 🥱😪". जाता जाता दरवाज्याला थोडीशी ती धडकली. " owwww😖"बेवड्यासारखी ती लडखडली.
" अगं सांभाळून. खूपच झोप आलीये तुला. "
" hm🥱. बाय. " ती जाऊन गाढ झोपली.
" चल मी ठेवते फोन बाय 😊"
" बाय. "
" एवढ्या रात्री का फोन केला त्यांनी 🤨? "
" अरे ते night ड्युटीला असतात. म्हणून. आणि मला जाग येत राहते.,2 वैगरे च्या दरम्यान मग 3 पर्यंत झोप नाही येत मला. खूप rarely येते.म्हणून मग म्हणले कि तेव्हा फोन करा. मी जागी असेल तर उचलेल.म्हणून मग करतात ते 🤭"
" अच्छा. ठीके चला झोपूया 😊मी आलोच पाणी पिऊन. "
" हो चालेल. मी जाते. Anyways अजून काही विचारपूस करायची आहे का मला.?"
" असे का विचारता? "
" तु नेहमी संशय घेत असतोस. जसे कि आम्हीच घात करणारे आहोत आणि सगळे जाणून घ्यायचे प्रयत्न करत असतोस जबरदस्ती म्हणून विचारले. सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या तर मग पर्सनल राहणार का काही. "
" सॉरी. "
" its okay. " ती रूम मध्ये निघून गेली.अभय ही जांभळी देत रूम मध्ये निघून गेला. आणि झोपी गेला.
"बरं झाले अजून काही पुढे बोलले नाही मी. नाहीतर खरे नव्हते. हा मूर्ख कधीच माझी पाठ सोडणार नाही कितीही झाले तरी."सुस्कारा सोडत ती म्हणाली.
फोन वर मेसेज आला." U have a defective order on your way. Watch it. And reply consciously "
Your sweetheart 😉
स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटले. आणि ती झोपी गेली..
*********
" हॅलो बॉस ऐका. खूप महत्तवाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला.....
कोण आहे नियती? काय भानगड आहे.
Stay tuned 😉