Mother Teresa - Shanti Dut books and stories free download online pdf in Marathi

मदर टेरेसा- शांती दूत

मदर टेरेसा- शांती दूत!!! (१९१०-१९९७)

मदर टेरेसांचा उल्लेख व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच करावा लागेल. जे मनात येत गेल ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडलं... हा मनस्वीपणा इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी हि व्यक्ती किती मोठी होती. त्यांच्या राहणीमानात कमालीचा साधेपणा होता. त्यांचा चेहरा कमालीचा सात्विक होता. जेमतेम ५ फुट उंची असलेली लहान मूर्ती. मुळचा वर्ण गोरा गुलाबी.. डोळे बारीक आणि तपकिरी! चेहऱ्याच्या मानाने नाक मोठ! अंगावर पांढरी साडी जाड्या भरड्या सुताची. साडीला निळे काठ! अंगात लांब बाह्यांचा पांढरा ब्लाऊज. डाव्या खांद्यावर क्रूस त्यावरच ख्रिस्त आट वळलेला. त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ! हृदय विकाराचे २ झटके येऊन गेल्याच कुठ्तही चिन्ह हालचालीत नाही! त्यांची मूर्ती लहान होती पण काम मात्र मोठ होत. जगात कुठंही मानवजात संकटात सापडली कि धावून जायचं हा मदर टेरेसांचा सहज धर्म. मग तो बांगलादेश चा महापूर असो, किंवा अजून कोणत संकट असो, मदर टेरेसा मदतीला धावून जाणार! 'द मोस्ट पॉवरफुल वूमन इन द वर्ल्ड' अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल लिहायचा एक प्रयत्न.

१. जन्म व बालपण-

टेरेसांचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. त्यांचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपे (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. उत्तर मॅसिडोनियामधील कोसावा प्रांताची राजधानी 'स्कोपे' इथे हे कुटुंब राहत होते. अल्बेनियात १९२० वर्ष गोंधळाचे होते. अल्बेनियाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्यांपैकी बोयाझिऊ हे एक कॅथोलिक कुटुंब होते. त्या वर्षी २६ ऑगस्ट १९१० ला त्यांच्या कुटुंबात एका गुटगुटीत बालिकेचा जन्मोस्तव पार पडला. निकोला आणि ड्रेनाफील यांचे तिसरे अपत्य म्हणजे अॅग्नेस. १९०४ मध्ये जन्मलेली एज आणि १९०७ मध्ये जन्मलेला लाझार हे अॅग्नेस चे मोठे बहिण भाऊ. अॅग्नेस च भावंडांशी खूप पटायचं. त्यांची आई हि एक शेतकऱ्याची मुलगी होती आणि वडील बांधकाम ठेकेदार आणि अन्न धान्याचे ठोक व्यापारी होते. त्यांना अल्बेनियन खेरीज इतरही बऱ्याच भाषा येत होत्या. वडिलांचं गरीबंविषयी प्रेम अॅग्नेस लहानपणापासूनच बघत होती. आईचा काटकपणा आणि वडिलांचा व्यवहारीपणा हे गुण मदर टेरेसा ह्यांच्यामध्ये उतरले.

अॅग्नेस बोयाझिऊ चे बालपण मजेत आणि सुखावह वातावरणात पार पडल्याची सर्वत्र नोंद आहे. निकोला व्यवसायात चांगला च यशस्वी झाला होता आणि त्याच्या मालकीची बरीच घरे होती असेही वर्णन आढळते. त्यांचे राहते घर खूप मोठे होते आणि त्याभवती सुंदरशी बाग होती आणि त्यात फळाफुलांनी लगडलेली खूप झाडे होती. चर्च ऑफ द सक्रेद हार्टच्याच रस्त्यावर हे घर होते. छोटी अॅग्नेस चांगलीच गुटगुटीत, स्थूल शी पण टापटीपीत मुलगी होती. त्यांच्या लहानपणी त्यांना 'गोंझा' हे टोपण नाव होते. गोंझाचा अर्थ 'कळी' असा होतो आणि अल्बेनियात ती आजपर्यंत याच नावाचे ओळखली जाते. लाझार नी पुढे अनेक वर्षां नंतर सांगितले कि लहानपणी अॅग्नेस अतिशय संवेदनशील आणि वयाच्या मानाने जरा जास्तीच गंभीर, प्रौढ आणि समजूतदार मुलगी होती. लाझार ने अनेकदा चोरून जॅम वैगरे खाल्ला पण अॅग्नेस ने विचारल्याशिवाय कधी कोणत्याही खाद्य पदार्थांना हात लावला नाही. सकाळची प्रार्थना असेल तर त्याच्या आदल्या रात्री मात्र अॅग्नेस कडून त्याला चोरून काही खाल्ल्याबद्दल ताकीद मिळत असे पण त्याच्या चोरून खाण्या च्या सवयीबद्दल अॅग्नेस ने मोठ्यांकडे कधीही कागाळी किंवा तक्रार केली नाही.

