Terms Conditions - 2 books and stories free download online pdf in Marathi

टर्म्स अॅन्ड कंडीशन्स... - २

टर्म्स अॅन्ड कंडीशन्स

पार्ट २

नेहा चा कंपनीत पहिला दिवस होता... कंपनीत तिच काम सुरु झाल. पाहता पाहता बरेच दिवस गेले! ती कंपनीत मोठ्या पदावर पोचली. एक दिवस आई बोलायला लागली,

"नेहा, तुला आत्ता वेळ आहे का ग?"

"आहे कि... काय झाल सांग!"

"निवांत वेळ हवाय मला.. जरा बोलायचं महत्वाच!"

"बोल... पण प्लीज पटापट बोल! सध्या काम इतकी वाढलीयेत! पोझिशन वाढली कि काम सुद्धा वाढत.. डेड लाईन्स असतात... काम वेळेत होण गरजेच असत! त्यामुळे निवांत बसून बोलायला वेळ नाही! आणि खरच, मी एन्जॉय करते काम.."

"मनासारखं आयुष्य जगती आहेस ना ते महत्वाच! आणि जास्ती वेळ नाही घेत.. डोंट वरी! मला सांग, तू लग्नाबद्दल काय विचार केला आहेस?"

"लग्न?" प्रश्नार्थक मुद्रेनी नेहा नी आईकडे पाहिलं..

"हो हो तुझ लग्न! तुला कोणी आवडतो आहे का? म्हणजे तू कोणाशी ठरवलं असशील तर सांग.. आम्ही घर आणि मुलगा बघणार फक्त! बाकी आमच्या काही अपेक्षा नाहीत!"

"नो नो आई... लग्न बिग्न मी विचार पण नाही केलाय! काम इतक आहे! कुठे वेळ आहे मला ह्याविषयी विचार करायला?"

"म्हणजे?"

"म्हणजे लग्नाचा विचार नाही केलाय! आणि मला कोणी आवडत नाही! पण आत्ता हा विषय का? परत माझ्या लग्नाच्या मागे का लागलाय? माझ्या वागण्यात काही चुकतंय का?"

"नाही नाही... तुझ वागण एकदम छान आहे! आता तू एकदम जबाबदार झाली आहेस! पण आता लग्नच वय झाल ना? म्हणून आपल विचारलं... माझ विचारण अस होत कि तुला लग्न नाही करायचं?"

"अस काही नाही ग आई.. लग्न करायच नाही अस नाही! पण सध्या विचार नाही केलाय! आणि माझ्या काही टर्म्स, कंडीशन्स आहेत! म्हणजे मला माझ आयुष्य माझ्या पद्धतीनी जगायचं आहे! माझी काही स्वप्न आहेत! मला कंपनीत खूप पुढे जायचं! ते माझ खूप मोठ स्वप्न आहे! लग्न झाल कि मुल बाळ आलीच! परत घरातलं काम.. मला मुलांची आवड आहे पण मी स्वतः हे सगळ किती सांभाळू शकेन आय डाऊट! मी माझ आयुष्य कस हवय त्याचा विचार केलाय! त्यात घर काम तर मला जमण अवघड आहे! माझा तसा पिंड नाहीच आहे! पण जर कोणी असा मिळाला जो माझी जागा घरात घेऊ शकेल तर मी लग्नाचा विचार करू शकते! आणि माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगता आल पाहिजे!"

"ओके.. मग शोधू अस कोणी मिळतंय का?"

"हाहा.. आई तू काय बोलती आहेस! स्वतःच करिअर सोडून कोण मुलगा घर सांभाळेल? कोणी अश्या टर्म्स वर लग्न करणारच नाही आई.. आणि मी मला वाटेल तेव्हा काम बंद केला तर त्याला जॉब मिळाला पाहिजे! म्हणजे तो चांगला शिकलेला सुद्धा पाहिजे! शिकलेला असेल तर घरात बसून काम करणार नाही... आणि परत त्याचा इगो मध्ये आला तर परत नात्यात दुरावा.. कोणी सांगितलय इतक? त्यापेक्षा मी एकटीच राहते.. तेच बर! आणि मी काम करून सुखी.. समाधानी असते! जे जमणार नाही त्याच्या नादी कशाला लागू? आणि लग्न केल कि अपेक्षा असतातच सासरच्या लोकांच्या कि घर काम कराव इत्यादी इत्यादी! मला ते खर नाही जमणार.. उगाच इतक्या लोकांची आयुष्य खराब कशाला करू? मी एकटीच बरी! आणि मी लोकं काय म्हणतील ह्याचा विचार करत नाही... आयुष्य माझ आहे.. ते मी माझ्या मनाप्रमाणे जगेन! अगदी कधी वाटलच आपल बाळ हव आहे तर एक मुल दत्तक घेता येईल.. मुल दत्तक घेतलं कि मात्र मी त्या बाळाकडे पूर्ण लक्ष देईन हे खात्रिणी सांगते!! लोकांना दाखवायला नाही जगणार मी माझ आयुष्य! मला प्रत्येकक्षणी आनंद घेत जगायचं आहे!"

"तुझे विचार खूपच फॉरवर्ड आहेस नेहा! मला न्हवत माहित हे! पण तुला आयुष्यात काय हव आहे ते तुला माहिती आहे हि एक खूप छान गोष्ट आहे! आणि तू बराच विचार करून ठरवलेलं दिस्तीयेस तुला कस आयुष्य हव आहे! नेहा तू इतकी मोठी कधी झालीस! स्वतःचे निर्णय स्वतः घेतेस.. पण मला एक सांग, तुला कोणाची उणीव नाही वाटणार आयुष्यात? म्हणजे आयुष्य एकटीन जगण सोप्पा नाहीये. तुला पण साथ लागेलच न? आम्ही तुझ्याबरोबर नेहमीच असणार नाहीयोत! तुला एकटिनी आयुष्य जगता येईल?"

"मला माहिती आहे आई एकटीनी आयुष्य जगण खरच खूप अवघड आहे! पण मी कोणाच्या दबावाखाली नाही राहू शकत! माझ आयुष्य मला माझ्या पद्धतीनी जगायचं आहे! आत्ता मला कोणाची साथ नको आहे! आणि कोणाची साथ मिळाली तर त्यानी मला समजून घेतलं पाहिजे! मी पण त्याला समजून घेईन पण त्यानी म्हणल म्हणून मी माझ्या कोणत्याही स्वप्नापासून लांब नाही ठेवलं पाहिजे! महत्वाच म्हणजे नात्यात इगो ला जागा न ठेवणारा असला पाहिजे. नात्यात इगो वाईटच! तुझ्यात आणि बाबांमध्ये कुठे आहे इगो! तुला त्यांनी तुला हव तस वागण्याची मोकळीक दिली आहे आणि तू सुद्धा! म्हणूनच तुमच नात इतक मोकळ आहे... थोडी कुरबुर ठीके..त्यानी नाती फुलतात! अस नाही कि हो ला हो म्हणल पाहिजे! प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहेच! पण शेवटी एकमेकांना समजून घेण अत्यंत महत्वाच आहे!"

"सुंदर आहेत नेहा तुझे विचार.. तुझे विचार इतके प्रगल्भ असतील अस मला कधीच वाटल न्हवत! मी शोधते असा मुलगा! कामालाच लागते आता!"

"हाहा.. आई.. तू पण ना! तुला मला एकटीला का राहून द्यायचं नाहीये? मला स्वतंत्रपणे जगायचं आहे. खर! आणि अशी स्वप्न बघू नकोस कि मला जस हव आहे तस आयुष्य माझ्याबरोबर कोणी जगायला तयार होईल! मला तर अशक्य वाटत असा कोणी भेटण! हाहा! मला सुद्धा कल्पना आहे माझ्या अटी पूर्ण होण्यासारख्या नाहीयेत!"

"हो हो. मला ते आता कळलय.. पण अगदीच अशक्य नाहीये! कोणीतरी खूप समजूतदार, नात्यांची किंम्मत असणारा मिळू शकेलच कि.. आधीपासूनच नकारात्मक विचार का करायचा? मी पाहते कोणी मिळतोय का ज्याच्या घरात तुला स्वतंत्र आयुष्य जगता येईल अस घर शोधते!"

"हाहाहा! तू किती आशावादी आहेस आई! कर ट्राय.. पण माझ्या अपेक्षा सांगायला विसरू नकोस! हाहा! एक जरी अपेक्षा ऐकली तरी नकार येतो ना ते बघ!" नेहा म्हणाली..