वडिलांच्या मृत्युनंतर बोयाझिऊ कुटुंबातील मुलांच्या जीवनाला नाट्यमयरीत्या कलाटणी मिळाली. निकोल च्या व्यायासायातील भागीदारंनी त्यांच्या कुटुंबाकडे पाठच फिरवली. आणि राहत्या घरा खेरीज या कुटुंबाकडे काहीच राहिले नाही. नोवी सेलो येथील कौटुंबिक मालमत्तेवर आपला हक्क आहे असे तरुणपणी विधवा बनलेल्या ड्रेनाला वाटत राहिले. पण त्यांच्या कडे आपला हक्क शाबित करणारी कागदपत्रे न्हवती. त्यामुळे या वादग्रस्त मालमत्तेत आपला वाट किंवा त्यापासून चे उत्पन्न यावर त्यांना ठामपणे हक्क सांगता आला नाही. त्यानंतर ड्रेना अगदी हतबल झाली आमो एज ने यावेळी कुटुंबाची बरीचशी जबाबदारी पेलली. त्यानंतर ड्रेन थोडीशी सावरली आणि तिने भरतकाम आणि कापडाचा व्यवसाय सुरु केला. लाझार च्या मदतीने तिने कपड्याच्या गिरण्या बरोबर बोलणी केली आणि त्यानंतर आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत स्कोपेच्या प्रसिद्ध गालीच्यांचाही समावेश केला. आणि या कुटुंबाने धार्मिकतेचा आपला परिपाठ कायम ठेवला. आपल्यापेक्षा अधिक गरीब असलेल्यांना मदत करण्याचा शिरस्ता तसाच चालू ठेवला. नंतरच्या आयुष्यात मदर टेरेसा ज्या काही थोड्या फार गोष्टी बोलत त्यात हे आवर्जुन सांगत कि, आई अगदी अनोळखी लोकांनाही कपडे देऊन त्यांना जेवायला घालत असे.

छोट्या अॅग्नेस या साऱ्यांचा परिणाम दिसत होता. धर्माचा प्रभाव त्यांच्या वर वाढत होता. अॅग्नेस चा जीवनप्रवाह काही काळ धार्मिकतेच्या दिशेने झाला होता. अनेकदा ती धर्मगुरूंची दुभाषी म्हणून काम करत असे. सर्बो क्रोट भाषेतले विचार आणि संभाषण अल्बेनियन भाषेतून सांगण्यात ती वाकबगार झाली होती. त्याखेरीज कॅथोलिक पंथाची प्राथमिक शिकवणही (दीक्षा) ती लहान मुलांना देऊ लागली होती. त्या असा उल्लेख करीत असत कि वयाच्या १२ व्या वर्षापासूनच आयुष्य देवाला समर्पित करण्याची आपल्या इच्छेची जाणीव त्यांना झाली होती. त्यामागे त्यांच्या आईच्या जगण्याचा त्यांच्या वर पडलेला प्रभाव काही प्रमाणात होता हे निश्चित.. कारण बिकट परिस्थितीत सुद्धा आई ड्रेनाने घर सावरले होते ते खरेच पण त्या खडतर काळातही तिची आई त्यांच्या कुटुंबापेक्षा गरीब असलेल्यांची सेवा करून त्यांना मदत सुद्धा करत असे. त्यांच्यापेक्षाही फादर यांब्रेकोविच यांचा विशेष प्रभाव अॅग्नेस वर पडल्याचे स्पष्ट दिसते.