"हो हो... आधी अपेक्षा सांगेन! हाहा!" आई नी हसत उत्तर दिल...

दोघींचं बोलण संपल.. आणि आई तिथून गेली! नेहा च्या मनात विचार आला, "खरच लग्न इतक महत्वाच आहे? मला कोणाच्या साथीची गरज आहेच? खरच मला एकटीनी आयुष्य जगता येणार नाही? आणि मी कामाला खूप जास्ती महत्व देते आहे?"

नेहा ला नुसते प्रश्न पडत होते. पण त्याची उत्तर मात्र तिला सापडत न्हवती. तिला स्वतःच्या निर्णयावर शंका देखील आली आणि ती अजूनच गोंधळून गेली. आपण फार टोकाचा विचार करतो आहोत असे सुद्धा विचार तिच्या मनात आले. शेवटी नुसत्या प्रश्नांना कंटाळून तिनी विचार करायचं सोडून दिल.. आणि परत कामाला लागली..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नेहा च्या आईनी मुल शोधायला सुरवात केली. तिला खात्री न्हवती कि नेहा ला हवा आहे तसा मुलगा मिळेल का पण तरी तिनी प्रयत्न चालूच ठेवले. नेहाच्या अटी मान्य असलेला एकही मुलगा नेहाच्या आईला मिळाला न्हवता. तिकडे नेहा च बिझी आयुष्य चालू होत. तिच्या कंपनीत तिच्या हाताखाली बरेच लोकं कामाला होते. तिच्या हाताखाली असलेला मुलगा एक दिवशी तिच्याशी बोलायला आला.

"नेहा मॅडम, २ मिनिट तुमच्याशी बोलू का?"

"तू रोहन ना? बोल कि... कामात काही प्रॉब्लेम्स येतायत का?"

"नाही मॅडम.. कामाबद्दल नाही सांगायचं! मला तुमच्याकडे बघून खूप प्रेरणा मिळते! तुम्ही ज्या पद्धतीनी काम करता करता ती खरोखर वाखाखण्याजोगी आहे. तुम्ही किती हि प्रॉब्लेम आले तरी त्यावर उत्तर शोधतच.."

"ओह.. थॅंक्यू रोहन!! अस कौतुक ऐकल कि खूप छान वाटत... काम केल्याच समाधान सुद्धा मिळत!" नेहा ला कामच कौतुक झाल्याबद्दल आनंद झाला..

"बरेच दिवस तुम्हाला हे सांगायचं होत.. सांगू का नको असा विचार करतांना शेवटी आज बोललोच!" रोहन म्हणाला

रोहन च बोलण ऐकून नेहा हसली.. आणि बोलली,

"आपली टीम खूप चांगली आहे... सगळेच चं काम करतात... तू पण! आणि आता चला काम पूर्ण करायचं ना? कि फक्त गप्पा?"

"नो नो.. काम पूर्ण करायचं ना! हाहा..." दोघ हसायला लागले

त्यादिवशी त्यांच संभाषण संपल पण त्यांनतर हळू हळू दोघांमधला संवाद वाढायला लागला आणि जवळीक सुद्धा. दोघ एकमेकांबरोबर जास्ती वेळ राहायला लागले. दोघ एकमेकांना नीट ओळखायला लागले. दोघांच्या मधला संवाद एकदम अरे तुरे वर आला.. दोघांना एकमेकांची कंपनी आवडायला लागली होती.. रोहन चे आई वडील काही दिवसांपूर्वीच गेले होते. त्यामुळे त्याला कामाची सवय होती. आणि त्याच्यात इगो सुद्धा न्हवता. तो मिळालेल्या आयुष्यावर भरभरून प्रेम करत होता. तो जे करायचा ते मनापासून करायचा! त्याला लोकांची किंमत होती आणि त्याच्या बोलण्यावरून, वागण्यावरून सुद्धा ते जाणवायच! एक दिवस दोघ हॉटेल मध्ये भेटले... दोघांनी कॉफी मागितली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि तेव्हा रोहन नी न राहवून नेहा ला विचारलच,

"नेहा.. तुझ्याशी महत्वाच बोलायचं! शांतपणे ऐकून घेशील?"

"हो रोहन.. सांग कि! कामाबद्दल असेल तर इथे नको! उद्या बोलू ऑफिस मध्ये!"