जोगीण किंवा संन्यासिनी (नन) बनण्याचा निर्णय घ्यावयाच्या दोन वर्ष अगोदर , शेर्नागोर देवालायापाशी अॅग्नेस बऱ्याच वेळ विचार करत बसायच्या. या एकांतात त्यानी खूप विचार केला असावा. अखेर त्यांनी, फादर कान्फेसरचा सल्ला घेतला. त्यांनी त्यांच्या मनातल्या शंकाकुशाकांच निरसन करत सांगितले, "देवाची आणि तुझ्या शेजाऱ्याची सेवा करायची सेवा करण्याची साद देव घालतो आहे आणि त्यातून तुला सुख लाभते अस वाटत असे तुला वाटत असेल तर तुझ्या भावी पेशाच्या अस्सलते विषयी चा तो सर्वोत्तम पुरावा आहे. खोल अंतकरणातून उचंबळून येणारा आनंद आणि सुख हे दिशादर्शकासारखे (कंपास) असते. त्याद्वारे कोणता मार्ग तुझ्या आयुष्याने स्वीकारावा हे तुला कळेल. तुला जावेच लागेल असा मार्ग खडतर असला तरी हा परमानंद तुला लाभू शकतो."

अॅग्नेस ची जडणघण अशी झाली होती कि सेवा व्रत हे देवाच्या इच्छेचे प्रतिक आहे आणि त्यासाठी घर सोडावे लागले किवा व्रतस्थ ब्रह्मचर्य निवडावे लागले आणि अगदी तरुणपणी स्वताचे स्त्रीत्व नाकारावे लागले तरी बेहत्तर इतकी त्यांची धारणा ठाम होती. वयाच्या सतराव्या वर्षी हा निर्णय घेण्या इतक्या त्या सक्षम होत्या. त्यांनी स्वार्थ त्यागाचे आयुष्य निवडले.

नंतर भारतात मिशनरी म्हणून जाणार असल्याचा निर्णय अॅग्नेसने ड्रेना ला सांगितल्यावर त्यांना फार आश्यर्य वाटले असण्याची शक्यता न्हवती. ड्रेना आपल्या खोलीत गेली, तिने दार बंद करून घेतले. २४ तास आपल्या खोलीत बंद राहिली. नंतर बाहेर आली आणि आपल्या मुलीला म्हणाली, "तुझा हात 'त्याच्या' हातात दे आणि पुढची वाटचाल 'त्याच्या' सोबतच कर.."

२. मिशनरिज आणि भारतात आगमन

अठराव्या वर्षी अॅग्नेस ने भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता होती. आयर्लंड मधील विशिष्ट ठिकाणच्या धार्मिक केंद्राची निवड तिने आपल्या निर्धारयुक्त पद्धतीनी केली. कारण एकदा इंग्रजी भाषेचा पाया पक्का झाला कि तिची महत्वाकांक्षा फलद्रूप होण्यासाठी तोच माग सर्वाधिक उपयुक्त ठरेल अस त्यांना सल्ला त्यांना देण्यात आला होता. एकदा ह्या केंद्रात प्रवेश घेतला कि कि मग आयुष्यात आपले कुटुंब किंवा गाव पुन्हा कदाचित बघावयास मिळणार नाही अशी त्यांनी खुणगाठ त्यांनी मनाशी भांडलेली असावी कारण त्या काळातले धार्मिक आयुष्य, सुट्टी घालवण्यासाठी घरी जाण्यास परवानगी देणाऱ्यातले न्हवते. सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या ६ जानेवारीला भारतात आल्या. त्या कार्यानिमित्त त्या भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल आणि इतिहास विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाल्या. त्यांनी बंगाली भाषी शिकून घेतली. बंगाली भाषा इतक्या उत्तम रित्या बोलता येत असल्यामुळे त्यांना 'बेंगाली टेरेसा म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर त्या हिंदी भाषा सुद्धा शिकल्या. त्यांना सिस्टर टेरेसा म्हणून ओळखले जाऊ लागले. नव्या आयुष्याच्या शिक्षणात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आणि पापक्षालनार्थ दर आठवड्याला चर्चमध्ये त्या हजेरी लावत. याखेरीज, सकाळी २ तास स्थानिक शाळेत जाऊन मुलांना शिकवण्याचे काम या प्रशिक्षणार्थींना करावे लागत असे. याच बरोबर , सिस्टर टेरेसा एका दवाखान्यातहि अधून मधून जात असत.

आपल्या पहिल्या प्रतिज्ञा विधीनंतर अॅग्नेस उर्फ सिस्टर टेरेसा कोलकात्यास आली व तिची शिक्षकी कारकीर्द सुरु झाली. २४ मे १९३१ रोजी अॅग्नेसने सिस्टर ऑफ लोरेटो म्हणून गरिबी, पवित्र आणि आज्ञाधारकता याबाबतची पहिली प्रतिज्ञा केली. या कार्यक्रमा मध्ये हातपाय लांब करून अॅग्नेस जमिनीवर काही क्षण पालथी पडून राहिली. चेहरा जमिनीच्या दिशेने करून काही काळ स्तब्ध पडून राहणे हा प्रतीकात्मक मृत्यू मनाला जात होता. साऱ्या ऐहिक इच्छांपासून सिस्टर मुक्त होणे असा त्या प्रतिकाचा अर्थ होता. या नाट्यपूर्ण कृतीद्वारे निर्णयाची गंभीरता परिणामकारक रीतीने सिद्ध होत होती. त्याचबरोबर हा निर्णय भविष्यात कधीही बदलता न येणारा असल्याने ठामपणे प्रतीत केला जात असे. आपल्या पहिल्या प्रतिज्ञा विधीनंतर अॅग्नेस उर्फ सिस्टर टेरेसा कोलकात्यात आली व तिची शिक्षकी कारकीर्द सुरु झाली. या वेळेपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा लोरेतो सिस्टरर्स चा उत्कृष्ट दर्जा भारतभर प्रसिद्ध पावला होता. पुढील १९ वर्षे लोरेटो नन आणि मुलींची शिक्षिका या भूमिकेत सिस्टर टेरेसा होत्या. त्यांचा प्रमुख विषय भूगोल होता. नंतर त्या या शाळेच्या मुख्याधापिका झाल्या. तिथले नियम अत्यंत कडक होते. १४ मे १९३७ रोजी दार्जीलिंग मध्ये सिस्टर टेरेसा तिन्ही प्रतिज्ञांचा पुनरुच्चार केला. आणि त्यानंतर लगेचच त्या शाळेच्या मुख्याधापिका बनल्या. त्यांच मन शिक्षणात पूर्णपणे रमल होत पण त्यांनी त्याच्या आस पास असणारी गरिबी, लाचारी, दरिद्रता त्यांच्या मनाला अशांत करत होती. १९४३ मध्ये दुष्काळा मुळे शहरात दुष्काळामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत होती. आणि लोक गरिबी मुळे बेहाल होत होते. १९४६ ला हिंदू मुस्लीम दंग्यांनी कोलकाता शहराची स्थिती अजूनच भयंकर बनवली. 1946 साली , गरीब असहाय्य, आजारी लोकांची मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