"नो.. वेगळ आहे... आपल्या दोघांबद्दल? आपण दोघ बरेच दिवस झाले एकमेकांना ओळखतो आहे! आधी आपल नात वेगळ होत पण आता मोकळ झालाय ना आपल नात? मॅडम वरून नेहा पर्यंत चा प्रवास खूप छान होता... फुलाच्या पाकळ्या उमलाव्या तशी तू मला समजत गेलीस! आणि तू मला अधिकाधिक आवडायला लागलीस! आय रिस्पेक्ट यु.." रोहन बोलला..

"आय नो... पण हे सगळ आत्ता का बोलावस वाटतंय? आणि आपल्या दोघांबद्दल काय सांगायचं आहे?" रोहन च बोलण ऐकून नेहा विचारात पडली..

"हो... बरेच दिवस विचार करतोय आणि आज बोलतोय! मला माहित नाही तू कशी रिअॅक्ट करशील.. पण आज सांगण गरजेच आहे! आज नाही सांगितलं तर कधीच सांगू शकणार नाही!! आणि तू तुझ मत सांगावस अस मला वाटत.."

"तू सांग तर रोहन.. प्रस्तावना पुरे आता..." नेहा हसून बोलली..

रोहन नी एक दीर्घ श्वास घेतला आणि तो बोलायला लागला..

"नेहा मला तू आवडतेस! मला तुझ्याशी लग्न करायचं आहे!" रोहन इतक बोलला आणि त्यानी डोळे घट्ट मिटले... त्याला कल्पना होती नेहा त्याच्यापेक्षा जास्ती शिकलेली होती आणि वरच्या पदावर काम करत होती.. त्याला नेहाची प्रतिक्रिया पहायची हिम्मत न्हवती! नेहा ला सुद्धा रोहन अस काही सांगेल अशी अपेक्षा न्हवती... ५ मिनिट नेहा काहीच बोलली नाही... रोहन तिच्या उत्तराची वाट पाहत होता पण काहीच उत्तर नाही मिळाल्यामुळे त्यानी डोळे उघडले आणि नेहा कडे पाहिलं... नेहा एकदम सिरिअस झाली होती.. ती कोणत्यातरी विचारात असल्याच रोहन ला जाणवलं...

"नेहा.. मला माहिती आहे तुला अश्या प्रश्नाची अपेक्षा नसेल कदाचित! सो तू उत्तर नाही दिलस.. पण प्लीज सांग! तुझ उत्तर काही असेल तरी ते सांग! नाही असेल तरी नो प्रॉब्लेम! आपण मित्र राहूच!" रोहन म्हणाला

"काय उत्तर हवाय तुला रोहन? मी तुला मला काय वाटत ते सगळ सांगितलं आहे! म्हणजे तू मला नीट ओळखतोस! आणि ते एक मित्र म्हणून! म्हणजे मी कस आयुष्य जगायचं ठरवलं आहे ते तुला सगळ सांगितलं आहे!! मी कशी आहे ते तुला माहिती आहे.. तरी तुला माझ्याशी लग्न करायचय? मला तर वाटल होत आपण फक्त चांगले मित्र आहोत! महत्वाच म्हणजे, माझ्या अटी जगावेगळ्या आहेत! त्याची मला सुद्धा जाणीव आहे! आणि कोणाला माझ्या टर्म्स आणि कंडीशन्स मान्य असतील अस मला वाटतच नाही! म्हणूनच मी एकटी राहायचा निर्णय घेतला होता. सगळ्यांनीच लग्न केल पाहिजे अस थोडीच असत? लग्न हा आयुष्याचा एक टप्पा आहे हे खर पण जर कोणाला थोडा वेगळा विचार करून जगायचं असेल तर जगू नये? आयुष्य मनाप्रमाणे जगता आल पाहिजे अस मी खूप आधी पासून ठरवलं होत!"