१९४१ सालापासून सिस्टर टेरेसा सोडॅलिटील मुलींना बरोबर घेऊन झोपडपट्ट्या आणि इस्पितळा त जाऊ लागल्या असे बेल्गीम धर्मगुरू फादर ज्युलिअन हेन्री यांनी नमूद केले आहे. युद्धकाळात मोडतोड आणि विध्वंस तसेच दुष्काळ त्रस्त कोलकात्यावर १९४६ च्या ऑगस्ट मध्ये आणखी आपत्ती कोसळली. महायुद्धात ब्रिटीश लोक विजयी झाले असले तरी जेता देश असे त्यांचे वर्णन करण्याची स्थिती न्हवती. ब्रिटीशांची सत्ता संपल्यातच जमा होती आणि राजकीय फायद्या तोट्यांची, सत्तेची गणिते मानाडायला सुरवात झाली होती. त्यात बंगाल ची भूमी फार महत्वाची होती. हिंदुस्तान आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी करण्याबाबत जवाहरलाल नेहरू आणि जिना यांची बोलणी सुरु होती. संपूर्ण देश ब्रिटिशांनी हिंदू सरकारच्या ताब्यात दिला तर बंगाल हा स्वतंत्र देश म्हणून जाहीर केला जाईल या धमकीने अधिकच गुंतागुंत निर्माण झाली होती. १९३० च्या दांडी यात्रेने आपल्या शांततापूर्ण अहिंसावादी भूमिकेची शक्ती महात्मा गांधींनी जगाला दाखवली होती. नेहरूंबरोबर ची बोलणी फलद्रूप होईनात तेव्हा जिना आणि मुस्लीम लीग यांनी शुक्रवार १६ ऑगस्ट हा दिवस थेट कृती दिन म्हणून जाहीर केला आणि कोलकाता प्रशासनाने मुस्लीम नेते एच. एस. सुह्रावार्दी यांनी त्या दिवशी सुट्टी जाहीत केली. या सुट्टीमुळे प्रत्येकजण कामाच्या जबाबदारीतून मोकळा झाला आणि रस्त्यावर आला. कोलकाता शहर तणावग्रस्त बनले होते. हिसाचार आणि हत्याकांडांच्या वातावरणामुळे शहराला होणारा अन्न आणि इतर वस्तूंचा पुरवठा थांबला. बोर्डिंग स्कूल मध्ये ३०० विद्यार्थिनींची जबाबदारी सिस्टर टेरेसा ह्यांच्या वर होती. काहीही खायला न मिळाल्यामुळे अन्नाच्या शोधार्थ कॉन्वेंट बाहेर पडायची वेळ सिस्टर टेरेसांवर आली. आपल्या काळ्या रंगाच्या चुण्या असलेल्या, गळ्याभोवती पांढरा रुमाल बांधलेल्या आणि चेहऱ्यावरून कळ बुरखा घेतलेल्या वेशात सिस्टर टेरेसा १६ ऑगस्ट ला बाहेर पडल्या आणि आपल्या मुलांना जेऊ घालण्यासाठी खुपसा तांदूळ घेऊन आली. पण तिने काय पहिले होते, क्रूर कत्तल आणि कल्पने बाहेरचा द्वेष प्रचंड हत्याकांडाचा दिवस- हि प्रतिमा कधीही मनावरून पुसली जाणार न्हवती. त्यानंतर महिनाभराच्या आताच म्हणजे १० सप्टेंबर या धुमसत्या शहरातून बाहेर पडू शकल्या. आपल्या विश्रांती स्थळाकडे दार्जीलिंग ला त्या रवाना झाल्या. दार्जीलिंग पर्यंतच्या रेल्वे प्रवासात गेल्या त्यांनी पाहिलेल्या निर्घृण प्रतिमा आलटून पालटून येत होत्या. कोलकाता मध्ये येऊन १० वर्षे उलटून गेली तरी जेव्हा जेव्हा आपला परिसर ओलांडून त्यांना पलीकडच्या शहरात यावे लागले तेव्हा वर्णनपलीकडचे दुःख आणि गरजा त्यांना दिसत राहिल्या. या गरजांची पूर्ती करणे आपल्याला शक्य नाही हे त्यांना माहित होत. सोडॅलिटी शाखेत आलेल्या त्यांच्या विद्यार्थिनींकडून गरिबी आणि गलिच्छ ता याबाबत त्यांना बरेच काही ऐकायला मिळत होते. स्कोपे मध्ये असतांना ह्याप्रकारे गरिबांची सेवा करण्याचा निश्चय त्यांनी केला होता तसेच त्यांना आत्ताही वाटत होते. आत्ताच्या त्यांच्या विद्यार्थिनी नियमितपणे एका स्थानिक इस्पितळा मधील रुग्णांना भेटण्यास आणि मोती मोती झील मधील झोपडपट्ट्यांमध्ये सेवेसाठी जात असत. त्यांना त्यांच्या आईकडून नियमितपणे येणाऱ्या पत्रांमधून गरिबांसाठी आणि जगातील एकाकी लोकांसाठी भारतात जाण्याचा मूळ हेतूची आठवण त्यांना करून दिली जात असे. त्या बाबतीत त्यांच्यावर त्यांच्या आईचा प्रभाव पडतांना दिसतच होता. मदर टेरेसा यांनी घेतलेला शिक्षकी पेशा त्यामागचा हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. प्रत्यक्षातला विरोधाभास आणि आपल्या जीवनातील भविष्यातली दिशा यावर सखोल चिंतन झाल्यावर त्या ह्या निर्णयाप्रत आल्या. मात्र त्यांना स्वतः या प्रक्रियेचे वर्णन, 'हाकेच्या आत मधली हाक' असे केले आहे. मदर टेरेसा यांनी असे वारंवार म्हणले आहे कि आपला दिशा बदल हा 'देवाने घडवून आणला आहे, मी न्हवे.' त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे 'हे देवाचे काम आहे, त्यातून जगाला फायदा होणार आहे हे मला माहित आहे.' यावरच त्यांनी अधिक भर दिला आहे. मदर तेरेसांची हि भूमिका निर्णायकरीत्या महत्वाची ठरते. 'आपली हाकेच्या आत मधली हाक, त्यांना फादर एकसम यांनी समजून सांगितली. त्या 'हाके मुळे' शिक्षकी पेशा सोडून काहीतरी नवे सुरु करण्याची आवश्यकता आपल्याला का जाणवते हे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांवरील गरिबांसाठी मदत देऊ करणे तसेच आपण व आपल्या मदतनीस यांना विशेष प्रतिज्ञे द्वारे गरिबांशी संबंध जोडावे लागणे हे आपले नवे कार्य असणार आहे याची स्पष्ट कल्पना त्यांना सुरवातीपासूनच होती. फादर एक्सिम यांनी मदर टेरेसांना २ पर्याय सुचवले. एक म्हणजे सिस्टर ने थेट रोम ला पत्र पाठवावे आणि कोन्ग्रीग्रेशन फॉर द प्रॉपॅगेशन ऑफ द फेथ यांना आपल्यास लोरेटो मधून मुक्त करावे अशी परवानगी मागावी. दुसरा पर्याय म्हणजे कोलकाता आर्कडिओसेस चे प्रमुख आर्चबिशप पेरियर यांच्याबरोबर या प्रश्नाची चर्चा करून त्यांचे सहकार्य मिळवावे. फादर एक्सम यांना स्वताला दुसरा पर्याय पसंत होता आणि सिस्टर त्यांच्याशी सहमत झाल्या.