"नेहा नेहा... आय नो एव्हरीथिंग... तुझ्या टर्म्स आणि कंडीशन्स जगावेगळ्या असल्या तरी मी त्यांचा आदर करतो! अस थोडी आहे कि फक्त बाईनीच तिच मन मारून रहाव? तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहेच कि.. प्रत्येक व्यक्ती आपले निर्णय घेण्यासाठी फ्री आहे! तुला स्वतः ला काय हवाय हे माहिती आहे! खूप कमी लोकांना ते माहित असत.. मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे! खरच! आणि मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत! मनापासून सांगतो आहे! दर वेळी बाई मन मारून जगते.. आणि पुरुष मनमानी करतात.. हे कोणीतरी कुठेतरी बदलायला पाहिजे... मला घर सांभाळायला काही प्रॉब्लेम नाही! मी ते मनापासून केल तर कुठे बिघडलं? तू खूप हुशार आहेस! आणि तू खूप पुढे जावस अशी माझी मनापासून इच्छा आहे.... आणि माझ बरच शिक्षण झाल आहेच सो तुला कंटाळा आला कि मी काम करू शकतोच!"

नेहा ला रोहन च बोलण ऐकून काय बोलाव सुचेना.. तिला अस कोणी बोलेल अस वाटलच न्हवत. तिला खात्री होती कि तिच्या अट कोणाला मान्य नसतीलच! पण रोहन नी तिला लग्न बद्दल विचारलं! तिचे डोळे पाणावले.. तिला अस कोणी भेटेल अस वाटतच न्हवत!

"रोहन.. मनापासून बोलतोयस? कि लग्न होईपर्यंत हे विचार आणि नंतर बदलणार?" नेहा नी खात्री करण्यासाठी विचारलं...

"तुझा विश्वास नाही? खर सांगतो.. मी मनापासूनच बोलतो आहे.. आणि मला काहीच हरकत नाही! मला कोणतही काम करायची लाज वाटत नाही! आई बाबा अचानक गेले आणि तेव्हापासून मीच करायचो सगळ.. ते आपल्या दोघांसाठी केल तर कुठे बिघाडल? संसार आपला असेल.. मग तू घर काम केल किंवा मी केल! आपण एकच असू लग्न झाल्या नंतर! संसार आपला असेल आणि आपणच तो संसार कसा फुलेल हे पहाण गरजेच असत... शेवटी काय, आपला संसार सुखाचा होणा महत्वाच! आपले रोल थोडे बदलतील इतकच!"

नेहा मनापासून हसली.. तिला काय बोलाव सुचेना.. पण ती बोलली,

"तू सुद्धा काम करू शकतोस! म्हणजे तू घरी बसून रहावस अस मला सुद्धा वाटत नाही. पण मला मदत करण अपेक्षित आहे! म्हणजे मी स्वयपाक करतीये आणि तू नुसता बसून हे नाही बर चालणार! हाहा!" नेहा ला मनापासून हसू आल..."पण एक नक्की, घर आपण दोघांनी सांभाळायच आहे हे विसरू नकोस! कोण काय जबादारी उचलतो आहे त्यापेक्षा एकमेकांची साथ आहे हे महत्वाच! आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर बरोबर राहायचं वचन दे.."

"हो हो.. वचन देतो तुला! संसार सुखी होण्यासाठी मी वाट्टेल ते करेन नेहा! यु डोंट नो.. मी खूप छान सांभाळतो घर! तुला कळेलच ते लवकर! आपले रोल्स थोडे बदलू शकतात... म्हणजे घरी मी बॉस आणि बाहेर तू बॉस! हाहा!" रोहन बोलला.

रोहन च बोलण ऐकून नेहा थक्क झाली! तिच्या डोळ्यासमोर तिच्या वेगळ्याच पण सुखी संसारच चित्र आल.. इतरांपेक्षा तिचा संसार वेगळ असणार याची तिला जाणीव होती पण तो संसार चांगला असेल याची सुद्धा नेहा ला खात्री झाली. तिच्या चेहऱ्यावर समाधान आल.. आणि डोळ्यांनी तिनी रोहन ला होकार सांगितला! रोहन ला नेहा चा होकार कळला... आणि तो खुश झाला! नेहा साठी सगळंच अनपेक्षित होत! पण हे सगळ खर होत! तिला तिच्या मनासारखा राजकुमार मिळाला होता. रोहन आणि नेहा दोघ एकदम खुश झाले कारण रोहन नी नेहा ला समजून घेतलं हे महत्वाच होत. रोहन नी नेहा च्या टर्म्स अॅन्ड कंडीशन्स मान्य केल्या! आणि नेहाला सुद्धा रोहन आवडत होता! हि गुड न्यूज आईला सांगायला नेहा नी आईला फोन लावला..

"हेलो.." नेहा इतकाच बोलली आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी आल!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com