तथापि फादर एक्सम यांनी शेवटी हा विषय काढला तेव्हा आर्चबिशप पेरीयर यांना तो आवडला नाही. मदर च्या निर्णयाचा लोरेटो वर कसा काय परिणाम होईल याबाबत त्यांना चिंता वाटली आणि कोलकत्त्याच्या रस्त्यावर एकटी नन हि कल्पना त्यांना रुचली नाही. किमान वर्षभर तरी कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असा त्यांनी ठरवलं. त्यानंतर त्यांनी लवकरच सिस्टर टेरेसा यांना कोलकात्याच्या उत्तरेकडील १३० मैलांवर असनसोल या खाणीच्या शहरात पाठवण्यात आल. तिथे त्यांच्याकडे बाग आणि मुदपाकखाना यांचा कारभार सोपवण्यात आला. आणि काही वेळ भूगोल शिकवण्याचीही मुभा देण्यात आली.

आपल्या भावी जीवनात धार्मिकता कट्टर पणे रुजवण्याची गरज आहे हे सिस्टर टेरेसा च्या मनी पूर्णतः बिंबले होते. त्यामुळे त्या पाटण्यात पोहोचल्या तेव्हा प्रार्थने चे तास तपश्चर्या आणि उपास याबाबतचे काही नियम त्यानी मनाशी पक्के केले होते. आपल्या स्वतःला 'देवाची इच्छा व हाकेमधील हाक' याबाबत सिद्ध करण्यास एक वर्ष मिळाले. याची जाण त्यांना होतीच. त्यामुळे पाटण्यात त्यांना काही आठवडेच प्रशिक्षणासाठी देता आले. आपले नवे आयुष्य सुरु करण्यासाठी त्या एकट्याच डिसेंबर मध्ये कोलकात्याला परतल्या.

३. पुढचा प्रवास.

या कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली आणि कलकत्ता येथे १९५० साली मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली . पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले. निराश्रित मरणोन्मुख लोकांसाठी एक केंद्र सुरु करण्याचे मिशनरीज ऑफ चॅरिटी या लहानश्या गटाने ठरवले. याला एक घटना कारणीभूत ठरली. पादपथावर एक भयंकर आजारी महिला मदर टेरेसा यांना आढळली. उंदीर आणि झुरळे त्यांचा पाय खात होती. आणि ती शक्तिहीन महिला काहीही करू शकत न्हवती. तिला इस्पितळात घेऊन जाण्याचा मदर टेरेसा यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. प्रत्येक इस्पितळात त्यांना नकारच मिळाला. त्यांना अशी जागा हवी होती जिथे लोकं सुखाने मारू शकतील. आणि कालीघाट मध्ये 'निर्मय हृदय- होम फॉर डाइंग डेस्टीट्युट सुरु झाल. त्यांच्या विचारांशी सहमत असणार्‍या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून त्यांना लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून टेरेसासह सेवाभावी महिलांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली. टेरेसाला तर लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत; तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे टेरेसाने जाणले आणि इतरांनाही दाखवून दिले. या संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन करू लागल्या. मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथ आश्रम काढले. तसेच बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगीपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट्स (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले. १९६४ मध्ये टेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली; कारण त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा आहे. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे.

त्यांच्या कार्याचा कालानुरूप व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, महिला-अपंग-वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, मरणोन्मुखांसाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व भारतेतर देशांत पसरल्या. तेव्हा कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली. या संस्थांत १९६२ पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता; परंतु टेरेसाने मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी ही वेगळी संघटना स्थापन करून पुरूष सेवकांना त्यात प्रवेश दिला. या संघात २,००० जोगिणी व ४०० ब्रदर्स कार्य करतात (१९८३).

मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या शाखा व उपशाखा जगभर ५२ देशांत प्रसृत झाल्या असून एकूण २२७ ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत. भारतात व इतर देशांत संस्थेने चालविलेल्या ९८ शाळा, ४२५ फिरती रूग्णालये, १०२ कुष्ठरोग उपचार केंद्रे, २८ शिशुभवने, ४८ अनाथा-लये व ६२ आश्रमगृहे आहेत. महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, विलेपार्ले या ठिकाणीही सेवा केंद्रे आहेत. मुंबई येथे आशादान नावाचे स्वीकार- गृह १९७६ मध्ये सुरू करण्यात आले. त्यात शिशुभवन, निर्मल हृदय व रूग्णांची सेवा या तिन्ही शाखा एकत्र केल्या आहेत. या संस्था-साठी लागणारा खर्च विविध देणग्यांतून तसेच टेरेसाला मिळालेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतून करण्यात येतो.

दारिद्र्य, भूक, दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकार यांमुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते, असे त्यांचे मत आहे. म्हणून प्रथम या शत्रूंना दूर केले पाहिजे; यासाठी दुःखी व अपदग्रस्त लोकांची सेवा हाच एकमेव मार्ग आहे. या त्यांच्या सेवाकार्याची दखल घेऊन १९७९ चे शांततेचे नोबेल पारितोषिक त्यांना दिले. याशिवाय त्यांना त्रेचाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. मदर टेरेसा यांना मिळालेले सन्मान-

१. 4 ऑगस्ट 1962 (भारत राष्ट्रपतींकडून ) पद्मश्री पुरस्कार

२. पोप जॉन तेविसावा शांती पुरस्कार जानेवारी 1971

३. जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सप्टेंबर 1971

४. आंतरराष्ट्रीय समजून जवाहरलाल नेहरू पुरस्कार नोव्हेंबर 1972

५. "धर्म प्रगती " एप्रिल 1973 साठी टेम्पल्टन पुरस्कार

६. नोबेल शांती पुरस्कार डिसेंबर 1979

७. 'भारतरत्न' (भारताची रत्नजडित ) मार्च 1980

८. ऑर्डर ऑफ मेरिट ( राणी एलिझाबेथ पासून) नोव्हेंबर 1983

९. सोव्हिएत शांती समितीच्या सुवर्ण पदक ऑगस्ट 1987

१०. युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसनल गोल्ड मेडल जून 1997

शेवटी त्यांच शरीर त्यांना साथ देईनास झाल. रात्रीची अपुरी झोप, अखंड जागरण, कमी खाण, सतत गरिबांची चिंता, वणवण, धावपळ, प्रवास आणि शरीर शक्तीचा अफाट व्यय यामुळे त्यांची प्रकृती ढासळायला लागली. हृदयाने त्यांना त्रास द्यायला सुरवात केली. १९८३ मध्ये त्यांना मोठा हार्ट अॅटॅक आला. त्यावेळी त्या रोम मध्ये होत्या. आणि त्यांची रवानगी हॉस्पिटल मध्ये झाली. डॉक्टरांनी त्यांना बिछान्या वरून हालूनही दिल नाही. या काळात त्यांच्या मनाची कामाविना तडफड झाली. स्वतः पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी फोन करून डॉक्टरांना मदर ची पूर्ण काळजी घ्यायला सांगितली. पण हॉस्पिटल मधून सुटका झाल्यावर त्या अधिकच जोमाने कामाला लागल्या. नंतर मदर टेरेसा यांच ८० वे वर्ष चालू झाले. १९८९ सप्टेंबर महिन्यात त्यांना दुसरा जबरदस्त अॅटॅक आला. त्यातूनच त्या वाचल्या. नुसत्या वाचल्या नाहीत तर १९९१ साली रोमला हि जाऊन आल्या. त्यांना बऱ्याच अडचणी आल्या पण त्यांनी त्यांच काम अखंड चालूच होत. नंतरही त्यांनी बरंच काम केल.

४. मदर टेरेसा यांचे काही अनमोल विचार-

१. सुंदर लोकं नेहमीच चांगले असतात अस नाही. पण चांगली लोकं नेहमीच सुंदर असतात.

१. जीवन जे दुसऱ्यांसाठी जगल नाही तर ते जीवन नाही.

३. आपण सगळेच महान कार्य करू शकणार नाही. पण आपण आपली काम प्रेमाने करू शकतो.

४. स्वतःपेक्षा दुसऱ्यांची काळजी करा. स्वताचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार करा.

५. शांतीची सुरवात एका हास्याने होते.

६. जर तुम्ही १०० लोकांना जेवण देऊ शकत नसाल तर फक्त एकाला तरी जेवण द्या.

7. जितक जमेल तितक कमी बोला. शांतता आणि मौन हेच खऱ्या अर्थान समर्थ आणि प्रभावी आहे.

८. दुसऱ्यांच्या फक्त दोषांकडे लक्ष देऊ नका.

९. कुणी तुमची निंदा केली तरी त्यामुळे विचलित होऊ नका. चिडू नका. अपमान आणि निंदा सहन करायची सवय ठेवा. कुणी शिव्या दिल्या तरी त्या स्वीकारा.

१०. आपली लोकांनी स्तुतु करावी, कौतुक कराव, आपल्यावर प्रेम कराव अशी मुळीच इच्छा ठेऊ नका.

११. दुसऱ्यांच्या इच्छेला मान द्या.

५. मदर टेरेसा ह्यांच्या जीवनातील काही घटना-

२६ ऑगस्ट १९१०- अँग्निस गॉंकशा वाजकशियू म्हणजेच मदर टेरेसा ह्यांचा जन्म स्कोपे या युगास्लोविया मधल्या गावात झाला.

१९२२- पहिला दैवी संदेश मिळाला.

१९२८- दुसरा संदेश. गाव आणि घर सोडायचा निर्णय.

१९२९- दार्जीलिंग च्या 'लोरेटो नॉव्हीशिएट' मध्य दाखल

१९३१- कलकत्याच्या सेंट मेरीज स्कूलमध्ये टीचर म्हणून काम सुरु.

१९३७- याच शाळेत प्राचार्य झाल्या.

१९४८- लोरेटो कॉन्वेंट सोडलं. मोतीझील झोपडपट्टीत शाळा आणि काम सुरु

१९५०- कलकत्यात 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ची स्थापना

१९५२- कालीघाट इथे 'निर्मल हृदय' सुरु झाले.

१९५८- तितघर इथ 'गांधीजी प्रेम्नीवन' हि कुष्ठरोग्यांची वसाहत सुरु झाली.

१९६०- कलकत्या बाहेर काम वाढवायला रोमची परवानगी. पाहिलं हाऊस दिल्लीला सुरु.

१९६२- भारत सर्कर्ण पद्मश्री बहाल केल. याच वर्षी मॅग्सेसे अवॉर्ड मिळाल.

१९६३- 'मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी' हि सेवासंस्था सुरु झाली.

१९६५- भारताबाहेर पाहिलंहाऊस व्हेनेझुएला या गरीब देशात सुरु.

१९६८- खुद्द पोप याच्याच शहरात व्हॅटिकन सिटी मध्ये हाऊस सुरु.

१९७०- लंडन मध्ये मदर च्या सेवेचा झेंडा फडकला.

१९७१- एकाच वेळी चार जागतिक सन्मान लाभले.

१९७२- जवाहरलाल नेहरू सामंजस्य पुरस्कार,

१९७५- फाओचे सेरेस सुवर्णपदक.

१९७७- केम्ब्रिज विद्यापीठाची डॉक्टरेट. निर्मल हृदय चा रौप्य महोत्सव.

१९७९- नोबेल शांतता पुरस्कार.

१९८३- ब्रिटीश राजघराण्याचा ऑर्डर ऑफ मेरीट किताब. पहिला हार्ट अॅटॅक.

१९८५- युनोन तयार केलेला 'मदर टेरेसा' हा पूर्ण लांबीचा चित्रपट युनोच्या इमारतीत प्रदर्शित. मदर स्वतः उपस्थित.

१९८६- पोप जॉन पॉल दुसरे यांचे मदर हाऊस व निर्मल हृदय ला भेट.

१९८९- दुसरा हार्ट अॅटॅक.

१९९२- रोमचा दौरा.

१९९३- राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर.

५ सप्टेंबर १९९७- मदर टेरेसा हार्ट अॅटॅक मुळे मदरहाऊस मध्ये कालवश.

संदर्भ-

१. मदर टेरेसा - प्रतिमेच्या पलीकडे.. (१९१०-१९९७)- अॅन सेबा अनुवाद- अनंत बेदरकर.

२. मदर टेरेसा- सौ आशा कर्दळे.

३. मराठी विश्वकोश-https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=10319

अनुजा कुलकर्णी.